"सत्यमेव जयते" भाग ३ - (Marriage Or Marketplace?)

Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39

आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्‍या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..

सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडला आजचा कार्यक्रम. कोकणात हि प्रथा नाही, तिथे जेवणावळी पण अगदी साध्या असतात.
मूलीचे लग्न ठरल्यावर गावकीला सांगण्यात येते आणि सर्वजण शक्य ती मदत करतात. *यात श्रमाची मदत जास्त असते.
पण गोव्यात भरपूर सोने दिले जाते, असे बघितले.

आमिर मुलाखत देणार्‍यांना फार चांगल्या प्रकारे उद्यूक्त करतो, असे दिसले.

आणि हो त्या मुलीचे केविलवाणे हसणे, काळजाला चर पाडून गेले.

आजच्या भागात किलो किलोने सोनं , गाड्या वगैरे डिमांड करणार्‍या साउथ इंडियाच्या काही स्टेट्स चा उल्लेख कसा काय झाला नाही ?
आज मुख्यतः पंजाब मधली भीषण परिस्थिती दाखवली , पण साउथ मधेही मुलगी किती का क्चलिफाइड असो , मुलाच्या क्वॉलिफिकेशन्स नुसार हुंडा ठरतो , त्यात मॅट्रिमोनिअल संस्थांचाही कमिशन वगैरे प्रॉपर धन्दा .. याचा निषेध पण हवा होता !
कदाचित साउथ मधे 'हुंडा बळी' प्रमाण कमीअसेल जरी हुंडा असला तरी म्हणुन इग्नोअर केलं का साउथ ला Uhoh
असो , पण एपिसोड ची पॉझिटिव बाजु आवडली.

१०-१२ वर्षांपुर्वी, माझ्या नात्यातल्या एका मुलीचे लग्न ठरले. तेव्हा दोन्हीकडच्या लोकांना खर्च परवडनार नव्हता म्हणुन त्यांनी नोंदनी पद्धतीने लग्न केले आणि गावात सगळ्यांच्या घरी जाऊन साखर वाटली. तेव्हा 'असले कसले लग्न' म्हणुन नाक मुरडनारेही बरेच दिसले Uhoh

आपल्याकडे कॅनडाचे कुणी आहे का ? तिथल्या पंजाबी लोकांबद्दल लिहिता येईल का ?

माझ्यासाठी हे जरा नवीन आहे. तसे सरदार लोक आपल्या समाजाला धरुन असतात. लंगर मूळे, अगदी
गरीब लोकांची खाण्याची आबाळ होत नाही. न्यू झीलंडमधले सरदार लोक बहुतांशी शेती करताना दिसतात.

इथे केनयात ते रेल्वे कामगार म्हणून आले आणि इथेच राहिले. सध्या त्यांची मोठमोठी गुरुद्वारा आहेत. लंगर
पण चालतात. बहुतेक सरदार, स्वतःचा छोटा मोठा उद्योग करतात.

माझ्या बिल्डींगमधेच एक बाई, तिच्या तीन मुलींसोबत राहते. त्या मुलींचे वडील त्या लहान असतानाच वारले.
तिघीजणी लहानपणापासुन नोकरी करतात. (त्यातल्या एकीला मी माझ्याच खात्यात नोकरी दिली होती, आणखी चांगली संधी मिळाली, म्हणून ती गेली. पण अजून ओळख आहेच) तर त्यांना त्यांच्या समाजाकडून
मदत मिळते असे ती सांगते. शिवाय दोन बहिणी लग्न करुन सुखी आहेत तरी माहेरी मदत करत असतात.
त्यामूळे त्यांच्या समाजात हे असे होत असेल, हे जरा वेगळे वाटले मला.

अजूनही तुकड्या तुकड्यातच पाहिला आहे हा भाग. पण ती पहिली मुलगी अमेरिकेतसुद्धा तिचे काय काय हाल केले ते सांगते तेव्हा सारखे डोक्यात येत होते की तिने ९११ ला कॉल का केला नाही? डोमेस्टिक व्हॉयोलन्स केस का केली नाही? आमिरने ही तो प्रश्न विचारलेला आठवत नाही. तिने त्या एका संस्थेला कॉल केल्याचे सांगितले पण ते बर्‍याच दिवसांनी.

