"सत्यमेव जयते" भाग ३ - (Marriage Or Marketplace?)

Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39

आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्‍या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..

सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण तुमची पोस्ट छान आहे. भा पो. .पटली. जितक्या जास्त लोकांना पटेल, पचनी पडेल तितके बरे.
विवाहसमारंभावरच्या खर्चाबद्दल लिहिण्यासारखं बरंच आहे.

"परवडते म्हणून लग्नावर खर्च करणे हा परंपरा जोपासण्याचा गुन्हा आहे...."

~ सहमत किरण. नव्याने पैशाची सूज (उब नव्हे) आलेल्या घटकांत तर लग्नातील किळस येऊ शकेल असा डामडौल पाहताना कित्येकवेळा मला वाटते की काय म्हणून मी हे लग्न अटेन्ड केले ? समाजात राहतो, भेटतो, नातेवाईंकांचे संबंध असतात, नोकरीपेशामुळे बाहेरचा गोतावळा निर्माण झालेला असतो....आदी अनेकविध कारणाने अशा विवाहसोहळ्याना हजर राहणे क्रमप्राप्तही असते. पण तेथील बेमुर्वतखोरपणे चाललेली पैशाची उधळण पाहून मन खिन्न होते आणि हे आपण थोपवू शकत नाही ही भावनाही मनी अधिकच कटुता आणते.

अशा लग्नाला इच्छुक मुलाचे पालक हजर असतात, त्यानाही मग वाटू लागते की आपल्या मुलाच्या लग्नाच्यावेळीही नियोजित वधूपित्याने इतका खर्च केलाच पाहिजे {मग तो मुलगाही नंदीबैलासारखा आईवडिलांच्या हो ला हो मिळवितो.... हे मी पाहिले आहे.}

सर्वसामान्य पदवीधर तर सोडाच, पण ज्यावेळी एखादा पीएच.डी.होल्डरही लग्नखर्चाच्या वारेमापपणावर डोळेझाक करून बोहल्यावर चढतो त्यावेळी लक्षात येते की शिक्षणाचा आणि या भपकेपणाच्या हौसेचा काडीचाही संबंध येत नाही.

फार वेदनादायक चित्र आहे हे आजच्या 'लग्न' परिस्थितीचे.

अशोक पाटील

विवाह हा संस्कार न राहता, एक सामाजिक दर्ज्याचे प्रदर्शन करण्याचे साधन बनत चाललाय. सुदैवाने
भारतीय हिंदु विवाह कायदा यापैकी काहीच गोष्टींना मान्यता देतो आणि त्याशिवाय केवळ नोंदणी पद्धतीने
झालेला विवाह देखील, तितकाच ग्राह्य मानला जातो.

ज्यांना शक्य आहे त्यांनी खर्च करावाच (कारण इथे मग सजावटकार, फुलवाले, कॅटरर्स यांच्या पोटापाण्याची
चर्चा होईल) पण डोईजड होत असेल तर का करावा ? त्यापेक्षा तोच पैसा मुलीच्या एकटीच्या नावे ठेवला तर
तिला पुढे उपयोगी पडेल.

शुभेच्छा हाच आशिर्वाद, कृपया आहेर आणू नये अशी पत्रिकेतली वाक्ये कुणी गांभिर्याने घेत नाहीत आणि जे घेतात, ते प्रत्यक्ष विवाहसोहळ्यात बापुडवाणे ठरतात.

"फक्त मुलगी आणि नारळ द्या" हा एकेकाळचा गाजलेला संबाद कुठेच ऐकू येत नाही आता.

