मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा ,
ग्नोम बद्दल छोटीशी हिंट .
ग्नोम्स ना फक्त १-२ दाच फिरवा आणी साधारण (clockwise 150 degree) घड्याळाचे ५ वाजले असतानाचा कोन असताना सोडा .

कवठीचाफा , तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे , तुम्ही ग्रिफिंडॉरच ना ?
स्वागत आहे संघमित्रा , फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे

तुम्ही ग्रिफिंडॉरच ना ? >>> बरेच जणांना आश्चर्य वाटलं Proud पण मी ग्रिफींडॉरच Happy

जादुई ओगल्यांच्या अचुक पोकृ वाचल्यानं काढे तर जमतायत Wink पण वेळ खूप घेतात हे Sad

केदार..काय सुपर्ब टिप दिली..!!!!!! पार झाले त्या राऊंड मधून!! Happy आत्ता जोम आला पुढे कूच करायला.. Happy Happy

संघमित्रा, अभिनंदन!

पॉटरमोअर आहेच, पण (हे अगदीच वैयक्तिक मत म्हणता येईल) मी असं सुचवेन की तुम्ही आधी पुस्तक वाचावेत. पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला पॉटरमोअरमध्ये कदाचित मजा येईलही, पण पुस्तक वाचताना त्याप्रमाणे हे जग आपल्या मनात उभे करण्याची आणि त्यात रमून जाण्याची मजा निसटून जाईल. ( मा. प्रा. म. )

(पॉटरमोअर नंतरही असेलच. आत्तापर्यंत कुठं फक्त एका पुस्तकातलंच जग पॉटरमोअरमध्ये आलंय. आणि तुम्ही पहिलं पुस्तक वाचायला घेतल्यापासून दोन दिवसांच्या आत नीटच संपवणार! मंग तुमी आन् पॉ.मो. बरोबरच. तवा उश्यर नगं!)

पॉटरमोअर आहेच, पण (हे अगदीच वैयक्तिक मत म्हणता येईल) मी असं सुचवेन की तुम्ही आधी पुस्तक वाचावेत. पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला पॉटरमोअरमध्ये कदाचित मजा येईलही, पण पुस्तक वाचताना त्याप्रमाणे हे जग आपल्या मनात उभे करण्याची आणि त्यात रमून जाण्याची मजा निसटून जाईल. ( मा. प्रा. म. ) >>>>>>>>> +१००००००००

बाकीचं निवांत वाचुन रिप्लाय देइन.. सध्या मगल्स च्या जगातल्या कामात बिझी Sad

पॉटरमोअर आहेच, पण (हे अगदीच वैयक्तिक मत म्हणता येईल) मी असं सुचवेन की तुम्ही आधी पुस्तक वाचावेत. पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला पॉटरमोअरमध्ये कदाचित मजा येईलही, पण पुस्तक वाचताना त्याप्रमाणे हे जग आपल्या मनात उभे करण्याची आणि त्यात रमून जाण्याची मजा निसटून जाईल. ( मा. प्रा. म. ) >>>>>>>>> +१००.
युनोहु , यावर आपल्यासारख्या पुस्तकं वाचलेल्या लोकांच एकमत होणारच.
पण मी असेही मगल्स पाहिलेत की ज्यांच्या मनात "Missed the bus" ची भावना आहे . त्याना याच आकर्षण आहे पण आपण खूप मागे पडलोय अस वाटतय , त्यांच्यासाठी हा चांगला setpping stone आहे. असे ३ मगल्स बाटवलेत मी आतापर्यंत .
एक उत्तम उदाहरण म्हणजे माझी बहीण , तिने आधी पहिले ५ चित्रपट पाहिले आणी नंतर गोडी लागल्यावर एका महिन्यात सगळी पुस्तक वाचून काढली (आणी आता सांगत फिरते , पुस्तकात जी मजा आहे ती चित्रपटात नाही Happy )

रुणुझुणू, मृदुला, माझ्या प्रश्नाला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
@ धागाकर्ते केदार धाग्यातही बदल केलात, आभारी आहे.

ElmRain464 अशी आयडी मिळवून तिथे रुजू झालो आहे. यथावकाश खेळ सुरू करीन..

सक्काळ सक्काळ समद्यांस्नी च्यालेंज करून आलेय....
स्लिदरिनला पोइंटसची खिरापत दिली आहे उगीचच Sad
लोकोमोटर विब्ली मस्त जमायला लागलाय.

