"सत्यमेव जयते" भाग ३ - (Marriage Or Marketplace?)

Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39

आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्‍या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..

सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेम विवाहात ह्या ठरवायच्या, मानापमानाच्या गोष्टी कशा काय येतात कळत नाही.>> विवाह कुठलाही असला तरी वरमाय ही एक गोष्ट जिथे कॉमन आहे तिथे बहुतकरून या गोष्टी येतातच. Happy

ज्यांच्या लग्नात हुंडा देणे /घेणे झाले आहे, किन्वा लग्नावर प्रमाणबाहेर जास्त खर्च जबदस्तीने झाला आहे त्यांच्या साठी disaster recovery plan :

1. त्या मुली जर नोकरी करणार्‍या असतील तर त्यांनी आपल्या मिळकतीतून आई वडीलांना जमेल तसे हप्ता हप्त्याने तरी सर्व रक्कम परत करून टाकावी.
अशी उघडपणे देता येत नसेल तर काहीतरी निमित्ते काढून द्यावी. सासरच्यांना बोंबलायचे असेल तर बोंबलू द्यावे.

2. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांच्या लग्नात हुन्डा मागून घेतला गेला आहे अशा मुलींनी एकत्र कुटुम्बात अजीबात राहू नये. लवकरात लवकर वेगळे बिर्‍हाड थाटावे. ते सुद्धा माहेरच्या घराजवऴ किन्वा आपल्या एखाद्या चांगल्या नातेवाईकाच्या घराजवळ असावे. हे त्यांच्या शारिरीक व मानसिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.

3. नोकरी करत नसतील तर ती मिळवण्याचा किन्वा आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा मार्ग शोधून काढावा. व लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवावे.

४. लग्नानंतर कमीत कमी २-३ वर्षे तरी मूल होऊ देऊ नये. घरातल्या वातावरणाचा अंदाज घ्यावा. तसेच स्वतःचे काही पैसे गाठीला बांधावे. नवर्‍याची खात्री वाटत असेल तरच मुलाचा विचार करावा. कारण मुलाच्या निमित्ताने परत माहेरून पैशांची मागणी होऊ शकते.

५. आपल्या आयुष्यात आपण 'स्वतः' शिवाय इतर कोणतीही व्यक्ती महत्वाची नाही हे लक्षात ठेवावे. स्वतःचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य जपावे. आपल्या आई वडीलांनी आपल्याला वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत तेव्हा इतर कोणासाठी नसेल पण त्यांच्यासाठी तरी आपला जीव लाख मोलाचा आहे हे सतत ध्यानात ठेवावे.

५. आपल्या आयुष्यात आपण 'स्वतः' शिवाय इतर कोणतीही व्यक्ती महत्वाची नाही हे लक्षात ठेवावे. स्वतःचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य जपावे. आपल्या आई वडीलांनी आपल्याला वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत तेव्हा इतर कोणासाठी नसेल पण त्यांच्यासाठी तरी आपला जीव लाख मोलाचा आहे हे सतत ध्यानात ठेवावे.>>>>>>>>> लाखमोलाचं वाक्य. जियो Happy
आमिर खानच्या कार्यक्रमाचा समाजावर खुप परिणाम झाला समाजावर दोन उदाहरणं.
१) एका कामवालीने आपल्या मुलीचे लग्न हुंडा मागतायत म्हणून मोडलं.
२) अजून एक ओळखीचं कुटुंब त्यांच्या मुलीच:) ठरलेलं लग्न मोडणार आहेत. Happy

@डेलिया-
तुम्ही एका गुंतागुंतीच्या समस्येचं अति-सुलभीकरण करत आहात. त्यामुळे रोगापेक्षा औषध जालीम होतंय की काय असे वाटते. Happy

