माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुरकुरीत खेकडा भजी चहामधे बुड्वून्बुड्वून खायची. चहा कटींगवाला, अमृततुल्य असलाच पाहिजे. ४-५ भज्यांनंतर एखाददोन घोट उरतो. त्यात मस्त भज्यांची चव आलेली असते. आहाहा... ओहोहो....

अज्ञजनांसाठी टिप : ही भजी कांद्याची असतात खेकड्याची नव्हे Proud

नी पहिल्यांदाच वाचलं अस भजी चहात बुडवुन.... Uhoh

बाय द वे, मी चहा घेतो मस्तपैकी त्यात गुड्डे कॅशु बिस्किट बुडवुन खाता खाताच एखादं त्यातच सोडायच.
बायकोने डोळे मोठे केले की म्हणायच ते चुकुन पडलं. Proud
अस चुकुन आणि चुकवुन चार ते पाच वेळा पाडायच. Wink
मग त्यात ब्रिटानियाच बॉर्बॉन बिस्कीट खाता खाता चुकुन पाडायच. ही दोन तरी बिस्कीट चुकुन पाडायची. Wink
मग चहाच प्राक्षण करुन ती बिस्किटं मस्त होतील. त्याना एक चमचा घेवुन मिक्स करायच. फार पातळ नाही पाहिजे. पातळ वाटल तर आपल्या आवडीच अजुन एखाद बिस्किट चुकुन पाडायच. Wink

रबरबीत मिश्रण तयार झालं की चमच्याने हाणायच.. Happy

एखादा फारच रावडी राठोड असेल तर त्याने बायकोसमोरच चमचा ऐवजी देवबाप्पाने दिलेले तर्जनी हे बोट वापरावे खाण्यासाठी. Proud

स्वताच्या जबाबदारीवर हा प्रयोग प्लीजच.. Biggrin

माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात.... >>>>

टेरेसमधल्या केनच्या खुर्चीवर दोन्ही पाय वर घेवुन बसायचं ( एकदम गावठी स्टाइल. पाठीला एक उशी असेल तर अजुन आराम) एका हातात पुस्तक आणि दुसर्‍या हातात खाणं. मला न आवडणारे पदार्थ सुद्धा आयते, गरम आणि पुस्तक वाचताना मिळाले कि आवडते होतात.

चविच खाणार त्याला देव देणार...

गरमा गरम बटाटावड्या सोबत उकड्या तांदळाची लुसलुशीत भाकरी वर लसणाची चट्टकदार चटणी...

तुला प्राशन म्हणायचंय का रे झकोबा?>>> तेच की नी.
तोंडात त्यावेळी पाणी आल्याने स्लिप ओफ टन्ग असेल..

बाकी बटाटे वडे किंवा गरमागरम भज्जी खाताना तळलेली झणझणीत मिर्ची हवीच बॉ..
मजा दुप्पट होते...

लग्नाच्या जेवणात (खास करून कोल्हापूर , सांगलीकडच्या) मठ्ठा आणी जिलेबी असेल तर जिलेबी मठ्ठ्यात भिजवून ,, काय चव येते जिलेबी आणी मठ्ठा दोघानापण ,...
टीप : हे जर तुम्ही पहिल्या २-३ पंगतीत असाल तर , नंतर पाणी घालून घालून नावापुरता उरलेल्या मठ्ठ्यात नाय चालणार हे Happy

शेवयांचा उपमा किंवा तिखटा-मिठाचा सांजा आणि त्यावर आदल्या दिवशीची (शिळी) कढी - यम्मी लागतं.

१) मटकीची नेहमीची उसळ आणि घट्ट दही
२) महाराष्ट्रीय पद्धतीचा गोड शिरा आणि लिंबाचे लोणचे
३) कटाची आमटी आणि साधे वरण एकत्र करुन

१) मटकीची नेहमीची उसळ आणि घट्ट दही
२) महाराष्ट्रीय पद्धतीचा गोड शिरा आणि लिंबाचे लोणचे
>>>> दिनेशदा, द्या टाळी!

