"सत्यमेव जयते" भाग ३ - (Marriage Or Marketplace?)

Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39

आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्‍या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..

सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या पोस्टस् वाचून लग्नाबद्दल (म्हणजे समारंभाबद्दल) तिडीक यायला लागली आहे.
भांडणे, खून, मारामार्‍या? असं मोठे, तरूण लोकच करायला लागले तर लहानांनीही मोठं होऊन हेच करायचं? माझ्या लग्नात आईबाबांचा आहेराचा अंदाज चुकला. म्हणजे लोकांनी महागाचे आहेर केले म्हणून त्यावरून धडा घेऊन आईबाबांनी दोन्ही भावांच्या लग्नात ना आहेर दिले, ना घेतले. दोन्ही भावांच्या लग्नात (वेगवेगळी झाली लग्ने) सकाळी ब्रेकफास्ट कमी पडले. कोणीही मारामार्‍या नाहीतच, साधा टोमणाही मारला नाही. ज्येष्ठांनीच या लहानसान गोष्टी सोडून दिल्या की झाले.
दोन्ही वहिन्यांच्या वडीलधार्‍यांना किती सोनं घालणार? हेही बाबांनी विचारलं नाही. आईबाबा काय दागिने करणार हे मात्र सांगितलं. त्यावरून ते प्रकार सोडून त्यांनी काही केले असावेत. मी सासरी गेलेली असल्याने नुसतं, सहज म्हणूनही विचारलं नाही की माझ्या आईबाबांनी काय केलं आणि वहिन्यांच्या माहेरहून काय आलं? प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखणे महत्वाचे.

गा.पै. तुमचं मत अजुनही कैच्याकैच आहे! हुंडापद्धती, लग्नांत होणारा अवास्तव खर्च यात भरडले जाणारे मुलीचे माता पिता यात मधेच स्त्रिचं माता.. मात्रुत्व वगैरे कुठून आलं? मातेच्या द्रूष्टीकोणातून तर तिला मान मिळणारच आहे, त्यापलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणुन तिचा काही विचार केला जातोय का हे महत्वाचे नाहि का?
एकाहून जास्त लोक तुमचं मत खोडुन काढतायत तर तिथे खोडुन काढणार्यांना परत काहीतरी लिहुन बुचकळ्यात पाडण्यापेक्षा आपलं मत तपासून बघीतलं तर बरं होईल असं का नाही वाटत?
परत प्रदर्शन म्हणजे कितपत अंग्-प्रदर्शन करणं म्हणजे योग्य (तुमच्या मते) आणि कितपत योग्य नाही अशी काही सर्वांग व्याख्या बीख्या आहे की काय Uhoh
शो मधे रानी त्रिपाठी पण स्लिवलेस घालून आली होती, तिच्या नावानी बोंब उठवायची की तिनी कमी कपडे घातलेत की तिच्या धैर्याला दाद द्यायची ते ज्याने त्याने ठरवायचे. रानीनी या शो मध्येच म्हटले, मेरा बदन है, मुझे पता है क्या पेहेनना है और कैसे पेहेनना है. खुपच आवडलं मला हे उत्तर Happy

aashu29,

१.
>> त्यापलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणुन तिचा काही विचार केला जातोय का हे महत्वाचे नाहि का?

हे तुम्हाला आम्हाला पटतंय. पण लोकांना कोण सांगणार?

२.
>> डापद्धती, लग्नांत होणारा अवास्तव खर्च यात भरडले जाणारे मुलीचे माता पिता यात मधेच स्त्रिचं
>> माता.. मात्रुत्व वगैरे कुठून आलं?

जर मुलाच्या मातांनी हुंडा घेऊन मुलाला विकणार नाही असं ठरवलं तर हुंड्याची चाल रात्रभरात बंद पडेल. अतिशयोक्ती सोडून द्या, पण जर मुलाकडच्या स्त्रियांनी हुंड्याला विरोध केला तर बरंच बरं पडेल.

जी बाई स्वत: एक आई आहे, टी भावी आईची परवड निश्चितच थांबवू शकते. निदान प्रामाणिक प्रयत्न तरी करू शकते. मात्र त्यासाठी मातृत्वाचा संकुचित अर्थ लावता कामा नये.

३.
>> एकाहून जास्त लोक तुमचं मत खोडुन काढतायत तर तिथे खोडुन काढणार्यांना परत काहीतरी लिहुन
>> बुचकळ्यात पाडण्यापेक्षा आपलं मत तपासून बघीतलं तर बरं होईल असं का नाही वाटत?