'हुंडा घेणे' आणि 'बळजबरीने हुंडा घेणे / हुंड्यासाठी छळ करणे' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी तितक्याच निंदनीय आहेत, हे आधी स्पष्ट करतो. मात्र असंख्य कुटुंबामधे लग्नात ठरवूक केलेली देवाण-घेवाण झाली की नंतर काहीही होत नाही, चार नॉर्मल घरांसारखीच ती घरे होतात, हेही लक्षात घ्यावे. लग्नात हुंडा देऊनही सासरी सुखी असणार्‍या कित्येक मुली इथे, माबोवरही असतील. (हे हुंडाप्रथेचे समर्थन नाही !) अशा कुटुंबांना तुम्ही वर दिलेले सल्ले लागू पडत नाहीत. शेवटी अशा केसेसमधे कुठलेही सामान्यीकरण करणारे विधान चुकीचे ठरते. केस-टू-केस निर्णय घेणेच योग्य आहे.

शेवटी अशा केसेसमधे कुठलेही सामान्यीकरण करणारे विधान चुकीचे ठरते. केस-टू-केस निर्णय घेणेच योग्य आहे>>

ज्ञानेश, अनुमोदन.

माझ्या माहितीप्रमाणी दागिने कोण कुठले करणार, कपडे कोण करणार अशा गोष्टी हे आधीच ठरल्याने लग्नात गोंधळ होत नाही. ईव्हेंट मॅनेजमेंटच्या दृष्टीने वर उल्लेखलेली "यादी" ही फार महत्त्वाची बाब ठरते. एका सासूबाईनी तर यादी करताना "रूखवताचे सजावटीचे (लोकरीची बदके, खोबर्‍याचे कासव असले सामान अजिबात देऊ नये. आमच्याकडे मागच्याच वर्षी एक सून आणली आहे. तिचे असले रंगीबेरंगी सामान माळ्यावर पडून आहे. वाटल्यास तेच सामान आम्ही घेऊन येतो आणि हॉलवर सजवून ठेवतो" असे स्पष्ट सांगितले होते. Happy

मी काही लग्नांचे हौसेखातर ईव्हेंट मॅनेजमेंट केलेले आहे त्यामुळे "घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून" हे का म्हणतात हे चांगलंच अनुभवलय.

शेवटी अशा केसेसमधे कुठलेही सामान्यीकरण करणारे विधान चुकीचे ठरते. केस-टू-केस निर्णय घेणेच योग्य आहे.<<
अनुमोदन.
यादी हा प्रकार मुळात व्यवस्थापन म्हणून बरोबर असतो.
गोष्टी रिपीट होऊ नयेत पासून विसरू नयेत पर्यंत. जेव्हा त्याचा उपयोग शक्तिप्रदर्शन, समोरच्यावर सक्ति, प्रतिष्ठेचा प्रश्न असा काय काय केला जातो तेव्हा ते सगळं अमानुष होतं.

बाकी लग्नातला दाखवेपणा हा चुकीचा इत्यादी हे मान्यच. पण चार जवळच्या, ओळखीच्या, नात्यातल्या लोकांना बोलवून जेवण देणे हा एक सुरूवात साजरी करण्याचा, आपला आनंद या लोकांच्यात वाटण्याचा प्रकार आहे तेव्हा तो निषेधार्ह कसा मानायचा? असा एक प्रश्न मनात येतो.
अर्थात त्यातली सक्ती, ऋण काढून सण साजरा करण्याची वृत्ती, एकाच बाजूवर पडणारा बोजा हे सगळे चुकीचेच आहे.

>>> घामाघूम होउन, दात-ओठ खाऊन ८:३२ ची लोकल पकडणारी लोक असा माज दाखवतात का? <<<<
दाखवू शकत नाहीत, पण दुसर्‍याचे, खास करुन वरिल उच्चभ्रु समाजाचे अनुकरुण करीत वरपक्षाकडले पोरीच्या बापाच्या पैशाने करुन बघु पहातात् / पोरीच्या बापाला करायला भाग पाडले जाते.

<<त्यामुळे रोगापेक्षा औषध जालीम होतंय की काय असे वाटते. >>
ते ५ न.स क्रमाने आहेत. रोग जितका मोठा तसे उपायाचे प्रमाण वाढवावे.

