माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदल्या दिवशीची उरलेली पावभाजीची सण्सणीत भाजी ताकभाताबरोबर एक्दम फंडू लागते.. Happy

बटाट्याचा भाजलेला पापड कुस्करायचा नि त्यात शेंगदाण्याचं खमंग कूट घालून गट्टम करायच.. तोंपासु..

पातळ पोहे भाजून घ्यायचे नि त्यात फक्त ओलं खोबरं, मीठ, साखर घालायची.. झटपट मस्त नाश्ता तय्यार.. (गोडखाऊंसाठी फकस्त)

तांदळाच्या भाकर्‍यांना कोण ते नावं ठेवतंय.>>> त्यांना दहा धपाट्यांची शिक्षा फर्मावण्यात यावी. >> माझ्याकडून आणखी दहा.
तांदळाच्या भाकरीसोबत लसणीची चटणी किंवा भरल्या वांग्याची चमचमीत भाजी....आहाहा !

<< वाळत घातलेल्या ओल्या फेण्या
नुकताच वाळत घातलेला ओला पोह्याचा पापड
मक्याचे भाजलेले कणीस त्या वर तुप मीठ लावुन ( समोर प्रचंड पडणारा पाउस पाहिजे)>>
मोकिमी, यादें ताजा कर दी... आई-मावशी अशा कंपनीचा डोळा चुकवून वाळवणाचे पदार्थ गट्टम करण्यात दुहेरी सुख...खाण्याचं आणि वात्रटपणाचं Proud

<< चुर्र वाजलेली आंबोळी आणि त्यावर साजुक तूप >> लाजो Lol आणि वाजली नाही तर ?
पोहून आल्यावर असली आंबोळी खायला धमाल.

जाऊ दे झालं. ह्यातलं काहीही आत्ता मिळणार नाहीये. नुसतंच वाचून लाळ गाळत बसावं लागणार.

कालचा उरलेला मटणाच्या रस्स्यात शिळ्या ज्वारीच्या भाकरी घालुन शिजवतात त्याला ऊकडा किंवा ऊकडल म्हणतात मस्त लींबू पिळून अप्रतीम लागत>>>रावण, हेच लिहायला आले होते मी Happy माझी आई शिळ्या पुरणपोळ्या गुळवणीमध्ये शिजवते. तोंपासु.
झकासराव, चहा + बिस्किटे माझेही फेवरेट. मला चहा + खारीचा चुराही भयंकर आवडतो.
तव्यावरची गरम गरम चपाती + चहा
तव्यावरची गरम गरम चपाती + घरचे तुप+ साखर
दिनेशदा, ते लसणीची चटणी+ तेल मला भाकरीबरोबर खुपच आवडते.
गरम भातावर लसणीची चटणी आणि कैरीचे लोणचे आहाहा!

रुणुझुणू, जाऊ दे झालं. ह्यातलं काहीही आत्ता मिळणार नाहीये. नुसतंच वाचून लाळ गाळत बसावं लागणार.>>>अगदी अगदी

शिळं घट्ट साधं वरण + बारीक चिरलेला कांदा + कच्चं तेल + तिखट, मीठ कोथिंबीर... मस्त कालवायचं - शिळ्या पोळी/भाकरी बरोबर हाणायचं Happy

शिळ्या पोळी/भाकरी बरोबर हिरव्या मिरचीचा खर्डा + कच्चं तेल ... जिभेची सगळी सगळी जिरते!

दूध + साय + साखर + पातळ पोहे

पातळ पोह्यांचा कच्चा चिवडा

गोपाळकाला, त्यातली लिंबाच्या लोण्च्याची फोड

मस्त जमलेला दाल तडका + स्टिम्ड राईस

शिजवलेल्या गावरान हिरव्या चण्याची कच्ची ऊसळ (ठाण्यात गडकरी रंगायतनजवळ मस्त मिळते) ती घरी नेऊन घट्ट दह्यासोबत चापावी

बाजो, एकदा माझ्या हातचा उंधियो खाल्ला पाहिजे. अगदी कमी तेलातला, गोळे सुद्धा तळलेले नसतात.

रावण, त्या पदार्थाला खदाकनं असा पण एक शब्द आहे.

