माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. कोकम आगळ + सेव्हन अप
२. ओटमील नामक महाबेचव प्रकार दाल माखनीबरोबर मिसळून आश्चर्यकारक चांगला लागतो.
३. अननस क्युब्स तिखटजाळ चिली गार्लिक सॉसमध्ये बुडवून
४. पातळ पोह्यांचा चिवडा चमच्या-चमच्याने चहात बुडवून ज्याने खाल्ला नाही त्याने मनुष्यजन्म वाया घालवला!

सरडी, जामची आयडीया मस्त आहे.

ड्रीम्गर्ल व माने , सर्व मांसाहारी मेनु + १

पुरण्पोळी आणि शुद्ध तुप

आधी उल्लेख झाला असेल तर अनुल्लेख करावा नाहीतर नक्की हे प्रयोग करुन पहा -----
घरगुती गुलाबजाम + व्हॅनिला आईसक्रिम
Sprite (दुसरं कुठलं कोल्ड ड्रिंक नाही चालणार) + व्हॅनिला आईसक्रिम
महान चव येते !

भाजलेले तितर किंवा बटेर मसाला,
उन्हाळ्यात गार बियर सोबत टंगड़ी फ्राय
हिवाळ्यात सगळे नॉनवेज सोबत रम
सिक्किम लद्दाख पासुन अरुणाचल पर्यंत मिळणारे "थुक पा" नामक क्लियर गार्लिक चाइव्ज अन चिकन नूडल सूप
अर्थातच वेज मोमोज
चीज बर्स्ट पिज़्ज़ा
घरी असल्यास आमचे अस्सल सातारी उड़दाचे श्याक अन शाळु ची भाकरी
वरहाडी रस्सा (तो ही अमरावती च्या अंजनगांव बारी रोड वर असलेल्या रानमाळ ढाब्याचा असल्यास एखाद लोटाभर)
मेथी ची तांदळा च्या कण्या लावुन केलेली गुरगुटी भाजी वरतुन लसुणाची फोड़नी
बाकी आई अन बायकोच्या हातचे काहीही
पुण्यात लोणी स्पंज डोसा

अजुन एक दोन पदार्थ आहेत ऐकायला इतके चांगले नाही वाटत पण चवी ला फार्मास असतात

अ. एस्कारगोट्स म्हणजेच गोगलगाय , ह्याची भाजी म्हणजे करी किंवा नुसते तळलेले एस्कारगोट्स (फ्रेंच कूझिन मधे गार्लिक बटर मधे शिजवतात)
ब. साप, मुंडके अन शेपटी कडून एक एक वित काढून टाकलेला, आगोटीवर भाजलेला साँप अप्रतिम लागतो चवीला अगदी चिकन सारखा

गोगलगाय व साप >> कसंसच झालं

आधी मलाही तसेच वाटले होते पण बिलीव मी एक नंबर लागतात दोन्ही

कुरकुरीत शॅलो फ्राईड कारल्याचे पातळ काप (किंवा चक्क नुसती तव्यावर रोस्टेड: कारल्याचा चकणा म्हणू शकतो.) + कुठलेही हार्ड ड्रिंक/सोडा/कोल्डड्रिंक/बियर

धागाकर्त्याने दिलेल्या विशेष सुचना लक्षात ठेवल्यावरसुध्दा हा धागा वर आला की उघडण्याचा मोह होतोच.

पण हीच वेळ हा धागा वाचण्यासाठी योग्य आहे. Happy
धागा फिरसे वाच्या आणि भुक खवळ्या:P

मॅन्गो स्लाइस (च) आणि स्प्राइट(च)
आणि पद्धत खालीलच Happy
ग्लास मधे १/२ ते ३/४ ग्लास स्लाइस ओता.
आता ग्लास वाकडा करुन (सांडेल इतके वाकडे नाही) ग्लासच्या वॉल वरुन (आतल्या) अगदी सावकाश स्प्राइट ओता. उरलेला (चवी प्रमाणे) ग्लास भरे पर्यंत...
झकास लागते.

रीया..बरोबर..
स्प्राइट मधिल गॅस हवेत जावु नये म्हणुन..जसा थम्स अप भरकन ओतले की वर वर येते तसे होवु नये म्हणुन.

