माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट्ट बीबी आहे हा>>>+१०१
तरिही हावरटासारखं इकडे मन जातच. Proud
मी तर कितीवेळा येवुन गेलो सकाळपासुन इकडे.. Happy

रुणुझुणू खरच हा वाईट बी बी आहे. कामात लक्श लागत नाही
>>>
बीबीच्या उपोदघातात (इंट्रो) दिलेल्या वि.सू. वाचल्या नाहीत का? Proud

तरी तुम्ही अजून मूळ बीबी पाहिलेला दिसत नाही . तिथं लै करामती हैता... Happy

खुप तहान लागल्यावर...
.
.
.
.
फ्रीजमधील थंडगार पाण्याची बाटली घ्यावी आणि त्यात...
.
.
.
.
.
काहिच न टाकता तशीच बाटली तोंडाला लावावी आणि पाणी प्यावे .....बेचव पण अप्रतिम...
.
.
खाण्याच्या धाग्यावर पाण्याच्या गोष्टी करतोय क्षमस्व: Proud

गरम गरम गुरगुट्या भात + गार गार दही + मीठ + मेतकुट. स्स्स्स्स्स्स्स परिक्षेचे दिवस आठवले. पेपरला जाताना असे भाताचे गोळे पटापट गिळुन जायचे.
आता जेवल्यावर पण मिळाला तरी जाईल सहज तसा भात.

वाळत घातलेल्या ओल्या फेण्या

नुकताच वाळत घातलेला ओला पोह्याचा पापड

चिकवड्या राखताना गट्टम करायच्या!!

पोह्याचे डांगर + दही

तुरीच्या शेंगा मस्त मीठ लाउन उकडुन

मक्याचे भाजलेले कणीस त्या वर तुप मीठ लावुन ( समोर प्रचंड पडणारा पाउस पाहिजे)

हापुस चा आंबा पुर्ण सोलुन त्याचे नीगुतीने बारीक काप करुन, ते थंड करुन, त्यावर साय घालुन काट्याने खायचे ( बरोबर एखादे ३०० पानी पुस्तक पाहिजे)

बरोबर एखादे ३०० पानी पुस्तक पाहिजे >>> Happy

पुस्तक संपेपर्यंत न संपणार्‍या फोडी पण पाहिजेत ना मग... Wink

तांदळाच्या भाकर्‍यांना कोण ते नावं ठेवतंय. उकडीच्या भाकर्‍या खाऊन पहा. सोबत अळू नाहीतर अंबाडीची भाजी. दुसर्‍या दिवशीही मस्त लागतात.

माळव्यात अनेक वर्षे पोहे खाल्ल्यावर कां/ब पोह्यावर ओल्या खोबर्‍याऐवजी शेव (रतलामी असेल तर मज्जाच) आवडायला लागली. साबुदाणा खिचडीवर लिंबू पिळून खाण्यातली मजाही तिथेच कळली. तिथे सकाळचा नास्ता पोहा-जलेबी. पण माझ्या मुंबईकर पोटाला लग्नाच्या पंगतीखेरीज अन्यत्र जिलब्या खाणे रुचले नाही. रात्रीच्या जेवणानंतर बाहेर फेरफटका मारताना गरम दूध+ जिलेबी खाऊन येणे हेही तिथे कॉमन आहे.

एका ब्रह्मचारी कुटीत फारच कंटाळा आल्याने पोटभरीचा ब्रेकफास्ट म्हणून ब्रेड स्लाइसना लोणी लावून त्यात बटाट्याचे वेफर्स सँडविच करून मिळाले. त्याची चव कल्पनेपलीकडे धमाल होती. मी स्वतः कधी करून खाणार किंवा खिलवणार नाही कदचित, पण पुन्हा समोर आले तर नक्की खाईन.

मला बटाट्याच्या काचर्‍या शि़ळ्या खायला आवडतात. सोमवार/गुरुवारच्या वरणबभातासोबत आई या काचर्‍या करते (आमच्याकडे त्याला काप म्हणतात). ताटात वाढलेल्या गरमागरम काचर्‍यासुद्धा मी उद्यासाठी म्हणून शिल्लक ठेवतो.

मला हिरवी द्राक्ष सोलून खायला आवडतात. Happy

हुरडा आणि दही, सोबत ती खास चटणी... मी नगरला रस्त्याशेजारी खाल्ले होते.
उसाचा रस आणि बेळगावी फुटाण्याची चटणी.
भुईमुगाच्या शेंगा आणि गूळ (शेंगा आपणच सोलायच्या )
फणसाची भाजी -- नुसतीच
उकडलेल्या चवळ्या आणि मीठ (मालवणी बेत असे पुर्वी, तिखटही नाही घालत.)
चकलीचे किंवा थालिपिठाचे पीठ.. कच्चेच !
पापडाच्या लाट्या आणि तेल
कुरड्याची उकड --- नुसती
अळुवड्या, कोथिंबीर वडी, मुठिया नुसते उकडून, न तळता !
ढोकळा आणि लसूण घातलेली फोड्णी,
पंजाबी पद्धतीचा गाजर हलवा आणि व्हॅनिला आईस्क्रीम
गुजराथी खिचडी, त्यावर जिरालू मसाला आणि सोबत गुजराथी कढी
गुजराथी उंधियू + दही + बाजरीची भाकरी
केरळी पद्धतीचे अवियल + साधा भात + तांदळाचा पापड
शहाजिरे वाटून आणि गूळ घातलेले नारळाचे दूध + कडक पाव ( गोवन बेत)

तांदळाच्या भाकर्‍यांना कोण ते नावं ठेवतंय.>>> त्यांना दहा धपाट्यांची शिक्षा फर्मावण्यात यावी. Happy

ती तांदळाची टम्म फुगलेली गरम भाकरी त्यावर लोण्याचा गोळा टाकून तो वितळताना एकेक घास बारकाईने मोडत गट्टम् करायचा.

