Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39
आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्री.दामोदरसुत यानी सध्याच्या
श्री.दामोदरसुत यानी सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये ठाण मांडून बसलेल्या 'पुस्तकी शिक्षणा' चा जो मुद्दा मांडला आहे त्याची मी प्रत्यक्ष पाहणी केली आहे, दिनेशदा. नोकरीतील कामाच्या स्वरूपामुळे मला वेळोवेळी पदवी महाविद्यालये आणि विद्यापीठे इथे जावे लागते. तेव्हा अशाच काही मोकळया प्रसंगी मी तेथील ग्रंथालयांचा मुक्त वापर करीत असतो. अन्य वाचनासमवेतच वेगवेगळ्या वर्गांना विहीत केलेले अभ्यासक्रम (सिलॅबस) ही चाळतो आणि मग आता लक्षात येत आहे की आमची शिक्षणकेन्द्रे आणि त्यासाठी रेखीत केलेली मंडळे अजूनही मेकॉलेबाबाच्या मठातून बाहेरच पडायला तयार नाही. अगदी पदवी घेईपर्यंतच्या अभ्यासक्रमात सामाजिक जाणीवा प्रकर्षाने उमटल्या जाव्यात असे कोणताही क्रांतिकारक वाटावा असे बदल झाल्याचे पाहण्यात येत नाही.
"स्त्री" प्रश्न आणि त्यासंदर्भातील सामाजिक बदल याबाबत तर पुरता आनंदच आहे. अध्यापकवर्गही या संदर्भात फार संवेदनशील आहे असेही जाणवत नाही. अर्थात तेही आपल्या वाट्याच्या आठवड्याच्या १८ तासिका झाल्या की काम झाले अशाच वृत्तीने विद्यादान करीत असतील तर मग विद्यापीठ तरी कसला उत्साह दाखवेल?
तीन दशकापूर्वी दलित साहित्याने मांडलेल्या विचारवादळाचा त्या मानाने काहीसा बदल मराठी भाषा आणि त्यामुळे काही प्रमाणात इंग्रजी भाषा विषयात बदलाच्या पाऊलखुणा दिसू लागल्या होत्या...पण तोही अंगार आता पूर्ण विझला आहे. त्यामुळे उगाच ताटाला लावलेल्या लोणच्यासारखे काही एकदोन किरकोळ बदल (तेही तीन वर्षातून एकदा) केले जातात. अन्यथा "मागील अंकावरून पुढे चालू...' हाच प्रकार उच्च शिक्षणप्रणालीत सध्या चालू आहे आणि राहिलही.
अशोक पाटील
याबाबतीत 'हा भारत माझा' मधे
याबाबतीत 'हा भारत माझा' मधे 'समाजाने मान्य केलेला कायदा' हा एक चपखल वाक्प्रचार वापरला होता. शाळेत "अमुक करणे चांगले, तमुक करणे वाईट" असे विद्यार्थी शिकतात. पण शाळेबाहेर त्याच्या उलट चाललेले बघतात - त्यातील काही गोष्टी आपल्या घरात, आपल्या नातेवाईकांत, ज्यांना आदरणीय समजतो अशा ओळखीच्या लोकांत चाललेल्या दिसतात. तेथून कोठेतरी शाळेत शिकवतात त्यापेक्षा जगात "प्रॅक्टिकली" वेगळेच काही चालू असते आणि ते तसेच करावे लागते असा समज निर्माण होऊ लागतो. आणि हे असे अपवाद एकदा करत गेलो की शालेय शिक्षण हे फक्त पुस्तकीच राहते.
आपल्या समाजात रूढ असलेल्या चालीरीती फार कमी लोक तोडू शकतात. विशेषतः बंदिस्त असलेल्या समाजांमधे.
यात शालेय शिक्षणाच्या काही मर्यादा आहेत असे मला वाटत नाही.
दुष्यंत: हा हा हा छान आहे.
दुष्यंत: हा हा हा
छान आहे. तुला शुभेछा...
दुष्यंत, तुमच्या साठी एक उपाय
दुष्यंत, तुमच्या साठी एक उपाय आहे : Prenuptial agreement
पण भारतात तो कायदा आहे कि नाही ते मला माहित नाही.
अन्गप्रदर्शन करुन असन्ख्य
अन्गप्रदर्शन करुन असन्ख्य बघ्या पुरुषान्च्या भावना चाळविणे, व त्यान्ना तसेच "मोकाट" सोडणे हा विषय या धाग्याचा नसेलही तुमच्या मते.