हूण्डा वा तत्सम पद्धतीने "पैशे" वसुल करणे ही पद्धत केवळ अन केवळ हिन्दु धर्मियान्ची खासियत आहे व हिन्दु धर्माला कलन्कित करणारी आहे.
अन्य धर्मियान्चि हुन्ड्यासम्बन्धी काही उदाहरणे असतीलच, तर ती "बाटग्यान्ची" म्हणजे हिन्दु धर्मातुन त्या त्या धर्मात गेलेल्यान्नी सोईच्या तेवढ्या पकडुन ठेवलेल्या चालीरितीची अस्तात. कारण हिन्दू वगळता, अन्य धर्मियात, धार्मिक लिखित नियमाप्रमाणे तरी हुन्डा वगैरे नाही.

कार्यक्रमातील बुर्‍हाणपुरच्या मिय्याची गेल्या साठ वर्षात बुर्‍हाणपुरात हुन्ड्यामुळे एकही जळितकान्ड झाले नाही ही घोषणा तद्दन नाटकी वाटलीच, पण मीराजोशी यान्चे वरिल पोस्टकरता समर्थनियच भासली.
मात्र धार्मिकरित्या धार्मिक नियमाप्रमाणे मुसलमानान्मधे हुन्ड्याची प्रथा जरी नसली व मुलिला "मेहेर" नामक रक्कम "मन्जुर" केली जाण्याची व तलाक झालास(च) ती रक्कम तिला देण्याची "व्यवस्था" जरी असली तरी एतद्देशीय (महाराष्ट्रात) बघितल्याप्रमाणे येनकेनप्रकारेण मुलीचे आईबापान्ना नाडून दागदागिने/कपडालत्ता/गाडीघोडे या मार्गाने वसूली केली जातेच जाते.

आता मूळ विषयावर....
काही वर्षान्पुर्वीपर्यन्त आम्ही मुलाला एवढे शिकवतो त्यावर खर्च करतो, तर तो तुम्हाला, आयमीन तुमच्या मुलिला रेडीमेड कसा काय द्यावा या युक्तिवादाची डाल पुढे करुन डॉक्टर/इन्जिनिअर वगैरे उच्चशिक्षित मुलान्चे बाबतीत अगदी उच्चवर्णियात (ब्राह्मण वगैरे) देखिल हुन्डा घेतला जायचा, मात्र आजच्या परिस्थितीतही मुलगी देखिल तितकीच शिकलेली असूनही हुन्डा घेतला जातोच, वा कमी शिकलेली मुलगी करुन हुन्ड्याची मागणि रेटली जाते. हिन्दुन्च्याच नव्हे तर आशिया खन्डातील या भरतभूमीवरील पिढ्यानपिढ्या जोपासलेली हुन्ड्याची फुकटेगिरी अजुनही तितकीच शिल्लक आहे, व मला हे सान्गायला काहीही वावगे वाटत नाही की "कुठलाही शास्त्राधार नसलेली खोटी धार्मिक कारणे पुढे करुन मुलीच्या आईबापाला हुन्ड्यामार्फत नागवे करुन लुटणारी ही निलाजरी फुकटखाऊ वृत्ती हिन्दू धर्मियात अधिकृतपणे आहे" याची मला हिन्दु धर्मिय म्हणून व स्वतःस हिन्दू म्हणवुन घेताना लाज वाटते.

लव्हजिहाद, धर्मभ्रष्टता वा निधर्मान्धता, कोसळत चाललेली कुटुम्बव्यवस्था याचे जोडीनेच, किम्बहुना यासर्वाला कारण म्हणुन देखिल "हुन्डा प्रथेचा" विचार करावा लागेल.

की तिने ९११ ला कॉल का केला नाही? डोमेस्टिक व्हॉयोलन्स केस का केली नाही? > कदाचित हा निर्णय घेण खूप अवघड जात असेल. `परतीचे दोर बंद' होऊन उरली सुरली दारं बंद व्हायचं भय वाटत असेल. यात लहानपणा पासून झालेल्या संस्कारांचा, घरच्यांच्या विचारसरणीचा मोठा वाटा असावा. शिवाय `डोमेस्टिक व्हॉयोलन्स केस' वगैरेंसारख्या गोष्टींची माहिती ही नसावी.

