Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39
आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉलेज मध्ये असताना विवेकानंद
कॉलेज मध्ये असताना विवेकानंद केंद्राची voluneteer होते, हे मनात असे ठरवणे त्याचाच हा परिणाम होता असे आता वाटते ...
नीधप +१.
नीधप +१.
>>मी हि नाही हुंडा दिला, वा
>>मी हि नाही हुंडा दिला, वा देऊ दिला....हि एक गोष्ट तेवढी मी फार पक्की मनाशी ठरवून होते आणि अमलातही आणली<<
बरोबर आहे तुमचे माझा मित्रांने आणि त्याच्या भावाने दोघांनीही स्वत:च्या लग्नात एकपै पण हुंडा घेतला नाही. ते मुळचे कराडचे पण जेंव्हा त्यांच्या बहीणीच लग्न ठरले तेंव्हा त्यानी वराकडच्या लोकांना स्पष्ट सांगितले की आम्ही आमच्या लग्नात हुंडा घेतला नाही, तेंव्हा आम्ही आमच्या बहीणीच्याही लग्नाला हुंडा देणार नाही. पण शेवटी त्यांना स्वत:च्या बहीणीच लग्न हुंडा देऊनच करावे लागले जी एक चांगली डॉक्टर आहे. जुन्या प्रथाना टाळून, नव्या(चांगल्या) प्रथा पाडणार्याला, हा समाज नेहमीच पायदळी तुडवत असतो.
माझ्या जवळपासच्या नात्यातल्या
माझ्या जवळपासच्या नात्यातल्या आणि जवळच्या मित्रमैत्रिणींपैकी कुणाच्याच लग्नात हुंडा देणे घेणे झालेले नाही. खर्च दोन्ही आईवडिलांनी अर्धा अर्धा वाटून घेणे, कपड्यांचा खर्च ज्याचा त्याने, नो मानपान अशीच सगळी लग्ने बघितलीयेत मी अगदी आधीच्या पिढीतल्या नातेवाइकांच्यातही.
देणेघेणे, हुंडा असा विषय कुणी काढला तर सगळे तोंडावर फिस्कन हसून 'काय हे मागासलेपण' अश्या प्रकारे बघणारेच जास्त लोक माहितीयेत मला.
प्रमोद काका तुम्ही हे फार
प्रमोद काका तुम्ही हे फार पूर्वी केले, जेव्हा अगदी विरुस्द्ध होते सगळे,
मी तर हल्ली हल्ली ८ वर्ष झालीत आमच्या लग्नाला, आणि सुदैवाने नवरा हि तसा मिळाला म्हणून, किंवा म्हणूनच त्याच्याशी लग्न केले
आज मांडलेल्या समस्येवर,
आज मांडलेल्या समस्येवर, गरिबांसाठी एक उतारा म्हणून एक चांगला प्रयत्न महाराष्ट्रात आता अनेक ठिकाणी चालतो. तो नजरेला आणून देतो.
लग्नाचा खर्च [ज्यात हूंडा, मान पान इ. खर्च खूप मोठा असतो] ही गरिबांसाठी जास्त मोठी समस्या असते. आजकाल सामुदायिक लग्ने करून या प्रश्नाची त्यांना बसणारी झळ बर्यापैकी कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.
सोलापुरात माजी खासदार सुभाष देशमुख यांच्या 'लोकमंगल' तर्फे झालेल्या एका अशा सोहळ्याला मला जाण्याची संधि मिळाली. शेकडो लग्ने एका मांडवात अतिशय नियोजनपूर्वक, अतिशय मंगल वातावरणात लावण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे ज्यांना पहिली मुलगी होईल तिचे पालनपोषण चांगले केले जावे म्हणून प्रोत्साहनपर योजनाही गेली कांही वर्षे राबवली जाते. एक जण तर असा मुलगा होता की ज्याचे लग्न भरपूर हुंडा वगैरे घेऊन धूम धडाक्यात होऊ शकले असते. त्याने अशा ठिकाणी लग्न करणे कमिपणाचे या मानसिकतेला धक्का देण्यासाठी हट्टाने आपले लग्न तेथे करून घेतले व दोन्हीकडच्यांनी त्याला साथ दिली.