शुभेच्छा हाच आशिर्वाद, कृपया आहेर आणू नये अशी पत्रिकेतली वाक्ये कुणी गांभिर्याने घेत नाहीत आणि जे घेतात, ते प्रत्यक्ष विवाहसोहळ्यात बापुडवाणे ठरतात.<<<
मी बहुतेक कुठल्यातरी वेगळ्याच बबलमधे वावरते की काय?
गेल्या दहापंधरा वर्षात जवळच्या नात्यात, जवळच्या मित्रमैत्रिणींच्यात जी लग्ने झालीयेत त्या सगळ्या पत्रिकांवर आहेर वा पु गु आणू नये हे छापलेले बघितलेय आणि पाळले गेलेलेही बघितलेय. अगदी प्रसंगी आहेर घेत नाहीत म्हणून लोक रूसले तरी न घेण्याच्या भूमिकेवर ठाम राह्यलेले बघितलेय.
माझ्या स्वतःच्या लग्नातही आम्ही आहेर घेतला नव्हता. कुणी देऊ केला तर तो घेतला नव्हता.

<<शुभेच्छा हाच आशिर्वाद, कृपया आहेर आणू नये>> अनुमोदन नी. हे पुण्यामुंबईच्या एका विशिष्ठ वर्गात नक्कीच यशस्वीपणे राबवले जाते. स्वानुभव Happy

<शुभेच्छा हाच आशिर्वाद, कृपया आहेर आणू नये>> अनुमोदन नी. हे पुण्यामुंबईच्या एका विशिष्ठ वर्गात नक्कीच यशस्वीपणे राबवले जाते. स्वानुभव

>> अनुमोदन.

काहींकडे तर चक्क "श्री अमुक तमुक - एक हंडा, अमके रुपये" - म्हणजे आहेर दिला त्याचे नाव आणि काय आहेर दिला त्याची यादीच जाहीर माईकवरुन वाचून दाखवली जाते Sad

हो म्हणजे हे इतकं अंगवळणी पडलंय की क्वचितप्रसंगी 'ओह तिथे आहेर आहे बरंका!' अशी आठवण करून द्यावी लागते Happy

"शुभेच्छा हाच आशिर्वाद, कृपया आहेर वा पुष्पगुच्छ आणू नयेत."

~ ही प्रथा छानपैकी रुळू लागली आहे आणि केवळ मुंबईपुणेच नव्हे तर अगदी सांगली-सातारा-कोल्हापूर अशा ग्रामीण ठसा असलेल्या शहरातूनदेखील हेही सांगणे गरजेचे आहे. मार्च/एप्रिल २०१२ मध्ये मला आलेल्या ११ लग्नपत्रिकेपैकी ९ पत्रिका वरील "नम्र सूचने" सह आल्या होत्या....त्यातही दोन मुस्लिमधर्मीयांच्या होत्या.....एक तर चक्क माझ्या कार्यालयातील शिपायाच्या मुलाची होती, त्यानेही तशी विनंती पत्रिकेत केलेली पाहिल्यावर मला विशेष आनंद झाला होता.

~ आहेर स्वीकारणार्‍यात प्राधान्याने पुढे असतात ते राजकारणाशी संबंधित लोक [केवळ लग्नातच नव्हे तर वास्तुशांत समारंभाला आलेल्या लोकांकडूनही मुर्दाडपणे हे लोक पाकिटे स्वीकारतात.]

काही वर्षापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या एका प्र-कुलगुरूने ज्यावेळी आपल्या मुलाच्या लग्नात धडधडीतपणे आहेर पाकिटे स्वीकारताना मी पाहिले त्यावेळी त्यांच्याविषयी मनी जे विचार आले ते इथे देणेही अवघड वाटते. त्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून अक्षदानंतर जेवायलाही आम्ही तीनचार समविचारी मंडळी तिथे थांबलो नव्हतो.

अशोक पाटील

आहेर घेणे देणे यात चूक काय आहे? तुम्हाला द्यायचा नाही , घ्यायचा नाही, म्हणून सगळ्या दुनियेने ते सोडून द्यायचे का?

जेवायलाही आम्ही तीनचार समविचारी मंडळी तिथे थांबलो नव्हतो.

मुळात तुम्ही गेलातच का? पत्रिकेत आहेर आणु नये असे लिहिले नसेल तर ते लोक आहेर घेणार हे नक्की.. तुम्ही लग्नात गेलातच कशाला?

मला वाटतं आहेर आणु नये असं छापूच नये हवं तर. "आहेर ऐच्छिक" असे छापावे वाटल्यास. किंवा काहीच छापू नये.

