मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेकंड बुक, चॅप्टर ५ च्या पुढेच जायला तयार नाहिये ते पॉटरमोअर.. व्हाय म्हणे? की आय अ‍ॅम चुकिंग समव्हेअर?

कुणीच जात नाही अजुन......
.
.
.इब्लिस सगळे न घेताच पुढे पुढे गेलात वाटते Happy

इब्लिस, गेटवेमधे दिसते ना मित्रमंडळी कुठे कुठे पोचलीत ते. सगळेच २.५ला येऊन थांबलेत. Happy

स्पेलच्या टिपेबद्दल आभार. प्रयत्न करून बघते तसा.
सध्या जमले तर १२० नाहीतर सगळे गाळात अशी परिस्थिती आहे.
बाकी द्वंद्वाला दोन्ही बाजू ऑनलाइन असाव्या लागतात का? लाइव असते की आपल्या स्पेलची पोटन्सी लक्षात ठेवून नुसते आपले आभासी?

सगळे घेतलेत. मला नाही वाटत एकही चुकलंय म्हणून. पोशन पण एक तयार केलं. रुणुझुणूनी पहिली फ्रेण्ड रिक्वेस्ट दिली, म्हणून त्यांना गजराचं घड्याळही गिफ्ट केलंय Happy

उदयन, गिफ्ट केले ना काही, तर परत त्या चॅप्टरात जाऊन परत ती वस्तू गोळा करता येते Wink प्रयोग करून पहा
फुटका कप वगैरे गिफ्ट करून ...

मी कपाचा प्रयोग नाही केलेला, पण आगगाडीच्या डब्यातल्या बर्टी बॉट्स बीन्स पाठवल्या होत्या भेट. तिकडे परत गेल्यावर परत मिळाल्या.

>> पहा गिफ्ट करून ...
हेहेहे!
इस्को बोल्ते फ्रेण्ड्स! थ्यांक्यू मृदुला. (तुम्हाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली आहे आपण दोघे सेम हाऊस)
इब्लिस(ElmRain464)

इब्लिस, घड्याळ पोहोचलं बरं का. धन्यवाद.
( माझ्याकडे आता बहुतेक तीन घड्याळं झालीत. बाई, वेळेचा सदुपयोग कर, हेच सांगत असतील का ? )
आपल्याकडच्या वस्तू वाटल्या की त्या त्या धड्यांमध्ये जाऊन परत घेता येतात.

<< प्रयोग करून पहा फुटका कप वगैरे गिफ्ट करून>> ... Lol

सगळ्या मित्रमंडळाला माझ्याकडून लवकरच भेटवस्तू येणार आहेत. जरा धीर धरण्यात यावा....

सगळ्या मित्रमंडळाला माझ्याकडून लवकरच भेटवस्तू येणार आहेत. जरा धीर धरण्यात यावा....>>>>>>> पोशन्स मिळणार वाट्तं.. तु मला चुकुन एकच पोशन दोनदा गिफ्ट दिलस त्यातलं एक प्रामाणिकपणे परत केलय बरं का Wink

फ्रेंड्स पण एकदाच मिळतात. जो होगा सो देखा जायेगा >>>>> इब्लिस __/\__ आवडलं हे... Happy

@ रुणुझुणु
Wideye or Awakening Potion मधे मी कढईतलं शिजायला ३० सेकंद ठेवलं तेव्हड्या वेळात २ इन्ग्रेडिएन्ट्स कुटुन घेतले. पण काय झालं ते कळलं नाही. ३० सेकंद पूर्ण व्हायच्या आतच कसलं तरी १० सेकंदाचं टाईम लिमिट आलं अन तेव्हड्या वेळात कढईतलं शिजलं नाही म्हणुन मग मी कुटलेलं त्यात टाकलं नाही (सॉरी इन्ग्रेडिएन्ट्स ची नावं लक्षात नाहिये). आणि मग ते बिन्डोक उत्तर आलं तिथे की पोशन बनवायला स्किल्स वगैरे लागतात.. आधीच त्या बाटलीतलं कढईत टाकताना मी खुप सांड लवंड केलीय..

तु Wideye or Awakening Potion ची पाकृ लिहिली आहेस का? नसशील तर लिही आता.. नशीबाने कढई फुटली नाही हे एक बरं झालं

चिमुरी, प्रत्येक पोशनाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धाला कुटणे, ढवळणे, तापवणे,छडी फिरवणे इ. करण्यासाठी काही वेळमर्यादा असते (बहुतेक १ मि. नक्की किती ते माहीत नाही). म्हणून ती उलटमोजणी सुरू होते. त्या पोशनासाठी पाकृ पान आठवर आहे.