आणखी यादी,

ऋषिपंचमीची भाजी + दही + दशमी
नारळीभात + ओल्या वाटाण्याची उसळ

बिनफोडणीची अळूची पातळ भाजी + मोदक + वरण भात तूप (आमच्याकडचा नागपंचमीचा मेनू)

के रुस्तम कडचे आईस्क्रिम + त्यांचाकडचेच दही ( यावेळी किंग मँगो खाऊन आलो राव, काय तो रंग, काय तो पोत, काय ती चव..... तूलना केवळा हापूसचीच होऊ शकेल)

अंबाडीची भाजी + त्यावर करडईचे तेल + भाकरी

हरभर्‍याच्या पाल्याची भाजी + चटणी + भाकरी

मेथीची गोळा भाजी + चपाती

महालक्ष्मीच्या देवळामागे मिळतात ती मूग भजी आणि मग हाजी अली ज्यूस सेंटर कडचा फालुदा

एकदा माझ्या हातचा उंधियो खाल्ला पाहिजे. अगदी कमी तेलातला, गोळे सुद्धा तळलेले नसतात.>>>दिनेशदा, ईथे आहे का ती रेसिपी? नसेल तर टाकता का?
हाताची चव नाही येणार, पण पाककृती तरी मिळेल!

बिनफोडणीची अळूची पातळ भाजी + मोदक + वरण भात तूप (आमच्याकडचा नागपंचमीचा मेनू)

नागपंचमीला भाज्या चिरायच्या नसतात ना?

बरके गरे लोणचं लावून खायचे.....

नियमः बरका झाडावरून काढलेला फणस कमीतकमी दहा बारा जणांचा घोळका जमवून फोडायचा..... त्यातली पोय काढून टाकून अखंड फणसावर किंवा मग चारखंड कोयत्याने कापून घेऊन त्यातल्या गर्‍यांवर रसरशीत तिखट लोणचं वाटीत (इथे वाडगा लागतो Proud ) घेऊन एक एक गरा लोणचं लावून खायचा.....

एक फणस संपला की दुसरा पुढ्यात हजर असणे ईज मस्ट Proud

काही विशिष्ठ जातीच्या बरक्या फणसात गरा तर गोड आणि छोट्या साईजचा असतोच पण त्या गर्‍याभोवतीची पाती पण चविष्ट आणि गोड असतात..... गर्‍यांबरोबर ती पाती पण खायची........

अहाहा........

मन तृप्त झाले आहे गरे खाऊनी....... आता नाही देवा काही अन्य मागणे Happy Wink

शिळ्या चपातीला दोन्ही बाजुंनी तव्यावर चांगले शेकुन आणि शेकताना मस्तपैकी तेल लावुन चपाती जराशी कडक करायची. मग ही गरम गरम चपाती गरम गरम चहात बुडवुन खायची.

गार पुरणपोळी/ डोसा/ घावन चहात बुडवुन खायचे.

लुसलुशीत बनपाव गरम दुधात (दुधात साखर टाकुन) बुडवुन खायचा.

नुकतीच तळुन काढलेली करंजी थोडीशी गार झाल्यावर फुंकुन फुंकुन खायची.

पहाता पहाता केवळ दहा तासांत ह्या बीबी ने शम्भरी ओलांडली तेही कुठल्याही वादविवादाशिवाय ! लगे रहो भै खाते रहो.... Proud

एकंदरीत चहा हे युनिव्हर्सल सॉल्व्हन्ट आहे असे दिसते Happy

इथे चमच्याने हे महत्त्वाचे आहे... Wink

उपम्यावर शेव किंवा फरसाण आणि त्याबरोबर कॉफी हे माझ्या देशातल्या क्यांटीनचं महाप्रसिद्ध सकाळचं खाणं होतं.... न्याहारी करून गेलं असलं तरी त्याच्या उपम्याच्या वाफेनेच भूक लागायची....

मटणाचा/चिकनचा आदल्या दिवशीचा रस्सा + पातळ पोहे

भाकरी + कुठलीही पिठ पेरुन केलेली भाजी...यात पालेभाजी, कोबी, सिमला मिरची, भज्यांची मिरची

भाकरी+ सोडे घातलेली वांग्याची भाजी

भाकरी + करंदीचे सवतळलेले

दही साखरेबरोबर ब्रेड

मस्त वाफाळलेला भात + कुठल्याही माशाचे हिरवे कालवण. बरोबर तळलेला मासा/ कोलंबी असेल तर अजुन मजा येते.