ज्यांना आणायचा द्यायचा ते देतील, ज्यांना नाही आणायचा ते नाही आणणार. लग्नाला आशीर्वाद द्यायला ही ही माणसे आली यात यजमानांनी आनंद मानावा आणि आहेर कुणी आणला/कुणी नाही याचा विचार करु नये.

अर्थात सगळं जरा गुंतागुंतीचं आहे म्हणा!

हि नवीन प्रथा लोकप्रिय होतेय, ते वाचून खरेच आनंद झाला. पुर्वी लग्नाला खर्च झाला, त्यात आपला हातभार असावा, म्हणून अहेराची प्रथा होती.

ज्यांना अशी मदत करायची आहे, त्यांच्यासाठी "घरचा आहेर" हा मार्ग आहेच.

<त्यापेक्षा तोच पैसा मुलीच्या एकटीच्या नावे ठेवला तर तिला पुढे उपयोगी पडेल.>
हे वाचताना इशुरंस कंपन्यांच्या जाहिरातींतल्या 'मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी' टाइप ओळी आठवल्या

लग्नाचा खर्च मुलीकडच्यांनीच का करायचा, मुलीला हुंडा का तर माहेरच्या संपत्तीत तिला वाटा नसायचा. तेव्हा अप्रत्यक्षरीत्या मुलीला माहेरच्या संपत्तीत वाटा मिळावा हा उद्देश. तो सरसकट , ज्यांच्याकडे संपत्तीतला स नाही अशांसकट राबवला जाऊ लागला...कारण महाजनो येन गतः.......
आता मुलीला संपत्तीत वाटा देता येतो. त्यामुळे मूळ उद्देश रद्दबातल.
दोन्हीकडच्यांनी समान खर्च उचलावा हे योग्य. (मला राहून राहून एलदुगो आणि त्यातले लग्नखर्चावरचे भांडण आठवतेय).
----
समारंभांवरच्या खर्चाबद्दल गाडगेबाबा उपदेश करून त्याला किती दशके लोटली. जन्म , लग्न आणि मृत्यू हे सगळेच सोहळे गावजेवणाने (स्थलकालानुरूप बदललेल्या) साजरे करायलाच लागतात. आपण त्यांच्याकडे खाल्लं, मग परतफेड नको का? त्यांची तीन मुले , आपले एकच, इत्यादी जमाखर्च त्यात असतात. आमच्या ऑफिसात प्रॉव्हिडंट फंडातून उचल घेण्यासाठी अपत्याचा पहिला वाढदिवस हे ग्राह्य कारण होते!

---
साधेपणाने आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण साजरे करणार्‍यांची संख्या वाढावी अशी प्रार्थना.

विवाह हा संस्कार न राहता, एक सामाजिक दर्ज्याचे प्रदर्शन करण्याचे साधन बनत चाललाय. >> अगदी दिनेश Sad

माझ्या जवळच्या नात्यात नुकतंच एक लग्न झालं. खर्च चिक्कार झाला असणार यात वाद नाहीच. पहिल्या मुलिचं लग्न ही असंच थाटात करून दिलंय. आम्ही काही मंडळींनी एकत्र त्यांना परतीचा आहेर (निदान आम्हाला तरी) देऊ नका असं बजावलं होतं, तरिही त्यांनी दिला. तो हि असा जो आमच्याक्डून वापरलं जाणं निव्वळ अशक्य आहे. उगिच खर्च केला. वर प्रथा असते, द्यावं लागतं ही सारवासारव. Sad असं एकाने प्रथा म्हणून केलं की मग इतरांना ही ते पाळावं लागतंच.

श्री.हजारे....

मी (आणि माझ्यासारखेच या विषयावर विचार करणारे माझ्या मोजक्या मित्रांनी) माझ्या मुलांच्या लग्नात आहेर घेतले नाहीत आणि कुणाला दिलेले नाहीत. वर दिनेशदा म्हणतात तसा 'घरचा आहेर' जरूर केला आहे, पण तो भाचे-भाचींच्या लग्नात....मामा या नात्याने.

