माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुके बांगडे निखार्‍यावर भाजून त्यावर खोबरेल तेल + बारीक चिरलेली हिरवी मिरची + कांदा / कोथिंबीर
फणसाच्या पानातल्या इडल्या + कैरी+लसूण +ओलं खोबरं+ सुकी मिरची चटणी
खोबरेल तेलाची फोडणी दिलेलं डाळी तोय, लाल तांदळाचा पाणी काढून केलेला भात, खोबरेल तेलात भाजलेले मासे .
निखार्‍यावर भाजेलेले पापड त्यावर खोबरेल तेल
तेच पापड कुसकरुन त्यात खोबरं कांदा हिरवी मिरची बारीक चिरून
उडदाच्या सांडग्यांची कैरी घालून उडीद-मेथी + तूप घालून शिजवलेला भात

गरमागरम ज्वारीची भाकरी ती ही टम्म फुगलेली, ताजं ताजं लोणी त्यात कोल्हापुरी तिखट घालुन खायला स्वर्गसुख आहे. Happy

खानदेशातल "कळणं" म्हणजे ज्वारी,दादर (शाळु ज्वारी), उडीद, मीठ, यांचे दळलेले मिश्रण असते.
ह्या भाकरीसोबत दुसरे काही नसले तरी नुसता पोपडा (पापुद्रा) उलगडुन तेल टाकुन खाल्ली तरी अप्रतिम चव लागते.आणी जर शेंगदाणा/तीळाचे तिखट असेल तर.......... जाउद्या आताच लाळ गळायला लागेल .

कळणा करण्याच्या पद्धती प्रदेशानुसार बदलत जात असाव्यात पण ज्वारी आणि उडीद मुख्य पदार्थ
आमच्यात (सोलापूरी भागात) पाच भाग ज्वारी+तांदुळ एक भाग्+आख्खे काळे उडीद एक भाग सगळे एकत्र दळुन तयार झालेल्या पीठाला कळणा म्हणतात यात हळकुंड आणि ब्याडग्या मिरच्या पण घालतात कुणी कुणी. पण आईकडे साधेच पीठ असायचे.
आणि वर जेबाँने सांगितल्याप्रमाणे फुलक्याएवढ्या टम्म (हे कंपल्सरी) फुगलेल्या भाकरीला मधोमध फोडुन त्यात तुप ओतुन या भाकरी चापायच्या Happy

बिबडी म्हणजे (मला माहिती असलेली) ज्वारी दोन दिवस पाण्यात भिजवुन नंतर त्यांचा कोंडा काढुन दळलेल्या पीठात मीठ +पापडखार घालुन (खिच्चे घेऊन) केलेल्या पापड्या आणि त्या निखार्‍यावर भाजल्यावर कच्च्या शेंगदाण्याबरोबर खाणे हे एक स्वर्गीय सुख.

जळगावकडे कळणा म्हणजे ज्वारी + अख्खे उडीद + मीठ दळून आणातात. इअक्डे अमेरिकेत आणायचे असेल तर नुसते उडीद दळून आणायचे आणी इकड्च्या ज्वारीच्या पिठात मिसळून वापरायचे. त्यारल्या त्यात भाकरी बर्‍या बनतात.

महिनाभराच्या परदेशातल्या प्रवासानंतर फूडमॉलला वडापाव आणि मिरची! म्हणजे खावाच लागतो
<<<<<<<<<<

हे खुपदा अनुभवलय..... मुंबईत आल्यावर वडापाव,पाणीपुरी, दहिपुरी, भज्जी,लस्सी, पावभाजी आणी हो इथे मिळणारी मिठायांची विविधता, हे पदार्थ चाकायलाच हवेत Happy

एकदा केरळला फिरायला गेलेलो, तिथे हॉटेलमध्ये नाश्टयाला भारतीय पदार्थ म्हणुन रोज रोज डोसा, इडली, अप्पम व परदेशी लोकांसाठी ब्रेड, बटर, जॅम बघुन बघुन इतका कंटाळा आला होता की कधी घरी जाउन कांदेपोहे,शिरा,थालीपीठ खाउन त्यावर आले-वेलची मिश्रीत गरम गरम चहा पिते असे झाले होते.

अरे हे खास मराठी प्रकार आहेत ते कुणी तयार करून विकत नाही का?
एकदा एका औ'बादच्या असिस्टंटने बाजरीच्या खारवड्या आणल्या होत्या हपिसात. कांदा आणि दाणे घालून असल्या भारी लागत होत्या.
बिबड्या वगैरे ऐकून तरी भारीच वाटतंय. खायला कधी मिळेल?