<<असंख्य कुटुंबामधे लग्नात ठरवूक केलेली देवाण-घेवाण झाली की नंतर काहीही होत नाही, चार नॉर्मल घरांसारखीच ती घरे होतात, हेही लक्षात घ्यावे. लग्नात हुंडा देऊनही सासरी सुखी असणार्‍या कित्येक मुली इथे, माबोवरही असतील >>

असे असेल तर फक्त क्रमांक १ अमलात आणणे पुरेसे आहे. हुन्डा पटत नाही आणि तरीही तो दिला गेला असेल तर ते चूकच. तेव्हा काही कार्यक्रमांच्या निमित्ताने आई वडीलांना ती रक्कम परत करावी.

नंतर कीतीही 'गोड' वातावरण असले तरी अशा हुन्ड्याचे समर्थन शक्य नाही. जेव्हा हुन्डा 'मागितला' जातो तेव्हाच मुलीचे दुय्यम स्थान पक्के होते. जरी नंतर कीतीही 'गुडी -गुडी' वातावरण निर्माण केले गेले तरी मनात बसलेली अढी जात नाही. लक्षात ठेवा ' बुंद से गयी वो हौद से नही आती '

डेलिया यांच्या प्रतिसादातील पहिल्याच वाक्यात 'जबरदस्तीने' हा शब्द पुरेसा स्पष्ट आहे.
उपायांमध्ये क्र. १ : अशा मुलीने आपला खुंटा कितपत बळकट आहे हे तपासून घ्यावे. खुंटा=नवरा.

'हुंडा घेणे' आणि 'बळजबरीने हुंडा घेणे / हुंड्यासाठी छळ करणे' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी तितक्याच निंदनीय आहेत, हे आधी स्पष्ट करतो.>>

मला स्वतःला तरी या सगळ्या गोष्टी तितक्याच अपमानास्पद वाटतात. फरक फक्त की पहिला १०० रू लाच घेतोय तर दुसरा करोडोंचा भ्रष्टाचार करतोय. वृत्ती एकच पण पहिल्याकडे मोठे घोटाळे करायची संधी आणि हिंमत नाही. त्यामुळे थोडक्यात भागतेय.

रच्याकने, मी लिहिलेल्या ५ ही उपायांमधे 'वाईट' काय आहे ?? यात 'जालीम' असे काय आहे????

माहेरच्यांचे लग्नात घेतलेले पैसे परत करणे , मुलीने आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे, वेगळे घर घेऊन स्वयंपुर्ण होणे हे, स्वतःचा जीव जपणे हे सगळे 'जालीम' उपाय ????????????????

वेगळे रहायलाच आक्षेप असेल तर आजकाल तसेही अनेक कुटुम्बे वेगळी रहातात. सासरच्यांशी संबंध तोडा असे मी लिहिले नाहीये. शारीरिक , आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या मुलींनी 'सुरक्षित' रहावे एव्हढे च म्हण्ले आहे.
कोणाला मारायला , झोडपायला सांगितलेले नाहीये. की सासरच्यांचे पैसे ही पळवायला सांगत नाहीये.
हुन्डा घेतला म्हणुन पोलिसात तक्रार करा असे ही सांगत नाहीये.
तरीही यात 'जालीम' काय आहे ????????????????????????????????

भरभक्कम हुंडा घेणार्‍या सासूसासर्‍यांबरोबर एकत्र रहायची काहीही गरज नाही. स्वतःच्या मुलाची किंमत त्यांनी वाजवून घेतलेली आहे.

ज्ञानेश, भरपूर हुंडा घेतल्यानंतर सुखाने वगैरे संसार असं काही नसतं. दिसताना सुखाने दिसतं इतकंच.

@डेलिया-
इतके पॅनिक होऊ नका. आपण एकाच बाजूने बोलतो आहोत. हुंडा आणि त्या अनुषंगाने येणार्‍या अनिष्ट प्रथांचे समर्थन इथे कोणीही करत नाहीये.

