बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलाच्या वाढदिवसाची थीम "लायन किंग" आहे. त्यामुळे त्या थीमबरोबर जाणारे पदार्थ हवे आहेत.

मुलांसाठी::
१. कूकी कटर वापरून सँडविच करणार आहे प्राण्यांच्या आकाराचे.
२. प्राण्याच्या शेपचा पास्ता
३. फ्रुट्स
४. पॉप कॉर्न
४. केक

मोठ्यांसाठी काय करावे?
मुलांसाठी आणखी काही करता येईल का?

पार्टि ४:३० ल आहे.
६ पासून मूव्ही दाखवू. म्हणजे लोक ८ पर्यंत तरी असतील
डिनर नसला तरी पोटभर खाणं हवं.

@bittu : मोठ्यांसाठी व लहानांसाठी पिझ्झा / पावभाजी. आणि आईसक्रीम. Happy

त्यांचे डेकोरेशन थीमनुसार करता येईल.

चिकन तंदुरी ( शक्यतो लेग क्वार्टर घे), रोल (चपाती मधे सॅलेड्,चिकन घालुन), ब्राउनी, एखादा भाताचा प्रकार...

मला एका मैत्रिणीला जेवायला बोलावयाचे आहे. ती, मुलं अणि इतर असे ४-५ लोकं येणार. ही मुलं फक्त अमेरिकन फूड खातात. त्यंच्यसाठी काय करू? शक्यतो दुपारी बोलवेन म्हणून ब्रंच्/लंच्+स्नॅक्स मेनु सांगा. या मुलांना मी सर्व पदार्थ सोडून कूकीज, दुध्/पेस्ट्री, डोनट्स खातांनाच पाहीलय Sad
मैत्रिणीला पावभाजी, छोले असे प्रकार आवडतात. भेळ वगेरे. पण मुलं आणि मोठे सर्वांना चालेलआणि पोटभर होईल असं हवयं. मुलांना भारतीय प्रकार फारसे माहीत नाही/इंटरेस्ट नाही.
दोन लहान मुलांना सांभाळून काय काय करता येइल?

चिन्नु ती मुलं अंडं खाणारी आहेत (डोनट्स वरून Wink ) तर Fritatta करुन पहा ..फूड नेट्वर्कच्या साईट्वर त्याचे व्हेरिएशन्स मिळ्तील..पोट्भरीला वाईट नाही. सोबतीला एखादा फ्रेंच ब्रेड आणी थोडं टीपी आयट्मस (विकतचे) चिप्स डीप, ज्यूस इ. ठेवू शकता. मुलांना संभाळून हे जमेल. फ्रटाटा नंतर ओव्हनमध्ये जातो सो टायमर चेक करायचा

पास्ता, बेक्ड व्हेजिटेबल्स / सलाड, गार्लिक ब्रेड, ज्यूस / सूप, डेझर्ट. ब्रेड स्टिक्स व डिप्स.

स्टार्टर्ससाठी भारतीय प्रकार ठेवता येईल. विकतही आणता येईल.

मैत्रिणीलाच ती मुलं काय खातात/ खात नाहीत ते विचारून घे.

आमच्याकडे पार्टीसाठी काही लोक येणार आहेत.साधारण १० फॅमिली असतील. म्हणजे साधारण १० - १२ बायका ५-८ वयोगटातील १० मुले आणि १-३ वयोगटातील १० मुले असतील.
मी पार्टी साठी
मटार उसळ ब्रेड
दही बुत्ती
ढोकळा
गुलाब्जामुन
पापड
पॉपकॉर्न
ज्युस आणि केक

हा मेनु ठरविला आहे. कसा वाटतो आहे ? काय काय बदल करु प्लिज सुचवा ? मी १टीच आहे करणारी त्यामुळे सोपे सुट्सुटीत असे काहीतरी करायचे आहे. आणि मेन म्हणजे पहील्यांदाच मी पार्टी अ‍ॅरेंज करणार आहे. त्यामुळे खुप टेंशन आले आहे.

nirmayi , तुम्ही लंच/डीनर कींवा ब्रेफा ला बोलवणार आहात का??? त्यानुसार पदार्थ सुचवणे सोपे जातील.
गुलाबजाम घरी करणार असाल तर आदल्या दिवशी करून ठेवा म्ह्णजे तेवढा वेळ वाचेल.

