माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचित्र पाककृती टाकायला वेळ लागेल.घरी गेलो की आइला विचारुन टाकतो.

कोकणात खारवड्या म्हणजे तांदळाच्या पिठापासुन बनवलेल्या तळुन खायला, खानदेशात त्यांना कुर्डाया म्हणतात पण त्या तांदळाच्या नसतात.

नीधपनीं म्हटले ते बाजरीच्या वड्या असतील. तश्याच मठ-मुगाच्याही वड्या असतात.

बाजरीच्या वड्या तळुनही खाता येतात व कोरडी भाजी करुनही.

शेवयाचा भात्+दुध्+गुळ्+तुप>>>शेवयाचा भात... याकरता जाडसर शेवया बेस्ट.. मॅगी पाण्यात उकळुन घेतो तश्याच शेवया पाण्यात उकळुन घ्यायच्या (मीठ पण टाकत असावेत कदाचीत).. शेवया शिजेपर्यंत पाणी आटलं पाहिजे इतपतच पाण्यात शिजवाव्यात. नंतर खायच्या वेळी त्यात दुध, गुळ, तुप टाकायचं. दुधात शिजवल्या तरी चालेल..

इतके दिवस हा धागा टाळत होते.. अजुनही अधल्या मधल्या बर्‍याच पोस्ट्स वाचायच्या राहिल्या आहेत.. सवडीने वाचण्यात येतील Happy

इतके दिवस टाळत होते इथे यायचे, पण नाहिच रहावत आता, अगदि जुलुम आहे बाबा Happy
झकासराव,
"लग्नाच्या आदल्या दिवशी नवर्‍याला शेवया देतात. भात देत नाहीत खायला अशी परंपरा पाहिली आहे"
असे काहि नाहि रे, मला आठवतय लहानपणी नवरा नवरी बरोबर फिरताना शेवया नसतील तिथे गरम गरम भात करुन देत असत, वरुन दुध आणि बर्‍याचदा साखरेऐवजी गुळाचा खडाच असायचा, मजा यायची राव ओरपायला.
सुमेधाव्हि येतेस का घरी जेवायला पाऊसहि चालु आहे, बिबड्या पाठवल्यात आईने गावावरुन, मस्त शेंगोळ्यांचा बेत करु बाजरीच्या भाकरी बरोबर (फक्त चुल नाहिये). Happy
बाजो, कुठे फेडणार हे पाप हा बीबी पुन्हा सुरु करण्याच Proud

हा शेवयाचा भात नवरदेवाला लग्नाच्या आधल्या दिवशी खायला भावकीतले लोकप्रत्येक घरी बोलावतात. त्याच्या बरोबर इतर मुले / करवल्या घोळक्याने फिरत असतात. नाहीतरी तो एकटा किती घरी खानार. लहान मुलांची मजा असते त्याच्याबरोबर. >>>

आरारारा, कस्सली जीवघेणी आठवण काढलीत ओ.....

मी लहान असताना केलाय हा प्रकार Proud
बहिणीच्या लग्नाआधी मामाच्या शेतातील शेतकरी आणि आजूबाजूचे लोक तिला बोलवायचे. सोबत मीसुद्धा मिरवत मिरवत जायचे. शहरातनं आलेली म्हणून जरा जास्तच कोडकौतुक व्हायचं माझं.
छोट्या -छोट्या ठोक्याच्या परातींमध्ये चुलीवरच्या शेवया दिल्या जात. बाकी सगळे त्यात दूध, गूळ, साखर घेऊन खात. मला मात्र त्यात मीठ भुरभुरून सोबत लोणच्याची फोड लागायची....ह्या कॉम्बोकडे सगळे विचित्र नजरेने बघतायेत ह्याकडे संपूर्ण दूर्लक्ष करून मी ते कॉम्बो ओरपायची...

कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन Sad

रुणुझूणु, मी सुध्दा लहानपणी वाड्यातील एकहि लग्न मिस नाहि केल. आयला लै मजा यायची, त्या दिवशी घरी जेवायचेच नाहि हा अलिखित नियम होता आम्हा पोरांचा, प्रत्येक घरी शेवया खाऊन झाल्या कि खोबर्‍याची वाटि मिळायची, उरलीसुरली भुक ते खाऊन भागायची, ज्या नवरदेवाच्या/ नवरीच्या वाट्या जास्त त्याची गावात जास्त वट समजली जायची. Happy
बाजो. खाण्याचा वेडापायी ह्या वर्षीच्या मे महिन्यात आळेफाट्यावरुन दगडि पाटा वरवंटा आणि जाते आणले आहे Happy
नवरा पार येडा झालाय बघुन Proud

उकडलेला बटाटा आणि मीठ

उकडलेले अंडे आणि मीठ पेरून.