असे लैन्गिकरित्या भावनिक उद्दिपित झालेल्या पुरुषा-नरान्चा लोटच्या लोट समाजात चौविस तास जिकडे तिकडे वावरतो आहे, अशात बिनलग्नाची /कुमारिका/विधवा स्ती एकटी रहाणे अशक्य होऊन बसते हे कदाचित तुमच्या सुरक्षित आयुष्यामुळे आलेल्या टणक्क वैचारिक कवचामुले तुम्हाला जाणवतही नसेल, अन त्याचा संबंध कसेही करुन्/हुन्डाही देऊन पण पोरीचे लग्नच करणे आवश्यक वाटावे ही परिस्थिती इथे माण्डणेही तुम्च्या मते या धाग्याचा विषय नसेल.
असे अन्गप्रदर्शन पाहून/अशा व्यभिचाराच्या (खरे तर जुगवलेल्या) कथा मिडीयामधे ऐकुन बघुन जे दु:ष्परिणाम होतात तोही या धाग्याचा विषय नाहीच्चे, नाही का?
मिडीयामधे लोकाच्या उघड्यानागड्या बायका पाहून चाळविलेले नर आटोक्यात रहाण्यासाठी गावोगन्ना वेश्यावस्त्या निर्माण झाल्या/रचल्या गेल्या तरी तुमच्या सुरक्षित आयुष्याशी या क्षणि तरी त्याचा संबन्ध नसल्याने हा विषयही या धाग्याचा नाहीच्चे, हो ना?
तरी बर, मी अजुन "दारू"चा विषय इथे आणला नाही!
असो.
तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे (खर तर लायकी/गरजेप्रमाणेच असे मला म्हणायचे होते) वर दुष्यन्त यान्नी विषय मान्डला आहे, अन तो मात्र "या धाग्याच्या विषयाला धरुन नक्कीच असणार" नै का?
मूळ प्रतिसाद धाग्याच्या
मूळ प्रतिसाद धाग्याच्या विषयाशी संबंधित नसल्याने संपादित .
>>> रस्त्यावर फिरणार्या
>>> रस्त्यावर फिरणार्या लिंगपिसाटांकडून गैरवर्तनाचे जितके प्रकार घडतात, त्यापेक्षा जास्त घरातल्या किंवा घरात ज्याला प्रवेश आहे अशा कुटुंबवत्सल , विवाहित पुरुषाकडून अतिप्रसंग केले जाण्याचे दाखले जास्त आहेत <<<
आकडेवारी देऊ शकाल? आहे उपलब्ध?
अन या शक्यतेच्या अस्तित्वाचे मान्य केले वा न केले, तरी सामुहिकरित्या लैन्गिकदृष्ट्या भावना चाळविणारे/उद्दिपित करणारे सर्रास उघड अन्गप्रदर्शन समर्थनीय कसे ठरेल? ठरते?
>>अंगप्रदर्शन बंद झाले तर
>>अंगप्रदर्शन बंद झाले तर अतिप्रसंग घडणार नाहीत याची गॅरंटी देणार का? <<
(मयेकरजींच्या वरील प्रतिसादाला माझ्या खालील प्रतिसादाचे उत्तर म्हणून त्यांचा प्रतिसाद असा :
'मूळ प्रतिसाद धाग्याच्या विषयाशी संबंधित नसल्याने संपादित.'
असा आल्याने मी कोणाला उत्तर दिलेले आहे ते कळावे म्हणून त्यांचे आता नाव टाकले. कारण असे प्रश्न कोणीना कोणी विचारतोच!)
मयेकर जी,
ते बंद करायचे म्हणजे कायदा करावा लागेल नाही का?
चोरी करणे हा गुन्हा आहे असा कायदा आहे तरी चोर्या होतातच नव्हे तर वाढत्या आहेत. अणि राहाणार!
हुंडाबंदीचा कायदा असूनही आणि पोरी शिक्षित असूनही या गोष्टी होतच आहेत आणि होणार.
हत्त्या पाप आणि गुन्हा आहे आणि त्यासाठी फाशीची शिक्षा आहे तरी सर्वत्र या घटना नित्य घडताहेत. उलट आता फाशी रद्द करा असा सौम्य पवित्रा घेतला जातोय; आणि ती मागणी मान्य झाल्यागत अम्मलबजावणीत ती रद्द झाल्यातच जमा आहे.
या कायद्यांची मागणी करतांना आणि तो कायदा करतांना हा हमी देण्याचा मुद्दा विचारात घेतला गेला नसल्याने हे सर्व कायदे रद्द केले पाहिजेत नाही का?. कारण कुठल्याही कायद्यात अशी हमी दिली असल्याचे ऐकलेले नाही.
वरील कायद्यांचे तीन तेरा वाजण्याचे खरे कारण म्हणजे ज्यांनी कायदे करायचे ते लोक्प्रतिनिधी ते कायदे परिणामकारक व्हावेत यासाठी अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाहीत आणि जो कांही लाव लिजाव कायदा घिसाडघाईने केला जातो त्याच्या अंअलबजावणी कडे लक्ष द्यायला त्यांना कुठे वेळ असतो? असे कायदे आणि अशी अंमलबजावणी झाल्यावर कोणालाच शिक्षा होत नसेल तर कोण भिणार त्या कायद्यांना?
