नेमबाजी

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 12:16

१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके

- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

- पिस्तूल

- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा

- रायफल

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून

- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा

- शॉटगन

- स्पर्धक हालाणार्‍या मातीच्या निशाणावर नेम साधतात.

- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.

- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा

- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.

- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.

- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.

- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.

- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.

- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.

- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही निकाल लागलाय.
फायनलला सहा शूटर्स असता.चार राउंडसनंतर प्रत्येक राउंडला सगळ्यात कमी स्कोर (फायनल राउंडचा) असणारा एकेक स्पर्धक बाहेर पडतो.

अरे मी लाइव्ह फीड बघत होतो ऑफिशियल साइट वर .
ती जरा लेट आहे.

जबरी. दुसर मेडल भारताच. Happy
सिल्वर..
जबरीच..

अभिनंदन विजयकुमार....कांस्य झालं, रजत झालं....आता सुवर्ण Happy
४१ पदकं बघून माझा चिन्यांवर (उगीच :फिदी:) जळफळाट होतोय.

आज गगन नारंग आणि संजीव राजपूत पुरुषांची ५० मीटर्स रायफल ३ पोझिशन्स पात्रता फेरी दुपारी १:३० अंतिम फेरी संध्याकाळी ६:१५.
पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत मानवजीत संधू ७०/७५ शॉट्ससह पात्रता फेरीत सध्या पंचविसाव्या स्थानी.

कसली टफ कीम्पिटिशन आहे. > पाचव्या स्थानावरच्या गगनचे २६ शॉट्स इनर १० मधे आहेत तर पहिला आणि तिसर्‍याचे ३१ शॉट्स इनर १० मधे आहेत.

अगदी Happy मला आधी कळेचना की काही न होता नंबर का बदलतायत.. मग कळलं बाकीच्यांचं सुरु झालय ! सध्या तिसर्‍या स्थानावर आहे. स्टांडीग जरा अवघड असतं का? सगळ्यांचे एखादे शॉट ९ पाँईटला गेलेत.

उभे राहून नेम मारणे सगळ्यांनाच अवघड जाते आहे... झोपून नेम मरल्यानंतर पहिला असलेला आता डायरेक्ट पाचव्या नंबरवर पोहोचला आहे... त्याचे पहिल्या १० पैकी ५ नेम ९ मध्ये लागले आहेत.

सध्या तिथे असलेली रॅन्क टेम्प आहे.
सारखी बदलते.
अजुन सगळ्यांचे सेम सेम शॉट्स नाही झालेत.
नारंगा ह्यातही पदक मिळव बाबा..

नारंग अचानक चुकायला लागलाय... तिसर्‍या फेरीत ५० पैकी ४७... मधले काही शॉट्स फारच बाहेर गेल्या सारखे वाटत आहे.. सगळेच चुकताहेत.. पण नारंग जरा जास्तच चुकलाय..

उभे राहून फक्त क्विनॉननीच दोनदा ९९ गुण मिळवले आणि कॅम्प्रियानीनी एकदा.. बाकी सगळे मागेच आहेत..

नारंगची बंदूक गंडली की काय अचानक..
जास्तीत जास्त २१ व्या नंबर वर येऊ शकेल.. आणि तिथून अंतिम फेरी गाठण्यासाठी बाकीच्यांनी केलेल्या चुकाच फक्त उपयोगी पडतील. किंवा त्याला ४०० पैकी ४०० गुण मिळवावे लागतील..

Pages