बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>दही वडा , दही बुत्ती<<
भारतात आहात का? मुसळधार पावसात ?
काहीतरी चमचमीत बरे राहिल. रगडा पॅटीस, छोले- भटुरे/नान. मिसळ वगैरे.

निर्मयी, दहीवड्या ऐवजी एखादा चाट आयटेमही खपून जाईल. समोसा चाट / कचोरी चाट वगैरे. समोसे/ कचोरी बाहेरून ऑर्डर करता येतील. तसाही पावभाजी + दहीवडे मेन्यू चांगलाय.

हो निर्मयी.
तू वडे ताकात भिजवतेस की पाण्यात?
माझ्यामते, वडे तळून काढलेस की पाण्यात किंचीत हिंग मीठ घालून त्यात भिजव. मग पाणी व्यवस्थित निथळून काढून घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिजमधे ठेवून दे. मी इकडे मुंबईतल्या दमट हवेतही असं करते, वडे चांगले राहतात.

गुलाब्जाम आदल्या दिवशी सकाळी करुन ठेवले तर दुसर्या दिवशी संध्याकाळ पर्यंत रहातील का? इथे सध्या खुप उन्हाळा आहे. का मला ते लगेच फ्रीज मधे ठेवावे लागतील?

थंड झाले की लगेच फ्रिजमध्ये ठेवा. दुसर्‍यादिवशी संध्याकाळी एक तोडून पहा जर आत घट्ट पीठ लागल तर थोड गरम करा पाहुणे येण्या अगोदर पीठ लागत नसेल तर तसच सर्व्ह करा. Happy

पावभाजी, गुलाब्जाम, चिप्स,दहीवडे, ( एखादा भात प्रकार?) ,ज्युस, केक असा मेनु मी ठरविला आहे.
१-२ वयोगटातील आणि साउथ कडची लोक असल्यामुळे भात प्रकार ठेवावा का ते कळत नाहीये. कुठ्ला ठेवावा? नाहीतर मग सोपा लहान१-३ वयोगटातील मुलांना जमेल असा काय प्रकार ठेउ. आणि प्लिज मला सगळ्याचा प्रमाण हवे आहे.
१०-१२ बायका, १०-१२ ४-६ वयोगटातील मुले, १०-१२ १-२ वयोगटातील मुले.

दहीवडे साठी डाळ कीती आणि केव्हा भिजवु. कीती वडे लागतील साधारण? दही कीती लागेल? दहीवड्यांच्या पाककृती ची लिंक मिळेल का?
पावभाजी साठी भाज्यांचे प्रमाण कीती घेउ?
गुलाबजाम २ पॅकेटचे पुरतील का? कीती लागतील?

आणि गुलाबजाम मी आदल्या दिवशी सकाळी तळुन घेइन आणि त्याच उरलेल्या तेलात दहीवडे आणि पापड तळीन पण ते रात्री तर ते चालेल का? सकाळ चे उरलेले तेल मी रात्री वापरले तर चालेल का?

खुपच प्रश्न विचारले आहेत. पण प्रथमच करते आहे आणि १टीच करणार आहे त्यामुळे खुप टेंशन आले आहे.

nirmayi, Happy
भात प्रकार नका ठेवू कारण तुम्ही संध्याकाळी स्नॅक्सला बोलवत आहात. जेवायला बोलावल असत तर भात ठेवला असता तर चालल असत स्नॅक्ससाठी भाताच्या प्रकाराची गरज नाही. शक्य असेल तर पाणीपुरी ठेवा. पाणी आदल्या दिवशी करुन ठेवता येईल.

गुलाबजाम तूपात तळा.
उडदाची डाळ ७-८ तास भिजत घाला.
प्रमाणासाठी दिनेशदांना विपू करा, लगेच उत्तर देतील.
पा. भा. बटरमध्ये करा.

गुलाबजाम २ पॅकेटचे पुरतील का?>> हो पुरतील.
निर्मयी, वड्याचे प्रमाण वरील पाकृ मध्ये आहेच.
भाज्यांबरोबर जरा जास्त बटाटे शिजवून घे. ऐनवेळी पाभाचे प्रमाण वाढवण्यासाठी सोपे जाते. भाज्या उकडून झाल्यावर त्यातील जास्तीचे पाणी टाकून देऊ नकोस. पाभा १-२ वेळा गरम केली कि कधी कधी दाट होते तेव्हा हे पाणी त्यात टाकू शकतेस.

