माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकासरावांसारखच पण बिस्कीट एवजी खारी. मोठ्ठ्या मगात दुधाचा चहा. त्यात शक्य तितक्या खारी भीजवुन मग चमच्याने खाणे. चहा रहीला की परत खारी बुडवणे. मग शेवटी गोड खारट चहा.
माझ आवडीच एकमेव नॉनव्हेज कॉबीनेशन. आइच्या हातची खाडीच्या कोलंबिची लाल भडक आमटी, तळलेली कोलंबी, लाल माठाची भाजी आणी मउ भात.
शेवग्याच्या शेंगा घातलेली मलवणी डाळ आणि गावठी वली बटाट्याची भाजी, भात. (माशे खाणारे तर तळलेला बांगडा आगदी प्रेमाने खातात याच्याबरोबर)
चौकूळ (आंबोलीच्या जवळ) चा धोधो पाउस. घरात शेकोटीसमोर बसुन चुलीवर बनवलेली नाचण्याची भाकरी, वाफाळणार वाटलेल्या डाळीच पिठल, कांदा लोणच. खर तर ह्या घरात बनवलेल सगळच आवडत. पाणी आणि हवेमुळे असेल कदाचीत.

भाजलेले शेंगदाणे किंवा फुटाणे खायची माझी आवडती पद्धत.

उजव्या हाताच्या बोटावर दाणा ठेवायचा आणि डाव्या हाताने उजव्या तळहातावर टाळी वाजवायची कि दाणा उडून थेट तोंडात.. लहान मुलं आजूबाजूला असतील तर मजा येते.

हायला...
कसला कातील बाफ आहे..
सगळ्या प्रकारच्या पापडाच्या बोट्या..
उडदाच्या बोट्या तेल घालून..
पोह्याची, बटाट्याची (ह्यातली वाटलेली हिरवी मिरची आणि जिरं काय लागतं!) यSSSम बोटी
तांदुळाचा, गव्हाचा चीक - गरमगरम - तूप/तेल घालून...
अर्धवट वाळलेले पोहे, बटाटा पापड, शाबुदाण्याच्या पापड्या, सालपापडी, कुरडया, खारवड्या
मिरगुंड
आहाहा!

लोणचं करताना फोडणी घालण्याआधी सगळं घालून ठेवलेल्या कैर्‍या....

तोंपासू..

मोठ्ठ्या मगात दुधाचा चहा. त्यात शक्य तितक्या खारी भीजवुन मग चमच्याने खाणे. चहा रहीला की परत खारी बुडवणे. मग शेवटी गोड खारट चहा.>> +१.
मला हे ही आवडत फक्त खारी आमच्या कोल्हापुरची पाहिजे.
नशीबाने आता नांदणीच्या गणेश बेकरीची खारी आता पुण्यातही मिळतेय.
त्यामुळे प्रत्येक रविवारी हाच प्रोग्राम होतो घरी... Happy

झक्या अगदी खरं, पण चहा असा मोठ्ठा मग भरून हवा, तो ही दुधाचा आणि गोडगिट्ट Happy कोल्हापूरची किंवा मग सायकलवरून विकायला येतात त्या लोकांकडची खारी हवी, खरपूस भाजलेली..

त्यामुळे प्रत्येक रविवारी हाच प्रोग्राम होतो घरी... >
माझा पण हा प्रोग्राम रवीवार संद्याकाळचा ठरलेला. मग रात्रीच्या जेवणाची इच्छा पण होत नाही. Happy

अजुन काही काँबीनेशन्सः
गरम मसाल्याची आमटी आणि आंबोळी.
छान मउ मउ घावणे आणि चहा. चार पाच सहज जातात.
सांबार चटणी काँबिनेशनमध्ये (ज्यात सांबार जास्त) पोहणारी इडली किंवा बटाटा वडा.

सगळेच प्रकार तोंपासु आहेत इथले!

बाजरीची खिचडी! कढी!!! >>>> +१०००
अनेक वर्षात खाल्ली नाहीये. आता बाजरी शोधते!