"सासरच्यांना बोंबलायचे असेल तर बोंबलू द्यावे."
"सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांच्या लग्नात हुन्डा मागून घेतला गेला आहे अशा मुलींनी एकत्र कुटुम्बात अजीबात राहू नये. लवकरात लवकर वेगळे बिर्‍हाड थाटावे."

"लग्नानंतर कमीत कमी २-३ वर्षे तरी मूल होऊ देऊ नये. नवर्‍याची खात्री वाटत असेल तरच मुलाचा विचार करावा. कारण मुलाच्या निमित्ताने परत माहेरून पैशांची मागणी होऊ शकते."

"आपल्या आयुष्यात आपण 'स्वतः' शिवाय इतर कोणतीही व्यक्ती महत्वाची नाही हे लक्षात ठेवावे."

ही सर्व विधाने परिस्थितीचे अत्यंत सरसकटीकरण करणारी आहेत. लग्नाकडे एक 'व्यापारी करार' या दृष्टीने बघणारी आहेत. लग्नाचे (असे) व्यापारीकरणही योग्य नाही. 'आपण' आणि 'ते' अशी विभागणी लग्न या संस्थेत, किंबहुना कुठल्याही सशक्त नात्यात संभवत नाही. परस्परांचा आदर आणि विचार करावाच लागतो. केवळ स्वार्थाच्या दृष्टीने या किंवा कुठल्याही नात्याकडे पाहिले जाऊ शकत नाही.

समजा, दुसर्‍या बाजूने "सून बोंबलत असेल बोंबलू द्यावे" अशा टाईपची विधाने आली तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल?
'नवर्‍याची खात्री वाटत नसेल' तर मुळात त्याचाशी लग्नच का करावे?
हुंडा देऊन, तडजोडी करून लग्न करायचे आणि नंतर कणखरपणा दाखवायचा, त्यापेक्षा आधीच आपल्या अटीवर लग्न करून, मनासारखा जोडीदार निवडून- प्रसंगी त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी दाखवून मग आपला संसार उभा का करू नये?

हक्क आणि कर्तव्ये दोन्हीकडे असतात, जबाबदारी दोन्ही बाजूला समान असते. तुमचे उपाय चुकीचे आहेत असे मी म्हणत नाहीये. पण ते सरसकट लागू होणारे नाहीत, एवढेच माझे म्हणणे आहे. केस टू केस विचार करून हे किंवा याहीपेक्षा जालीम (सासू-सासर्‍यांना तुरूंगात पाठवणे वगैरे) उपाययोजना करायला माझी काहीच हरकत नाही. Happy

आशा आहे, की माझे म्हणणे व्यवस्थित पोचले असेल.

"सासरच्यांना बोंबलायचे असेल तर बोंबलू द्यावे."

त्यापेक्षा अशा बायकानी लग्नच करु नये.. म्हणजे हुंडाही वाचेल आणि आई बापाच्याच घरात आनंदाने रहाताही येईल.

ज्ञानेश, तुम्ही माझी वाक्ये संदर्भ तोडून टाकलेली आहेत.

<< लग्नाकडे एक 'व्यापारी करार' या दृष्टीने बघणारी आहेत >> हुन्डा घेतला तिथेच व्यापार सुरू झाला. आपल्याकडे लग्नाला उघडपणे 'बाजार' म्हणतातच. आणि बहुतेक ठीकाणी तिच परिस्थिती असते. ठरवून लग्न हे कोणत्याही व्यापारी 'व्यवहारापेक्षा' कमी नसते. उगीच ताकाला जाऊन भांडे लपवण्यात काय अर्थ आहे?

आणि हे सर्व फक्त जबरदस्तीने हुन्डा घेतलेल्यांसाठीच आहे. हा मुद्दा तुम्ही परत परत दुर्लक्षित करत आहात.