सामान्यपणे आहेर "कुणी" घ्यावा याला लिखित असे कुठले मीटर अस्तित्वात नसले तरी यजमानाचे सामाजिक शैक्षणिक स्थान काय आहे हे विचारात घेता त्याने काही आदर्शाचे पालन करावे अशी मी अपेक्षा ठेवली तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. लग्नपत्रिकेत 'आहेर आणू नयेत' अशी सूचना नव्हती हे मान्य, पण म्हणून प्र-कुलगुरू अगदी त्यांच्या ड्रायव्हरकडूनही पाकिट स्वीकारतात हे दृश्य नक्कीच खेदजनक (मलातरी) वाटले.

कोल्हापूरातील कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.गोविंद पानसरे तसेच कामगार नेते श्री.दिलीप पवार या दोघांनी आपापल्या मुलांच्या लग्नपत्रिकेत 'आहेरा' संदर्भात कसलीही सूचना केली नव्हती. पण प्रत्यक्षात अक्षतारोपण झाल्यावर मांडवातील लोक ज्यावेळी त्याना आहेराची पाकिटे देवू लागली त्यावेळी त्यानी ती नम्रपणे नाकारली.....फक्त शुभेच्छांचा स्वीकार. मी तीनचार दिवसांनी त्याबद्दल त्याना तसे विचारलेही, तर भाईनी उत्तर दिले...."अहो पाटील, आहेर स्वीकारायचाच नसेल, तर मग ते पत्रिकेत लिहायला तरी कशाला हवे ? बस्स, फक्त नम्रपणे तसे जागेवरच सांगितले तरी कार्य भागते."

हीच गोष्ट त्या प्र-कुलगुरुंनी केली असती तर आनंद झाला असता.

असो. आहेराबाबतचा दृष्टीकोन तुम्ही म्हणता तसा व्यक्तिगत पातळीवर घेणे हे ज्याचेत्याचे स्वातंत्र्य आहेच.

गैरसमज नसावा.

अशोक पाटील

श्री अशोक, शैक्षणिक पात्रता आणि सारासार स्वतंत्र विचार करण्याची कुवत यांचा काही संबंध नाही हे सत्यमेव जयतेच्या भागांतून (पुन्हा) कळू लागले आहे की.

अशोक, भरत, दक्षिणा.. अगदी सहमत.
नवर्‍याच्या, नवरीच्या शेजारी बसलेला तो "विश्वासू" माणूस. सर्व पाकिटांची नोंद करतोय, त्यावर क्रमांक
टाकतोय.. अगदी नकोसे दृष्य असते ते माझ्यासाठी.

नागपूरला, नमस्काराचे पैसे असा एक प्रकार असतो. नवरा नवरीने नमस्कार केला, कि ती व्यक्ती त्यांना
पैसे देते.

साधेपणाने, मुलीच्या दारात मांडव घालून, घरच्या मंडळीनी केलेले जेवण, पत्रावळीवरच्या पंगति, जेवायल्या
येणार्‍या प्रत्येकाने घरून येताना आणलेले तांब्या भांडे, अंगणात लावलेली हळद, गावातूनच बैलगाडीतून काढलेली वरात, पाच परतावण्याचे जेवण, सत्यनारायणाची पूजा, गोंधळ... अशी लग्ने आता भूतकाळात जमा
झालीत.

सीमा,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> अहो, वंशाला दिवा पाहिजे, मुलगीला कमी लेखणे, पाव एकर शेत असल तरी घराण्याच नाव टिकल पाहिजे
>> या फाल्तु विचारांच्या पगड्यातुन मुलींची हत्या होत आहे. त्याचा अंगप्रदर्शनाशी काय संबध?

वर दिलेली कारणं निरर्थक आहेत हे मान्य. ती दूर होईस्तोवर वेळ लागणार. मधल्या वेळात स्त्रीभ्रूणहत्या तशाच चालू राहतील.

हे टाळण्यासाठी ताबडतोब उपाय म्हणजे स्त्रीविषयी आदर उत्पन्न करणे. अंगप्रदर्शनातून स्त्रीविषयी आदर उत्पन्न होत नाही. ते तात्कालिक उपायाच्या विरुद्ध आहे.

