Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पावाबरोबर किंवा साध्या
पावाबरोबर किंवा साध्या भाताबरोबर खाता येईल अशी सरसरीत भाजी सुचवा.
आणि त्याबरोबर बरे पडेल असे सॅलड किंवा रायता.
विद्रोही मेनू वेलकम!!
रस्सा (टो, कां, ब, म, फ्लॉ
रस्सा (टो, कां, ब, म, फ्लॉ इ.,), उसळी (मटार, छोले, चवळी, राजमा, मसूर इ.),
नारळाच्या दुधातल्या उकडलेल्या भाज्या (बटाटा, घेवडा, रताळे, मटार, काकडी, भोपळा), काजू - वरून साजूक तुपाची कढीपत्ता, मिरची, जिर्याची फोडणी.
दाल-पालक, पालक-पनीर, पनीरच्या ग्रेव्ही वाल्या भाज्या, कोफ्ता करी, मेथी मटर मलई, बटाट्याच्या विविध प्रकारच्या रसभाज्या, पंजाबी पालक, तुरिया पात्रा वाटाणा, मज्जिगे हुळी, मसालेदार दुधी.
पारसी पद्धतीचे धानसाक / धानशाक देखील करता येईल.
सध्या मार्केटमध्ये इतक्या मस्त भाज्या मिळत आहेत की बास! त्यामुळे सॅलडसाठी भरपूर पर्याय आहेत. अगदी गाजर, मुळा किसून त्यात टोमॅटो, मोड आलेले मूग, डाळिंब दाणे इत्यादी घालून चाट मसाला, सैंधव घातले तरी बास!
जरा अजून वेगळं सुचव की
जरा अजून वेगळं सुचव की काहीतरी.
झोल प्रकार ट्राय केलेस का
झोल प्रकार ट्राय केलेस का कधी?
डिमेर झोल (वरदा बहुतेक ऑथेंटिक कृती सांगेल - फक्त मोहरी तेला ऐवजी नेहमीचे तेल),
या निशामधुलिका.कॉम साईटवरच्या काही थोड्या वेगळ्या भाज्या : बेबी कॉर्न मटार करी, शेपू-पालक-स्वीट कॉर्न साग, टोमॅटो सालन.
माझ्या पुरचुंडीतल्या वेगळ्या रेसिपीज संपल्या!!
नाही केलेत. बघते. पण हे
नाही केलेत. बघते. पण हे शाकाहारी आहे ना? मी नॉनव्हेजमधे हात घातलेला नाही कधी.
बघते. नाहीतर सकाळी जाऊन कंद
बघते. नाहीतर सकाळी जाऊन कंद काय मिळतात ते बघणार आणि खतखते करणार. सकाळपासून केलेले खतखते संध्याकाळी जास्त यम्मी लागेल.
डिमेर झोल अंड्याचे आहे, कधी
डिमेर झोल अंड्याचे आहे, कधी काळी कॉलेजात असताना करायचे मी... सोप्पे आहे. बाकी पाक कृती शाकाहारी.
अंडं थोडीच नॉनव्हेज पण हे
अंडं थोडीच नॉनव्हेज
पण हे अंडाकरीसारखंच लागत असेल का?
हो ही अंडाकरीच... फक्त बंगाली
हो ही अंडाकरीच... फक्त बंगाली पद्धतीची! जरा वेगळी चव आहे.
डबल पोस्ट
डबल पोस्ट
नी, थोडी वेगळी व्हर्जन
नी, थोडी वेगळी व्हर्जन अंडाकरीची. आम्ही साधारणपणे कांदा टोमॅटो (हवी असल्यास हिरवी मिरची) पेस्ट करून घेतो. बटाटे अर्धवट उकडून घ्यायचे किंवा तेलात सोनेरी परतून घ्यायचे. आणि तेजपाता, जिरेपूड, हळद आणि ही पेस्ट घालून बटाटे आणि उकडलेली अंडी जरा सवताळून घ्यायची. हवं तेवढं पाणी, मीठ घालून बटाटे पूर्ण शिजेपर्यंत उकळून घ्यायचं. आणखी एक्स्ट्रा गरम मसाला घालू शकतेस. मध्यंतरी एकदा मस्तपैकी मटार आणि कांद्याच्या मोठ्या फोडी घालून साबांनी केला होता तो प्रकारही छान लागला. आम्ही यात साधंच तेल वापरतो. मोहरीचं नाही.
मला अंडाकरी मुळात अजिबात आवडत
मला अंडाकरी मुळात अजिबात आवडत नाही.
मग आधीच सांगायचं ना!! भरल्या
मग आधीच सांगायचं ना!! भरल्या पोटी जडावलेल्या बोटी टायपायचे कष्ट नसते का वाचले?
अरे अंडाकरीची रेसिपी दे कधी
अरे अंडाकरीची रेसिपी दे कधी म्हणाले होते मी?
चवळिची उसळ(छ्ले मसाला
चवळिची उसळ(छ्ले मसाला घालुन)
छोले मसाला/चणा मसाला.
आलु-टमाटर
मेथि-मलई मटर( रसोई मॅजिकचा मसाला घालुन पटकन होते)
हे थाई सॅलेड फार मस्त लागते..
http://thaifood.about.com/od/thaisnacks/r/cucumbersalad.htm
मी खतखते करायचे नक्की केलेय.