नाही वाटंत. कारण माझं मत वाचून बुचकळ्यात पडण्यासारखं आहे तरी काय त्यात? अर्थात माझं मत मान्य करायची सक्ती कोणावरच नाही! Happy

माझे विचार स्पष्ट मात्र जरूर करेन.

४.
>> तिच्या नावानी बोंब उठवायची की तिनी कमी कपडे घातलेत की तिच्या धैर्याला दाद द्यायची ते
>> ज्याने त्याने ठरवायचे.

अगदी बरोबर. मी कार्यक्रम पहिला नाही. त्रिपाठी बाईंनी सभ्य कपडे घातले असावेत असे वाटते.

तसं बघायला गेलं तर रामायणकाळी बायका कंचुकी घालत नसंत. थेट उत्तरीय लपेटीत. म्हणून आजही तेच करावं का? त्याकाळी लोकांचा इंद्रियांवर संयम असे. आज तसा आहे का? बाहेर लोक कसे आहेत त्याप्रमाणे वेशभूषा ठेवावी;

आ.न.,
-गा.पै.

@गामा-

त्याकाळी लोकांचा इंद्रियांवर संयम असे. आज तसा आहे का?
हम्म..
इन्द्रापासून रावणापर्यंत आणि ययातिपासून विश्वामित्रापर्यंत संयमी पुरूषांच्या कथांनी आमचा इतिहास भरलेला आहेच. Happy
अशी जनरलायजेशन्स करू नयेत. चांगली- वाईट माणसे सर्व काळात असतात.

बाहेर लोक कसे आहेत त्याप्रमाणे वेशभूषा ठेवावी

या लॉजिकने बुरख्यापासून चॅस्टिटी बेल्टपर्यंत कशाचेही समर्थन करता येईल.

बाकी पुरूषांना जर सदासर्वकाळ 'पिता' (वडील हा अर्थ घेणे ;)) राहणे शक्य नसेल, तर स्त्रीने 'माता' रोलमध्ये का रहावे? असा प्रश्न पडला.

तुमची मते मात्र मांडत रहा, ही विनंती. कारण इतरांनी केलेले त्यांचे प्रतिवाद वाचतांना अनेक कुंपणावरच्यांचे आपोआपच प्रबोधन होते आहे. Happy

ज्ञानेश,

१.
>> इन्द्रापासून रावणापर्यंत आणि ययातिपासून विश्वामित्रापर्यंत संयमी पुरूषांच्या कथांनी आमचा इतिहास
>> भरलेला आहेच. Happy

असेलही. पण त्यातल्या कुठल्या भागाचा आजच्या स्त्रील उपयोग होईल ते स्पष्ट केलंय.

२.
>> अशी जनरलायजेशन्स करू नयेत. चांगली- वाईट माणसे सर्व काळात असतात.

बरोबर आहे. रामायणकाळ केवळ उदाहरणासाठी दिला आहे. तुलनेसाठी आजची स्त्री दुसरा कोणताही काळ घेऊ शकते.

३.
>> या लॉजिकने बुरख्यापासून चॅस्टिटी बेल्टपर्यंत कशाचेही समर्थन करता येईल.

येईलही कदाचित. पण उपरोक्त सल्ला स्त्रीसाठी आहे. कारण बायकांना आपापल्या स्त्रीत्वाची उपजत जाणीव असते.

हवे ते कपडे घालणे आणि नको ते कपडे घालणे या दोघांत फिकट सीमारेषा आहे. ती निश्चित करणं स्त्रीलाच जमू शकतं हा मथितार्थ! Happy

४.
>> बाकी पुरूषांना जर सदासर्वकाळ 'पिता' (वडील हा अर्थ घेणे ;-)) राहणे शक्य नसेल, तर स्त्रीने 'माता'
>> रोलमध्ये का रहावे? असा प्रश्न पडला.

पुरूष सदासर्वकाळ पित्याच्या भूमिकेत नसतो हे एका अर्थी बरंय. कारण स्त्री माता म्हणून धरली तर पुरुषाची पूरक भूमिका पुत्र होते.

आ.न.,
-गा.पै.

