नेमबाजी

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 12:16

१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके

- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

- पिस्तूल

- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा

- रायफल

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून

- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा

- शॉटगन

- स्पर्धक हालाणार्‍या मातीच्या निशाणावर नेम साधतात.

- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.

- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा

- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.

- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.

- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.

- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.

- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.

- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.

- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्या!! हे नखं खाण्याचे क्षण फार वाईट्ट असतात. ती लिंक रीफ्रेशला ठेवलीये तर कितीतरी वेळ ते चक्र हलतंच आहे, काहीच कळत नाहीये.

प्लीज पटापट टाका पोस्टस. जीव गळ्याशी आला आहे. ऑलिम्पिक्स साठी ऑफिसला सुट्टी द्यायला हवी खरं तर. ऑफिसमधुन एकही साइट ओपन होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पोस्टस वाचुन अपडेटस घेते आहे. इथे एकेक पोस्ट वाचुनही थरार अनुभवते आहे.

ये!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

खातं तरी उघडलं भारताचं... कोरी पाटी घेऊन येण्यापेक्षा ते कितीतरी छान.
गगन नारंगला आधीच्या फेर्‍यातली पुण्याई कामी आली.

प्लीज पटापट टाका पोस्टस. जीव गळ्याशी आला आहे. ऑलिम्पिक्स साठी ऑफिसला सुट्टी द्यायला हवी खरं तर. ऑफिसमधुन एकही साइट ओपन होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पोस्टस वाचुन अपडेटस घेते आहे. इथे एकेक पोस्ट वाचुनही थरार अनुभवते आहे.>>+१

अभिनंदन... २०१२च पहिल वैयक्तिक ऑलिम्पिक्स पदक

जाम मजा आली... मस्त टफ फाईट बघायला मिळाली... धम्माल

फारच भारी..जियो नारंग...आणि आपण सर्वांनी एवढा धीर धरून स्कोर पाहिला म्हणून आपलेही अभिनंदन करून घेऊ Happy

महाच टफ आहे बरंका हा प्रकार! एका जरी फेरीत गेलात तरी संपलंच!
हुश्य! पेढे वगैरे आणा! फिदीफिदी >> +१
९.९ आणि ९.५ नडले

नारंग आणि पहिला आलेल्या ह्यांच्यात फक्त एका गुणाचा फरक आहे आणि तो सुद्धा प्राथमिक फेरीतला... अंतिम फेरीत दोघांनी सेम गुण मिळवले... १० पेक्षा कमी गुणांच्या गोळ्यांनी फरक पडला...

Pages