पापड स्टार्टर आहे का? दही बुत्तीबरोबर पापड कडू लागतो म्हणतात म्हणून विचारले. पण भाताबरोबर पापड नसेल तर काही हरकत नाही. लोणचे नक्की ठेव, दही बुत्तीबरोबर मिरचीचे लोणचे छान वाटते.
४ वाजता बोलाव्णार असशील तर तसे ३-कोर्स होणार नाहीत, मग ढोकळ्याची गरज आहे का ते बघ.
लहान मुलांसाठी थोडे चीज स्लाईस आणून ठेव, म्हणजे यातले काही खाल्ले नाही तरी चीज ब्रेड खाऊ शकतील.

ढोकळा मी लहान मुलांसाठी करणार होते. आणि त्यांच्याबरोबर आया पण खातील म्हणुन.
नाहीतर जॅम ब्रेड किवा चीज ब्रेड ठेवू का?

माझा असा विचार होता की केक ढोकळा आणि पापड असे आधी द्याय्चे. आणि मग थोड्यावेळानी उसळ ब्रेड आणि दही बुत्ती.

१-३ वर्षाची मुले केक भात आणि जमले तर ढोकळा खाउ शकतील ना?

हे जर विचित्र कॉम्बो वाटत असेल तर प्लिज तसे सांगा आणि दुसरे काय ऑप्शन्स पण सांगा.

दही बुत्ती सर्वांनाच आवडेल की नाही हे पण माहित नाही आणि ४ वाजताच्या स्नॅक्समध्ये योग्य वाटत नाही. मटार उसळ ब्रेड आणि दही बुत्ती एवजी ढोकळा, मिसळ पाव, पावभाजी, पाणीपुरी, वडापाव, दहीवडा, सॅडवीचेस, समोसा, ईडली सांबार, स्विट कॉर्न चाट अस ठेवू शकता.

nirmayi, केक आणि गुलाबजाम शेवटी द्या. पापड नका ठेवू त्याएवजी चीज बॉल्स, खारी शंकरपाळी ठेवा.

मामी पापड घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा झिप लॉक प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये थोडे थंड झाले की भरुन ठेवायचे काही होत नाही.

परवाच्या रविवारी खास माझ्या भाच्यांच्या आग्रहास्तव मी खालील बेत केला होता :

हम्मस आणि बाबागनोश बरोबर घरी केलेला होलव्हिट ब्रेड (मेडिटरेनियन)
न्योकी बटरमध्ये सॉटे करून (इटालियन)
पास्ता विथ टोमॅटो-बेसिल सॉस आणि व्हाईट सॉस (इटालियन)
थाय करी राईस (थाय) (थायकरी ऑर्डर केली होती)
सुशी (जपानी) (पण आयत्यावेळी ही कॅन्सल केली. जरा जास्तच पदार्थ होतील असं सगळ्यांचं म्हणणं पडलं)
शेवटी उकडीचे मोदक आणि दुधी हलवा (भारतीय) (हे दोन्ही आस्वाद मधून ऑर्डर केले होते)

धन्यवाद आरती
खुप छान सजेशन दिले.
दहीवडा आणि पावभाजी हे कॉम्बो कसे वाटेल. शक्यतो पोट्भरीचे होइल. आणि सगळे खाउ शकतील असे ३-४ पदार्थांचे वेगवेगळे कॉम्बो सुचवा ना प्लिज.

तसेच सॅन्डविचेस चे ओलसर होणार नाहीत आणि सर्व वयोगटातले खाउ शकतील असे पण प्रकार सुचवा प्लिज.

साउथ लोक जास्त आहेत. त्यामुळे इड्ली ़कींवा तत्सम प्रकार शक्यतो नको.

माझ्याकडे आजचाच दिवस आहे.

दहीवडा आणि पावभाजी हे कॉम्बो कसे वाटेल.>> एकदम बेस्ट होईल. लहान मुलांना पावभाजी आवडतेच, पोटभरीचीही होते. लहान मुलं शक्यतो पावभाजी आणि केकच खातात, मोठ्यांसाठी दहीवड्याऐवजी दहीबुत्तीही चालेल.

Pages