धन्यवाद युनोहु

४. ३० सेकंद मध्यम आचेवर गरम करा>>>>> इथे म्हणजे फक्त मधलं बटण दाबायचं का?? की उजवीकडचं बटन दाबुन टेम्परेचर ग्रीन झोन मधे आल्यावर मधलं बटण दाबायचं??
५. खलबत्त्यात घेतलेल्या जिनसा वस्त्रगाळ बारीक करा>>>>> हे वरचे ३० सेकंद संपल्यावर कुटायचं की ३० सेकंद चालु असताना?

अन डावीकडे तो १० सेकंदाचा टाईमर आल्यावर वरचे ३० सेकंद पुर्ण झाले नसले तरी पण ते मिश्रण कढईत टाकायचं का? कारण मी करत असताना १० सेकंदाचा टाइमर आणि ३० सेकंदाचा टाइमर एकत्रच बंद झाले.

पॉमोच्या पोकृंसाठी "मा का चु" धागा काढावा काय ?>>>>> अगदी अगदी.. पाकृ पण वेगळ्या धाग्यात लिहाव्यात..कारण इथे हेडर मधे जरी पान क्र टाकायचा म्हटलं तरी अजिबात जागा नाहिये..

रुणूझुणू मा. का. चु. Lol
चिमुरी, मी एकावेळी एकच काम करत होतो. नाहीतर खूप धांदल होते.

तापवण्यासाठी टीप : आधी लाल बटन दाबून खालच्या मर्यादेजवळ तपमान आणायचं. मग मधलं बटन दाबून वरच्या मर्यादेपर्यंत न्यायचं. मग शेगडी बंद चालू करत रहायचं (बटन १ आणि २). बंद चालू करण्याच्या दरम्यान जरा पुढच्या पायर्‍यांचा विचार करायला काही क्षण मिळातात. अर्थात तापमापीवर डोळा ठेवूनच.

युनोहु धन्यवाद..

आता ह्या पद्धतीने करून बघते..कारण मी अजूनही पोशंस मधे मारच खात्ये..काल माझी पिव्टर कढई 'क्युर फॉर बॉइल्स' करताना फुटली.. Sad
नवी घेतली पण आधीच लॉकहार्टची पुस्तके घेतल्यामुळे जो बॅलन्स कमी झाला होता तो परत सगळ्या जिनसा आणि कढई घेताना कमी झाला. आणि ते पोशन करताना फक्त सापाच्या नांग्या लागतात ना कुटायला? मग बाकीच्या वस्तू तिथे मुद्दाम तुम्हाला गोंधळात पाडण्यासाठी ठेवलेल्या असतात का?
मला बहुतेक विच म्हणून गती नाहिये..शाळा सोडावी काय असं वाटलं काल.. Proud

>> मग बाकीच्या वस्तू तिथे मुद्दाम तुम्हाला गोंधळात पाडण्यासाठी ठेवलेल्या असतात का?
नाही मुग्धा.. दुसर्‍या पानावर पुढची कृती आहे त्यासाठी लागतात त्या.. Happy

मला बहुतेक विच म्हणून गती नाहिये..शाळा सोडावी काय असं वाटलं काल.. फिदीफिदी >> अस काही मनात आणू नका . मी तर पोशन्स "ऑप्शन"ला टाकलाय .
पुढे कुठे हे पोशन दाखवूनच पुढेजा अस असू नये म्हणजे बर Happy

>> पोशन्स "ऑप्शन"ला टाकलाय
एकंदरित लोकांना (=हॅरी, रॉन इ) पोशन्स अवघड का जायचा ते समजले खरे तर. Happy
रुणुझुणू आपल्या बॅचची सगळ्यात हुशार विच असावी काय?

रुणुझुणू आपल्या बॅचची सगळ्यात हुशार विच असावी काय?>>>>>> येस्स्स्स्स्स्स्स्स्स Happy

एकंदरित लोकांना (=हॅरी, रॉन इ) पोशन्स अवघड का जायचा ते समजले खरे तर. >>>> नेव्हिल ला पण... Wink

युनोहु, मदतीकरता धन्स Happy अजुन एक शंका, ते ३० सेकंद तापवुन झाल्यावर गॅस बंद केल्यावर मग कुटायला घ्यायचे का इन्ग्रेडिएन्ट्स??? की आधी कुटुन ठेवायचे अन नंतर तापवायला घ्यायचं???

रुणुझुणू आपल्या बॅचची सगळ्यात हुशार विच असावी काय?>>>>>> येस्स्स्स्स्स्स्स्स्स >>

Blush Blush Blush Blush
हफलपफ का नाम रोशन हो गया Proud

पोशन्स "ऑप्शन"ला टाकलाय >> केदार Lol

पुढच्या भागांना सप्टेंबर.....इतका उशीर !
(एका दृष्टीने बरंच आहे, पहिल्या वर्षातच आपली इतकी दाणादाण उडाली आहे. सगळे स्पेल्स आणि पोशन्सचा सराव होईपर्यंत तेवढे दिवस मिळाले तर बरंच.)

Pages