चिकनीचा पापड भाजुन त्यावर तेल आणी शें/ती. तिखट टाकुन दोहोंसाठी ( अपेयपान करणारे आणी न करणारे ;)) जबर्दस्त.

इ बबो........चिकनी = लाल ज्वारीच/किंवा तत्सम... म्हणा नं उगाच गैरसमज नको.

पुणे नाशिक रस्त्याने नारायणगावपर्यन्त जाणार असाल तर नारायणगावच्या अलिकडे एक दीड कि.मी.वर 'सुपर श्रीराज' हे धाबावजा हॉटेल आहे. १३२ केव्ही स्टेशनच्या शेजारी पुण्याहून जाताना डाव्या बाजूला(३-४ मजली हॉटेल 'नीलायम्'च्या शेजारी)तिथे मासे वगळून सर्व नॉन्व्हेज अतिशय उत्तम मिळते, हे श्री. भुजबळ नावाच्या माजी सैनिकाने चालवलेले असून तिथे दारू पिण्यास बंदी असल्याने वातावरण शांत असते. मटन, चिकन, सुके बोंबील चे बरेच पदार्थ उपलब्ध तर असतात पण व्हेजमध्ये 'मासवडी' नावाचा 'जानलेवा' प्रकार रश्श्यासह उपलब्ध. इथले मसाले एकदम घरगुती त्यामुळे पोटाचे चिन्ता नाही. ज्वारीच्या व बाजरीच्या पापुद्रेदार चुलीवर भाजलेल्या मोठ्ठ्या गरमागरम भाकरी . जास्तीत जास्त दीड भाकरी खाऊ शकता अशा मोठ्या भाकरी.
विशेष म्हणजे 'क्वांटीटी ' एकदम भरपेट असते..
आणि बिल धक्कादायक म्हणता येईल इतके कमी...

नारायणगावात गेलात तर चुकवायचे नाही. आम्ही नाही चुकवीत

शेवयाचा भात कसा करायचा बाजो??
>> तेच ते नेहमीचे.काहीही प्रोसेस न करता तेल मीठ घालून शिजवलेल्या/उकळलेल्या प्लेन हातवळणीच्या शेवया.. त्याला खेड्यात शेवयाचा भात म्हनतात .त्याचे पाणी वजा खारे गर्रम गर्रम सूप आधी प्यायला मिळे . तेही अप्रतिम. गरम दूध, शेवया तूपहीचांगले लागते पण आमरस तो आमरसच...

हा शेवयाचा भात नवरदेवाला लग्नाच्या आधल्या दिवशी खायला भावकीतले लोकप्रत्येक घरी बोलावतात. त्याच्या बरोबर इतर मुले / करवल्या घोळक्याने फिरत असतात. नाहीतरी तो एकटा किती घरी खानार. लहान मुलांची मजा असते त्याच्याबरोबर.

अलिकडे एक दीड कि.मी.वर 'सुपर श्रीराज' हे धाबावजा हॉटेल आहे>> नोंद घेतली आहे. जेव्हा तिकडे जाउ तेव्हा मासवड्यांचा समाचार घेण्यात येइल. बैदा (तिकदे बैदाच म्हणतात ना) असेल तर तो हि घेवु.

शेवयाचा भात कसा करायचा बाजो??>> शेवयाचा भात हा शब्द मी उस्मानाबाद, सोलापुर येरीयातच ऐकलाय.

लग्नाच्या आदल्या दिवशी नवर्‍याला शेवया देतात. भात देत नाहीत खायला अशी परंपरा पाहिली आहे.
शुकु तु लिहिलेल्या पद्धतीनेच बनवत असतील. पण जास्त पातळ नाही करायचं.

झकास राव , भात देतच नाहीत. उकडलेल्या शेवयानाच 'शेवयाचा भात' असे नाव आहे. नगर , पुणे (ग्रामीण), सोलापूर इ. ग्रामीण भागातील लोक शेवयाचा भात हाच शब्दप्रयोग वापरतात. तसा भाताचा संबंध नाही. भगरीचा भात्,राळ्याचा भात्,बाजरीचा भात असेही शब्द प्रचलीत आहेत. केवळ पुणे शहरात प्रचलित नाही म्हणून तो शब्द चुकीचा आहे असे नाही.

मला पारले जी च्या बिस्कीटांवर टोमॅटो सॉस लावुन
अंड पोळी मधे रोल करुन चहात बुडवुन करुन खायच
मसाला पापड वर कांदा,टोमॅटो शेजवान सॉस मधे मिक्स करुन स्प्रेड करुन खायच
उरलेला खिमा ब्रेड मधे भरुन ग्रिल सँडवीच
तांदळाचे आयते आमरसासोबत ,,,यम्मी Happy
मुगाची टोकरी चाट चे पदार्थ घालुन Happy
लोणच...वेज असो वा नॉनवेज

बिबड्यंच्या पापडांची खिशी, तेल घालून... लाळ!
बिबडेभाजून्+त्यावर लोणी विथ कच्चे शेंगदाणे...स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प!