हा एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. मुद्दा हा कि असे चांगले प्रयत्न अनुल्लेखित राहू नयेत.
माझ्या घरी हि आता आता आमच्या
माझ्या घरी हि आता आता आमच्या पिढीत हुंडा घेणे देणे ह्यात बदल होतोय..पण खरेच आता आता...माझ लग्न अगदी पाहिलं होता त्या बाबतीत, मी खानदेशातली आहे
कौतुकास्पद म्हणे मागच्या वर्षी भावाचे अर्रेंज मेरेज केले, त्यात जी मुलगी आवडली तिच्या घराची परिस्थिती चाग्नाली नवती म्हणून वडील आणि भवानी एकूण एक खर्च केला, त्यांनी मुलाला कपडे केले एवढाच काय तो खर्च,
आमच्या भागात इथपर्यंत चा प्रवास हा मला तरी कौतुकाप्साद वाटतो
सध्या मी हैदराबाद ला रहाते,
सध्या मी हैदराबाद ला रहाते, इथे तर परिस्थिती भाय्नानक आहे, तेलुगु लोक तर मुलांना शिकवताना graduate म्हणजे एवढा हुंडा, मास्टर्स म्हणजे एवढा असे होशोब मांडत असतात सारखे
आमच्या ऑफिस मधल्या एका मुलीचे लग्न किलो भर सोने, लाखात कॅश असा काय काय देऊन ठरत होता, आणि कार त्या मुलाला हवी ती म्हणजे मोठी हवी होती सेदान नाही मिळाली म्हणून लग्न मोडल...
नवर्याच्या कम्पन् मधला एक पोरगा कमी पगार आणि कमी designation वर infosys ला गेला, कारण ह्या कंपनीत आहे सांगितलं तर हुंडा जास्त मिळतो म्हणून...इकडे खरच फार भयानक चित्र आहे
अण्णा हजारेंचं नावही
अण्णा हजारेंचं नावही सामुदायिक लग्नांच्या संबंधात वाचनात आलं होतं. आणखीही काही संघटना, व्यक्ती प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातच काही वर्षांपूर्वी नवरा मुलगा मानपानासाठी अडून बसला तेव्हां गावक-यांनी व-हाडाला हुसकावून लावून गावातीलच एका तरूणाशी मुलीचा विवाह लावून दिल्याची घटना गाजली होती. त्या वेळी मुलगी मुलाकडच्यांच्या मागण्यांना बळी पडणार नाही या निश्चयावर ठाम राहिली होती. त्यानंतर महिनाभरातच तिच्यापासून प्रेरणा घेत आणखी दोन तीन प्रकरणं अशीच घडली. या सर्व सकारात्मक घटनांना चांगली प्रसिद्धी मिळाल्याने त्याचे चांगले परिणाम पहायला मिळाले होते.
माझ्या मुलाच्याबाबतीत इथे
माझ्या मुलाच्याबाबतीत इथे लिहिणे [या विषय संदर्भात] मला योग्य वाटते.
आम्हा 'कोल्हापुरी मराठा' समाजात 'आमच्या मुलाला हुंडा नको' असे म्हणणे जवळपास मुलाचे असलेले/नसलेले व्यंग लपविण्याचा प्रकार मानतात. मध्यस्थाजवळ मी "हुंडा नको, सोने नको" असे बोललो तर ते गृहस्थ चमकले आणि 'असे बोलू नका ओ पाटीलसाहेब. मुलीकडील म्हणतील पाटलाच्या पोरात काही तरी कमी आहे वाटतं....." अशी हसतहसत दटावणीही दिली. ही मनोवृत्ती इतकी रुजली आहे की ज्यावेळी पुण्याचे स्थळ आम्ही नक्की केले होते, त्यावेळी होणार्या लग्नाच्या वाटाघाटीच्या वेळी त्या मध्यस्थाकडील तिघाचौघांनी माझ्या तोंडावर फक्त फडकेच बांधायचे बाकी ठेवले होते.