वरण + भात + करंदी घातलेला चण्याच्या पिठाचा पोळा.

सायीचं दही घातलेला भात आणि उकडलेल्या बटाट्याची कोमट (गरम नाही) भाजी.
पांढरा दहीभात आणि पिवळी भाजी (त्यावर काळे छोटे मोहरीचे दाणे, चिरलेली हिरवी कोथिंबीर असतेच त्यामुले त्याचं वर्णन करत नाही. Wink )
तांदळाची भाकरी भारी लागते. गरम गरम भाकरी, भरल्या वांग्याची भाजी किंवा अंबाड्याची भाजी.
हे सगळं काही या क्षणी मिळणार नाही त्यामुळे सन्यास घ्यावासा वाटतोय. Wink

आईच्या हातच्या भोपळपुर्‍या आणि घरचे लोणी.
छे छे!

आजपासून श्रावण सुरु झालाय. पुढच्या शुक्रवारी पुपो करणार.
साधा वरणभात, पुपो, बटाटा भाजी, हिरवी चटणी, मसालेभात, काकडी कोशिंबीर (दाण्याचं कूट घातलेली), कटाची आमटी. तळलेल्या कुर्डया, पापड.

एकंदरीत चहा हे युनिव्हर्सल सॉल्व्हन्ट आहे असे दिसते >>>>> बाजो, अहो माझ्या एका मैत्रिणीला तर
चहात बुडवुन खाण्यासाठी कुठलाही खाद्यपदार्थ चालतो. ती शिरासुद्धा चहात बुडवुन खाते हे ऐकल्यावर मी अवाक झाले ! Uhoh शिरा हा प्रकार चहामध्ये बिस्किट, खारीसारखा बुडवुन कसा काय खाऊ शकतो असे विचारल्यावर मज पामरावर बाईसाहेब तु. क. टाकत म्हणाल्या, "तु फरसाण, शेव, भावनगरी कधी चहात
टाकुन खाल्लीयस का ? तसाच शिरासुद्धा चहात टाकुन चमच्याने खायचा !" ................आता बोला ! Lol

विद्याक सेम पिंच!

* मऊ गुरगुट्या भात + चिकन्/मटणचा शिळा रस्सा
* वरण्+भात्+तूप्+लिंबू एनी टाईम सोबत असली तर तोंडी लावण्यापूर्ती उकडलेल्या बटाट्याची भाजी / उसळ नाहीतर गरज नाही
* गुरगुट्या भात + सायीचं दूध्/तूप, मीठ मेतकूट
* भात, वालाचं बिरडं (डाळींबी उसळ नव्हे घट्टसर पातळ बिरडं) तूप
* पुरणपोळी, सायीचं दूध्/पोळी बुडेल इतकं तूप
* वाफाळते लुसलुशीत उकडीचे मोदक + तूप
* पोहे, मूग्/मटकीची शिळी उसळ, बारीक चिरलेले कांदा , टोमॅटो, कोथिंबीर, तिखट, मीठ, घट्ट दही, फरसाण, उरलेल्या लेज वा इतर वेफर्सचा चुरा
* खरपूस चपाती,कडा कुरकुरीत ब्राऊन झालेलं पिवळा गोळा न फुटलेलं हाफ फ्राय आम्लेट, अंबाड सुकट कांदाटोमॅटोमध्ये सवतळलेली
* भाकरी + जवळा/करंदी सवतळलेली, वांग्यातील सोडे
* तूप्,साखर्,चपाती मिक्सरमध्ये वाटून त्याचा लाडू
* बटाट्याच्या काचर्‍यांची कडीपत्ता, मोहरीची फोडणी दिलेली कुरकुरीत भाजी, केळं, मटकी उसळ, खरपूस चपाती
* साध्या वरणाचा घट्ट गोळा, भात, तूप, ऋषीपंचमीची भाजी यांचा एकत्र काला
वरण, भात्, शेंगदाणे घातलेली अळूची पातळ भाजी, ताक
वरण, भात, ताक
* चिकन मटणचा रस्सा, वरण, भात, लिंबू
* ग्लुकोजची बिस्कीटे + सायवालं दूध यांचं गुरगुट्या मिश्रण चमच्याने
* हापूसचा आंबा न कापता अक्खा चोखून
* उपलब्ध फळांचे काप, मिल्क मेड्/किंचीत साखर घालून फेटलेली साय, रूह अफ जा/ रोझ सिरप
* व्हॅनिला आईसक्रीम चॉकलेट सॉस/ फळांच्या कापांसोबत विशेषतः हापूस आंबा
* हातसडीचा गुरगुट्या भात+ गरम गरम ओल्या बोंबलाचं कालवण (पावसाळा स्पेशल)
* चिंबोरीचं कालवण (पीठ भरून केलेल्या) याच्या सोबत्चं चपाती/भात गौण! हेही पावसाळा स्पेशल
* गुरगुट्या भात + अंड्याचं मिरे घालून कालवण आमच्याकडे अंड्याची मिरवणी म्हणतात (पावसाळा स्पेशल)
* सोड्याचा गरमागरम पुलाव/ व्हेजमध्ये वालाचा पुलाव (याला आमच्या कडे सोड्याची सोजी/ वालाची सोजी म्हणतात), उडदाचा/पोह्याचा तळलेला पापड, भरपूर तूप, आंब्याचं लोणचं
* लसणीची फोडणी दिलेली तुरीच्या डाळीची आमटी चपाती कुसकरून
* कुरकुरीत तळलेले ओले बोंबील , खुसखुशीत गरम चपात्या
* आंबोळी, शिळ्या चिकन/मटनाचा रस्सा

