माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिळी भाकरी आणि बरोबर लसणीचे तिखट (तेल घालून) किंवा गोडा मसाला, तिखट,मीठ आणि तेल मिक्स असं आवडतं मला.>>> मला पण. त्यात थोडे मेतकूट सुध्धा छान लागते.

तळलेल्या माशाची तुकडी+गोडे वरण+भात
>> हा प्रकार मला अज्जीबात नाही आवडत. मासे असतील तर माशाचीच आमटी. नाहीतर माशाचा आपमान होतो असं मला वाटतं. माझ्यासाठी आई नेहमी माशाचं सुकं करते म्हणजे ते आमटी आणि सुके दोन्हीसारखे खाता येते. बाकीच्यांना गोडं वरण आणि मासे. माझे नखरेच जास्तं !

१)मेतकुटाची लसुण कोथिम्बीर घालुन केलेली बोंड भजी आणि गरम गरम मऊभात, तुप, लिम्बु लोणचं
२)आंबा वडी किंवा आंबा मावा + दुधावरची साय एकत्र कुस्करुन आणि गरम गरम पुर्‍या
३)जीरा राईस, सोलकढी आणि तोंडी लावायला पोह्याचं डांगर+कच्चं शेंगदाणा तेल.
४)तांदळाची भाकरी गरम असतना पापुद्रा सोडवायचा, त्यात कच्चं शेंगदाणा तेल आणि लसणीचं तिखट (सुक्या खोबर्‍याची चटणी त्याला आम्ही लसणीचं तिखट म्हणतो)
५)ताकातले गरम गरम घावन, तुप आणि ओल्या नारळाची चटणी.
६)हरभरे किंवा स्वीट कॉर्न भेळ मस्त कांदा, लिम्बु, चाटमसाला आणि कोथींबीर घालुन आणि गरम गरम आल्याचा चहा मध्येच एक एक घोट.....पण बाहेर कोसळणारा पाऊस हवा.

तांदळाची भाकरी गरम असतना पापुद्रा सोडवायचा, त्यात कच्चं शेंगदाणा तेल आणि लसणीचं तिखट (सुक्या खोबर्‍याची चटणी त्याला आम्ही लसणीचं तिखट म्हणतो)

कुठल्याही भाकरीबरोबर सेम अशाच पद्धतीने माझा नवरा आणि नणंदा खातात.

तरीच....:फिदी:

मुग्धा + १०००००००००००००००००००००००

खुप हसले अगदी पोट दुखेपर्यंत हसले.
आता पुन्हा धाग्याकडे वळुया.

हल्लिचं माबोवर फ़ेमस झालेला ५ मिन मावे/मग केक आणि वर व्हॅनिला आईस्क्रीमच मोठा स्कूप हे कॉम्बो एकदम हीट आहे घरात.

Pages