माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुधा भाजणीचं पीठ वापरून केलेले ते थालीपीठ आणि इतर ते धपाटे अशी विभागणी असावी. मग भोके वगैरे हा सोयीचा भाग असावा सर्व भागाला तेल पोचावे म्हणून....

लले, आपण दोघी एकत्र पुण्यात असू तेव्हा जाऊया खायला गाडीवरचे लोणी-धपाटे.

खिशात पैसे नसल्याने >>> बाजो, शो. ना. हो!

गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे>> बाजो हा प्रकार माझ्याबाबतीत नेमका उलटा घडलेला. शिक्षणाच्या निमित्ताने सांगलीला राहायचा योग आल्यानंतर समजलं धपाटे हे पाठीतच नव्हे तर पोटात खाण्याचेही असतात Happy

तोपर्यंत मात्र थालिपीठ आणि लोणी हेच माहीती होतं. धपाटे पातळ लाटून किंवा थापूनही करतात.>> बरोब्बर!

थालिपीठाला भोकं पाडून त्या भोकांतून तेल सोडतात म्हणजे थालिपीठ सगळीकडून खरपूस \खमंग भाजले जाते. अर्थात आपापल्या आवडीनुसार! गरमागरम थालिपीठ आणि पांढराशुभ्र लोण्याचा मोठ्ठा गोळा म्हणजे स्वर्गसूख असते...

बरं झालं हा बिबि परत चालू केला ते. आठवण आली की जुनाच कितीदातरी वाचला जात होता Happy

एक एक पोस्ट वाचून चव अशी आठवून , इमॅजिन करुन घोळवत रहाविशी वाटते.

माझं सासर कर्नाटकातलं. वर उल्लेखलेले कडक भाकरी आणि धपाटे तिकडे अगदी लग्नसमारंभात मस्टच असतात. त्या सुपर कडक भाकर्यांना तिथे छज्जी रोटी म्हणतात. (छज्जी म्हणजे ज्वारी का?) अगदी महिना-महिना भर टिकता. ही भाकरी आणि धपाटे, सोबत गावचीच कुट्लेली शेंगदाण्याची चटणी (एकदम चवदार आणि तिखट, खाऊन पोट बिघडलचं पाहीजे आणि हे माहीत असुनही खाल्लीच पाहीजे अशी)+ताजं दही. आणि हे खायचं कुठे तर शेतातल्या विस्तिर्ण चिंचेच्या झाडाच्या सावलीत. केळीच्या पानावर. जोडीला वांग्याची भाजी, तुरीच्या डाळीची स्पेशल कर्नाटकी भाजी, गव्हल्यांची खिर, कच्चा कांदा आणि कच्ची मेथी..अहाहा..नुस्ती आठवण आली तरी बास्..हे घ्या सगळं खास तुमच्यासाठी...
400482_2886919746551_1524495173_n.jpg

आणि खासा आग्रह हवाच
396485_2886918226513_2000848738_n.jpg

आणि ताजा ताजा हुरडा खाताना केव्हा थांबावं हे कळतच नाही
166974_2886890545821_1152710784_n.jpg427330_2886886665724_29875663_n.jpg

माझे अजून काही खास आवडीचे म्हणजे थंडगार फ्रिजमधलं पाणी आणि त्यात बुडवलेले पारले जी. ईतके दिवस हसतील म्हणून कोणाला सांगत नव्हते पण असे खाणारे बरेच जण आहेत हे मला कळून आलयं Proud

आणि ऊन्हाळ्यात आईस्क्रिम पण पाहीजे आणि आंबे पण मग हे खाणं मस्टच
2012-05-20-23.03.jpg

सगळ्यात आवडते स्प्राइट आणि व्हॅनिला, उंच ग्लासात, उंच चमच्यासहीत्...सोबत एकच आवडती व्यक्ती :P...रात्रीची वेळ, छान जुनी गाणी...फ्रेंच विंडोमधे बसून बाहेर बघत आस्वाद घ्यायचा...अहाहा...सुख सुख म्हणतात ते हेच हो Happy
2012-05-23-22.24.09.jpg

कळण्याची भाकर आणी शेंगदाण्याचं ओलं तिखट
कळण्याची भाकर आणी तीळ्/मिरची/शेंगदाण्याचं कोरडं तिखट ....तेल टाकुन,
कळण्याची भाकर आणी हिरव्या मिरचीचा खुडा.
गरम भात आणी तव्यावरचं पिठलं
खिचडी आणी कढी (तळोद्याकडे लग्नात कोणी जेवलेय काय ?)
कळण्याच्या पुर्‍या आणी बामणोदी वांग्याचं भरीत
बाजरीच्या पुर्‍या आणी बामणोदी वांग्याचं भरीत
गरमागरम चपाती आणी दाय-गंढोरी (मलकापुर स्पेशल)
बाजरीची भाकरी/चपाती आणी शेवभाजी (शेव भुसावळच्या बोंडेचीच पाहीजे)

मी आत्ता तेच लिहायला आले होते इतके सगळे भाकर्‍यांबद्दल बोलताहेत तर कळण्याबद्दल कुणीच लिहिले नाहिये का.