आईगं खूप लिस्ट आहे.... अशक्य भूक लागलीये आधी पेपू करते... मग उरलेलं

तांदळाची भाकरी आमची पांढरी शुभ्र , नाजुक-साजुक, मउसुत एकदम राजेशाही ...... हॉटेलच्या गार्लिक नानला देखील मागे टाकेल.... तिची ज्वारी-बाजरीच्या जाडजुड भाकरयांबरोबर काय बरोबरी..... तिची तर बातच न्यारी.....

कच्च्या चिंचा, शेकोटीत भाजून.. हा लता मंगेशकरचा देखील आवडता खाऊ होता. या चिंचा गुळाबरोबर खायच्या.

पावट्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा, नुसत्या उकडून. मीठ सुद्धा नाही लागत.

होळीत भाजलेला, नारळ.
श्रावणातल्या शुक्रवारचे चणे, गूळ आणि मसाला दूध.

ज्वारी-बाजरीच्या जाडजुड भाकरयांबरोबर <<<
ज्वारी बाजरीच्या पातळ मऊसूत भाकर्‍या कधी बघितल्या नाहीत काय? की करता येत नाहीत कुणाला?

नीरजा, त्या भाकर्‍या सोलापूरकडचीच खासियत आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाकर्‍या "बडवल्या" जातात. त्या पातळ थापायला वेळ नसतो. सकाळी भाकर्‍या बडवून शेतावर जायचे आणि संध्याकाळी आल्यावर भाकर्‍या बडवून जेवायलाच बसायचे. दोनचार भाकर्‍या रिचवल्या कि दिवसभराची सोय होते !

असेल बुवा.. मी खाल्लेल्या बहुतांशी ज्वारी बाजरीच्या भाकर्‍या या पातळ - खरपूस होत्या. अगदी शेतावरच्या सुद्धा.

मी खाल्लेल्या बहुतांशी ज्वारी बाजरीच्या भाकर्‍या या पातळ - खरपूस होत्या. अगदी शेतावरच्या सुद्धा.>>>> +१. (मी केलेल्या सोडून. :फिदी:)

तू केलेल्या मी कधी खाल्ल्यात? Happy
बाकी मी कुणाला भाकरी करून जेवू घालायला जाणारच नाही.. जळके कडक तुकडे ४ तास पाण्यात बुडवल्याशिवाय कुणीच खाऊ शकणार नाही Happy

अगदी अगदी दिनेशदा! त्या तुकडे पडणार्‍या भाकर्‍या चघळत खायला कंटाळा येतो. नी म्हणते तशा भाकर्‍या खायला खास सोलापूरलाच जायला हवं

तसंपण कदाचित लहानपणापासून आजीआजोबांच्या सोबतीने गुरगुट्या भाताची आणि लुसलुशीत चपात्या-भाकर्‍यांची सवय झाल्याने कशाला तोंडाला, दातांना आणि जबड्याला त्रास द्यायचा असा विचार करून मटामट घास गिळायची सवय झालेली बहुदा!

Pages