तरीही तुम्ही सध्याच्या कायद्यांना फूलप्रूफ करणार असाल आणि त्याची अंमलबजावणी करून दाखवणार असाल व पुढील काळाचीही गॅरंटी देत असाल तर आम्हीही तुम्ही मागितली आहे तशी गॅरंटी देऊ.
>>> या कायद्यांची मागणी
>>> या कायद्यांची मागणी करतांना आणि तो कायदा करतांना हा हमी देण्याचा मुद्दा विचारात घेतला गेला नसल्याने हे सर्व कायदे रद्द केले पाहिजेत नाही का?. कारण कुठल्याही कायद्यात अशी हमी दिली असल्याचे ऐकलेले नाही <<<<
अहो, ही आधुनिक सुधारक तत्वज्ञानी "हो करा रद्द" असेही म्हणतील ....
>>तरीही तुम्ही सध्याच्या
>>तरीही तुम्ही सध्याच्या कायद्यांना फूलप्रूफ करणार असाल आणि त्याची अंमलबजावणी करून दाखवणार असाल व पुढील काळाचीही गॅरंटी देत असाल तर आम्हीही तुम्ही मागितली आहे तशी गॅरंटी देऊ.<<
अगदि बरोबर...!
अशोक, मला हीच माहिती हवी
अशोक, मला हीच माहिती हवी होती. कि सध्या अभ्यासक्रम कितपत बदलला आहे त्याची.
गजानन, दामोदरसुत माझ्यापेक्षा वयाने लहान असावेत का ?
माझ्या अभ्यासक्रमात समाजसुधारक म्हणून, सतीबंदी साठी राजा राममोहन रॉय आणि स्त्री शिक्षणासाठी
महात्मा फुले आणि महर्षी कर्वे एवढेच होते. त्यांचे कार्य अत्यंत महान आहे पण त्यानंतर किंवा त्या काळात
(माझी दहावी १९७७ सालातली) कार्यरत असलेल्या कुठल्याच समाजसुधारकांची वा ते करत असलेल्या
कार्याची आम्हाला ओळखदेखील करुन देण्यात आली नव्हती. त्याकाळचे सामाजिक प्रश्नही आमच्यासमोर
कधी आले नाहीत. आणि पुढे अनेक सामाजिक प्रश्न आमच्या पिढीने निर्माण केले. आणि कुठलीच सामाजिक
चळवळ सुरु केली नाही कि यशस्वी केली नाही.
हा काळ आणीबाणीपुर्वीचा होता. एक प्रकारचे स्थैर्य आल्याची भावना होती. देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेसवर हवाला टाकून आम्ही निर्धास्त होतो. देश किंवा समाज पुढे नेण्यात सामान्य माणसाचा हातभार असू शकतो,
याची जाणीवच आमच्या पिढीला नव्हती.
थोडेसे अवांतर पण तरीही मुद्द्याला धरुन म्हणजे. सिगारेट, दारू आदी व्यसने सहसा शाळकरी वयातच
लागतात. पण अल्कोहोल आणि निकोटीनचे काय भयानक परीणाम होतात, याचा पुसटसाही उल्लेख
आमच्या अभ्यासक्रमात नव्हता.
आज असे वाटते, कि जर तो असता, तर माझ्या काही मित्रांना हि व्यसने लागली नसती.
फक्त एक वेगळेपण म्हणजे.
आमच्या शाळेत खर्या अर्थाने सहशिक्षण होते. आमचा वर्ग फारच बडबड करायचा त्यामूळे आम्हाला एका
बाकावर एक मुलगा आणि एक मुलगी असे बसवायचे. त्यामूळे मुलींवर शेरे मारणे, टींगल करणे हे कधीच
व्हायचे नाही. पेन्सिल, खोडरबर यांची सहज देवाणघेवाण व्हायची. त्याचा आमच्या मनावर चांगला सस्कार
झाला, असे अजूनही मला वाटते.
दिनेश..... अगदी दोनतीन
दिनेश.....
अगदी दोनतीन तासापूर्वीच - या विषयाशी संबंधित चर्चा डोक्यात होतीच म्हणून - मी ज्या महाविद्यालयात ऑडिटसाठी आलो आहे, तेथून मुद्दाम 'बी.ए. समाजशास्त्र' या विषयाचे विद्यापीठाचे सिलॅबस मागवून घेतले. 'स्त्री शिक्षण महत्व, स्त्रियांचा सामाजिक दर्जा, त्यांच्या अडचणी, एकूणच समाजभावना, रुढी परंपरा, त्याचे स्त्री वर्गावर होणारे परिणाम...." आदी अनेकबाबी 'समाजशास्त्र' विषयाशी निगडित असतात. विद्यापीठाच्याच एका सर्व्हेनुसार 'समाजशास्त्र' हा विषय 'स्पेशल' साठी घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये ८०% मुली असतात असे आढळले आहे.....[मी शिवाजी विद्यापीठाबाबत हे लिहित आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा हे तीन जिल्हे या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात....सोलापूर स्वतंत्र झाले आहे.]