कळण्याची गरम गरम भाकरी + लोणी नाष्ट्याला
नाचणीची उकड+ भरपूर तेल घालुन
भरपूर तुपातला गाकर
चुरमुरे+तिखट+मीठ्+कच्चे तेल+बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर (असेल तर कैरी)
शिळी भाकरी +डांगर (सोलापूरकरांचा मस्ट नाष्टा)
आदल्यादिवशीच्या भाजी आमटीत सगळी पिठे मिक्स करुन केलेले थालिपीठ +साईचे दही
सोलापूरे कडक भाकरी +दाण्याची चटणी+दही, सोबत पातिचा कांदा
कुठलिही कडधान्याची उसळ+ बारिक चिरलेला कांदा+बारिक शेव
भुसावळी वांग्यांचे भरीत्+पुरी
चैत्रगौरीची उरलेली डाळ परतुन + काकडी
तुरीच्या डाळीची मसालेदार खिचडी _ लसणीचे तेल (तेल गरम करुन त्यात लसणीच्या पाकळ्या चांगल्या खरपूस तळायच्या)
दिवाळीतले उरलेले चिवडे+घट्ट दही+ बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओला नारळ
तळलेल्या पापडावर खवलेला नारळ मिरची कोथिंबीर बारीक चिरुन
रात्रीच्या भाकरीचा चुरा+तेल +तिखट्+मीठ्+लसुण कांदा मसाला (हे आम्ही तोठरा लागे पर्यंत गपागपा खायचो लहानपणी कारण पाणी प्यायला घेतले तर एखाद घास कमी मिळेल आणि दुसरा जास्त खाईल या भीतीने) Lol
शिळी भाकरीचा कुस्करा ताकात भिजवुन्+बारीक चिरलेली मिरची+कोथिंबीर्+लोणच्याचा खार
दुधभात+लोणच्याचा खार्/तळलेली मिरची/खारातली मिरची

अजुन भरपूर आहे आठवेल तशी लिहिते

आईच्या हातची हातावरची भाकरी (तव्यावरून डायरेक्ट ताटात) त्यावर लोणी / तूप आणि बरोबर भरलेलं वांगं (कृष्णाकाठचीच वांगी पाहिजेत) किंवा झुणका

गरम चपाती/भाकरी, ताजं सायीचं दही आणि बरोबर कसलीही चटणी (शेंगदाण्याची, लसणाची, कारळ्याची)

आमरस आणि भात

शिरा आणि बरोबर मॅगी हॉट अँड स्वीट टोमॅटो चिली सॉस

कळण्याची भाकर, आंबाडीची भाजी
ती तर लई ग्वाड लागती
अवं नुसतीच कळण्याची भाकर आणि नुसतीच आंबाडीची भाजी,
वर तेलाची धारच नाही..................... मला दादला नको गं बाई !!

_______/\_______

या चिन्हाचा अर्थ काय आहे ????? इथे खुपजण प्रतिक्रीया देताना हे चिन्ह वापरतात

>>शिरा आणि बरोबर मॅगी हॉट अँड स्वीट टोमॅटो चिली सॉस
+१ Happy

बाकी अनेक प्रकार ऐकूनही माहित नसलेले आहेत. उदा कळण्याची भाकरी म्हणजे कसली??

लोकहो , कळण्याच्या 'बिबड्या' कोणी खाल्ल्या आहेत/ ऐकल्या आहेत. चुलीवर भाजलेल्या बिबड्या हा प्रकार स्वर्गलोकात सर्व्ह करण्यासाठीच देवाने निर्माण केला आहे Happy

कळणा - वेगवेगळी धान्ये एकत्र + जीरं + हळद / एखादं भाजलेलं हळकुंड हे सगळं एकत्र दळतात. हा कळणा. याच्या नेहेमीप्रमाणे भाकर्‍या करतात.
धान्यांचं प्रमाण मात्र मला नाही माहीत. जाणकार सांगू शकतील.

एक मात्र आहे... ह्या भाकर्‍या नेहेमीच्या ज्वारी, बाजरी, तांदूळ भाकर्‍यांपेक्शा खमंग लागतात... :प