>>> लग्नाकडे एक 'व्यापारी करार' या दृष्टीने बघणारी आहेत. लग्नाचे (असे) व्यापारीकरणही योग्य नाही. 'आपण' आणि 'ते' अशी विभागणी लग्न या संस्थेत, किंबहुना कुठल्याही सशक्त नात्यात संभवत नाही. परस्परांचा आदर आणि विचार करावाच लागतो. केवळ स्वार्थाच्या दृष्टीने या किंवा कुठल्याही नात्याकडे पाहिले जाऊ शकत नाही. <<<, अनुमोदन Happy

हुंडा देऊन, तडजोडी करून लग्न करायचे आणि नंतर कणखरपणा दाखवायचा >>

बाप रे . म्हणजे एकदा हुन्डा देऊन लग्न केले की नंतर कणखरपणा दाखवू नये की काय? हे म्हणजे एकदा अत्याचाराला बळी पडले , त्यापुढे मान तुकवली तर परत कधी विरोध करूच नये - करण्याचा अधिकार नाही म्हणण्यासारखे झाले.

आणि हे सर्व फक्त जबरदस्तीने हुन्डा घेतलेल्यांसाठीच आहे. हा मुद्दा तुम्ही परत परत दुर्लक्षित करत आहात.

याची मला कल्पना आहेच. मुद्दा एवढाच आहे की जबरदस्तीने हुंडा घेतला म्हणून जबरदस्तीने नातेसंबंध बिघडवायचे का? हुंडा (जबरदस्तीने) घेणारा जसा दोषी, तसा हुंडा (जबरदस्तीने) देणाराही दोषीच नाही काय?
लग्नानंतर दोन-तीन वर्षांनाही नवर्‍याबद्दल विश्वास निर्माण न होणे, त्यासाठी अपत्य होऊ न देणे- ही स्थिती अनैसर्गिक आहे असे मी मानतो. इतका संशय असलेले नाते कुठल्याही उपायांनी टिकवत ठेवण्यापेक्षा सरळ संपवलेले चांगले !

म्हणजे एकदा हुन्डा देऊन लग्न केले की नंतर कणखरपणा दाखवू नये की काय?

अवश्य दाखवावा.
मात्र मुळात इतका कणखरपणा अंगी असेल तर हुंडा न देण्याची हिंमत आधी दाखवावी, ते जास्त सोपे पडते असे मला म्हणायचे आहे. 'पैसा कमवा, स्वावलंबी व्हा, आर्थिक स्वातंत्र्य मिळवा' असा सल्ला देणे सोपे आहे. पण लग्नाआधी माहेरच्या आणि लग्नानंतर सासरच्या धाकात असलेल्या, हुंडा दिलेल्या शामळू मुलीला हा सल्ला देणे कितपत प्रॅक्टिकल वाटते?

सासरचे सोडा, किती मुली मुली स्वतःच्या आईवडिलांना "हुंडा देऊन लग्न करणार नाही" असे निर्भयपणे सांगू शकतात? Happy

हुंडा घेवून मुली सुखाने नांदतात<<<

मूळात हुंदा घेणारी माणसे चांगलीच कशी? आई वडीलांना किंवा मुलीला हुंडा देवून लग्न करावे लागले ही बोच नाही का? हुंडा दिल्याशिवाय मुलीचे लग्न झाले नसते म्हणजे मुलीची किंमतच केली गेली ना?
मग ती मुलगी सुखी कशी? वर वरून सुखी असेल का तर ससरी हुंडा दिलाय ना असेच ना?

त्यामुळे मला हे पटत नाही, हुंडा देवून मुली सुखी आहेत सासरच्या घरी...

>>>>>>नंतर कीतीही 'गोड' वातावरण असले तरी अशा हुन्ड्याचे समर्थन शक्य नाही. जेव्हा हुन्डा 'मागितला' जातो तेव्हाच मुलीचे दुय्यम स्थान पक्के होते. जरी नंतर कीतीही 'गुडी -गुडी' वातावरण निर्माण केले गेले तरी मनात बसलेली अढी जात नाही. लक्षात ठेवा ' बुंद से गयी वो हौद से नही आती '<<

+१०१ मोदक Happy

त्यामुळे मला हे पटत नाही, हुंडा देवून मुली सुखी आहेत सासरच्या घरी...