मिठाच्या पाण्यात उकडलेल्या शेंगा.

प्रतिभा, पाटा-वरवंटा Proud
आईने पण ठेवला होता सांभाळून बरेच दिवस. त्यावर वाटलेलं पुरण एकदम छान लागतं. पुरणयंत्रातल्या पुरणाला ती सर नाही.

सुईने हळूच उचलाव्या लागतात त्या तांदळाच्या सालपापड्या सुद्धा ओल्या किंवा अर्ध्या-कच्च्या सुकलेल्या गट्टम करण्यात स्वर्गसुख आहे.

मिठाच्या पाण्यात उकडलेल्या शेंगा.>>>>> गरमागरम शेंगा ते कडकडीत वाळवलेल्या शेंगां, आणि मधल्या सगळ्याच फेजमधल्या शेंगा प्रचंड आवडीचा खाउ... Happy

बाजरीच्या खारोड्या मस्त लागतात. कच्चे शेंगदाणे हवेतच सोबत. Happy अन वाळवता (२) पण खावेत - अर्धवट वाळलेले. मनूसाठी खारोड्या करणारे एकदा तेव्हा कृती अन फोटो टाकेन. नी, तुला कुरीयर करू का २५० ग्राम्स? छोट्या थालिपिठाला आम्हीही कधी भोके पाडत नाही. पाडले तर तेल घालता येते एवढच.

इतके दिवस नुस्ता हा बीबी वाचत होते, ध पाटा कॉमेंटशिवाय. Happy पण मीसुद्धा थोडीबहुत खादाड आहे असे वाटायलय आता . Happy

वाळवण म्हणून घातलेल्या आणि अर्ध ओल्या लिबलिबीत साबुदाण्याच्या पापड्या, कुरडया, सालपापड्या आणि चिंचेचे गोळे त्यात कुठलीशी काडी खुपसून अग्दी चोखून खाणे!!

माझ्या आजोळी कळण्याची भाकरी म्हणजे तुरीच्या डाळ भरडताना जो गाळ राहतो, त्यात ज्वारीचे पिठ घालून केलेली भाकरी. त्यात अगदीच फोलफटे घेत नाहीत.
बाजरीच्या खिचड्याची कृती, शांता शेळके यांनी लिहिली होती. अप्रतिम लागतो तो प्रकार. ताजा किंवा शिळा, कसाही खा.

नवरा पार येडा झालाय बघुन>>> अजुन शहाणा शिल्लक राहिला होता इतके वर्षे?? Proud Light 1

बाजो हीच ती प्रतिभा उर्फ झेड प्रतिभा Happy
प्रतिभाच्या जुन्यामाय्बोलीवरच्या पोस्ट कहर होत्या.... Happy

सुईने हळूच उचलाव्या लागतात त्या तांदळाच्या सालपापड्या सुद्धा ओल्या किंवा अर्ध्या-कच्च्या सुकलेल्या गट्टम करण्यात स्वर्गसुख आहे>> +१
वाळवण म्हणून घातलेल्या आणि अर्ध ओल्या लिबलिबीत साबुदाण्याच्या पापड्या, कुरडया, सालपापड्या>> +१
आमच्याकडे उकडपापड म्हणून तांदळापासुन केलेले पापड असायचे (सालपापड्या वेगळ्या हे पापड वेगळे). त्याचा गरमा गरम पीठ गोळे करताना खायला मस्त लागायच..

जुन्या माबोपेक्षा तुफान वेगाने पोस्ट आल्यात इथे.:फिदी:

तळलेल्या बिबड्या अहाहा! अगदी खुसखुशीत लागतात.

अगदी कधीतरीच उकडलेले अंडे मीठ मीरपुड घालुन, भेळ (कांदा, कैरी घालुन ) घरची पाणीपुरी, शिळ्या भाकरीचा कुस्करा फोडणी आणी ताक घातलेला.

कधीतरीच पण गरम गरमच खावी अशी मसाला Maggi.

भरपूर साजुक तुप घातलेला पोळीचा लाडु ( गुळ किंवा पि.साखरेचा).

तव्यावरचे सुके पण झणझणीत पिठले ( लाल तिखट, मीठ आणी हिंग्,जीरे, मोहरीची चरचरीत फोडणी )

अरे अजून काय लिहीणार????