२.
>> आणि परत ते अनंतकाळची माता वगैरे स्टिरिओटाईप्स का बाळगावेत.

कारण तिचं मूळ स्वरूप आईचं आहे. भले प्रत्यक्ष पोरं प्रसवली असतील/नसतील. प्रत्येक स्त्रीला एक निसर्गदत्त देणगी मिळालेली असते. त्या देणगीला स्तरबद्ध (स्टिरिओटाईप) म्हणावं का?

३.
>> एखादिने माता व्ह्यायच नाही अस ठरवल कि समाज बुडला का?

नाही बुडाला.

४.
>> पुरुष अनंतकाळचा पिता आहे हे जनमानसात खोलवर रुजलं तरी कितीतरी गर्भपात थांबविता येतील.

जरा सांभाळून बरं का! नेमक्या याच कारणामुळे स्त्रीभ्रूणहत्या होताहेत. मुलीचा बाप ही जबाबदारी नको असते म्हणून मुलगी जन्माला येण्याआगोदर पाडली जाते.

५.
>> कारण निदान स्त्रियांचा आदर करायचे तरी पुरुष शिकतील.

पुरूष त्याच्या आईचा जितका आदर करतो तितका बाकी कुणाचाही करीत नाही. अर्थात काही अपवाद वगळून. त्यामुळे स्त्रीला स्त्री म्हणून आदर मिळावा असं वाटंत असेल तर तिचं मातृस्वरूप पुढे आलं पाहिजे. बाकी कुठल्या रूपात (उदा. व्यावसायिक, सामाजिक, इत्यादि) मिळणारा आदर तिच्या कार्य, स्थान, स्तर, इत्यादिंशी संबंधित असतो.

मी सांगितलेलं पटायला पाहिजेच असं नाही. मात्र समाजाच्या स्त्रियांविषयीच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल झाला पाहिजे, यावर एकमत नक्कीच व्हावं. Happy

आ.न.,
-गा.पै.

साती,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> अय्यो,मग काय विकतचं अंग बघायला बायकांशी लग्न करतात की काय पुरूष?

आता काय सांगायचं तुम्हाला! विकतचं अंग बघायला वेगळी ठिकाणं असतात! Uhoh

आज जो वाहिन्यांवरून स्त्रीदेहाचा नंगानाच चालू असतो त्यादृष्टीने फुकटचं अंगप्रदर्शन म्हणत होतो मी. हे ठिकठिकाणी बघायला मिळतं. एका प्रथितयश मराठी वर्तमानपात्राच्या संकेतस्थळावर उघडउघड उत्तानचित्रे असतात. हे थांबायला हवं.

२.
>> पण अनंतकाळची माता असन्याचा याच्याशी काय संबंध?

कुठल्या पुरुषाला आपल्या आईचं प्रदर्शन झालेलं बघायला आवडेल?

३.
>> स्त्री काय फक्त मातेच्या भुमिकेतच आदरणीय असते का?

एक मनुष्य म्हणून आदर मिळणं आणि एक स्त्री म्हणून आदर मिळणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्त्रीने मातृत्व सोडलं तर तिच्यात आणि पुरुषात फरक रहात नाही. मातृत्व म्हणजे केवळ पोरं प्रसवणं नव्हे.

त्यामुळे मातेव्यतिरिक्त भूमिकेत स्त्रीला आदर जरूर मिळेल. मात्र तो एक मनुष्य म्हणून मिळेल. असा आदर मिळवणं व्यावसायिक क्षेत्रातल्या स्त्रीला अवघड नसतं. परंतु भारतातल्या सर्वसाधारण स्त्रीला हे साधणं अवघड आहे. असं आपलं माझं मत. आपले मते वेगळी असू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

भरतजी, अशोकजी धन्यवाद

एका समाजाने ज्याप्रमाणे ठराव करून गर्भलिंगपरीक्षेवर बंदी घातली तसंच कुठल्यातरी एका समाजाने लग्नातल्या अनिष्ट प्रथांवर ठराव करून बंदी घालायला हवी. लोकशिक्षण वगैरे मार्ग आहेतच पण सामाजिक बंदीइतकं कुठलंही हत्यार प्रभावी नाही. याशिवाय आणखी कुठला प्रभावी मार्ग असेल तर त्याची चर्चा आपण करूयात ...