>>रामायणकाळी बायका कंचुकी घालत नसंत.
सीतेला कांचनमृग कशासाठी हवा होता मग? Happy

मला वाटते, भारतासारख्या उष्ण कटिबंधातल्या देशात थोडेच कपडे वापरावेत. कपड्यांचे प्रमाण हवामानाप्रमाणे असावे.
अजिबात कपडे न घालणार्‍या टोळ्यांमध्ये स्त्रीला आदर न मिळण्याची समस्या अजिबात नसते. (विविध प्रदेशातील - उदा अंदमान, दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी टोळ्यांविषयी बघितलेले कार्यक्रम, वाचलेली पुस्तके यावरून हे विधान केले आहे.) भारतात पुष्कळ कपडे घालण्याची प्रथा इस्लामी आक्रमणानंतर आली हे सिद्ध झालेले आहे.

दुसरे म्हणजे इंग्लंडातील स्त्रियांविषयी -
मी गेली ९ वर्षे इंग्लंडात रहाते आहे. लग्नाविषयी इथे काही विशेष समस्या आहे असे दिसलेले नाही. दहावी / बारावी झाल्या झाल्या मूल होऊ देणे ही एक समस्या आहे. त्याचे मूळ कारण म्हणजे मूल असले की त्याला सांभाळण्याचा भत्ता मिळतो. त्यामुळे वरखर्चासाठी मूल अशी एक विचारसरणी येऊ पहात होती. लग्न जमवण्याचे काम हल्ली इंटरनेटातून होते. तसेच लग्नेच्छुक मुलामुलींचे मेळावे होत असतात. माझ्या ओळखीतल्या अनेकांची लग्ने अश्या मेळाव्यातून झाली आहेत.
इथे मुलगे आणि मुली दोन्ही हवीहवीशी असतात कारण मुलगा नाव चालवतो आणि सहसा मुलगी म्हातारपणी आईबापांना बघते. सुनेशी पटवून घेण्यापेक्षा मुलीशी पटवून घेणे सोपे जाते.

स्त्रीला आदर मिळण्यासाठी प्रत्येकीने स्वतःपासून आणि स्वतःच्या मुलांपासून सुरुवात करायला हवी. मला वाटते, गेल्या दोनेकशे वर्षात पुष्कळ प्रगती झाली आहे.

मृदुला,

>> सीतेला कांचनमृग कशासाठी हवा होता मग?

खरं सांगू? मलाही माहीत नाही. Proud स्त्रीच्या मनाचा थांग लागणं प्रत्यक्ष परमात्म्याच्या अवतारालाही....! जाउद्यात! Wink

बाकी, इंग्लंडमधल्या अपत्यपसंतीविषयीचं आपलं निरीक्षण एकदम योग्य आहे. पण पुरुषांचा कल कौटुंबिक जबाबदार्‍या टाळण्याकडे अधिक झुकला आहे. ही चिंतेची बाब अहे.

आ.न.,
-गा.पै.

दुस-या एका धाग्यावर आता धागा रूळावर आणायला हवा असं कुणीतरी म्हटलंय. कोण बरं ते ? अं अं अं..... कालचीच गोष्ट आहे. पण जाम आठवेनासं झालंय Wink

कोकणात हुंडा हा प्रकारच मुळात नाही, लग्नाचा खर्च ज्याने त्याने आपआपल्या कडचा स्वत: करायचा. मुलीच्या दाग-दागिनेही मुलानकडच्यानीच करायचे>> बर्‍याच जणांनी हे लिहीलेले वाचले. मी सुद्धा कोंकणातीलच आहे खुद्द कोंकण नव्हे, रायगड जिल्ह्यातील. आणि सासर कुडाळ येथे. आमचे लव्ह मॅरेज. बैठकीत ठरले होते अर्धा अर्धा खर्च करायचा. साखरपुडा लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाच्याच गावी झाला त्याचा सर्व खर्च मुलीकडच्यांनी करायचा. लग्नाला येणार्‍या मुलीकडच्या पाहुण्यांचा ३दिवस राहायचा, खायचा, प्यायचा खर्च मुलीकडच्यांनी करायचा.सगळ्याला मान्यता दिली. त्यानंतर दगिने-साड्या खरेदी झाल्यावर पहीली पत्रीका देवाला ठेऊन झाल्यावर दुसरी पत्रिका देण्यासाठी आई-बाबा सासरी गेलेले तेव्हा "मुलीला काय काय दागिने केलेत? बांगड्या का नाही केल्यात? सालंकृत कन्यादानाचा अर्थ समजतो काय? किती तोळ्याचे दागिने केलेत? मुलीसाठी असा खर्चच काय केलात्? घाटावर जशा याद्या फाडतात तशा याद्या फाडाव्या काय? (म्हणजे काय ते समजले नाही... माहीतगारांनी प्रकाश टाकावा), आम्ही मुलासाठी चेन वगैरे मागतोय का?" असे प्रश्न काढून खूप भांडण झाले होते. मला समजल्यावर मी सांगितलं लव्ह मॅरेज असून या मागण्या करणार असतील तर मला लग्न नाही करायचं. माझं स्त्रीधन आहे ते काय व किती असेल ते मी व माझे पालक बघून घेऊ. त्यांनी मला एवढं शिकवलं आहे की आज मी प्रत्येक महीन्याला एक तोळा सोनं घेऊ शकते... ठणकाऊन सांगितल्यावर आजपर्यंत विषय निघाला नाही... Happy