तरीदेखील देवाणघेवाण प्रसंग अतिशय कटुतेचा असतो हे मी जाणत असल्याने अगदी आग्रहाने 'मुलीकडील मंडळींनी त्याना हवे ते मुलीला करावे तसेच आम्ही मुलीला जे काही करू ते उभयपक्षी मान्य व्हावे' असा अगदी अल्टिमेटम दिल्याने तो मुद्दा ताणला गेला नाहीच. मात्र मुलीकडील मंडळीनी त्या घरातील ते पहिलेच लग्न असल्याने त्याना ज्या रितीरिवाजानुसार थाटमाट करायचा तो केला....मात्र मी अक्षतानंतर फटाके उडविण्यास प्रतिबंध घातला, तो त्यानी मान्य केला.
माझाही मुलगा एकुलता एक असल्याने सूनेला मला जे काही हौसेने करावयाचे ते केले [ज्याची मागणी कुणीच केली नव्हती].
मला वाटते हुंड्याच्या अनिष्ट प्रथेपेक्षा हे 'म्युच्युअल अंडरस्टॅन्डिग' स्वीकारायला हरकत नसावी.
बाकी ज्यानी हुंड्याच्या नावाखाली एक रुपयाही न देता विवाहकार्य संपन्न केले अशा वरील सर्व संबंधित सदस्यांचे अभिनंदन करणे जरूरीचे आहे.
अशोक पाटील
चला इथे असण्यांपैकी काही जण
चला इथे असण्यांपैकी काही जण तरी बोलले की त्यांनी हुंडा घेतला नाही आहे..
.
.
माझ्या वडीलांनी घेतलेला हुंडा .. माझी आजी खाष्ट होती. (ललिता पवार झक मारली तिच्यासमोर इतकी) त्यामुळे ते एक घटना घडली.. नानाजींनी कर्ज वगैरे काढुन हुंडा दिलेला. वडील समजुतदार होते पण आई पुढे काय चालत नव्हतेच. कोल्हापुरासारख्या ठिकाणी त्याकाळी ८०-८२ च्या काळात मुल बाहेर कितीही गोंधळ घालत असली तरी घरी आई-वडीलांसमोर सुतासारखी सरळ होतीत..अजुनी असतीलच .. लग्ना नंतर आईला थोडाफार त्रास आजी कडुन झालेला.. वडिलांची बदली होउ पर्यंत तरी ...पण त्यामुळे एक चांगले घडले की तो त्रास बघुन माझ्या काकांनी ,आत्यांनी आणि मामा , माउशींनी हुंडा दिलाच नाही व घेतला ही नाही.. सर्वांनी आपापल्या खर्चातुनच आपापली लग्ने उरकलीत..काका आणि मामा दोघांनी ही वेळ घेतला लग्न करायला. का तर खर्च आपापला व्हावा म्हणुन .. काकांनी प्रचंड धुमधडाक्यात केले..खर्च काकींनी आणि काकांनी अर्धा अर्धा केलेला..वडिलधार्यांकडुन एक ही पैसा घेतला नाही..फक्त मानपान करण्यासाठी जे काही भेटवस्तु एकमेकांना द्यायच्या होत्या तोच काय खर्च झाला.. तीच बाब मामा बाबतीत.. लग्न कोर्टात केले .. घरात वैदिक पध्दतीने फेरे घेतले..नंतर नातेवाईक मित्र मैत्रीनी यांना सरळ रिशेप्शन मधेच बोलावले... मुळात हुंडा घेतलेल्याचा जो त्रास झालेला तो इतर सगळ्यांनीच अनुभवला... त्यामुळे "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" हे वाक्यप्रचार माझ्या घरात पुरेपुर उपयोगात आले....
.
.