तुम्हाला पटत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे.. पण हुंडा देऊनही सुखाचे संसार होतात आणिन देताही अर्धवट/ बरबाद होऊ शकतात.

--- हुंडा न घेऊनही संसार बाद झालेला..
जागो हुंडोबा प्यारे

एखादी श्यामळू मुलगी आई बाबांसमोर बोल नाही शकली किंवा तिचे आई बाबाच हुंडा देवून मुलीचे लग्न लावायला तयार असतील तर अश्या मुलीची कुंचबणा होणारच.

जर तिने शेवटी अनिच्छेने ह्याच्यात उडी घेतली/घ्यावी लागली( हो मी उडीच म्हणेन) तर तिला इतका हक्क नक्कीच आहे की आणखी कोणा जीवाला जन्म द्यायचा की नाही. तिचा जीव सुरक्षित आहे की नाही पाहून हे नक्कीच ठरवावे की आणखी एक नवीन जीव आणावा की नाही. भले लग्ना वेळची स्थिती वरती लिहिल्या कारणामुळे तिच्या हातात नसेल त र्का नाही असे निर्णय घ्यावे. तिने स्वतःला वेळ द्यावा, सासरी लोकं,नवरा कशी आहेत हे पडताळावे मगच मुल व्हावे की नाही ठरवावे ह्यात काय वाईट आहे?
ठरवलेल्या लग्नात नवरा कसा आहे कळायला वेळ लागतोच. त्या काळात मूल न होवु देणे ह्यात काय गैर?
हुंडा घेवून लग्न करतात तेव्हाच शंकेची पाल चुकचुकत अस्ते मग आपली शंका दूर करणे काय चूक. लगेच नवर्‍यावर अविश्वास वगैरे कशाला बोंब? नवर्‍यानेच/ सासरच्यांनी अशी स्थिती निर्माण केली हुंडा मागून तर नक्कीच वेळ लागणार ना? माणसे पैशाची लोभी आहेत हे कळल्यावर कुणाला भिती नाही वाटणार?

अशी परीस्थीती नसली तरी असे निर्णय जरी मुलीने घेतले तर लगेच नवर्‍यावर अविश्वास कसा काय तो?

आणखी एक जीव जगात आणून स्वतः बरोबर त्याची कशाला वाट जर सासर नंतर चांगले निघाले नाही तर?

जामोप्य,

तुम्हालाही आग्रह नाही माझे मत स्विकाराच म्हणून. कोणी जाब नाही विचारलाय की हे मत घेत का नाही?

<मूळात हुंदा घेणारी माणसे चांगलीच कशी? आई वडीलांना किंवा मुलीला हुंडा देवून लग्न करावे लागले ही बोच नाही का? हुंडा दिल्याशिवाय मुलीचे लग्न झाले नसते म्हणजे मुलीची किंमतच केली गेली ना?
मग ती मुलगी सुखी कशी? वर वरून सुखी असेल का तर ससरी हुंडा दिलाय ना असेच ना<> अज्ञानात सुख असते ना ते सुख असेल. मी बाईच्य जन्माला आलेय त्यामुळे हुंडा द्यायला हवा, मला नवर्‍याच्या चार पावले मागेच चालले पाहिजे इ.इ. समजुतीत राहणार्‍या मुली असतील तर त्या राहतील सुखात.

जर तिने शेवटी अनिच्छेने ह्याच्यात उडी घेतली/घ्यावी लागली( हो मी उडीच म्हणेन) तर तिला इतका हक्क नक्कीच आहे की आणखी कोणा जीवाला जन्म द्यायचा की नाही. तिचा जीव सुरक्षित आहे की नाही पाहून हे नक्कीच ठरवावे की आणखी एक नवीन जीव आणावा की नाही. भले लग्ना वेळची स्थिती वरती लिहिल्या कारणामुळे तिच्या हातात नसेल त र्का नाही असे निर्णय घ्यावे. तिने स्वतःला वेळ द्यावा, सासरी लोकं,नवरा कशी आहेत हे पडताळावे मगच मुल व्हावे की नाही ठरवावे ह्यात काय वाईट आहे?>>> झंपी, सहमत. किंबहुना हे हक्क स्त्रियांना कोणत्याही केस मधे असायलाच हवेत. हुंडा, अनिच्छा असो वा नसो.