कळणा-कोंडा असा जोडशब्द आहे तो मूळ. पूर्वी डाळी या खेड्यात कडधान्ये भिजवून करीत. भिजवलेली कडधन्ये वाळवीत व हलक्या जात्यावर भरडीत. त्याने साले सुटी होऊन त्याचा भुगा होई तसेच डाळीचे काही भरड तुकडेही होत. डाळ बाजूला केल्यावर जी फोलपटे व डाळीचा चुरा राहत असे त्यास कळणा-कोंडा म्हणत.त्यात तिखट मीठ लसूण टाकून त्याच्या अनारशाच्या साईजच्या गोल वड्या थापून करीत व वाळवून डब्यात भरून ठेवीत. या नन्तर वर्षभर चुलीच्या विस्तवावर खमंग भाजून भाकरीसोबत अथवा तशाच खाल्ल्या जायच्या. याच त्या 'बिबड्या'... आता डाळी यंत्रावर बनवल्या जातात व खेड्यातूनही त्या आयत्याच दुकानातून विकत घेतल्या जातात. त्यामुळे कसल्या आल्यात बिबड्या. यात सालींचा वापर असल्याने त्या पौष्टिकही असत.
त्याच्प्रमाणे कुरडया करताना अगोदर गहू भिजत घालून ओले गहू पाट्यावर वाटले जायचे व त्याचा चीक शिजवून त्याच्या कुरडया केल्या जात. त्यात वाटून उरलेली जी गव्हाची फोलपटे असत त्यात तिखट मीठ लसूण घालून असल्याच गोल अनारशाच्या आकाराच्या पापड्या केल्या जात व वाळवून साठवल्या जात् व भाजून खाल्ल्या जात.

थोडक्यात कळणा म्हणजे फोलपटे आणि दळताना तयार झालेला भुगा यांचे मिश्रण......

बाजो,
कळणं हे खानदेशी आहे. अन बिबडी पण.(संपादनः कळण्याची बिबडी करत नाहीत. आजही जळगाव जिल्ह्यात बिबडी बनवणार्‍या महिला बचत गटांकडून बिबडी सातासमुद्रापलिकडे एक्स्पोर्ट होते Wink ) बिबडी म्हणजे (संपादनः आंबवलेल्या) ज्वारीचा तिखट पापड. सेक्सी अस्तो. तुम्ही सांगितलेला रेस्पीमधे बिबडी अन खारवडी मधे घोळ झालाय... खारवडी कुरडईचा चीक काढून झाल्यावर उरते त्या गव्हाच्या सालींची बनवतात.
कळण्यात ज्वारी अन उडीद असतो, प्लस तिखट मीठ.
हे फोलपटे अन भुगा प्रकर्ण मी तरी कधी ऐकलं नव्हतं.
(खानदेशी) इब्लिस

@इबलीस ,कळण्याचे मूळ वर दिलेच आहे . कळणा-कोंडा हा साधारण शब्द आहे. धान्याचे पर्म्युटेशन्स बदलू शकतात. खानदेशाप्रमाणे पुणे परिसरातही हा 'टाकाऊतून टिकाऊ' कळणा वापरात असे. नन्तर मग मुद्दम भरड केली जात असावी. कळण्याच्या बिबड्या बनत असत. हे लिहिण्यापूर्वी मातोश्रीना फोन करून खात्री केली आहे Happy गव्हाच्या चिकाच्या वड्या ज्याला तुम्ही खारवड्या म्हनतात त्याला आमच्याकडे विशिष्त नाव नाही पण तो उन्हाळी पदार्थाचा बायप्रॉडक्टच आहे म्हणून तो मला बिबड्यांबरोबरच आठवला.

घुंघुरमास चा खुलासा माबोवरच नुकताच कुठेतरी येऊन गेला आहे.

धुंधुंरमास- हिवाळ्यात संक्रांती च्या आसपास कुठेतरी असतो. या महीन्यात, सकाळी उठल्यावरच जेवायचे असते. त्यात, खास पदार्थ असतात... नवीन आलेल्या मुगाची खिचडी-तूप, बाजरीची भाकरी-ता़जं लोणी, वांग्याची भाजी... असले प्र्कार करतात...

बहुतेक नवीन धान्य पचायला जड अस्ल्याकारणानी सकाळी खायची पध्द्त पडली असावी+ या काळात सकाळी चांगली भूक लागते हे ही कारण असू शकतं... Happy

<<पातळ पोह्यांचा चिवडा वाडग्यात घ्यायचा. त्यावर मस्त गरम्गरम चहा ओतायचा आणि खायचा. >> +१०००
माझे तर असे मत झालेय की चहा मिसळला की कित्येक पदार्थ अजून चविष्ट लागतात.

गरम गरम भाकरीवर फक्त 'दुखावलेल्या' लसणीची फोडणी! .. बस्स!

रात्री पोटभर जेवण झाले, की पातळ ताक, त्यात मीठ, हींग, थोडंसं आलं आणि चिमटीने चिरडून जिरे..

आदल्या दिवशीच्या वरण भातावर चिवडा.

दोन आम्लेटांच्या मध्ये बटाटा चिप्स ( पारशी लोकांमधे डिश आहे बहुदा).

टोस्ट केलेल्या ब्रेड वर मध घोळवलेले बटर! ( ईथे हनी-बटर मिळतेच) .

चकली-चहा!

लसूण चटणी सोबत काहीही -

बाकी एमिरिल लगासी म्हणे त्याप्रमाणे, लसूण गाडीच्या बंपर्वर लावली तर बंपरही खाता येईल.

Pages