(विशेष नोंदः जातीबाहेरचं लग्न असल्यामुळे आधी लग्नाला सासू सासर्‍यांचा कडवा विरोध होता. सासू बी ए ऑनर्स आहे, सासरे हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून रिटायर झाले...)

मला केलेले सर्व दागिने, माझ्या वडीलांनी केले. बांगड्या सोडून, कारण तेव्हढे त्यांना परवडले नाही, सोन्याचा भाव फार वाढला होता.
मुलाकडून मला मंगळसूत्र(त्यातल्याही दोन वाट्या व मणी माहेरचा असतो), मुहूर्तमणी, व साखरपुड्याची अंगठी इतकेच दागिने केले गेले. मला अपेक्षा नव्हती, नाहीये कारण मुळात दागिन्यांचा सोस नाहीये. पण इथे प्रत्येकाने आवर्जून लिहिलंय, की कोंकणात मुलाकडचे मुलीला सगळे दागिने करतात, मुलीच्या आईवडीलांना जे द्यायचेय ते देऊ शकतात, मला आलेला अनुभव विरूद्ध होता म्हणून आश्चर्य वाटलं आणि वाईटही! कारण हे विचारून बोलून माझ्या सासरच्यांनी माझ्या शिक्षणाची किंमत शून्य करून टाकली Sad
याचा अर्थ कोंकणातील सर्वच जण असे मागण्या वगैरे करतात असं मला म्हणायचं नाहीये. हा मला आलेला अनुभव!

खूप हळहळतेय आता, रजिस्टर लग्नासाठी अडून बसायला पाहीजे होतं, पण लग्नाला परवानगी घेऊन उपकृत झाल्यासारखं वाटत होतं त्यात अडून बसणं वगैरे म्हणजे... Sad

<<की आज मी प्रत्येक महीन्याला एक तोळा सोनं घेऊ शकते..>> गंमत अशी आहे की मुलगी लाखोनी कमवत असेल तरी त्याचा उल्लेखसुद्धा करणे पाप ( उद्धटपणाचे ) ठरते. माहेरून कीती काय मिळाले हे महत्वाचे.

गंमत अशी आहे की मुलगी लाखोनी कमवत असेल तरी त्याचा उल्लेखसुद्धा करणे पाप ( उद्धटपणाचे ) ठरते. माहेरून कीती काय मिळाले हे महत्वाचे.>> अगदी Sad

पण मी केला तो उद्धटपणा! लव्हमॅरेज असून केला... फार तर काय प्रेम केलेला साथीदार मिळाला नसता... पण आईबाबांना धुपवून, त्यांचा असा कायम अपमान होणार असेल तर काय करायचा आहे प्रेमाचा साथीदार नी असलं कोडगं सासर??? Angry

आज मी माझ्या शिक्षणाचा माज करून हा विचार तरी करू शकले, पण बर्‍याच जणींना हीही संधी मिळत नाही अजुनही दुर्दैवाने!

डेलिया,

>> माहेरून कीती काय मिळाले हे महत्वाचे.

एका शब्दात वर्णन करायचं झालं तर भिकारीपणा यालाच म्हणतात. काय करणार, दळभद्रीपणा केल्याशिवाय चैन पडत नाही.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.

"एका शब्दात वर्णन करायचं झालं तर भिकारीपणा यालाच म्हणतात."

