नेमबाजी

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 12:16

१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके

- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

- पिस्तूल

- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा

- रायफल

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून

- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा

- शॉटगन

- स्पर्धक हालाणार्‍या मातीच्या निशाणावर नेम साधतात.

- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.

- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा

- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.

- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.

- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.

- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.

- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.

- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.

- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहीची प्राथमिक फेरी अजून संपलेली नाही का? प्रिसिजन राउंड झालाय. रॅपिड फायर बाकी आहे.
http://www.fuzilogik.com/Sports-Library/Shooting/Shooting-Rules.html
Women's 25 meter --- Pistol

This event is made up of six series of five precision shots, and six series of five rapid-fire shots. Each precision series must be finished in five minutes, while each shot of the rapid-fire series must be finished in 3 seconds. The eight top shooters from the qualification round move on to the final round, which consists of ten rapid-fire shots.

शूटिंगच्या सगळ्याच स्पर्धांत अंतिम फेरीत ८ स्पर्धक असतात असे दिसतेय.
महिलांच्या १० मीटर एअर पिस्तोलचा निकाल :
http://www.london2012.com/shooting/event/women-10m-air-pistol/phase=shw2...
भारताची हीना संधू बारावी, अनु राज सिंग २३वी.

ok

शूटींगचे क्वालिफिकेशन राउंडस टीव्हीवर का दाखवत नाहित कळत नाही. आतापण त्या तिरंदाजीचे प्रक्षेपण चालू आहे ज्यात आपले कोणिच नाही.

शूटिंगपेक्षा तीरंदाजीत प्रेक्षकांना जास्त मजा येत असावी. थोड्या वेळाने दीपिका कुमारीचा सामना आहे.
दुसर्‍या गटात दोघींनी १००/१०० स्कोर केलाय.
अनु राज सिंग ९६

Men's Double Trap च्या क्वालिफायरमध्ये रंजन सोधी दुसर्‍या क्रमांकावर आहे.

मला तो चौथ्या नंबरावर दिसतोय, पण पहिल्या चारांचे गुण सारखेच आहेत. म्हणजे ते संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत का?

सेम..कळत नाहीये. पहिले ६ जाणार पुढे..आता ६ आणि ७ चे गुण समान आहेत.

दुसर्‍या ईवेंटमधे विजय कुमार ३ नं वर आहे

सोधी सहाव्या नंबरवर... ९२ गुणांसह.

दुसरीकडे विजय कुमार पात्रता फेरी एक नंतर तिसर्‍या स्थानावर.. अजून ६ स्पर्धक बाकी आहेत. त्यांची नेमबाजी झाल्यावर पूर्ण क्रमवारी कळेल.. पण विजयचे सध्याचे गुण २९७.

पन्नास गुणांची एक पात्रता फेरी अजून आहे.
1 Great Britain WILSON Peter Robert Russell 48 48 0.960 96 +
2 Kuwait ALDEEHANI Fehaid 47 47 0.940 94 +
3 Hungary BOGNAR Richard 44 49 0.930 93 +
4 Russian Federation MOSIN Vasily 48 45 0.930 93 +
5 Russian Federation FOKEEV Vitaly 44 48 0.920 92 +
6 India SODHI Ronjan 48 44 0.920
चौघांन सोधीपेक्षा जास्त गुण आहेत. पाचवा, सातवा दोघांचे ९२ गुण आहेत.

विजय कुमार क्रमांक ५ वर Qualification Stage 2 मध्ये दाखल.. शुभेच्छा..:)
खरेतर क्रमांक २ ते ६ पर्यंत सर्वांना समान गुण आहेत पण Inner 10's चा स्कोअर प्रमाणे विजय कुमार क्रमांक ५ वर..

मयेकर.. २५ मी. रॅपिड फायर मध्ये पात्रता फेरी पूर्ण झालेली नाही.. अजून ३० शॉट्स उद्या आहेत.. आणि त्या नंतर फायनलचे स्पर्धक ठरतील.. तरीसुद्धा पहिल्या ३० शॉट्स मध्ये ५वा हा नंबर विजयकुमार साठी नक्कीच निकाल आहे..

Pages