गर्रम उकडीचा मोदक + भरपूर साजूक तूप.
उकडगर्‍यांची भाजी + भरपूर लाल सुक्या मिरच्यांची खमंग चुरचुरीत फोडणी चुरून घेऊन भाजी नुसतीच गटकावणे
वाफाळता मऊ भात केळीच्या पानावर + साजूक तूप + लच/ आंब्याचे लोणचे. त्या बरोबर शिळं कुळथाचं पिठलं असेल तर केवळ स्वर्ग!

आत्ता शेबपु खायला जायचंय, मग लिहिन बाकीचं Wink

<<चकलीचे किंवा थालिपिठाचे पीठ.. कच्चेच !
पापडाच्या लाट्या आणि तेल
कुरड्याची उकड --- नुसती
अळुवड्या, कोथिंबीर वडी, मुठिया नुसते उकडून, न तळता !<<

एक नंबर दिनेशदा! मला ही अशाच आवडतात कोथिंबिरवड्या, अळुवड्या.

कुरडयांची दुध साखर घालुन किंवा तिखट हवी असल्यास तिळाच्या चटणीबरोबर.
नाचणी/ ज्वारी/ गहु यांच्या पापडांचे पीठ घेरलेलं (उकड), पातेलाच्या तळाला लागलेली खरड तेल आणि तिळाच्या चटणीबरोबर.
याचप्रमाणे बाजरीच्या पीठाची उकड घेउन तेही नुसतं किंवा पोळपाटवर टाकुन तीळाच्या चटणीबरोबर खाता येतं.
वडे/ सांडगे यांचे कच्चे पीठ तेल टाकुन चपातीबरोबर.
ब्रेडला घट्ट साय लावायची आणि वरुन साखर भुरभुरुन चहाबरोबर.

मालवणी उकड्या तांदळाची पेज + करवंदाची चटणी + खारातला आंबा (कैरी) + शहाळ्याचे खोबरे
कोल्हापुरी मसाल्याची आमटी आणि कुस्करलेली भाकरी (दोन्ही शिळे)
काजूची बोंडे + समुद्राच्या पाण्यात बुडवून (समुद्र स्वच्छ हवा !)
फणसाच्या भाजलेल्या बिया + तूप
भाजलेली कणंगे + गावरान तूप + साखर + किंचीत मीठ
भाजलेले रताळे + तूप

दिनेश्दा... लईच जलवा पदार्थ लिहिलेत. हुरड्याबरोबर खोबर्‍याची चटणी असते , उंधियो हाप्रकार माला भावला नाहीच. लई तेलकट. कदाचित दुकानातला असल्याने का?

अंड्याचे ऑम्लेट प्रचन्ड आवडीचे पण प्लेनच. आणि उकडलेल्या अंड्यातला पिवळ्या बलकाचा गोळा? विचारूच नका !

उकड्या तांदळाची पेज ताप उतरल्यावर खायची. तोंडी लावायला दिलेले कैरीचे लोणाचे पेजेतच टाकायचे आणि भाताबरोबर कैरीची फोड तोंडात आली की सरप्राइज मिळाले म्हणून खुष व्हायचे. याबरोबर ओल्या खोबर्‍याचे तुकडे (चव नव्हे) .

बडीशेप खाऊन पाणी प्यायचे. ग्वाड ग्वाड लागतं.

वरच्या सगळ्या पोस्टींना +++++१०० (मांसाहारी पदार्थ सोडुन Proud )

तांळाची गरमा गरम फेणी त्यासोबत घट्ट दही आणि फोडणीच्या मिरचीचे ताजे लोणचे,

चुर्र वाजलेली आंबोळी आणि त्यावर साजुक तूप

छोले भटुरे - छोल्यांवर चिंचेची गोड चटणी आणि कांदा, भटुर्‍यांबरोबर अमुल बटर Happy

उपमा त्यात गरम दुध घालुन थोडा पातळसर करायचा आणि कैरीच्या लोणच्याबरोबर खायचा

कॉर्नफ्लेक्स + दूध + केळे

बॉम्बे सँडविच - मस्का मारके आणि सोबत फ्रेश ज्युस

लाल तांदळाचा चुलीवरचा भात आणि तुप मिठ....

पोळी कुस्करून त्यावर आमटी + कांदा आनि लसणाची चटणी

अजुन आठवेल तसे लिहीतेच Happy

स्लर्र्र्र्र्र्र्र्र्प समद्याच पोस्टींना Happy

गरम गरम गुलाबजाम आणि त्यावर थंड थंड व्हनिला आईस्क्रीम ...डेडली काँबो

कालचा उरलेला मटणाच्या रस्स्यात शिळ्या ज्वारीच्या भाकरी घालुन शिजवतात त्याला ऊकडा किंवा ऊकडल म्हणतात मस्त लींबू पिळून अप्रतीम लागत असच ऊकडल उरलेल्या आमटी बरोबर पण करतात.

नाना न खाताच काय नन्नाचा पाढा...आणि लिहिलंय की डेड्ली म्हणुन

तुम्ही दुसरं काही थंड घ्या ..हाकानाका Wink

हा बाफ वाचून एक गोष्ट लक्शात येते की सगळे मायबोलीकर अस्सल खवय्ये आहेत. आणि अशा मायबोलीचा एक मेम्बर असल्याचा मला अभीमान वाटतो Happy

Pages