वालाचं बिरडं ,त्यावर साजूक तूप व त्यात पोळी कुस्करुन.
साधा प्रकार पण छान... तळलेला पापड व दही(वाटीत दही व ते पापडाच्या तुकड्याने खायचे.पापडासकट)
दहीभाताबरोबर मटण
तळलेली सुरमइची तुकडी व पोळी साजुक तुपात बुडवून
पिठलं त्यावर कच्चं तेल व ज्वारीची भाकरी
लसूण चटणी त्यावर कच्चं तेल व पोळी
ढोकळा व फाफडा

पोहे आणि ओलसर उपीठ मिक्स करून खायला मला आवडतं. पोह्यात दूध आणि केलॉग्ज हे पण छानच लागतं. कांदापोहे आणि शेव ( कॉमन आहे ना ) आणि त्यात बटाट्याचा रस्सा ( ये अलग है ).

आणखी एक राहीलं कि

सकाळी पोहे केलेच असतील आणि रात्रीचा भात शिल्लक असेल तर भात विथ आमटी\वरण एकत्र करून (गरजेनुसार तूप ) गरम केल्यास डीशमधे त्यातही पोहे एकत्र केल्यास छान लागतं.

खालील पदार्थ मला असे आवडतात.

१. इडली : सांबर किंवा चटणीऐवजी चहाबरोबर.
२. पुन्हा इडलीच. तिखट मीठ वापरून इडली फ्राय करून तिचे बारीक तुकडे डिशमधे घेऊन टीव्ही पाहत काट्याचमच्याने खाणे.
३. बेसनाच्या भजीबरोबर पोळी
४. मूगभजी आणि कोल्हापुरी ठेचा.
५. पिठलं. कांदा आणि लसणाची चटणी ( स्वारगेटला प्रकाश मसालेवाले आहेत त्यांच्याकडचं. दुसरं दुकान भवानी पेठेत आहे )
६. फोडणीचा भात आणि तडका दिलेलं दही आणि त्यात कोबी मांचुरिअन.

मीठात खारवलेले मोठे आवळे.. वाटीत परत थोडे मीठ, हिंग आणि तिखट घेऊन.. मस्त दुपारी आवडीचे पुस्तक वाचत खाणे..

तांदळाच्या पीठाची आले-ताक घालून केलेली उकड.. मस्त कढीपत्ता, हळद, मोहोरीची फोडणी!

जेम्स बाँड चे चित्रपट पहायचे असतील तर मस्त चायनीज - स्पेशली कंग्पाओ किंवा जनरल स्तो चिकन विथ एक्सट्रा चिली सॉस आणि क्र्याब रंगून्स!

कुठलेही चॉकलेट आईस्क्रीम - त्यावर रोस्टेड बदाम, अक्रोड आणि पिक्यान्स!

कच्च्या पातळ पोह्यांचे दडपे पोहे कच्च्या फोडणी बरोबर आणि कधी कधी मेतकूट घालून.

गरम गरम इडली सांबार आणि त्यावर लसूण शेव + नारळाची चटणी .आणि नंतर मस्त आईस्क्रीम !
चमचमीत कांदे पोहे ...भरपूर नारळ, कोथिंबीर आणि लिंबू पिळून आणि मग मस्त आल्याचा चहा !
बाहेर धो धो पाउस पडत असताना घरी केलेली गरम गरम कांदा भजी , ब्रेड आणि केचप..
बटर मध्ये केलेली पावभाजी , अमूल बटर मध्ये सढळ हाताने भाजलेले ब्रेड आणि मग आईस्क्रीम किंवा कुल्फी !
गरम गरम बटाटे वडे + मिरची कोथिंबीर चटणी + तळलेली मिरची ..
कुरकुरीत सामोसे + तळलेली मिरची + चिंचेची चटणी.
गरम पोळ्या + बटाटा काचर्या + फ्रेश लसूण चटणी
पिठलं भात + मिरची चं लोणचं + ताक
वरणफळ भरपूर तूप टाकून
घरी कढवलेले लोणकढे साजूक तूप आणि बेरी ..
हापूस आंब्याचा रस (पातळ केलेलं साजूक तूप वरून टाकून ) + पोळ्या + कोणतीही भाजी + भजी
मुगाची खिचडी + कढी + तळलेला पापड + कैरीचं लोणचं
मिल्कशेक कोणतेही आणि वरती आईस्क्रीम
वरून भरपूर फ्रेश नारळ , कोथिंबीर घातलेला मस्त मसाले भात आणि त्यावर लिंबू आणि तूप + मठ्ठा !
बासुंदी + पुरी + बटाटा भाजी !

अजून बरेच काही....