माझ्याच पोस्टचा हा भाग आता वाचताना त्यातला अनर्थ जाणवला. कृपया

तसंच कुठल्यातरी एका समाजाने लग्नातल्या अनिष्ट प्रथांवर ठराव करून बंदी घालायला हवी म्हणजे इतर समाजात त्याचे अनुकरण होईल अशी आशा वाटते..

असं वाचावं..

क्षमस्व

स्वाती_आंबोळे,

आपला इथला संदेश वाचला.

१.
>> वैयक्तिक बाबींच्याच सामाजिक प्रथा बनत गेल्यामुळे निघालेले धिंडवडे आहेत ते.

वैयक्तिक बाबींतून सामाजिक प्रथा बनतात की समाजाच्या दबावामुळे प्रथा वैयक्तिक जीवनात झिरपत जातात, हा प्रश्न 'कोंबडी आधी की अंडं आधी' अशा स्वरूपाचा आहे.

याला उपाय म्हणजे स्त्रीबद्दल स्त्री म्हणून आदर उत्पन्न करणे.

२.
>> बाकी तुम्ही काय बोलत आहात ते अचाट आहे.

आहेच मुळी. कारण इथली इंग्लंडमधली परिस्थितीच मुळी अचाट आहे! Happy

इथे पहा इंग्लिश स्त्रीपुरुषांतल्या नातेसंबंधांनी कसं वळण घेतलंय ते. विषय अवांतर आहे. पण म.सा.वि. काढता येतो. जबाबदारी (commitment) टाळण्याकडे इंग्लिश पुरुषाचा कल आहे. तसाच पळकाढूपणा कन्यापितृत्वाच्या बाबतीत भारतीयांत दिसून येत नाही काय?

अमेरिकेतली परिस्थिती मला माहीत नाही. आपणांस कदाचित त्यावर प्रकाश टाकावासा वाटू शकतो.

आ.न.,
-गा.पै.

"मुलीच्या दारात मांडव घालून, घरच्या मंडळीनी केलेले जेवण, पत्रावळीवरच्या पंगति, जेवायल्या येणार्‍या प्रत्येकाने घरून येताना आणलेले तांब्या भांडे...."

~ हे सारे जसेच्यातसे नजरेसमोर आले दिनेश. लहानपणी असे ताटवाट्या घेऊन त्या मांडवात.....[मांडव म्हणजे चार बांबू, त्याला पिवळ्या तांबड्या हिरव्या चुनीदार कनाती, आंब्याच्या डहाळी, हळदीच्या पाण्याचे शिंपन....]. ... शिवाय तो डोक्यावर बुरखा घालून लग्नाचे फोटो काढणारा पांढर्‍या कपड्यातील फोटोग्राफर ... साळोखे ब्रास बॅण्डची ठरलेली टिपरी.....एक छानच वातावरण होते खर्‍या अर्थाने सार्‍या गल्लीचे कौटुंबिक लग्नाचे.

"दारात लग्न" ही बाब तर इतिहासजमाच झाली आहे. प्रत्येकाला 'कार्यालय'च हवे. अगदी साखरपुड्यालादेखील. आमच्या कोल्हापूरात तर 'हळद लावणे, खेळणे' हा प्रकार अगदी संतापजनक झाला आहे आजकाल. पावकिलो हळद आणतात आणि 'पिवडी' नावाचा रंगपावडर प्रकार पोतंभर आणून तो काहिलीतील पाण्यात घुसळतात आणि मग नवर्‍याकडील दिव्य मित्र आपल्या मोटारसायकलींचे 'सायलेन्सर' काढून त्याच्या कानठळ्या बसविणार्‍या आवाजात त्या ठिकाणी जो धिंगाणा घालतात तो पाहून गझनीही झकासपैकी लाजेल.

