नेमबाजी

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 12:16

१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके

- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

- पिस्तूल

- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा

- रायफल

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून

- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा

- शॉटगन

- स्पर्धक हालाणार्‍या मातीच्या निशाणावर नेम साधतात.

- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.

- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा

- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.

- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.

- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.

- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.

- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.

- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.

- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व्प्रथम धन्यवाद.... Happy

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.>>> अजुन जरा डिटेल्स लिहाल का प्लिज...
वेळ ठराविक असतो का?

ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून>>>> म्हणजे चॉइस असतो का हे वेगवेगळे प्रकार आहेत?

निवांत पाटील टीव्हीवर बघणार नाही का?

तीन प्रकार असावेत. थ्री पोझिशन हे नाव ऐकलेय. तिन्ही एकामागोमाग करतात की मध्ये विराम असतो हे बघायला हवे.

बीजिंग ऑलिंपिक्समध्ये एका स्पर्धकाने दुसर्‍याच नेमबाजाच्या लक्ष्याचा वेघ साधून पदक गमावल्याचे आठवतेय.

निवांत पाटील.. हे निशाणाची अंतरे आहेत.. १० मी., २५ मी. ५० मी. अश्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात.
आणि थ्री पोझिशन मध्ये आधी उभे राहून, मग गुडघ्यावर बसून आणि सगळ्यात शेवटी झोपून असे असते.

एकाच एव्हेंट मध्ये हे तिनही प्रकार असतात... ह्यांची वेगळी अशी स्पर्धा फक्त झोपून वेगळी असते. थ्री पोझिशन मध्ये एकच स्पर्ध तिन्ही प्रकारे लक्ष्यवेध घेतात.

पुरुषांची १०मी. एयर रायफलची क्रमवारी स्पर्धा सुरु झालीये.. बिंद्रा आणि नारंग दोघेही स्पर्धेत आहेत...

स्पर्धा अशक्य अवघड आहे... सगळे जण फक्त १० पॉइंटच मारत आहे.. ६०० पैकी ६०० गुण मिळवणारेच फक्त अंतिम फेरीत खेळतील बहुतेक...

बिंद्रानी आत्ता पर्यंत दोनदा ९ गुण मिळवले आहेत त्यामुळे तो बर्‍यापैकी मागे पडला आहे..

बिंद्राने तिसरी आणि चौथी सिरि़ज परफेक्ट मारली !
कमॉन बिंद्रा !!!!
नारंगने पहिल्या दोन फरफेक्ट मारलेल्या.. कमॉन नारंग !

किती जास्त कॉन्सट्रेशन लागत असेल.. !

पग्या फरफेक्ट बरेच जण मारताहेत.. पण त्यातही इनर १० जास्त महत्त्वाचे ठरते... शेवटाला... त्यामुळेच फरक पडणार आहे.. सध्या एकच प्राणी फरफेक्ट मारणारा उरला आहे.. सगळ्याच गोळ्या फरफेक्ट मारल्या आहेत त्यानी.. आणि ४२ पैकी ३७ इनर टेन मध्ये...

कुठेच लाईव्ह दाखवत नाहीयेत.. फक्त साईटवरच आहे... पण साईट जबरी आहे... एकदम लाईटनिंग स्पीडनी अपडेट होते आहे..

पहिले फक्त ८ अंतिम फेरीत जातात... Happy

उरलेल्या ७ गोळ्यात बिंद्रानी काही गम्मत केली नाही तर तो नक्की अंतिम फेरीत.. नारंगच्या अजून बर्‍याच गोळ्या बाकी आहेत.. पण ज्या पद्धतीने आत्ता मारतो आहे ते बघता तोही अंतिम फेरीत जाईल.. तसे झाले तर आज रात्री अंतिम फेरी नक्कीच बघणार..

लिही पर्यंत बिंद्रानी एक गोची केलीच आता तो काही जात नाही अंतिम फेरीत...

Pages