. केवळ पुणे शहरात प्रचलित नाही म्हणून तो शब्द चुकीचा आहे असे नाही.>> माझहि तो शब्द चुकीचा आहे अस म्हणन नाहिये.. Happy

झकास राव , भात देतच नाहीत. उकडलेल्या शेवयानाच 'शेवयाचा भात' असे नाव आहे. नगर , पुणे (ग्रामीण), सोलापूर इ. ग्रामीण भागातील लोक शेवयाचा भात हाच शब्दप्रयोग वापरतात. >>>>>>>>>>> बरोबर. आमच्याकडे (बारामतीला) शेवयाचा भात असेच म्हणतात.

शेवयाचा भात + दुध + गुळ + तुप >>>> अहाहा!!

हा शेवयाचा भात नवरदेवाला लग्नाच्या आधल्या दिवशी खायला भावकीतले लोकप्रत्येक घरी बोलावतात. त्याच्या बरोबर इतर मुले / करवल्या घोळक्याने फिरत असतात. >>>>> मी ही पद्धत शिरूर तालुक्यात पाहीली. माझ्या मावसभावाच्या लग्नावेळी त्याला केळवण (आमच्याकडे गडंगण म्हणतात) म्हणून शेवयाचा भातच असायचा.

शिळ्या भाकरीचा हाताने केलेला चुरा आणि त्यावर गरमागरम मटणाचा रस्सा (ह्यासाठी शनिवारी रात्रीच जास्तिच्या भाकरी टाकायला सान्गायच्या)
हापुस आम्ब्याचे छोटे छोटे चौकोनि तुकडे + व्हेनिला आईस्क्रिम
बेसनात तळलेले शेन्गदाने + चिझचे छोटे छोटे चौकोनि तुकडे

झेड्प्रतिभा:- बाहेर जोरदार पाऊस चालु असताना गरमागरम शेंगोळ्या आणि भाकर. कुळथाच्या पिठाच्या शेंगोळ्या करतात. शेंगोळित वरुन थोडे कच्चे तेल घातले कि विचारुच नका.तोंडाला अगदि पाणी सुटलय....
प्राजक्ताडी:- अगदी ! अगदी ! एकदम जमेश बेत असतो तो...शेंगोळ्यांना तिखट जिलबी असही नाव आहे... भरपुर लसुण घालुन गरम शेंगोळ्या आणी गरम बाजरीची (पापुद्रेवाली) भाकरी त्यावर नुकतच केलेल लोणी.यंदाच्या भारतवारीत एका माऊलीने हा पदार्थ खावु घालुन जिभ तुर्प्त केली होती. ....
झेड्प्रतिभा:- प्राजक्ता, आईला सांगुन इतक्या शेंगोळ्या बनवायला सांगायचो कि दुसर्‍या दिवशी परत तव्यावर तेल टाकुन गरम करुन नुसत्याच खायला पुरल्या पाहिजेत.

>>

हा 'जीवघेणा' संवाद जुन्या मायबोलीवरून घेतला आहे. हुलग्याची (कुळीथ) मडक्यातली गर्रम गर्रम शेंगोळी (इतकी गरम की जीभ भाजली पाहिजे), आणि भाकरी बरोबर त्याची मस्सालेदार शेंगोळ्यांचा अर्क उतरलेली ग्रेव्ही . मसाला फार नव्हे लसूण . मिर्ची, मीठ एवढेच. नुसती प्यायला देखील अमृत.
काय बोलावे काय लिहावे. नेति, नेति, नेति...

उमरखय्यामाने देखील लिहिले असते..

'अन या इथे संध्याकाळी चुलीजवळी,
असावीत मडक्यातली चविष्ट शेंगोळी,
सोबत प्रियेच्या हातची गरम भाकरी,
हट , गेली उडत रातपाळीची नोकरी..."
Proud Proud

(मूळ तर्जुमा
Here with a Loaf of Bread beneath the Bough,
A Flask of Wine, a Book of Verse — and Thou
Beside me singing in the Wilderness —
And Wilderness is Paradise enow...)

हे खारोड्या, बिबड्या व शेंगोळ्या पदार्थ कसे बनवतात त्याची कुणी सचित्र कृती टाकेल का ? सॉलीड टेम्प्टींग दिसत आहेत.

Pages