"लग्न" ही एक पावित्र्याची घटना आहे ही बाबच हळूहळू लयाला जात आहे.

अशोक पाटील

>>> साधेपणाने आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण साजरे करणार्‍यांची संख्या वाढावी अशी प्रार्थना. <<<< अनुमोदन Happy

>>पण लग्न हा विषय कांद्यासारखा बहुपदरी आहे. एक एक पदर सोलत गेलं तरी संपायचा नाही. <<
किरण यांचेशी सहमत.
एक पुरुष व एक स्त्री नवराबायको होतात ही एक बाब सोडली तर तपशीलात प्रत्येक लग्न ही वेगळी केस आहे. तपशिलातील कोणत्याही एका गोष्टीबाबत अतिरेकी आग्रह धरल्याने लग्ने यशस्वी होतील अशी गॅरंटी देता येणार नाही.
विवाहाआधी, विवाहा दरम्यान आणि विवाहोत्तर प्रदीर्घ काळापर्यंत सर्व प्रमूख संबंधितांचे सुखसमाधान टिकून राहील असा विवाह करणे असेच प्रत्येकाचे ध्येय असते, निदान असले पाहिजे. जो विवाह वरील गोष्टींची पूर्तता करतो तीत ठरवलेले लग्न कि प्रेमविवाह, पत्रिका पाहून कि न पाहून, हुंडा दिला/ न दिला, नवरानवरी शिक्षित/ कि अशिक्षित, साधा समारंभ कि भपक्याचा खर्चिक समारंभ असले सभोवतालचे मुद्दे गौणच ठरतील.

एलटी, मला एक सांग. बहुतेक लग्नं भटजी लावत असतात. तेव्हा या भटजी लोकानी एकत्र येऊन सध्या सुरू झालेल्या या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेता येऊ शकतो का? प्रत्येक समाजाच्या मुख्य असणार्‍या लोकाकडून यासाठी काही उपक्रम राबवता येऊ शकतो का?

अशोक,हळद खेळणे हा खरोखर फार वैतागवाणा प्रकार असतो. माझ्या आईने एक दोन अनुभवानंतर कोल्हापूरकडील लग्नाला न जाणेच योग्य असं ठरवलय. (तिला दुसरा वैताग जेवणाच्या पंगतीसाठी खुर्च्या अडवून उभे राहतात त्याचा येतो.) मागच्या वर्षी आमच्या घराजवळच्या बौद्धवाडीमधे हळदकाढणी कार्यक्रमाला दारू पिऊन झालेल्या मारामारीत नवरीचा एक काका आणि नवर्‍यामुलाचा भाऊ यांचा खून झाला होता. कसलं लग्न आणि काय? यानंतर या मुलीचा पाय पांढरा आहे म्हणून त्या मुलीला सासरकडचे लोक घेऊनच गेले नाहीत. Sad

नंदिनी माय गॉड Sad फारच दुर्दैवी आहे हे. Sad
मी पण एका लग्नात (औरंगाबादेत) असा प्रकार पाहिलाय. कारण क्षुल्लक मुलाकडच्यांना नाश्ता विचारला नाही.. Sad खून बिन नाही पण थोडी मारामारी वगैरे झालिच होती. Sad