केदार मैत्रीचा आनंदाने स्वीकार झालेला आहे. Happy
यु नो हु, खरेय. म्हणूनच आजच पुस्तक आणण्यात येणार आहे. Happy
बाकी, हॅपॉ ठरवून टाळत होते. त्याचं कारण (थोडं मोठं असल्यानं) सवडीनं लिहीन. पण आता इथली मजा बघून वाचावंसं वाटलं. ते न वाचताही खेळता येईलच हे दिसतेय पण तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर..
ते बॉइल्सचं प्रॅक्टीस पोशन हिरवा धूर सोडतंय ब्वा! Sad टेम्प २५० ला जातंय का नाही कळतच नाही. कुठं दिसतं ते? आणि मग जादूई छडी कशी फिरवायची? हे अगदीच बालवाडी प्रश्न आहेत. Happy

आरारारारा....केदारशी ड्युएल नाही करणार. पुन्हा पॉइंटस वाटले. Sad Proud

संघमित्रा, मधलं कमी ज्वालेचं बटन आणि पहिलं ऑफचं बटन ह्याने तापमान कंट्रोल करायचं. तापमापीवर हिरवा रंगच राहायला पाहिजे. तापमापीवर लाल रंग आला की नंतर धूर निघणार हे नक्की.
जादुई छडी प्रमाणघटकांच्या (Standard ingredients) पोत्याच्या मागे ठेवलेली असते. तिथून ड्रॅग करून कढईवर फिरवायची.

स्वागत आहे इब्लिस .
अरेच्या, ८ रॅव्हेनक्लॉ , मायबोलीकर सगळे हुशार आणि शहाणे दिसतायत .
पण ग्रेट व्हायच Potential नाहिये बहुतेक Wink

महर्षी डंबल्डोर आमच्याच कुळातले हे लक्षात घ्या 'ग्रेट' लोकहो............>>>>
,.
.
.
ते राहुद्या..........मी कोणत्या कुळातला आहे ते बघा..........सुरुवात माझ्याच नावाने सुरु झालेली आहे...... Lol

महर्षी डंबल्डोर आमच्याच कुळातले हे लक्षात घ्या 'ग्रेट' लोकहो. >>
हे काय झेपलं नाही....डंबल्डोर ग्रिफिन्डॉर ना ??

महर्षी डंबल्डोर आमच्याच कुळातले हे लक्षात घ्या 'ग्रेट' लोकहो. >>
हे काय झेपलं नाही....डंबल्डोर ग्रिफिन्डॉर ना ?? >> हो .

मृदुला , हमारे पास वॉल्डी है , स्नेप है ,मर्लिनभी है , तुम्हारे पास क्या है ? Wink

चिमुरीला आनंद झाला असेल.. कोणीतरी ड्युएल मध्ये तिच्याकडून हारल्यामुळे.>>>>> तुमाखमि रे हिम्स्कुल Happy

..डंबल्डोर ग्रिफिन्डॉर ना ??>>>>> होय..

पण ग्रेट व्हायच Potential नाहिये बहुतेक>>>>>तू गेट होण्याची पहिली पायरी चढली आहेस .
अरे बनना है तो गब्बर बनो , सुरमा भोपाली बनने मे क्या मजा है>>>>>> केदार, हॅपॉशी लॉयल रहा.. Wink

रुणुझुणू , खिरापतीबद्दल धन्यवाद .>>>>>>> रुणुझुणु, केदार अन प्रसिक यांचे पॉईंट्स खिरापतीनेच वाढतायेत.. मी पण बरेच दिलेत.. हरकत नाही पण, कारण ड्युएलची रिक्वेस्ट डिक्लाइन केली तरी त्यांना मार्क्स मिळतायेत Sad

तुम्ही ग्रिफिंडॉरच ना ? >>> बरेच जणांना आश्चर्य वाटलं फिदीफिदी पण मी ग्रिफींडॉरच>>>>>> चाफा ग्रिफिन्डोर मधे असला तरी मनाने तो स्लिदरीयनच आहे... Wink

'काही जादुगार ईतरांपेक्षा श्रेष्ठ असतात, चिमुरी.' >>>>>> आय नो...

फिर मुकबला होगा, प्रसिक, नागेश नागशक्तीका ( अ ओ, आता काय करायचं ) और सृजन>>>>> हे लै भारी होतं Happy

मला सध्या वेळ नाहिये पोशन्स बनवायला Sad

मृदुला , हमारे पास वॉल्डी है , स्नेप है ,मर्लिनभी है , तुम्हारे पास क्या है ?>>>>>>> यामधे "हमारे पास प्रसिकभी है" हे पण अ‍ॅड कर Wink

आम्ही (बिच्चारे) हफलपफवाले पण बोलूनच घेतो......हमारे पास माँ है (हेल्गामाय) और वॉल्डीका हॉक्रक्स है ! Proud

कारण ड्युएलची रिक्वेस्ट डिक्लाइन केली तरी त्यांना मार्क्स मिळतायेत >> हायला, हे माहीत नव्हतं Uhoh

>>डंबल्डोर ग्रिफिन्डॉर ना ?
विकीत पाहून आले. ग्रिफिंडोर दिलंय. पण मी एका जेकेआर मुलाखतीत रेवनक्लॉ वाचल्याचं आठवतंय.
आणखी गूगलल्यावर माझ्यासारखे गोंधळलेले आणखी बरेच लोक दिसले. Happy

Pages