ज्ञानेश तुझे सरसकटीकरणाबद्दलचे मुद्दे योग्य आहेत पण डेलियाने हे "disaster recovery plan" म्हणून लिहीले आहे, सरसकट सर्व लग्नांबद्दल नाही असे मानून मी वाचले. ती मते मला पटली. काही मुद्दे टोकाचे वाटतीलच पण "To err on the right side" स्वरूपाचे वाटले मला. यातील १,३ व ४ अगदी पटले ("१" तर जे लोक "मला मान्य नाही पण आई-वडिलांची, चुलत मावस आत्याच्या भावजयीची मर्जी मोडवत नाही" म्हणून हुंडा घेतात त्यांच्यासाठी योग्य मार्ग आहे Happy ). २ व ५ बद्दल थोडा खुलासा: पुढे एक दोन वर्षे सासरकडून कशी वागणूक मिळते यावरून ठरवावे एवढे त्यात असावे.

>>>>>>>>>>>>किंबहुना हे हक्क स्त्रियांना कोणत्याही केस मधे अ>>>>>>>>>>>><<

+१
म्हणूनच म्हटले वरती की , अशी परीस्थीती नसली तरी असे निर्णय जरी मुलीने घेतले तर लगेच नवर्‍यावर अविश्वास कसा काय तो?

विनाकारण गोंधळ वाढतो आहे.

थोडक्यात सांगतो-
माझ्या कल्पनेतल्या आदर्श सहजीवनात शोषण, अविश्वास, स्वार्थ आणि संशय याला जागा नाही, मग ते कुठल्याही बाजूने का होत असेना. हुंडा घेणे-देणे हे अत्यंत चुकीचे असले, तरीही तो परस्पर-सहमतीने होणारा करार आहे. (हे लिहितांना ऐनवेळी केलेली अडवणूक, जबरदस्ती, छळ वगैरे मुद्दे डोळ्यासमोर नाहीत, कारण ते स्पष्टपणे एकतर्फी गुन्हे आहेत.) याद्या वगैरे करून ठरवलेला हुंडा हासुद्धा गुन्हाच असला, तरी तो दुतर्फी गुन्हा असतो. या गुन्ह्यात घेणार्‍याइतकाच देणाराही सहभागी असतो. इतकी-इतकी देवाणघेवाण आपल्यात होणार, हे दोन्ही बाजूस ठाऊक असते. हा शुद्ध पारदर्शक व्यवहार आहे. हा करार आहे. "तुम्ही आम्हाला इतके इतके पैसे द्या, त्याबदल्यात आम्ही तुमच्या मुलीचा प्रेमाने सांभाळ करू" अशा स्वरूपाचे कलम या करारात अनुस्यूत असते. मानवी नातेसंबंधात असे करार करणे नि:संशय अनैतिक आहे. मात्र सदर करार करतांना, तो अन्याय्य असल्याचे वाटल्यास, करार नाकारण्याचे स्वातंत्र्य दोन्ही बाजूस असते. त्यावेळी ते स्वातंत्र्य न वापरता, नंतर आगपाखड करणे, हे न्यायाला धरून आहे काय? "प्रेमाने सांभाळ करू" या कलमाचा भंग झाल्यास, ते नक्कीच योग्य ठरेल. अन्यथा नाही, असे माझे मत आहे.
हुंडा देऊन आधीच आपली आत्मप्रतिष्ठा कमी करू नये, नंतरच्या उसन्या अवसानाने त्याची भरपाई होणार नाही.

या दृष्टीने मला डेलिआ यांचे उपाय प्रॅक्टिकल वाटत नाहीत. हे माझे मत आहे. याउपरही मतभेद असू शकतात, याची जाणीव आहे. या विपरीत मतांचा आदर आहे, मात्र सहमती नाही. Happy

Pages