नेमबाजी

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 12:16

१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके

- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

- पिस्तूल

- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा

- रायफल

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून

- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा

- शॉटगन

- स्पर्धक हालाणार्‍या मातीच्या निशाणावर नेम साधतात.

- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.

- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा

- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.

- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.

- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.

- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.

- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.

- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.

- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टँडींगच्या शेवटी ७७५ गुणांसह २४ व्या स्थानी. आता फायनल साठी चमत्कारच घडावा लागेल. दुसर्‍या फेरीतले ९० नडणार आहेत !

इंद्रा.. ऑटोमॅटिक क्वॉलिफिकेशन पेक्षा लांब डिस्क टाकल्यामुळे गौडा अंतिम फेरीत गेला आहे.. पण तो पहिला नंबर असेल असे नाही.. त्याच्या पेक्षा जास्त लांब डिस्क टाकणारे अजून यायचे आहेत.. आणि त्याचा स्वतःचाही तिसरा थ्रो बाकी आहे.. पण त्याचे हे झालेले क्वॉलिफिकेशन पण नक्कीच आनंद देणारे आहे..

नारंग आणि संजीव राजपूत दोघेही अंतिम फेरीत पोहोचणे अवघड आहे.. नारंगनी उभे राहून नेम साधताना जे गुण गमावले तेच नडलेले आहेत.. तिथे २३ शॉट्स हुकले तिथेच अंतिम फेरी हुकल्यात जमा झाली..

नारंग २०वा तर राजपूत २६वा. नारंगला ११६४ गुण मिळवता आले.. आणि पहिला आलेल्या कॅम्प्रिआनीने ११८० गुण मिळवत नवीन ऑलिम्पिक्सचा रेकॉर्ड केलेला आहे... त्याच्यात आणि दुसर्‍या स्पर्धकात ८ गुणांचा फरक आहे.. त्याचे सुवर्ण पदक निश्चितच असल्या सारखे आहे.. पण दुसर्‍या नंबरसाठी चुरस आहे, ११७२ ते ११६८ मध्ये सगळे उरलेले ७ स्पर्धक आहेत.

Pages