अजून इथले प्रतिसाद वाचलेले नाहीत. पण या कार्यक्रमाचे जितके आधीच्या २ भागांवरील चर्चेमधे वाचले होते तितका कौतुकास्पद कालचा भाग वाटला नाही. हुंडाबळीची उदाहरणे चटका लावणारी होती यात वादच नाही (विशेषता: सर्वात पहिले ज्या मुलीची मुलाखत होती तिची कथा!) पण दाखवलेली सर्वच उदाहरणे एकाच पठडीतली होती. म्हणजे ऐन लग्नाच्या वेळी मुलाकडच्यांकडून सोने, कार, महागड्या गृहोपयोगी वस्तु, मुलाच्या परदेशवारीसाठी पैसे इ. या व तत्सम गोष्टींची डीमांड.

प्रत्येक गोष्टातल्या मुलांकडच्यांचे चेहरे धूसर दाखवण्यामागचे कारण कळले नाही. उलट त्यांचे नाव चारचौघात बदनाम करायला हवे होते.

मधे आमीर असे एक वाक्य म्हणाला या सर्व मुलींच्या केसेस अजूनही न्यायालयात चालू आहेत व आमचा प्रोग्राम त्यात कोणत्याही प्रकारची दखल-अंदाजी करणार नाही. असे का? मागील २ भागांत आमीर स्वतः एक पत्र लिहून त्यावर समस मागवून पाठींबा द्या असे आवाहन करीत होता. तसे यावेळेस का नाही.

राणीची कथा मस्त होती. तिच्या धाडसाला सलाम आणि तिच्या धाडसाला समजून घेणार्‍या तिच्या नवर्‍याचे कौतुक.

एकुणातच व्यथा आणि कथा फक्त मांडली गेली. जितकी यायला हवी होती तितकी अंगावर आली नाही असे वाटले.

शेवटचे गाणे (मुझे क्या बेचेगा रुपय्या) आवडले. ह्या गाण्यातून एकुणातून असा सूर स्पष्ट होत होता की मुलीला मुलासारखेच वागवा. तिचे लग्न नाही झाले तरी मुलाप्रमाणे ती ही पैसा कमवून आणेल व उतारवयातील तुमची काठी बनेल. मुलाप्रमाणेच कर्तव्य करेल मग मुलगी झाली तरी काळजीचे काय कारण. थोडक्यात मुलगा-मुलगी एक समान! पण पूर्ण कार्यक्रमभर फक्त हुंडाबळी हीच थीम होती. तेव्हा हे गाणे ह्या थीमसाठी मला तरी थोडे विसंगत वाटले. हेमेवैम. "मुलीचा विवाह" ह्या एकाच विषयाऐवजी अन्य बर्‍याच allied गोष्टींना स्पर्श करता आला असता तर बरे झाले असते व एपिसोड अधिक सर्वंकष झाला असता असे माझे मत!

मी खूप दक्षिण भारतीय लोकांबरोबर ( हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन ) शिकलेय / नोकरी केलीय / मैत्री आहे.
अगदी ओपनली किती हुंडा घेतला ते सांगतात. तेलगु लोकं सर्वात जास्त देतात-घेतात, १.५ कोटी ही जनरल रक्कम आहे, किलोनं सोन, जमिन इ. इ.

एका नवर्‍यानं ( कलिग होता माझा ) १.५ कोटी लग्नात, बरच सोनं. आज त्याला २ मुलं आहेत , आत्तापर्यंत (गेले १० वर्ष ) मुलीची आई दर सहा महिन्यांनी ८-१० लाखाचं सोनं मुलीला देते. आई बिल्डर आहे, श्रीमंत आहे त्यामुळे काय आणि किती द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे पण तीच आई मुलानं अमेरिकन मुलीशी लग्न केलं त्यामुले निदान ५ कोटी रूपये बुडाले म्हणून मुलगी आणि जावायासहित धो धो रडताना पाहिलीय मी.