>>>. एलटी, मला एक सांग. बहुतेक लग्नं भटजी लावत असतात. तेव्हा या भटजी लोकानी एकत्र येऊन सध्या सुरू झालेल्या या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेता येऊ शकतो का? <<<<
वरमाला घालताना वर अथवा वधुला उन्च उचलणे/ कसले तरी फेसाचे स्प्रे फवारणे वगैरे घाणेरड्या / चप्पलबुटपादत्राणे घालुन तसेच लग्नविधीच्या ठिकाणी गोन्धळ घालणे इत्यादिक बाबीन्ना आम्ही भटजी लोक "विरोध" करतोच करतो, पण ठराविक वर्ग सोडला, तर फार कमी ठिकाणी त्यास जुमानले जाते. आता मला सान्ग, की इतक्या प्राथमिक स्तरावरील नव्याने पडत चाललेल्या घाणेरड्या प्रथा थाम्बविता येत नाहीत्/लोकं ऐकत नाहीत, तर हुन्डा/अचाट खर्च वगैरे बाबी "दीड दमडीचे भटजी" थाम्बवू शकतील ही अपेक्षा कशी काय करता? अन होय, मी दीडदमडीचा हाच शब्द वापरतोय, कारण गावाकडे लग्नाची दक्षिणा अडिचशे रुपयान्वर जात नाही, त्यावर गेली तर तो दिवसच सोन्याहून पिवळा, मात्र त्याच वेळेस, लग्नात घोडा नाचविला तर त्याला, वरातीच्या घोड्याला अडीच हजार पासून पुढे दहा हजारपर्यन्तदेखिल पैका मोजला जातो. अन्य खर्चान्च्या बाबी मी विस्तारभयास्तव मान्डत नाही. तर मला सान्ग लग्नाचे घोड्याचे किमतीचे एकदशान्श किमत्तीत उपलब्ध असणार्‍या "भटजी" च्या शब्दास किम्मत ती काय असणार?
(विशेषः आम्ही (म्हणजे माझा गृप) लग्न लावण्याचि कामे वरील अनेक कारणान्मुळे घेत नाही. आमचा दिवस वाया जातो, धार्मिक विधी/मन्त्रतन्त्र यान्चे गाम्भिर्य कुठेच नसते व जे काय अस्ते ते केवळ दिखाऊ भपका अस्तो त्यामुळे कामाचे समाधान नाही, सबब त्या वाटेला जात नाही)

>>>> प्रत्येक समाजाच्या मुख्य असणार्‍या लोकाकडून यासाठी काही उपक्रम राबवता येऊ शकतो का? <<<<<
प्रत्येक जातीपातीपन्थान्चा हा समाज सर्व स्तरावर ढोन्गी आहे असे माझे मत आहे. हा समाज बाहेर एक बोलतो, पोटात एक ठेवतो अन प्रत्यक्ष कृती करताना भलतेच वागतो असे आमचे मत झाले आहे. या समाजाला सुधरवायला आजवर असन्ख्य साधुसन्तान्नी प्रयत्न केलेत, किम्बहुना आत्यन्तिक गरज असल्यानेच ये भूमिवर इतक्या बहुसन्ख्येने ते निर्माण होत असतात, पण या समाजाची गेन्ड्याची कातडी जराही थरथरतही नाही. त्यातुन, भटजी/ब्राह्मण समाजास, बाकी समाजाने दिशादिग्दर्शक म्हणुन प्रमुख मानणे १९४८ पासून नक्कीच वा त्या आधीच सोडून दिले असल्याने, आमचे येथे काहीच काम नाही.

>>> १० भटजी = १ घोडा. <<<
असे दहा घोडे म्हणजे एक गाढव, अन ते भटजी-घोड्याचा हिशेब बरोब्बर कर्ते बर्का Proud Light 1

प्रत्येक जातीपातीपन्थान्चा हा समाज सर्व स्तरावर ढोन्गी आहे असे माझे मत आहे. हा समाज बाहेर एक बोलतो, पोटात एक ठेवतो अन प्रत्यक्ष कृती करताना भलतेच वागतो असे आमचे मत झाले आहे. या समाजाला सुधरवायला आजवर असन्ख्य साधुसन्तान्नी प्रयत्न केलेत, किम्बहुना आत्यन्तिक गरज असल्यानेच ये भूमिवर इतक्या बहुसन्ख्येने ते निर्माण होत असतात, पण या समाजाची गेन्ड्याची कातडी जराही थरथरतही नाही.

अनुमोदन !

त्यातुन, भटजी/ब्राह्मण समाजास, बाकी समाजाने दिशादिग्दर्शक म्हणुन प्रमुख मानणे १९४८ पासून नक्कीच वा त्या आधीच सोडून दिले असल्याने, आमचे येथे काहीच काम नाही.

पुन्हा अनुमोदन !! Happy

Pages