याचा अर्थ असा की "समाजशास्त्रा"च्या बाबतीत मुलींच्या जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात, त्यांच्यात स्वतंत्ररित्या निर्णयक्षमता यावी, प्रसंगी निडरपणे अन्यायाला विरोध करणे किती आवश्यक आहे याची शक्ती यावी अशी अभ्यासक्रमाची रचना असावी अशी साधारणतः आपल्यासारख्यांची कल्पना असते.
त्या दृष्टीनेच मी सिलॅबसकडे पाहिले आणि मला काय आढळले ?
"समाजशास्त्र" बी.ए. साठी एकूण ५ पेपर्स. पैकी पहिल्यात "समाजशास्त्रीय विचारवंत" ~ यात कार्ल मार्क्स, हर्बर्ट स्पेन्सर, मॅक्सवेबर या पाश्चात्यांच्यासमवेत इरावती कर्वे, एम.एन.श्रीनिवासन या भारतीयांच्या साहित्याचा/विचाराचा अभ्यास.
दुसर्यात : "सामाजिक शास्त्राच्या शोधाची पद्धत" - यामध्ये डेटा कलेक्शन, सामाजिक संशोधन पद्धती, प्रश्नावली, माहितीचा उगम, त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया आदींचा समावेश असतो.
तिसर्यात : "ग्रामीण समाजशास्त्र" - पेपरच्या शीर्षकावरूनच यात कोणते घटक येऊ शकतात याचा अंदाज येईलच. तरीही प्रामुख्याने या पेपरमध्ये 'रुरल कम्युनिटी, खेड्यांचे प्रकार, आर्थिक उलाढाल, जातधर्माचे महत्व आणि त्याचे परिणाम, बलुतेदारी, शेती आणि शेतमजूर, शिक्षणापासून वंचित गट, पंचायत राज्य, सहकार तत्वाचे महत्व परिणाम, दूध व्यापार...." आदीचा अभ्यास.
चौथ्यात : नागरी समाजशास्त्र - या पेपरमध्ये नागरी आणि ग्रामीण समाजशास्त्रातील अंतर, फरक, शहरांची वाढ, त्यांचा इतिहास, सु आणि दुष्परिणाम, राहणीमान, शहरातील कुटुंबव्यवस्था, नोकरी व्यवसाय, गृहनिर्माण, झोपडपट्टी आणि अर्थातच वातावरणशास्त्र.
आणि पाचव्यात : औद्योगिक समाजशास्त्र : हा पेपर तर केवळ "इंडस्ट्रीज" वर आधारित असल्याने त्या अनुषंगाने 'समाजशास्त्र' कसे समोर येऊ शकेल याचा उहापोह.
वरील सार्या पेपर्समध्ये "स्त्री वर्ग.....स्त्रियांवरील अत्याचार....स्त्री विवाह, हुंडा, तिचे त्यामुळे होणारे हाल....मुलाबाळांचे प्रश्न...." यावर कसलाही झोत नाही. मग 'स्त्री भ्रूण हत्या.... हुंडाबळी...." आदी विषयाकडे तर हे सिलॅबस ढुंकूनही बघत नाही. फक्त एखाद्या दुसर्या प्रश्नात 'फॅमिली' संबंधी विचारण्याची तरतूद दिसली पण त्याही प्रश्नाचे मूल्य फक्त ५ असे दिसले. [अर्थात माझे निरिक्षण त्रोटक असू शकेल, म्हणून अन्य विद्यापीठातून कुणी या विषयाची पदवी घेतलेले इथे असतील तर ते त्यांच्या अभ्यासक्रमात 'स्त्री' संदर्भात काय तरतूद होती हे सांगू शकतील.]
ही जर 'समाजशास्त्र' या विषयाची अवस्था [जो जास्तीतजास्त मुलींच्या पदवीचा विषय आहे हे तर वर सांगितले आहेच] तर मग भाषाविषयातून तरी ह्या पदवीधर मुली आपल्या हक्काची जाणीव कशी करून घेतील हाच यक्षप्रश्न नजरेसमोर येतो.
अशोक पाटील
अभ्यासात बदल करून लोकांच्या
अभ्यासात बदल करून लोकांच्या डोक्यात प्रश्न पडेल का?