<<माबोवर तर हुंड्याचे समर्थन
<<माबोवर तर हुंड्याचे समर्थन करणारे लोक पण आहेतच.>> धन्य झालो ऐकून!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मीरा जोशी यांच्या पोस्ट कडे
मीरा जोशी यांच्या पोस्ट कडे दुर्लक्ष्य करा ...............................का हो किरण भाऊ ?
माझे मुद्दे चुकीचे आहेत का?
ही पोस्ट कितपत विषयाशी
ही पोस्ट कितपत विषयाशी संबंधित आहे माहित नाही
पण माझ्या ओळखिच्या एका ताईने रजिस्टर लग्न केले. आणि ज्या काही विधी होत्या त्या घरातल्या घरात केल्या.
त्यामुळे त्यांना जास्त काहीच खर्च आला नाही लग्नाचा.
त्या ताईला तीन बहिणी आहेत आणि त्या तिघींची ही लग्न अशीच झालियेत
काहीही खर्च नाही.
आणि मुख्य म्हणजे सासरकडच्यांनी काही मागितले ही नाही आणि अशा प्रकारच्या लग्नाला दोन्ही घरातुन प्रचंड सपोर्ट मिळाला.
त्यातुन जे पैसे वाचले त्याची त्यांनी एफ.डी केली. न जाणो उद्या गरज लागलीच तर म्हणुन.
हे असे लोक पाहिले की हुंडा घेणार्या लोकांबद्दल आश्चर्य ही वाटते आणि कीव ही येते
मीसुद्धा हुंडा घेतलेला
मीसुद्धा हुंडा घेतलेला नाही.
अर्थात, मी अजून लग्नसुद्धा केलेले नाहीये म्हणा.
मात्र माझे लग्न नोंदणी पद्धतीने होणार हे नक्की आहे. हुंडा वगैरे घेणार नाहीच. बाकीच्याही प्रथांना फाटा !
माबोकरांना बोलवेनच, रिसेप्शनला !
मात्र माझे लग्न नोंदणी
मात्र माझे लग्न नोंदणी पद्धतीने होणार हे नक्की आहे. हुंडा वगैरे घेणार नाहीच. बाकीच्याही प्रथांना फाटा !
माबोकरांना बोलवेनच, रिसेप्शनला >>>>>>>>>>>>.. पार्टीला खर्च कर पण..........
मात्र माझे लग्न नोंदणी
मात्र माझे लग्न नोंदणी पद्धतीने होणार हे नक्की आहे. हुंडा वगैरे घेणार नाहीच. बाकीच्याही प्रथांना फाटा !
माबोकरांना बोलवेनच, रिसेप्शनला !
>>>
थोडंस बदलुन मी हुंडा वैगेरे देणार नाही
बाकी संपुर्ण पोस्टला अनुमोदन.
>>मीसुद्धा हुंडा घेतलेला
>>मीसुद्धा हुंडा घेतलेला नाही.
अर्थात, मी अजून लग्नसुद्धा केलेले नाहीये म्हणा.<<
अहो तुम्ही कशाला हुंडा देताय ते पेक्षा तुमच्या कविता किंव्हा गझला ऐकवा सासरकडच्याना, ते स्वत:च म्हणतील बाबा रे हुंडा घे पण कविता आवर.......:स्मित:
आमची एक दाक्षिणात्य मैत्रिण.
आमची एक दाक्षिणात्य मैत्रिण. लग्न ठरले. दोघेही एवढे शिकलेले. पण तिकडच्या मागण्या ऐकून घेरी यायची एखाद्याला अशा. आम्ही म्हणू लागलो, कशाला करतेस लग्न याच्याशी? वगैरे... तर बर्याच वेळाने ती म्हणाली की मला लग्न करावे लागेल. मी मोठी, माझ्या तीन लहान बहिणी आहेत, आणि घरातूनच मला प्रचंड प्रेशर आहे.....
पार्टीला खर्च कर पण... हो हो,
पार्टीला खर्च कर पण...
हो हो, अवश्य.