(आधी कोणि दिले आहे का पाहिले नाही.)
१) आंब्याचा थंडगार रस त्यात वरुन रस दिसणार नाही म्हणज़े एक लेयर असे लोणकढ पातळ तुप जे घालता क्षणीच घट्ट झाले पाहीजे असे पोळीबरोबर बाजुला ताजे कैरीचे लोणचे
२) फ़ो पोळी (कुस्करा) त्यात गरम गरम आमटी (चिंच गुळाची असेल तर स्वर्ग)
३) कोणताही चिवडा आमटी घालुन
४) गरम गरम भाकरी..त्याच्या वरचा पापड अर्धवट कढायचा आणि त्यात लोखंडाच्या पळीत केलेली फ़ोडणी (लसुण तुकडे आणि मोहरी) आणि मीठ
५) तुप गुळ आणि पोळी
६) भात (गार), सोलपुरी दाण्याची चटणि, मीठ आणि कच्चे गोडे तेल
७) अर्धवट वाळलेल्या- (वरुन वाळलेले पण आत ओले) साबुदाण्याच्या पापड्या, कुर्डया, सांडगे.

आत्ताच एका ब्रेडला तुपावर खरपुस भाजुन त्यावर साखर पेरुन हलकेसे भाजले. अहाहा!
त्याआधी गरम ब्रेडला बटर लावून त्यावर अगदी थोड़ा मसाला आणि मीठ लावून चीज़ स्लाइस टाकून खाल्ले.

आत्ताच एका ब्रेडला तुपावर खरपुस भाजुन त्यावर साखर पेरुन हलकेसे भाजले. अहाहा!
>>>
मलाही भयंकर आवडतो हा प्रकार

मायबोलीवर खाणे हे एक अत्यंत महत्वपूर्ण आणि पवित्र काम आहे हे ध्यानात येऊ लागलेले आहे. तिकडे ते लेखक मंडळ रक्त आटवून, मशिनीत घातलेले शब्द लकी ड्रॉ सारखे झेलून एकेक कादंब-या लिहीत असतात, त्यासाठी क्लोन बनवतात, प्रतिसाद देतात आणि इथं बघा... खाण्याचा बाफ तरी धो धो प्रतिसाद आणि पकवायचा बाफ म्हटलं तरी हे प्रतिसाद !!

सकाळ सकाळ गरमागरम चहा बरोबर तव्यावरून नुकतीच काढलेली पोळी ,अहाहा
आणि शिळी भाकरी गरम आमटीबरोबर आणि जोडीला लसणाची चटणी........

हिरव्या मिरचीचा ठेचा आईने केलेला , सुका बांगडा भाजून ठेच्यात मिक्स करायचं ( हे काम बाबांनी करायचं) काय मस्त लागते ही चटणी !

लस्सी-पुरी
जिलेबी-पाव (वडापावसारखी)
अंडाभुर्जी+कोणत्याही उसळीचा रस्सा+तांदळाची गरमागरम भाकरी किंवा पाव.
पूर्वी मुंबईच्या भंडारी हॉटेलात मिळणारे कबाब+पाव
बांगड्याचे किसमूर+भात+काळ्या वाटण्याची उसळ.
तळलेल्या माशाची तुकडी+गोडे वरण+भात, नंतर फर्मास सोलकढी.
अख्खा मसूर+ज्वारीची गरमागरम भाकरी.

मॅन्गो स्लाइस (च) आणि स्प्राइट(च)
>>>>>
हे मी करतो लवकरच, आमच्याकडे ही द्रव्ये पडलेली असतात.

म्याप्रो चा स्ट्रोबेरी पाक येतो ( स्ट्रोबेरी च्या तुकड्या सकट + वोडका ( याला मी बेवडी बार्बी असे नाव देले आहे)
ताजा संत्र / मोसंबी / अननस चा ज्यूस + वोडका
कोकम सरबत + वोडका ( वोडका कोकण )
२ ताज्या लिंबांचा रस + सोडा + वोडका
कैरीचे पन्हे + वोडका

आणि सिंगल माल्ट असताना मात्र काहीही - म्हणजे काहीही - मग बर्फ असो नाहीतर पाणी घालू नये.सरळ सोट निट प्यायला आवडते.

Pages