टाईप करता करता भूक लागली आहे ! मस्त धागा ! Happy

नानबा सगळंच माझंही प्रचंड आवडत आणि तोंपासू
तेल लावून बोट्या तर अक्षरशः माझ्यासाठी पक्वान्न

मीठात खारवलेले मोठे आवळे.. वाटीत परत थोडे मीठ, हिंग आणि तिखट घेऊन.. मस्त दुपारी आवडीचे पुस्तक वाचत खाणे..
तांदळाच्या पीठाची आले-ताक घालून केलेली उकड.. मस्त कढीपत्ता, हळद, मोहोरीची फोडणी!
>>>>
स्र्ल्प स्र्ल्प... पण उकड गरम गरमच हवी.. नाही तर नो युज
मला कुरडयांचा चिक पण असाच जीव की प्राण आहे

आमचा मालवणला असतानाचा ब्रेकफास्ट
तांदळाची पेज, त्यावर खोवलेल खोबर आणि बरोबर लाल रंगाची भाजी असलेला बटाटा वडा किंवा शिरगांवकराकडची गोळा भजी.
गेले ते दिवस गेले

झंपी, वेल सेड Proud
बाजो, आईच्या जीवावर खायचे दिवस गेले हो आणि माहेरी पळण्याचे पण गेले म्हणजे पुर्वी सहा महिन्याने जायचो आता दर महिन्याला जाते. Proud
विद्याक, पाटा वरवंटा खास लसणाच्या चटणीसाठि, मिक्सरवर ती चव येत नाहि ना.
आज रात्रीचा मेनु - उडदाची आमटि, आंबेमोहर तांदळाचा भात, बाजरीची भाकर, कांदा, गावरान लोणचे, लसणाची चटणी, गावाला घरी केलेला भाजलेला पापड.
अजुन दिवस जायचाय हापिसात, आत्ता सकाळचे साडेनऊ वाजलेत. Sad

कुरडईचा चीक, वाळवणाचे अर्धे कच्चे पदार्थ,
गोकुळाष्टमीला शाळेत मिळणारा गोपाळकाला,
आजीच्या हातचे तळलेले मासे आणि माशाचे कालवण, वाफाळता भात,
साबुदाणा वड्याचे कच्चे पीठ बोटावर घेऊन खायला मस्तं लागते, तीच गोष्ट बटाटा वड्याच्या भाजीची,
आंबट चुका, माठ किंवा राजगिर्याची भाजी आणी भाकरी,
मिक्स डाळीची आमटी तिला वरुन तिखट मिर्च्या, लसुण आणी हिंग- जीरं- मोहरी, भरपुर कढिपत्त्याची खमंग फोडणी, गुरगुट्या भात आणि तुपाची धार,
आंबेमोहोर तांदुळ आणी तुरिच्या डाळीची खानदेश स्टाईल खिचडी, तेल, तोंडी लावायला कांदा, पापड, लोणचे...जगायला अजुन काय लागतं हो Happy

उडद पापडाच्या लाट्या,
गहू चिकाच्या अर्धवट ओल्या कुरडया,
बिबडे करण्यापुर्वी ज्वारीचा चिक केला जातो, त्याला म्हणतात घाटा, त्यात मिठ, बडिशेप, तिळ्,हि. मिर्ची,आले हे जिन्नस असतात...तर तसला तो घाटा विथ तेल स्लुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प्प्प्प्प
ज्वारीची खिशी
हे विशेष पदार्थ!
बाकी तळलेले समोसा, वडे, चिकन लॉलीपॉप, व्हेज मंचूरिअन, हाक्का नुडल्स वगैरे पदार्थ तर ऑल टाईम फॅव. साऊथ मध्ये कर्ड राईस, लेमन राईस, रवा डोसा, मिनी ईडली

संध्या़काळच्या वेळेला खारवलेले शेंगदाणे \ चकली \ शेव सोबत किंगफिशर सोडा घेत घेत बेफिकीर यांच्या कथा - कादंब-या वाचणे.. अहाहा !!

पालकाची सेमीपातळ लसूणयुक्त भाजी भरपूर शेंगदाण्यांसह आणि त्यावर कच्चं तेल आणि ज्वारीची गर्रम गर्रम भाकरी... अहाहा..

कारळ्याची चटणी आणि कच्चं तेल या बरोबर मी ज्वारीच्या १०-१५ भाकरी सहज खाऊ शकेल Proud

गरमा गरम साधं वरण, जर्रासा मऊसर भात, घरचं खमंग साजूक तूप, लिंबू अनि खरपूस परतलेली भेंडीची भाजी!

Pages