संस्कार आणि स्वतःच्या व्हॅल्यू सिस्टिममूळेच माणसात परिवर्तन घडू शकते आणि त्या परिवर्तनाला त्या माणसाच्या कुटुंबाची साथ असायला हवी. अन्यथा मुलगा लढतोय हुंडा न घेण्यासाठी आणि आई-वडील करतायत इमोशनल ब्लॅकमेल.
एकाच आईवडिलांची दोन मुलं
एकाच आईवडिलांची दोन मुलं सारख्याच परिस्थितीत वेगवेगळी वागतात. स्वभावाला औषध नाही, पण संस्काराने त्याचे वाईट पैलू नियंत्रणात राहण्यास मदत होते.
"एकाच आईवडिलांची दोन मुलं
"एकाच आईवडिलांची दोन मुलं सारख्याच परिस्थितीत वेगवेगळी वागतात."
अगदी खरंय किरण. याचे उदाहरण मी स्वत: डोळ्यांनी पाहिलेले आहे....ती दोन्ही मुले आजही आमच्याच कॉलनीत राहतात. थोरला लेक्चरर तर धाकटा राष्ट्रीकृत बॅन्केत. म्हणजे मुलीकडील लोकांच्या दृष्टीने दोन्ही मुले क्वाएट एलिजिबल फॉर देअर डॉटर्स.
तर लेक्चरर पदावर नोकरी करणार्याने 'दाबून' हुंडा घेतला लग्नात....कारण त्या नोकरीसाठी त्यालाही काही 'खर्च' करावा लागला होता अशी सबब पुढे करून. तेवढ्यावरच भागले नाही तर पुढे दिवाळसणासाठी मुलीच्या सासूसासर्यांनी या बहाद्दर प्राध्यापकाला 'रुसायला' लावून मुलीकडील घराकडून होंडाही मिळविली. फर्निचर तर अगोदरच घेतले होते. या सार्या प्रकाराने मुलीचे वडील किती कर्जबाजारी झाले असतील याची कल्पना धाकट्याला आली होतीच. त्याने भावाची तसेच आईवडिलांची या संदर्भात आमच्यासमोर निर्भत्सना केली....जी सार्या कॉलनीने पाहिलीही. त्याच्या वहिनीने अशा या आदर्श दिराकडे पाहून संसार सहन केला असे म्हटले तरे वावगे ठरू नये.
पुढे धाकट्याने स्वतःच्या निर्णयाने स्वत:च पसंत केलेल्या मुलीशी नृसिंहवाडी इथे देवळात जाऊन अत्यंत साधेपणाने विवाह केला. आईवडिल आणि थोरल्या भावाला त्याने अगदी कोरडेपणे निमंत्रण दिले..... आज हे दांपत्यही अत्यंत सुखाने संसार करीत आहे.
अशा स्वतंत्र विचाराच्या तरूणाने मग कोणत्याही शाखेतील शिक्षण घेतले असले तरी त्याच्या विचारक्षमतेत काही फरक पडत नाही.
अशोक पाटील
अशोकमामा
अशोकमामा
पण मी पाहिलंय की काही
पण मी पाहिलंय की काही मुलिंच्या पालकांना सुद्धा समाज काय म्हणेल याची चिंता फार असल्याने ते असा विचार पुढे मांडायला सुद्धा धजावत नाहीत आणि स्वत:च्या कर्माने कर्जबाजारी होतात.
अशोक, लहान वयात जर कूणी
अशोक,
लहान वयात जर कूणी प्रयत्नपूर्वक या जाणीवा मनात भरवल्या, तर खरेच फरक पडेल. आमिरच्या प्रोग्रॅममधून लोकशिक्षण म्हणा किंवा लोकजागृती म्हणा होतेच आहे. पण प्रेक्षकांच्या प्रतिसादावरुन हेच जाणवते कि या प्रश्नांचे भानही, समाजाला नव्हते. (निदान त्या प्रेक्षकांना नव्हते.)
स्वातंत्र मिळाल्यावर देशबांधणीचा विचार झालाच नाही.
गेल्या अर्ध्या दशकांत काय झाले. ना पंचवार्षिक योजना राबवता आल्या, ना पाणीपुरवठ्याच्या प्रश्न सोडवता
आला, ना लोकसंख्येवर नियंत्रण राखता आले, ना संर्वांगीण विकास साधता आला, ना आरोग्य व्यवस्था,
ना शिक्षणव्यवस्था.
या काळात काय काय विकास झाला ते बघितले तर, घोड्यांच्या शर्यती, लॉटरी, जाहिरातक्षेत्र, प्रसारमाध्यमे (पण प्रभावहीन) नवनव्या मोटारी (पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही) नवनवे चॅनेल्स (पण लोकशिक्षण
नाही.) नवनवे राजकिय पक्ष (पण राष्ट्रभावना नाही).
या काळात भाषावार प्रांतरचना, सीमावाद, नद्यांच्या पाणीवाटपाचे प्रश्न आणि अर्थातच लादलेली युद्धे यात
सगळा वेळ गेला.
