नेमबाजी

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 12:16

१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके

- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

- पिस्तूल

- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा

- रायफल

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून

- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा

- शॉटगन

- स्पर्धक हालाणार्‍या मातीच्या निशाणावर नेम साधतात.

- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.

- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा

- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.

- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.

- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.

- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.

- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.

- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.

- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नारंग(५९८) तिसरा आणि बिंद्रा (५९४) १६वा... शेवटच्या फेरीत कुठेतरी माशी शिंकली बिंद्रासाठी.. नाहीतर तो ७वा किंवा ८वा आला असता..

नारंगच्या २० गोळ्या मी स्कॅट वर गेल्याच महिन्यात पाहिल्या आहेत. मध्ये त्याच्या गोळ्यांचे रिप्ले पाहताना पण इतके जबरी वाटत होते की बास! फॉलो थ्रू अप्रतिम.

* http://www.scatt.com ही अ‍ॅडव्हान्स रायफल ट्रेनिंग सिस्टिम आहे.

केदार तू कुठे बघितलेस लाइव्ह.. नेटवर होते का कुठे???

अंतिमफेरी संध्याकाळी ४:४५ भारतीय प्रमाण वेळेनुसार आहे....

केदार तू कुठे बघितलेस लाइव्ह.. नेटवर होते का कुठे? >> नाही आज लाईव्ह नाही बघीतले. नेटवरच. तू स्कॅट बद्दल विचारलेस का?

नाही रे.. मी तुला शेवटच्या २० गोळ्यांबद्दल विचारले...

इंद्रा १० गोळ्याच असल्या तरी गुण दशांशात मोजतात...

अरे रे त्या २० गोळ्या स्कॅटवरच्या सरावातील आहेत. स्पर्धेसाठी स्कॅट नसते.

केदार कोणत्या अ‍ॅकॅडमीत? >> नारंग माझा महागुरू. मी त्याच्याच अ‍ॅकॅडमीत प्रो रायफल सरावासाठी जातो. गन फॉर ग्लोरी ह्या वल्ड क्लास सुविधा असणार्‍या अ‍ॅकॅडमीचा नारंग को ओनर आहे.

नारंग माझा महागुरू. मी त्याच्याच अ‍ॅकॅडमीत प्रो रायफल सरावासाठी जातो. गन फॉर ग्लोरी ह्या वल्ड क्लास सुविधा असणार्‍या अ‍ॅकॅडमीचा नारंग को ओनर आहे.>>>>>>>>> अरे माझा मित्र ही आहे म्हणुन विचरालं तो दादरला सावरकर अअ‍ॅकॅडमीतील रेंज वर सराव करतो, निलेश अभंग नाव त्याचे, आत्ता झालेली महाराष्ट्र एअर राफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता

१० गुण जरी मिळाले तर त्यात सुद्धा १०.० ते १०.८ पर्यंत गुण असतात.. लक्ष्याचे जसे १० गोलात विभाजन केलेले असते तसाच प्रत्येक गोल सुद्धा अजून छोट्या छोट्या १० गोलात विभागलेला असतो.. अगदी आतला गोल ८ गोलात विभागलेला असतो.. कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात.. फक्त ती दिसत नाहीत पण गुण मोजताना धरतात.

Pages