कडक उन्हाळा असेल तर दही आंबट होण्याची शक्यता आहे, ते चाखून पहा मात्र सर्व्ह करण्या अगोदर.
आणि हो माझ्या मते भात नकोस ४ वाजता.. दहीवडा बेस्ट.. उरला तरी फ्रिजात ठेवून खाता येईल.

हाय
आमच्या कडे माझ्या सासुबाईच्या भिशीच्या बायका येणार आहेत. साधारण १४ - १५. पैकी २-३ जणी बरोबर लहान मुले पण असतील.
वेळ संध्याकाळचीच असणार आहे.
तर मला या साठी काही मेनु ठरवायची आहे, पण सुचत नाहिये.

१ गोड आणी १ - २ तिखट,नमकिन असे पदार्थ करायचा विचार आहे.
प्लिज काही तरी सुचवा.

मला सुचलेले काही ऑप्शन्स.

पावभाजी सोबत गुलाब्जामुन, किंवा मुग हलवा करावा.
किंवा विज मंचुरियन व त्यासोबत जाईल असे एखादे स्वीट. असा पण एक विचार आहे.

पावभाजीच कर. मुलंपण खातील. सोबत कट मिरचीवडा आणि गोड चटणी/भेळपण चालेल. चाट सर्वांना आवडते. गोडात गाजर हलवा, गुलाबजाम, शिरा, रसमलाई किंवा एखादी बर्फी, एखादं आईसक्रीम. अजून वेळ असेल तर फळांचे तुकडे काडीला लावून ग्रिल करणे, त्यावर शुगर सिरप ड्रिझल करणे/पिठीसाखर भुरभुरणे.

छान

दोन अमेरिकन, चार कोरीयन, एक चायनीझ आणि ३ तेलुगु, २ मराठी, सात आठ तमिळ आणि कानडी, १ ओडिया असे सर्व बापये मंडळीना घरी स्नॅक्स अथवा डिनरसाठी बोलवायचे आहे. काय मेनू ठेवू ते अजिबात सुचत नाहीये. साऊथ इंडियन काहीही नको असा निरोप अमेरिकनकडून आलाय. कोरीयन चायनीझ लोकाना काय आवडेल ते माहित नाही. तमिळी लोक साऊथ इंडियन पदार्थ नसतील तर जास्त काही खात नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे इडली अथवा मेदूवडे करायचे ठरवतेय. डिनर ठरलं तर रस्सम भात करेन.

इतर लोकासाठी माझ्या डोक्यात सध्या पावभाजी/वडापाव्/मिसळ/साबुदाणा खिचडी/छोले/पास्ता/बेक्ड व्हेज्/स्टर फ्राईड व्हेज्/मांचुरीअन/पुलाव्/मसालेभात एवढेच पदार्थ फिरत आहेत. जरा अजून काही सुचवाल का?

मोमोज, स्टर फ्राईड राईस (भाताचा प्रकार!) किंवा पुलाव, रस्सम/ सार / सूप, मिक्स भाज्यांचे लोणचे, स्प्राऊट चाट असेही ठेवता येऊ शकेल.
यासोबत फुलके/ पोळ्या - आलूजिरा / बटाटा - फ्लॉवर भाजी / स्वीट कॉर्न - कांदा - टोमॅटो- सिमला मिरची-पनीर भुर्जी सोबत. किंवा त्या ऐवजी मेथीपराठे - दही / बुंदी रायते.

नंदिनी, सशलने इथे 'मेथीपुलाव' लिहिला आहे. मस्त होतो. वेगळ्या चवीचा आणि नियमितपणे न होणारा हा पुलावप्रकार सगळ्यांना आवडतो असा अनुभव आहे.

मंजूडी, मेथीपुलाव बघते. सोबत अजून थोडे प्रकार सुचवा की.

चायनीज लोकासाठी काय बनवू हा सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे.

त्या चिनी लोकांना सरप्राईज स्वीट डिश म्हणून आपले मोदक कर की ( मोमोज वाटेल ). बाकी वर सुचवल्याप्रमाणे मेथी पुलाव/ पालक पुलाव किंवा कॉर्न राईस/ मसालेभात/ तोंडलीभात नाहीतर मिक्स भाजी पुलाव चालेल( फरसबी,मटार, फ्लॉवर घालुन तो आपल्या भारतीय सर्व प्रांतातल्यांना पण चालेल. ).