आपल्याला शून्यातून सुरवात करायची नव्हती. रस्ते, रेल्वे, पोस्ट, बाजारव्यवस्था सगळे होतेच. त्यात आपण काही सुधारणा करू शकलो का ?
त्याकाळातही अनेक नेते समाजकार्य करत होतेच, पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही ना चांगले अनुयायी.
हा मधल्या काळातला बॅकलॉग आहे, तो भरून काढण्यात या पिढीची शक्ती खर्च होतेय.
आजवरच्या तिन्ही समस्या, आपल्या समाजानेच निर्माण केलेल्या आहेत, कुठ्ल्या नैसर्गिक आपत्तीमूळे वा परकिय प्रभावाने हे झालेले नाही, एवढे भान आले तरी पुष्कळ.
"आजवरच्या तिन्ही समस्या,
"आजवरच्या तिन्ही समस्या, आपल्या समाजानेच निर्माण केलेल्या आहेत,..."
~ अगदी सही निरीक्षण. त्यातही दुर्दैव असे की (जे आमीरनेही आकडेवारीने दाखवून दिले) या समस्यांना खतपाणी घालणार्यांत उच्चशिक्षितही आघाडीवर आहेत.
तुम्ही याच धाग्यावर मागील एका प्रतिसादात 'कॅनडा पंजाबी कुटुंबातील नवविवाहितां"च्या अवस्थेविषयी काही प्रश्न केले होते, त्यासंदर्भातील विदा मी गोळा करीत आहे, जो निश्चितच धक्कादायक...तितकाच अविश्वसनीय आहे. टोरोन्टो आणि पील शहरातील अशा तीनचार पंजाबी महिलांनी एका सेवाभावी संस्थेतर्फे पंजाबी मुलींची तेथील केविलवाणी अवस्थेवर एक रीसर्च पेपरही प्रसिद्ध केला होता, तो मी त्यावेळी वाचला होता, त्याच्या आधारे मी काही टिपणे काढल्याचे मला स्मरते. ते लिखाण मला जर मिळाले तर मी जरूर त्या स्थितीवर इथेच एक स्वतंत्र धागा गुंफतो.....तुमच्याआमच्या अंगावर शहारे येतील असे जीवन कॅनडामधील पंजाबी मुलीच्या कपाळी येते, या हुंड्याच्या प्रश्नावरून.
आमीर खानच्या या एपिसोडमध्ये माजी केन्द्रीय मंत्री रामू वालिया म्हणालेच की, या लालचीपणाने आज पंजाबमधील किमान तीस हजार वधू अक्षरशः नरकसम जीवन व्यतीत करीत आहेत.
अशोक पाटील
अशोक. तुम्ही मान्डत असलेल्या
अशोक. तुम्ही मान्डत असलेल्या बाबी सखोल विचार करण्याजोग्याच आहेत
<मलाही अगदी वाटलं त्या मुलीनी
<मलाही अगदी वाटलं त्या मुलीनी ९११ का नाही डायल केल>
हरीश अय्यरला 'नाही' म्हणायला १० वर्षे का लागली?
जिचा ४ वर्षांत ६ वेळा (की ८) गर्भ पाडला गेला तिला नाही म्हणता आले का?
पाठवणी करताना आई मुलीला "आता तुझे सासर हेच तुझे घर. ते जसे ठेवतील तशी तिथे रहा. (माघारी आलीस तर तुझ्या मागच्या बहिणींची लग्न होणार नाहीत)" असे का सांगते? त्या मुलीने "मी रोज या आशेवर जगत होते की हे आज थांबेल, आज तो माझ्याशी नीट वागेल" असे सांगितले होते. पोलिसांत गेले तर आपले लग्न कायमचे मोडेल, माहेरी जावे लागेल , त्यांची बदनामी होईल, अशीच तिची विचारधारणा झाली असेल. मुळात प्रतिकार करायला तिला शिकवले गेले असेल की फक्त सहन करायला?
एकाच शहरात सासर-माहेर असलेल्या मुली, सासरी छळ होतो हे माहेरी किती काळानंतर सांगतात? महाराष्ट्रातल्या शहरी भागांत, शिक्षित , एक किंवा दोन मुले असलेल्या घरांत परिस्थिती वेगळी असेल, पण उत्तरेला जावे तसे अजूनही चित्र बदलेलेले नाही.
दिनेशदा तुम्ही विचारात होतात
दिनेशदा तुम्ही विचारात होतात न आपल्याकडे कॅनडाचे कुणी आहे का ? तिथल्या पंजाबी लोकांबद्दल लिहिता येईल का ?
मी कॅनडा मधील नाही पण Sanjose, CA मधील माझ्या एका office colleague बद्दल सांगू शकते....