~ खरंय. आणि यातही दुर्दैवाची बाब अशी आहे की, सासर कितीही गर्भश्रीमंत असो, सर्वप्रकारच्या सोयीनी घर बंगला दुथडी भरून वाहत असला तरी लग्नानंतर घरी येणार्‍या पैपाहुण्यातील बायकाच "नवीन नवरीच्या घरातून काय काय आले वो...." असं अगदी मानभावीपणाच्या सूरात विचारतात, आणि मग ही सासू ललिता पवार आणि नणंद शशीकला....तुच्छतेने त्या रुखवताच्या सामानाकडे बोट दाखवून नव्या सुनेला ऐकू जाईल अशा आवाजात उत्तर देतात, "ते काय देणार आमच्या इभ्रतील साजेसं ? दिलयं बघा की ते कोपर्‍यात ठेवल्यालं !"

विशेष म्हणजे पुरुषवर्गाला अशा बाबतीत जवळपास शून्य गम्य असते, पण मुलीची या प्रश्नावरून मानहानी करणार्‍या स्त्रियाच असतात हे मी नोंदविले आहे.

अशोक पाटील

ड्रीमगर्ल, उच्चशिक्षित सासुसासर्‍यांचे असे वागणे कधीही निषेध करण्याजोगे ठरेल.

घाटावर साखरपुड्याला याद्या केल्या जातात, त्यात मुलीला काय काय देणार, मानपान कुणाला द्यायचा असे
चक्क लिहूनच काढतात. त्यावर उपस्थित लोकांच्या सह्यादेखील होतात.

आताआता पर्यंत हि प्रथा होती.

ड्रीमगर्ल व इतर, या उदाहरणावरुन हे देखिल सुनिश्चित होते आहे, जे माझ्या नजरेत असुनही मान्डायचे राहून गेले होते की,
एखादा ठरत असलेल्या विवाह मोडायचा असल्यासही अवास्तव मागण्यान्चे हत्त्यार मुलाचे आईबाप/वा नातेवाईक यान्चेकडून वापरले जाऊ शकते. प्रत्यक्षात वाकुडपणा तर घ्यायचा नाहीये, पण लग्न तर मोडायचे आहेच अशा वेळेस अवास्तव मागण्या हा जालिम उपाय ठरतो. बर तर बर, अत्यन्त महत्वाचे लक्षात ठेवलेच पाहिजे म्हणजे की यात, केवळ आईबापान्चाच "मुलाचे भल्याबाबतचा" इन्टरेस्ट असतो असे नाही, तर मुलगा व त्याचे आईवडील यान्चे "वाईटावर" असलेले सख्खे नातेवाईक देखिल आधीच आई/बाप यान्चे डोक्यात भरवुन वा बैठकीत असले भरमसाठ मागण्यान्चे मुद्दे काढून कोलदान्डा घालू पहात असतात असा अनुभव आहे. त्यातुनही लग्न ठरलेच, तर ऐन लग्नात निरनिराळ्या कारणान्नी गोन्धळ घालुन मुलगा व त्याचे आईबापान्वर सूड उगविणारे नातेवाईकही काही कमी नसतात.

मुलिचे आईबापाचे बाबतीत वाईट गोष्ट अशी की त्यास त्यान्चे सख्खे पण सूडबुद्धिने प्रेरित नातेवाईक अधिक वरपक्षाकडील सुडी नातेवाईक अशा दोहोन्चा सामना करावा लागतो. Happy
वरील प्रेमविवाहाचे केस मधे या बाबी देखिल तपासुन घ्याव्या लागतील.

>>> दिलयं बघा की ते कोपर्‍यात ठेवल्यालं !" <<<< Lol
अशोकभौ, अन हे जेव्हा अती होत, अन पोरगी खमकी असेल तर ती सास्वेपुढे दोन्ही हाताचे उताणे पन्जे नाचवित ओवाळीत ठणकावते, की येवढ देऊनही अमकतमक ठोम्बं माझ्या पदरात पडलय! Proud
या सन्वादात आपण पडणे केव्हाही इष्ट नस्ते! Wink
दिनेशभौ, प्रथा अजुनही आहे याद्यान्ची, पण बर्‍याच मोठ्या प्रमाणात कमी झालीये. गावाकडे अजुनही ही पद्धत आहे. लिम्बीच्या नि माझ्या लग्नात बैठकीत याद्यान्चा विषय आल्यावर मी "झुरळ झटकल्याप्रमाणे" झटकला होता, नुस्ते अमक्या तमक्याच्या मुलीशी तमक्याफमक्याच्या मुलाचे लग्न अमुक तारखेला/पर्यन्त ठरतय्/केल जातय, मानपान ज्याच्यात्याने वगैरे मोजकाच मजकुर टाकुन हळदकुन्कुगन्ध लावुन त्या कागदाच्या एकेक प्रति दोघान्कडे दिल्या! मी "रजिस्टर पद्धतीनेच्या" बाजुने नसल्याने, मात्र घरातल्या घरात सर्व धार्मिक विधी योग्य प्रकारे सुयोग्य मन्त्रोच्चारान्सहित करुन ब्राह्मणान्ना व्यवस्थित दक्षिणा देऊन लग्न उरकण्याच्या मताचा असल्याने ते रेटायचा प्रयत्न मात्र "मुलिकडच्यान्नीच" कार्यालयात लग्न लावुन हाणून पाडला. असो.