स्टार्टर म्हणून भजी/ कॉर्न पकोडे ( कॉर्न राइस नको मग जेवणात ). मसाला पापड ( गोर्‍यांना पापड आवडतात ) छोटे बटाटेवडे/ मेदुवडे चटणी/ पनीर कबाब ( इथे पाककृतीमध्ये पालक कबाब आहेत लोलाचे, पण मग पालक पुलाव नको).

मदतीला असेल कुणी ( स्वयंपाकवाली बाई/ कामवाली ) तर मग सगळ्यांना पावभाजी/ मिसळपाव किंवा मग वर अरुंधतीने लिहीले तसे फ्लॉवर रस्सा किंवा सुकी भाजी, टॉमेटो सार ( नारळाचे दूध घातलेले )

मि चिउ, मिसळ करता येइल , कट वेगळा ठेवला तर सगळे चवी नुसार तिखट कमी जास्त करता येइल. शेव फरसाण ,पा पो चिवडा,बारिक चिरलेला कांदा, वेगवेगळ्या बाउल मधे घालून ठेव. गोडात खांडवीच्या वड्या.

चिऊ तु ५ ऑगष्टला पोस्ट् टाकलीस, सगळे येणारेत कधी? आज की उद्या ? इथे सगळे प्रश्न विचारतात पण काही अपवाद वगळता बर्‍याच जणी तारीख/ वार / वेळ टाकतच नाहीत.( कृपया या पोस्टबद्दल रागवु नये)

चिन्नुचा बेत सही आहे. तरीही वेगळे म्हणजे मिनी किंवा मोठे समोसे/ मेदूवडे किंवा इडली चटणी/ अप्पे चटणी/ गोड पुर्‍या किंवा तिखटामिठाच्या पुर्‍या बरोबर नारळाची चटणी आणी गोड म्हणजे गुलाबजाम ( ते आजही करुन ठेवु शकतेस मग गोड पुर्‍या नकोतच ) किंवा बालुशाही ( विकतचीच ), सोनपापडी वगैरे

हो मिसळचा बेत सहीच आहे.

गेल्या वेळीच ईडली चटणी आणि शिरा केला होता, आणि परवा पुजेच्या दिवशी समोसे आणि जिलेबी केले होते म्हणुन ते सोडुनच बघते.

एका मराठी मैत्रीणीच्या कुटूंबीयांना आई-वडीलांबरोबर बोलवायचं आहे. मला स्वत्।ला पोळ्या/फ्रोजन पोळ्या नकोत. तरी त्यातल्या त्यात चांगलं दिसेल असं काही सुचवा नं? शक्यतो नॉन व्हेज...फक्त त्या ज्येष्ठांना मला वाटतं बी पीचा त्रास आहे तर माहित् नाही काही पथ्य असेल. पण थोडे ऑप्शन्स मिळाले तर मग विचार करता येईल.
सध्या मला त्यातल्या त्यात चिकन बिर्याणी, एखादी फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी सुचतंय...कदाचीत गुलाब जाम करेन किंवा रूनीचा तिरामिसु (*तो आधी करून ठेवता येतो नं म्हणून) अजून काय करावं..कोळंबीचा रस्सा की सुकं काही माहीते का माशाचा तंदुर प्रकार....
की मेन्युचा एखादा वेगळा पर्याय????

माझ्याकडे साधारण दोन आठवडे आहेत विचार करायला Happy

प्रॉन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी, बटर चिकन किंवा चिकन करी किंवा फिश करी किंवा चिकन बिर्याणी असेल तर प्रॉन करी, फुलके, रायता, आलू टिक्की, पुदीना चटणी, फ्राय फिश ...बांगडे किंवा मांदेल्या!

वेका मासे करणार तर मासे कर. चीकन करणार तर चिकन कर. मलातरी वाटत दोन्ही मिक्स करु नकोस. बिर्याणी करणार असशील तर तंदुरी करु शकतेस. सोबत चिकन रस्सा, सॅलेड - कोबी कांदा टॉमॅटो, दही, सोलकढी.
मासे करणार असशील तर कोलंबी पुलाव, त्याबरोबर फ्लॉवर चा रस्सा चांगला जातो, आणि मासे कमी तेलात तळु शकतेस. आणि मासे कराणार तर दुधाची स्विट डिश नको.

Pages