माझ्या Graduation नंतरच्या पहिल्या नोकरी निमित्त २००८ मध्ये माझी भेट झाली ह्या पंजाबी कुटुंबातील मुली बरोबर. मला सुरवातीला कंटाळा यायचा तिच्या अती बोलण्याचा. मी तिला टाळायचे सुरवातीला पण मग तिच्याच कडून समजत गेल की सात वर्ष तिला तीच अस्तित्वच न्हवत. तिच्या घरी तिला कुठलच स्वातंत्र्या न्हवत. सात वर्ष तिने खूप त्रास सहन केला सासरच्या माणसांचा. प्रचंड मारपीट सतत घालून पाडून बोलण आणि ह्या सगळ्यात कहर म्हणजे दोन वर्ष तिचा तिच्या घरच्यांनबरोबर (आई आणि बाबा) काहीच contact नाही. एक दिवस तिला तिच्या नवऱ्याने खूप मारून मग त्यांच्याच neighborhood मधील दुसर्याच कोणाच्या तरी घरा समोर तिला टाकून दिले ते ही रात्री ९ वाजता………….. आणि हे सगळे त्यांच्या घरातील इतर बायका नुसत्या पाहत होत्या. कोणीच तिच्या मदतीला नाही आले. ज्या घरासमोर टाकून दिले ती एक अमेरिकन family होती त्यानी तिला मदत केली. पोलिसांना बोलावले मग तिच्या पालकांना अमेरिकेत बोलवण्या साठी सुधा खूप मदत केली. तिचे पालक येई पर्यंत तिची हॉस्पिटल मध्ये सुधा काळजी घेतली कारण तेव्हा ती एका मुलीची आई होणार होती.
तिला हे सारे सहन करावे लागत होते कारण सतत वाढत जाणारया त्यांचा पैशांच्या गरजा तिचे भारतात राहणारे पालक पूर्ण करू शकत न्हवते.
आत्ता ती खूप सुखी आहे. एका महाराष्ट्रीयन मुलाने तिची आणि तिच्या मुलीची जबाबदारी समजून घेऊन तिच्या बरोबर लग्न केले आहे.
(पण मला थोड अस वाटत की तिच्या नवर्याने तर खूप मोठा गुन्हा केलाच आहे पण ह्यात तिची आणि तिच्या पालकांची सुधा चूक आहे. फक्त अमेरिकेत जायला मिळणार ह्या स्वार्थी विचार मुळे तिच्यावर ही वेळ आली. शेवटी लग्न म्हणजे काय नुस्त ऐश आरामात राहायला मिळणे अस नसते न? लग्न म्हणजे जबाबदारी, लग्न म्हणजे दोघांनी बरोबरीने कष्ट करून एकमेकांना साथ देत सुखी आणि आनंदी आयुष्य जगणे.)
भरत, खरं आहे. पण उद्वेग वाटतो
भरत, खरं आहे. पण उद्वेग वाटतो ऐकून.
लग्न (ठरलेलं किंवा झालेलं) मोडणं याचा एक प्रचंड मोठ्ठा बाऊ करून ठेवलेला आहे आपल्या समाजात. जिवाला धोका झाला तरी चालतो, स्वाभिमान मोडून पडला तरी चालतो, पण लग्न मोडता कामा नये - ही किती भयंकर विचारसरणी आहे!
भरत, प्रतिसाद पटला. स्वाती -
भरत, प्रतिसाद पटला.
स्वाती - सहमत. "यहॉसे मेरी अर्थीही जायेगी" वगैरे जाम डोक्यात जाते.
यु.पी. बिहारमधे मुलाला पळवून
यु.पी. बिहारमधे मुलाला पळवून नेऊन जबरदस्तीने लग्न लावून देणं हे प्रकार हल्ली खूप वाढले आहेत.
कालच्या भागात हा इष्यू खूप हसतखेळत हाताळला गेला असला तरी प्रत्यक्षात त्याचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे.
याच विषयावरचा 'अंतरद्वंद्वं' (Antar dwandwa) हा सिनेमा काही महिन्यापूर्वी पाहिला. अतिशय 'लो की' असलेल्या ह्या चित्रपटात हा विषय उत्तम रितीने हाताळला आहे.
लग्न मोडणं वा साखपुडा मोडणं
लग्न मोडणं वा साखपुडा मोडणं ह्याला नको तितकं महत्व दिलय. व अश्याच प्रकारच्या सिरियल पण चल्लोच असतात मग काय होणार?
काही लोकं तर टीवीलाच प्रमाण मानून बसतात..
कुठल्या तरी सिरियल मध्ये साखरपुडा तुटला पाहून ह्या बाई, अरे देवा... आता लग्न होणं कठिण, मुलाला कळले तर हजार प्रश्ण.
