नेमबाजी

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 12:16

१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके

- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

- पिस्तूल

- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा

- रायफल

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून

- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा

- शॉटगन

- स्पर्धक हालाणार्‍या मातीच्या निशाणावर नेम साधतात.

- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.

- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा

- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.

- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.

- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.

- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.

- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.

- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.

- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूटिंगच्या स्पर्धांना नेहमी शांतता असते. पण यावेळी प्रेक्षकांचा खूप गदारोळ होता. माझ्या आधीचा स्पर्धक ब्रिटिश होता , त्याला प्रेक्षक खूप चीअर करत होते. त्याच्या शॉटनंतर मला पाच सेकंदांतच शॉट घ्यायचे असत, त्यावेळीही प्रेक्षकांच्या आरोळ्या उठत, त्यामुळे माझे काँसंट्रेशन चुकले, एक शॉट केवळ त्यामुळेच चुकला. ही गोष्ट डोक्यात राहिल्याने पुढचे शॉट्सही नीट गेले नाहीत- इति सोधी.

अत्यंत चुकीचे म्हणणे आहे.. कारण शॉटगनच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून स्पर्धक प्रचंड घट्ट असलेले इयर प्लग्स घालतात.. त्यातून गोळीचा आवाज ऐकू येत नाही.. प्रेक्षकांचा गोंगाट कुठला ऐकू यायला... आणि भारतीय माणसाने लोकांच्या आवाजाचा त्रास झाला हे म्हणणे तर प्रचंडच हास्यास्पद वाटते..

अत्यंत चुकीचे म्हणणे आहे.. कारण शॉटगनच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून स्पर्धक प्रचंड घट्ट असलेले इयर प्लग्स घालतात.. त्यातून गोळीचा आवाज ऐकू येत नाही.. प्रेक्षकांचा गोंगाट कुठला ऐकू यायला... आणि भारतीय माणसाने लोकांच्या आवाजाचा त्रास झाला हे म्हणणे तर प्रचंडच हास्यास्पद वाटते.. >>>

संपूर्ण पोस्टला +१.
पहिल्या दोन फेर्‍यांमधे त्याला नाही झाला तो त्रास गोंगाटाचा... तिसर्‍या फेरीवेळी दडपणामुळे त्याची एकाग्रता भंगली.

भारतीय माणसाने लोकांच्या आवाजाचा त्रास झाला हे म्हणणे तर प्रचंडच हास्यास्पद वाटते.. >>> Lol हो ना...

आज भारताचे तीन नेमबाज स्पर्धेत... गगन नारंग आणि जोयदीप कर्माकर ५० मी. रायफल प्रोन प्रकारात तर. विजय कुमार कालच्या स्पर्धेच्या दुसर्‍या पात्रता फेरीत.

आज नारंग दिवस दिसत नाही.. तसेच कर्माकरचाही नाही.. नारंगनी ५९३ गुण मिळवले आहेत.. कर्माकारचे अजून सगळे नेम मारुन झालेले नाहीत.. पण आत्तापर्यंत त्यानी ५ वेळा १०चा वेध चुकवलेला आहे.. आणि ५०० पैकी ४९५ गुण मिळवलेले आहेत.

अरे शेवटच्या दोन फेर्‍यांमध्ये कर्माकर पेटला की.. आत्ता ७ वा आहे.
ह्या इनर १० चा स्कोर का नाही दाखवत आहेत ? पहिले ८ जाणार का फायनलला?

कर्माकर ५९५ गुण मिळवून संयुक्त चौथा, त्याच्या बरोबर अजून ८ जण आहेत.. नारंग ५९३ गुण मिळवून १८ वा..

http://www.london2012.com/shooting/event/men-50m-rifle-prone/index.html?...

ह्या पानावर मघाशी त्यांनी वेगळा सेक्शन केला होता नंबर ४ च्या खेळाडूंचा.. आणि शूट ऑफ लिहिलं होत. प्रत्येकी १० गोळ्या दाखवत होते..

आता परत काढलाय... ! काही कळत नाहीये धड :|

Pages