"आताआता पर्यंत हि प्रथा होती....."

~ दिनेश.....अहो आजही ही प्रथा कोल्हापुरात आहेच आहे, आणि फार गाजावाजा करत, अगदी व्हिडिओ शूटिंग करत हा 'याद्या' करणे प्रकार चालू असतो. मेहता आणि कंपनी, पटेल पेपर मार्ट, महाद्वार रोड, इथे तर लग्नाच्या सीझनमध्ये अशा 'प्री-प्रिन्टेड याद्या' घेण्यार्‍यांची तुंबळ गर्दी असते. फक्त "फिल इन द ब्लॅन्क....' भरावे लागते.

गेल्या महिन्यातच मी माझ्या भाचीच्या लग्नाच्या याद्या केल्या....ज्या मी स्वतः लिहिल्या....म्हणजे भटजी समोर बसलेले असतात....मामा या नात्याने मी यादी लिहिणारा....तर त्या यादीत जे लिहिले जात आहे त्यावर "नजर" ठेवण्यासाठी मुलाचा चुलता शेजारी बसला होता. लिखाई झाल्यावर मग भटजीकडून (त्रयस्थ या नात्याने) उपस्थितांना ते सविस्तर वाचून दाखविले जाते. ऐकणारी मंडळी दोन्ही बाजूची असतात. "वरपक्षाकडून वधुपक्षास" आणि 'वधुपक्षाकडून वरपक्षास" असे दोन स्वतंत्र रकाने असतात व तो भाग एकमेकाच्या संमतीने भरला जातो.

मग या "याद्यां" चे दोन सेट करण्यात येतात....त्यावर दोन्ही पक्षांकडून प्रत्यकी पाच याप्रमाणे ज्येष्ठांच्या सह्या घेतल्या जातात व ह्या सह्यांवर दस्तूर म्हणून खुद्द भटजी सही करतात व त्या नारळ कापडासह व्याही एकमेकाला देतात.....त्याचेही फोटो काढले जातात.

हल्ली याद्यात देण्याघेण्याच्या बाबी अगदी सखोलपणे लिहिल्या जात नाही....फक्त "एकमेकाच्या समजुतीप्रमाणे मानपान...' इतके मोघम असते. असे असले तरी ही 'समजूत' ची व्याख्या काय असते त्याचा हिसका नंतर हळुहळू जाणवायला लागतो.

अशोक पाटील

अशोक आणि लिंबू, हे प्रकार साधारण आहे रे वर्गातच जास्त आहेत, असे नाही वाटत ?

मुंबईला, दादरला वीर कोतवाल उद्यान नावाची एक बाग आहे. ती बाग लग्नाची बोलणी करायची जाग म्हणून
प्रसिद्ध होती. साधारणपणे कामगार वर्गातील माणसे या बागेचा उपयोग करत. दोन्ही कडची मंडळी तिथे जमत
आणि मुलगा, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम तिथेच पार पडत असे. पसंती झाली कि तिथल्या तिथे मुलीला
साडी आणि पेढ्याचा पुडा देत असत (हि दोन्ही दुकाने, जवळपासच आहेत.) बोलणी फिसकटली, तर दोन्ही पार्ट्या आपापल्या वाटेने जात असत. ज्यांची घरे लहान आहेत, परिस्थिती बेताची आहे, त्यांच्यासाठी हि व्यवस्था चांगली होती.

>>> अशोक आणि लिंबू, हे प्रकार साधारण आहे रे वर्गातच जास्त आहेत, असे नाही वाटत ? <<<
नाही! असे वाटत नाही म्हणण्यापेक्षा "अनुभवातच नाही"
जसाच्यातस्सा याद्यान्चा तपशील आहेरे अन नाहीरे वर्गामधे भिन्नभिन्नच अस्तो, पण पोरीच्या बापाकडूनची वसूली, ज्याचे त्याचे जीवनमानाप्रमाणे, आवडीनिवडीलायकीप्रमाने केलीच केली जाते. Happy मग तो झोपडपट्टीत रहाणारा असो वा कोरेगावपार्क/कल्याणीनगरात! एखाददुसर्‍या शहरातील एखाददुसरी सदाशिवनारायणपेठ अपवाद ठरते, पण अपवादाचे अपवादात्मकपण सिद्ध करण्यापुरतेच.