केरळात लग्न म्हणजे भयंकर
केरळात लग्न म्हणजे भयंकर प्रकार असतो
माझ्या मैत्रिणीच्या लग्नात तिने बहुदा अख्खं सोनाराचं दुकानच अंगावर घातलं होतं.
तिच्या साडीचा रंग ही कळु नये इतकं अंगभर सोनं होतं
माझे मुद्दे चुकीचे आहेत
माझे मुद्दे चुकीचे आहेत का?
तुमचे मुद्दे चुकीचेच आहेत. लव जिहादला पोरी स्वतः होऊन मुसलमानांच्या बरोबर जातात.. आता कायद्याने यात करावे अशी तुमची अपेक्षा आहे ? उद्या म्हणाल विकत घेतलेला नारळ कुजका निघाला तरी सरकारनेच भरुन द्यायचा म्हणून..
मुसलमानांच्यात तलाकने विवाह मोडायची प्रथा आहे. हिंदुम्मध्ये तलाक नाही, याचा अर्थ सगळ्या हिंदु बायका सुखातच नांदत असतात असे नाही. मुसलमानांच्या पुस्तकातला तलाक तुम्हाला दिसला, पण त्यांच्या पुस्तकात हुंडा पद्धतीचा विरोध आहे, हे तुम्हाला कसे दिसले नाही? मुसलमानांच्यात सती प्रथा देखील नव्हती..
त्या मुसलमान मौलवी/ माणसाने हुंडा घेऊ नका असे सर्वानाच सांगितले आहे. चांगली गोष्ट फक्त हिंदुनी सांगितली तरच ऐकायची असा काही तुमचा हिंदुत्ववादी लोकांचा अजेंडा आहे काय?
तुमच्या मुद्द्यांमध्ये थोडा फार तथ्यांश असला तरी इथे ते मुद्दे अप्रस्तुतच आहेत. एकमेकांची उणीदुणीच काढायचीच तर दोन्ही बाजूने काढता येतील. तुमच्या मुद्द्याना स्वतंत्र बीबी काढा.
................................
आता ऐकूया राग भैरव.
मेरो अल्ला मेहेरबान
कोई बिगाड सकत नहीं तेरो
http://www.youtube.com/watch?v=CeT1H80tfP0
आमीर खानच्या कार्यक्रमात
आमीर खानच्या कार्यक्रमात उल्लेख आहे कि नाही माहित नाही पण सांगली मिरज कडे "यादी पे शादी" आणी बुद्ध पद्धतीचा विवाह अशा दोन छान प्रथा पाहिल्या.
उसगावातुन हा शो कुठे बघायचा ?
उसगावातुन हा शो कुठे बघायचा ? कार्यक्रमाच्या वेब साईट वरुन दिसत नाहीये.
i am proud to say - we are
i am proud to say - we are four sisters and my dad never paid a single penny as dowry in any marriage. All four sisters are happily married and after seeing this show would like to say that there are people who treat their daughter in laws as their own - i am quit hopeful the next generation will not face at least this issue - needless to say i am very very proud of my parents as well as all in-laws of all four sisters -
upbringing makes lot of difference. Keep spreading the good practices.
जुन्नरकडील बरीच लग्न पाहिली
जुन्नरकडील बरीच लग्न पाहिली आहेत तिथे मुलीला लग्नात अख्खा संसार देतात.. अगदी पाट, विळी पासून ए़कूण एक. आणि त्याला हुंडाही म्हणत नाहीत. रीतच आहे म्हणे ती. सोन नाणं देतात वेगळेच.
बरं पूर्वी होतं असे नाही अजूनही हेच चालू आहे दोन्ही मुलगा मुलगी उच्चविभूषित पण या देण्याघेण्याबाबत सामाजिक जागरुकता कधी येणार देव जाणे.