मी खतखते करायचे नक्की केलेय. यावेळेला सुमेधाच्या पद्धतीने खोबरे, कांदा जाळून करून बघणारे. खतखत्याबरोबर जाईल असं सॅलड सुचवा. काही सुचले नाही तर कां-टो कोशिंबीर आहेच सोप्पी.
बरोबर दोदोल. अखेर गोव्याहून माडाचो सूर आलेला आहे.
पापडाची कोशिंबीर कर - पापड
पापडाची कोशिंबीर कर - पापड गॅसवर भाजून त्यावर दोन थेंब खोबरेल तेल घाल अन सगळिकडे पसरव.
पापडाचा चुरा , बारीक चिरलेला कांदा, हि मिरची ,ओले खोबरे अगदी वाढायच्या वेळेस एकत्र कर.
नी खतखत पावाबरोबर कस लागेल?
नी खतखत पावाबरोबर कस लागेल? तु गोव्याला बनवतात तशी हिरव्या वाट्याण्याची दबदबीत उसळ पाव पण बनवू शकतेस.
वा मेधा मस्त आयड्या..
वा मेधा मस्त आयड्या.. पापडाची कोशिंबीर फायनल. अशीच कोशिंबीर रूचीच्या नाचणी चिप्सची पण करता येईल ना?
)
(ही चकण्यातच संपायची जाम शक्यता दिसतेय मला
रिमा, मी बर्याचदा खाल्लंय खतखतं पावाबरोबर (ब्रेडबरोबर नाही). पावभाजीचे पाव. मस्त लागतं.
मेरेको आवडता है. नवरेकोभी.
खतखतं शिजायला ठेवलंही.
आज शूम्पीने पाठवलेल्या ऑलस्पाइसला न्याय देऊन फ्रॉम स्क्रॅच अॅपल सायडर बनवतेय. ते ही प्रकरण गॅसवर चढवून आलेय. होप इट वर्क्स. मुंबईत चक्क गरम गरम सायडरयोग्य गारवा आहे. निदान संध्याकाळी तरी.
माझ्याकडे विकेंडला १५ मोठे १०
माझ्याकडे विकेंडला १५ मोठे १० छोटे डिनर ला यायचेत.
वेल्कम कोल्ड्रींक्स, केक, चिप्स, मिक्स फ्रुट स्टिक्स हे असेलच.
स्टार्टर वेज पफ, सुरळीच्या वड्या आणि दोन चटण्या तिखट गोड
मेन कोर्स ..वेज पुलाव, बुंदी रायता, गुलाबजाम, पापड, सॅलड.
ह्याच्या बरोबरीने फरसाण मिसळ पाव योग्य वाटेल का ? दुसरी कुठली भाजी केल्यास.. रोटी/ किंवा पुर्या कराव्या लागतील. मला तळण नकोय.
मिसळी ला तिखट कट वेगळा बनवेन तरीही..बच्चे कंपनी साठी चिज पिज्झा ठेवतेय.
जेवणानंतर आईस्क्रिम आहेच.
मेन जेवणाला मिसळ ऐवजी दुसरा काही पर्याय सुचवा लोखो.. जो लव्कर होईल. आणि जास्त भांडी लागणार नाहीत असा.
मटार उसळ चालेल?
मटार उसळ चालेल?
मिसळ उसळ ऐवजी अजुन दुसरे काय
मिसळ उसळ ऐवजी अजुन दुसरे काय ? जे पाव/ ब्रेड बरोबर खाता येईल ?
पावभाजी?
पावभाजी?
पावभाजी कुठलीही मिक्स रस्सा
पावभाजी
कुठलीही मिक्स रस्सा भाजी
पनीर भुर्जी/ अंडा भुर्जी
खतखते
पावभाजी. मी येणार जेवायला
पावभाजी.
मी येणार जेवायला मस्त मेन्यू आहे.
या मामी पावभाजी च कराविशी
या मामी
काय करु समजत नाहीये.
पावभाजी च कराविशी वाटली होती.. पण ब्रेड बटर लाउन भाजा... म्हणून कंटाळा केला. आणि बरिचशी मंडळी पुण्यात राहिलेली आहेत म्हणून महाराष्ट्रीयन किंवा मिसळीचे अप्रूप आहे.
आणि शनिवार असल्या कारणाने चिकन किंवा नॉन्वेज बाद
शेवभाजी
शेवभाजी
डॅफो, बटर स्प्रेने पावाला बटर
डॅफो, बटर स्प्रेने पावाला बटर लाव आणि ओव्हनमधे ब्रॉईलवर ठेव, एका वेळी २०-२५ पाव मस्त क्रिस्पी होतात. अगदी दिड ते दोन मिनीटात.
शेवेची भाजी कर गं. मस्त वाटते
शेवेची भाजी कर गं. मस्त वाटते पार्टीला. स्लाईस ब्रेड पण चालतील त्याबरोबर. आणि दहीबुत्ती कर. किंवा उसळीत एक प्रकार म्हणजे झणझणीत अख्खा मसूर.
डॅफो छोले/काळे चणे पण करता
डॅफो छोले/काळे चणे पण करता येतिल. नुसतेच ब्रेड/पाव बरोबर सर्व्ह करणे ठिक नसेल वाटत तर वरुन कोथिंबिर,शेव्,कांदा,कोथिंबिरिचि/चिंचेची चटणि टाकुन ब्रेड/पाव बरोबर देता येतिल किंवा नुसतेच तंदुरि रोटी बरोबर सुद्धा देता येतिल. मिसळिचे थोडे वेगळे व्हर्जन!
Pages