एकूणच उसळी + दही एकदम फेवरीट.
दहीबुत्ती + माझी स्पेशल लसणीची चटणी
चविष्ट ओटमील + मास्पेलच.
गोडं वरण, भात, तुप, लिंबाचं लोणचं
पालेभाजी, भाकरी, कांदा, मिरचीचा ठेचा
आंबेमोहराचा गरम गुरगुट्या भात + कुळथाचं पिठलं

उपम्यासोबत बारीक शेव. ही शेव सगळ्या उपम्यावर एकदम घालायची नाही. प्लेटमध्ये बाजुला घ्यायची आणी घास घेताना थोडीशी उपम्यासोबत घ्यायची.

मॉन्जिनीजचे बार केक मिळतात त्यावर कोणतंही आईस्क्रीम घालायचं १ स्कुप आणि हादङायचं. यम्मी लागतं.

निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या मोठया हवेशीर गच्चीत सकाळचे कोवळे उन पडले आहे..... आजुबाजुला गुलाब-मोगरा-निशिगंध या फुलांचा सुवास दळवळत आहे..... आवडत्या सुगंधी साबणाने आंघोळ करुन, निवांत मनासारखी देवपुजा झाल्यावर , आपल्या आवडीच्या व्यक्तिंबरोबर ( यात आई,वडिल,भाउ,बहिण,नवरा,मुले,मैत्रिण कोणीही चालेल आणि कोणी नसेल तरीही, आपण आहोत की स्वतःसाठी ) गरम गरम आले-वेलची घातलेला चहा, मउसुत,खमंग,कोथिंबिर्,ओले खोबरे यांनी सजवलेली पोह्याची डिश..... अहाहा स्वर्ग सुख यापेक्षा काय वेगळे असेल....... Happy

मामे, अगदी लहानपणापासून या आवडी आहेत.
१) लसणीची चटणी + साधे तेल
२) भाकरी, मेतकूट + तूप (भाकरीवर पसरून)
३) ताकभात आणि पालेभाजी
४) हल्दीरामचा कोरडा सामोसा कुस्करून + घट्ट दही
५) गलाबजामून (पाक वगळून) + दूध
६) रव्याचा लाडू + दूध
७) नेहमीचे पेढे मायक्रोवेव्ह मधे गरम करून
८) कडक पाव, मस्का लावून + चहा
९) चॉकलेट केक + कॉफी

दही + भात + तळलेली मिरची
फोडणीची पोळी भरपुर कोथींबीर घालुन + खारे दाणे + दही
भरपूर साजुक तुपात ओथंबलेली पुरणपोळी

कुठलेही सुप + चीझ पास्ता..ओरेगानो

वालाचं बिर्ड+ साधा भात+ लसूण, मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीरीची ओली चटणी+ आंब्याचं लोणच... हे सगळं एकत्र करून खायचं. भात गरम हवा. श्रावणात हमखास हा बेत बनतो.

मस्त गरम भात व कुलदाचि पिथि ( पिथाल्या पेक्शा पातल) अनि त्याचा बरोब्रर काहिहि. लोनच, पापध, सुका मचिइ. ................. वा मजा आलि.

हायला,
हा लयीच तोंपासु बीबी आहे..... Happy

मला कटाची आमटी, भात आणि त्यात थोडसं आंबटसर दही घेवुन खायला आवडतं.
पुरणपोळी, दुध, तुप ह्यापेक्षाही कटाच्या आमटीतच बुडवुन जास्त भारी लागते. पुपो खाताना दही नाही घालायच आमटीत. ते फक्त भात खातानाच...

मामी तो बीबी अजुन पुर्ण वाचलेला नाहिये पण माझिया जातीचे अजुन बरेच असावेत अस वाटतय खरं.
वाचतो तो ही.. Happy

लग्नाच्या जेवणात (खास करून कोल्हापूर , सांगलीकडच्या) मठ्ठा आणी जिलेबी असेल तर जिलेबी मठ्ठ्यात भिजवून ,, काय चव येते जिलेबी आणी मठ्ठा दोघानापण ,...<<<<
काय आठवण काढलीये... अहाहा Happy

१) मटकीची नेहमीची उसळ आणि घट्ट दही
२) महाराष्ट्रीय पद्धतीचा गोड शिरा आणि लिंबाचे लोणचे<<<

अहाहा..
श्या आता कष्ट करावे लागणार... Happy

मसाला पापडावर जे मिश्रण पसरवतात ते मिश्रण खाकर्‍यावर पसरून
<<<<<<<<<< हि कल्पना मस्त आहे..... झटपट व चटपटीत

Pages