म्हणजे समाजात असे विचार आहेत की, लग्न, साखरपुडा तुटला म्हणजे मुलीचाच दोष असेल..
किंवा हे तुटले तर वाईट.
ह्या बाईंच्या मुलीचा साखरपुडा तुटला होता...लग्न ठरता ठरत न्हवते कारण लोकं येवून हेच प्रश्ण विचारत... का तुटला? किती काळ झाला होता साखरपुडा वगैरे प्रश्ण...
साखरपुड तूटो व लग्न .. काय त्यात एवढे... आधीचे ठरलेले लग्न व साखरपुडा तुटला तर अगदी सांगायलाच पाहिजे का मुलाकडच्यांना?
शिकलेले/ न शिकलेले सगळे ह्याच्यावर इतका भर का देतात?
डिवोर्स असलाच तर वेगळी गोष्ट. म्हणजे ती पण काही मोठी गोष्ट नाहीये पण माहीती म्हणून सांगितली मुलाला(होणार्या नवर्याला) तर ठिक पण उगाच त्याला इतका मोठेपणा कशाला हवाय?
इतकी हिपोक्राईट लोकं जगात अशी पाहिली की सणकावीशी वाटते लोकांच्या.
स्वाती + १ 'लग्न'-विवाह
स्वाती + १
'लग्न'-विवाह संस्थाच हा प्रकारच फार ओव्हरहाइप्ड करून ठेवलाय आपल्या सो कॉल्ड भारतीय कल्चर मधे !
अशोकजी अभ्यासक्रमाबाबतचा
अशोकजी
अभ्यासक्रमाबाबतचा तुमचा मुद्दा मला पटला. शाळेतल्या शिकवणुकीचा संस्कारक्षम वयात खूप परिणाम होतो हे मला मान्य आहे.
९११ बद्दल आणखी थोडेसे :
९११ बद्दल आणखी थोडेसे : जोपर्यंत सासरचे लोक घराबाहेर काढत नाहीत किंवा आपल्या मुलांच्या जिवाला(स्वतःच्या नव्हे, त्याला काही किंमत नसते) धोका वाटत नाही तोवर बाई घर सोडत नाही.
लग्न मोडले हे फक्त मुलीलाच कलंकसमान मानणारे लोक बहुसंख्य आहेत. काही तथाकथित निम्नजातीत/वर्गात मात्र विधवा/घटस्फोटिता सर्रास पुनर्विवाह, तोही प्रथमवराशी करू शकतात. इथे जैत रे जैतमधली चिंधी(चिंधीच ना?) आठवतेय.
बलात्कारित स्त्री कलंकित असते आणि बलात्कार करणारा पुरुष गब्रू जवान/मर्द असतो. एकदोन केसेसमध्ये बलात्कारित स्त्रीला बलात्कार्याशी लग्न करून स्वतःचा सन्मान 'रिस्टोर' करण्याचा पर्याय न्यायालयानेच दिल्याची बातमी वाचली. अशा विचारांच्या पुरस्कर्त्यांना पाक/अफगाणमध्ये काही पठाण टोळ्यांतले बाप्ये कुमारवयीन मुलग्यांना 'ठेवतात' त्या मुलांच्या जागी 'ठेवले' जायला हवे.
आमीरने त्या मुलीला "आता डायव्होर्स, तो तुला नाही, तर तू त्याला देशील" असे म्हटले ते मला आवडले. पण त्या मुलीला त्यातला अर्थ कळला आहे असे तिच्या चेहर्यावरून जाणवले नाही.
अनन्या, आता आठवले, खुप
अनन्या,
आता आठवले, खुप वर्षांपुर्वी टाईम्स ऑफ इंडिया मधे बातमी आली होती. अनेक पंजाबी उच्च्शिक्षित स्त्रिया,
कॅनडामधे लादी पुसण्याचे वगैरे काम करतात. त्या समाजात कॅनडात जायचे खुपच आकर्षण आहे.
पण तरीही त्यांच्या समाजात असे छळ, मला नवलाचे वाटतात. त्यांच्या काही श्रद्धा मला आवडतात.
माझ्या ऑफिसमधल्या मुलीने, ग्रुप इन्शुरन्स साठी नाव नोंदवायला नकार दिला. कारण ते म्हणे मृत्यू
हाच शेवट समजतात. त्यानंतर काही नसते. घरात तिच्या दिवंगत वडीलांचा फोटोही ठेवलेला नाही.
सर्व वाईट कृत्यांची शिक्षा, मरणापुर्वीच मिळते अशी त्यांची धारणा आहे. असे असताना, हे प्रकार म्हणजे !
बिहारमधे, मूलाला पळवून न्यायचे प्रकार होतात पण घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे, असे माझ्या बिहारी
मित्राने सांगितले. (कदाचित तो केवळ त्याच्या समाजाबद्दल सांगत असावा.)
Pages