एकेक खर्चाची बाब वाढत चालली.
साखरपुड्याला तर पुर्वी, नवरा मुलगा जातही नसे.
मेंदी, चप्पल लपवणे, गाणीबजावणी, फुलांची सजावट, आता देशोदेशीचे जेवण, गुलाबपाण्याचा पंखा, बर्फाचे
कोरीवकाम हे सगळे गेल्या काही वर्षातलेच. त्यामानाने होम, सप्तपदी हे विधीच केविलवाणे ठरलेत.

दिनेश आणि लिम्बू.....

~ या क्षणी माझ्या टेबलवर मराठी, कन्नड आणि इंग्रजी या तीन भाषांतील तीन वेगवेगळ्या रंगाच्या देखण्या कव्हरसहीत तीन पत्रिका आहेत....आणि ह्या लग्नपत्रिका नसून "साखरपुडा समारंभा" च्या आहेत याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल....प्रत्येक पत्रिका किमान दहा ते पंधरा रुपये किंमतीची असावी हे पाहताक्षणीच समजून येते (कदाचित जास्तच असेल). साखरपुडा आहे हुबळी (कर्नाटक) इथे....तर लग्न वरपक्षाकडे असल्याने ते होईल इचलकरंजीत.

हुबळीकरांची ही एकुलती एक मुलगी असल्याने "हौस" सदराखाली केवळ साखरपुड्याला सुमारे एक हजार लोकांच्या साग्रसंगीत जेवणाची व्यवस्था तर केली गेलीच आहे शिवाय कोल्हापूर आणि इचलकरंजीतून हुबळीला येणार्‍यांसाठी कोंडुसकर ट्रॅव्हल्सच्या खास गाड्या रिझर्व्ह. प्रत्यक्ष साखरपुडा हॉल येथील (होय, त्यासाठीही जवळपास ६० हजार रुपये भाड्याचा हॉलही बूक केला गेला आहे....) नखरे वेगळेच असणार.

असा 'रुबाब' दाखविणार्‍याला काही बोल लावायचे म्हटले तर ऐकणारा मलाच उलटे सुनावतो, "अहो पाटीलसर, तुम्ही कशाला वैताग करून घेताय. आहे त्याना हौस, तर करू देत ना ! तुमचं त्यात काय जातयं ?"

या प्रश्नाला पाटीलसरांकडे अर्थातच उत्तर असत नाही.

अशोक पाटील

अशोकजी तुमच्या वरील पोस्टवरून एक प्रश्न असा पडतो..की ह्या लोकांकडे काळा पैसा असतो का? घामाघूम होउन, दात-ओठ खाऊन ८:३२ ची लोकल पकडणारी लोक असा माज दाखवतात का?

तर मुलगा व त्याचे आईवडील यान्चे "वाईटावर" असलेले सख्खे नातेवाईक देखिल आधीच आई/बाप यान्चे डोक्यात भरवुन वा बैठकीत असले भरमसाठ मागण्यान्चे मुद्दे काढून कोलदान्डा घालू पहात असतात असा अनुभव आहे. >> लिम्बू अगदी अगदी! याचा सूत्रधार गेले तीन वर्ष शोधतेय, पण सगळेच चंदेरी मुलाम्याखालचा खवट खवा आहेत, खाऊन, पोट बिघडवून घेतल्याशिवाय असलीयत समजणार नाही! अर्थात जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत हरकत नाही. काये लग्नाळू मुलगी मांजरीप्रमाणे असावी... एरवी गरीब म्याव असली तरी उंचावरून पडल्यावर चारी पायांवर नीट सावरून उभी राहणारी, हवे तेव्हा नख्या काढणारी!! Happy

मुलिचे आईबापाचे बाबतीत वाईट गोष्ट अशी की त्यास त्यान्चे सख्खे पण सूडबुद्धिने प्रेरित नातेवाईक अधिक वरपक्षाकडील सुडी नातेवाईक अशा दोहोन्चा सामना करावा लागतो.>> हो हे मात्र झालंच! नवरा कित्तीही चांगला असला तरी मनात डोकावून जातंच की जातीत लग्न केलं असतं तर आईवडीलांना मानानं वागवलं असतं... कारण आमच्याकडे हूंडयाचं प्रमाण नगण्य आहे... Sad

ओह दिनेशदा ते याद्या प्रकरण अस्स असतं होय, म्हणजे बैठक फिसकटली तर याद्या फाडतात वगैरे! हे माहीत नव्हतं!