माझ्या मैत्रिणीच्या लग्नात तिने बहुदा अख्खं सोनाराचं दुकानच अंगावर घातलं होतं.तिच्या साडीचा रंग ही कळु नये इतकं अंगभर सोनं होतं>> ईतकंच कशाला एका माबोकरणीच्या लग्नात पण हेच चित्र पाहिलेले. सोन्याचे दर यांच्यामुळेच वाढतात यावर तिथे उपस्थित असणार्या ईतर सगळ्या माबोकरांचे एकमत झालेले
आमच्या परिचयातील स्नेह्यांच्या डॉक्टर मुलीला तिच्या हॉस्पिटलमधल्या एका वरिष्ठ डॉक्टराने मागणी घातली. हिला पण तो आवडलेला. एकूण प्रेमविवाह पण दोन्ही घरी सगळ्यांची परवानगी असल्यामुळे लग्नाची रीतसर बोलणी वगैरे झाली. मुलगी मराठी ब्राम्हण आणि मुलगा मारवाडी. मुलीने स्वःतच आणि चांगले स्थळ ठरवल्यामुळे मुलीचे आई वडिल खुष. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. जेव्हा लग्नाची बोलणी झाली ते ऐकून यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. लग्नाचा सगळा खर्च, बरेच तोळं सोनं, सासरकडून येणार्या प्रत्येक नातेवाईकाला ५ फळे, एक सोन किंवा चांदीचं नाणं, जवळ्च्या नातेवाईकाचा कपडे देऊन मानपान बरीच यादी होती. आधीच मुलीला डॉक्टर कर्ण्यात बराच खर्च झालेला.. त्यात हे आणि.. ह्यांनी मुलीला समजावयचा प्रयत्न केला की हे तू मुलाला समजावं किंवा आपण दुसर्या स्थळाचा विचार करु. पण प्रेमात पडलेली माणसं. काय करणार नं. मुलाने हात वर केले की लग्न तुझ्याशीच करायचय पण आई बाबा सांगताय्त त्यात काहीही लुडबूड करणार नाही. मग मुलीनेही गळा काढला आईबाबांच्या नावाने. झक्कत लग्न लावून द्यावे लागले त्यांना.. आमच्याकडे पत्रिका द्यायला आले तेव्हा आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली.. पोरीने धुतलं आम्हाला अगदी. मला त्या मुलीची कीव आली अगदी.
मी अविवाहित आहे. त्यामुळे
मी अविवाहित आहे. त्यामुळे हुंडा घेण्याचा प्रश्न नाही.
भावाने रजिस्टर लग्न केले , त्यामुळे हुंडा घेण्याचा प्रश्न नाही.
बहिणीच्या लग्नात लग्नाचा खर्च म्हणून ५० हजार दिले , १० हजार अंगठी साठी ,सर्व दागिने सासरच्यांनी घातले .बाकी हुंडा देण्याचा प्रश्न नाही.
आमीर खानच्या कार्यक्रमात
आमीर खानच्या कार्यक्रमात उल्लेख आहे कि नाही माहित नाही पण सांगली मिरज कडे "यादी पे शादी" आणी बुद्ध पद्धतीचा विवाह अशा दोन छान प्रथा पाहिल्या.<<<
हा विकु.. तो 'यादी पे शादी' चा संदर्भ अर्धवट आठवत होता. आमच्या ओळखीतल्या एकाचं लग्न तसं झालंय. तेव्हा त्याने एक्स्प्लेन केलं होतं. पण आता सगळे तपशील लक्षात नाहीत.
याद्या करायला म्हणून जमतात तेव्हाच लग्नाचे विधी उरकून घेतले जातात कारण दोन्हीकडची महत्वाची मंडळी हजर असतात. तेवढ्यांसाठीच लग्नाचं जेवण दिलं जातं आणि गावाला चिवडा-लाडूची पाकिटं दिली जातात जेवणाऐवजी.
असं काहीतरी आहे.
"यादी पे शादी" <<< किंवा
"यादी पे शादी" <<< किंवा "यादी की शादी" (याद्या झाल्या की त्याच मांडवात शादी.)
माझ्या एका बहिणीचं लग्न असं झालंय.
Pages