माझ्या आजोळी कळण्याची भाकरी म्हणजे तुरीच्या डाळ भरडताना जो गाळ राहतो, त्यात ज्वारीचे पिठ घालून केलेली भाकरी. त्यात अगदीच फोलफटे घेत नाहीत
>>>
दिनेशदा. ये हुइ ना बात. हाच मूळचा कळणा. आमचेकडे मुगाच्या,मटकीच्या डाळीचा कळणा असे.ह्यातच ठिकठिकाणी इम्प्रोव्हायझेशन झालेले दिसते . इतके की कळणा हा बाय्प्रॉडक्ट न राहता मुद्दम तयार करतात असे दिसते काही ठिकाणी.

मिनोतीच्या बिबड्याची रेसिपी अगदी वेगळी आहे पुणे नगर पेक्षा. हा एक खास व स्वतंत्र पदार्थ दिसतो आहे.पुणे साईड बिबड्या ज्या कळण्याच्या आणि शेवयाचा चीक काढलेल्या गव्हाच्या फोलपटांच्या करीत. गव्हाच्या तर भाजल्यानन्तरही आंबूस लागत (चिकाची चव)

गव्हाच्या तर भाजल्यानन्तरही आंबूस लागत (चिकाची चव)>>> + १...आजी त्यात थोडा भिजलेला साबुदाणा टाकायची. आठवणीने तोंपासू!

१) उकडलेल्या अंड्याचे दोन भाग करून त्या प्रत्येक भागातील पिवळ्या बलकावर चाट मसाला घालून
२) अंडे फोडून तव्यावर घालावे. त्यावर फक्त मिरपूड आणि मीठ भुरभुरावे. असे ऑम्लेट नुसते खायला सुद्धा मला आवडते.

प्रतिभा,......दगडि पाटा वरवंटा आणि जाते आणले आहे . नवरा पार येडा झालाय बघुन ...
अगं, मी पण ५-६ वर्षापुर्वी लोखंडाची शेगडी आणली भारतातुन्..तेव्हा माझा नवरा पण पार वेडा झाला..ही कशाला आणली, आता नेणार कशी...खुप बडबडला... तरिपण मी आणलीच्..आता ती कँपिंगला वापरते. त्यावर शिजवलेले चिकन काय लागते म्हणुन सांगु......आणि आता माझा नवरा इतके कौतुक करतो की विचारु नका! अर्थात शेगडी बरोबर बायकोचेही......
अशा कोळशाच्या शेगडीवरचे चिकन, आणि वाफाळलेला गरमागरम भात.

मी सगळच वाळवण अर्ध ओलं अर्ध सुकं असताना खाते Happy
मला प्रचंड आवडतं ते
आणि बटाट्याचे वेफर्स वैगेरे कच्चे असताना खाते
मागच्या महिन्यात आईने ५ किलो करून घेतले होते
या महिन्यात ते १ किलो वैगेरे राहिलेत Uhoh
मी आणि माझी बहिण जिंदाबाद

>>>नवरा पार येडा झालाय बघुन>>> अजुन शहाणा शिल्लक राहिला होता इतके वर्षे??<<
मूळातच "नवरा" प्रकार शहाणा असतो का हे एक कोडे आहे. Proud Rofl

प्रतिभा, धन्यवाद... नक्की येते तुझ्याकडे. बिबड्या आणि शेंगोळ्या हे दोन्ही पदार्थ खरंच चाखायचे आहेत.

नक्की येते तुझ्याकडे. बिबड्या आणि शेंगोळ्या हे दोन्ही पदार्थ खरंच चाखायचे आहेत
>>
काही उपयोग नाही. ह्या सगळ्या आईच्या जीवावर चाललेल्या गमजा आहेत. या पदार्थांसाठी दर सहा महिन्याने माहेरी पळावे लागते. Light 1
(पूर्वीचा सासुरवाशिणी माहेरी 'पळून' जात.:फिदी:)

पिठलं/झुणका/फोडणीचा भात्/मसालेभात तळाशी लागलेले करपलेले खरपूस असे खरवडून खायला....
बोर्नव्हिटा + मिल्कपावडर
मिरगुंडं खायला
पालेभाजी (माठ्/मेथी विशेष्)+मटकीची उसळ+ वरण+दही/ताक+भात हा सगळा दहीकाला एकत्र
गोपाळकाल्याचे प्रसादाचे दही-पोहे

Pages