अशोक, तुम्ही लिहीले आहे तशी लग्ने; अगदी माझ्या शिक्षक मित्रांचीही, पाहिली आहेत त्यामुळे शब्द न शब्द पटला.
'मुलगाच हवा' हा हट्ट, असल्या कारणांनीही वाढत असणार.

काल क्राईमपेट्रोलमध्ये हुंडाबळीची केस दाखवलेली.

हुंड्यावर बंदी म्हणून परवा मीरारोडमध्ये १४ मुस्लीम जोडप्यांचा सामुहिक विवाह साजरा केला गेला.

कल्पू आणि नंदिनी ~

माझी या संदर्भातील निरीक्षणे असेही दाखवितात की केवळ शहरी भागातील उद्योगधंद्याशी निगडीत, राजकारणी, तसेच उच्चपदस्थ अधिकारी लोकच (ज्यांच्याकडे काळा पैसा असण्याची दाट शक्यता असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते) लग्नात असा अव्वाच्या सव्वा खर्च करतात असे नसून ग्रामीण भागात [विशेषतः आमच्या कोल्हापूरात] उसाच्या, दूधाच्य पैशाने अचानक आलेल्या गब्बर सूजीमुळेही गावात आयता रुबाब दाखविण्याची संधी म्हणूनही असा वारेमाप खर्च करायला धडपडतात. या वर्गाकडे असलेला पैसा हा व्हाईट मनी सदरात मोडतो, पण गावात बंगला झाला, अगदी होंडा सिटी गाड्या दारात लागल्या, तिन्ही पोरांना ते म्हणतील त्या प्रकारच्या चैनीसाठी पतपुरवठा केला, ट्रकट्रॅक्टर्स घेतले....मग आता मुलीचे लग्न आले....दाखवू व्याह्याकडील मंडळीना की देशमुखांकडे कसली गंगा वाहते आहे ते !!

मग याच मनोवृत्तीतून असे खर्च करण्यात अहमहमिका लागते.....फटाके, आतषबाजी, मुंबईचा बॅण्ड, नृत्ये आदी प्रकार तर इतका बोकाळला आहे की त्या रात्री माझा मुक्काम जर त्याच गावात असेल तर मध्यरात्रीनंतरही चाललेल्या त्या धमाक्यामुळे झोपेचे खोबरे होणार याची बालंबाल खात्री पटते.

अशोक पाटील

मी तर कोकणातीलच एका शेजारच्या मुलीच्या लग्न ठरवताना गोष्टी एकल्या होत्या की,
ठरवायला गेलेल होते मुलाच्या घरी. लव मॅरेज बर कां... (प्रेम विवाहात ह्या ठरवायच्या, मानापमानाच्या गोष्टी कशा काय येतात कळत नाही. मुलगा आई बापाची आधी परवानगी घेत नाही मग नंतर आई बापाचे हे चाळे( ठरवाठरवी, मानपमान) कसे बघून गप्प रहातो कळत नाही; हे कोणाला उद्देशून नाही. पण असल्या ठिम मुलाशी लग्न करण्यापेक्षा न झालेले बरे.)
असो.

तर त्या प्रकारात पण असेच प्रश्ण एकले होते, किते काय घालणार? आम्ही मानपमान करत नाही म्हणत ह्याला अहेर, त्याला आहेर वगैरे होते. मुलीने लग्न केले पण रोजचे भांडत होती मुलाशी तुझे आई वडिल असे वागले, तसे वागले. काय अर्थ आहे शेवटी लग्न करून... काय होणार शेवटी दोन वर्षात डिवोर्स... मग मुलानेच मुलगीच वाईट म्हणून पसरवले कारण ते सोपे पडते सर्वांना.. Sad

---------------------------------
आजच शेवटी हा ३रा भाग पाहिला. कोमल मुलीचे कमालीचे आश्रर्य वाटले.. का ह्या मुली गप्प बसतात? शिकलेल्या असून सुद्धा?( ती ईंग्लिश बोलत होती त्या वरून...)

Pages