माझी रूमपार्टनर तमिळ ख्रिश्चन होती, तिच्या म्हणण्यानुसार चर्च / फादर ना दिल्या / घेतल्या हुंड्यातलं कमिशन मिळतं. त्यामुळेच खूप मल्याळी आणि तमिळ गरीब ख्रिश्चन मुली नन होतात.

कालचा कार्यक्रम मला एकमितीय वाटला, मला काल मुलाखत घेतलेल्या सगळ्या मुलींच्या भावांची लग्न कशी झाली आहेत हे ऐकायला आवडलं असतं. कारण मुलीच्या लग्नात हुंडा मागितला म्हणून किरकिर करणारी बरीचशी लोकं मुलाच्या लग्नात मात्र सगळ्या 'हौशी' वसूल करून घेतात .

माझ्या पाहण्यात काही मुली आहेत ज्यांनी आईवडीलांना कर्जबाजारी केलय.... का तर स्वतःची थाटामाटात लग्न करण्याची हौस पुर्ण करण्यासाठी.

एकीने वडिलांना त्यांच्या मालकीचा प्लॉट विकायला लावला, वरून कर्जही घ्यायला लावले.

दुसर्‍या एका मुलीने (जिचे वडील वारलेले आहेत) आईला कर्ज काढायला लावले. तिचा प्रेमविवाह होता आणि मुलाकडच्यांची परिस्थिती अगदीच बेताची होती. मुलाकडचे सांगत होते की नोंदणी पद्धतीने लग्न करू. पण या मुलीची थाटामाटात लग्न करायची हौस होती म्हणून आईनेच सर्व खर्च केला. लग्नात नेसायला त्या मुलीने १० हजाराची साडी घेतली, जी वजनाने इतकी जड होती की ती नेसवायला २ बायका लागल्या. लग्नानंतर ती साडी तशीच पडून आहे...तिला याची कल्पना असूनही तिने त्या साडीवर आईचे पैसे वाया घालवले. आता आई बिचारी ३-४ लाखाचं कर्ज फेडतेय.

निंबुडा, ते त्या मूलीने केलेले चित्रण होते.

अर्पणा आणि अमि, अशा केसेस मी पण बघितल्यात.
"आमच्यात द्यावेच लागते " असा पण सूर लावलेला ऐकलाय.

>>प्रत्येक गोष्टातल्या मुलांकडच्यांचे चेहरे धूसर दाखवण्यामागचे कारण कळले नाही. उलट त्यांचे नाव चारचौघात बदनाम करायला हवे होते.

प्रचंडच अनुमोदन. मुलींचे चेहरे दिसतात, तिथे असतात, पण हरामखोर मुलाकडच्यांचे धुसर का?

निंबुडा बर्याच गोष्टी पटल्या.

या कार्यक्रमाचे जितके आधीच्या २ भागांवरील चर्चेमधे वाचले होते तितका कौतुकास्पद कालचा भाग वाटला नाही. >>>

प्रत्येक गोष्टातल्या मुलांकडच्यांचे चेहरे धूसर दाखवण्यामागचे कारण कळले नाही. उलट त्यांचे नाव चारचौघात बदनाम करायला हवे होते. >>>

राणीची कथा मस्त होती. तिच्या धाडसाला सलाम आणि तिच्या धाडसाला समजून घेणार्‍या तिच्या नवर्‍याचे कौतुक. >>>

एकुणातच व्यथा आणि कथा फक्त मांडली गेली. जितकी यायला हवी होती तितकी अंगावर आली नाही असे वाटले.>>>

लिंबू,मंदार चांगल्या पोस्ट.
कोंकणात ब्राह्मण धरून कुठल्याच समाजात हुंडा पाहिला नाही. लग्न खर्च आटोक्यात शिवाय दोन्हिकडून सारखा. जास्तीत जास्त दागिने मुलांकडूनच घातले जायचे पूर्वी. १०-१५ वर्षांपूर्वीतरी ब्राह्मण समाजात तर जेवणाची आमंत्रणेही छोट्या चिठ्ठीवर लिऊन किंवा छापून वेगळी केवळ जवळच्या नातेवाईकांनाच पाठवली जात आणि बाकी निमंरितांना लिंबू सरबत सुपारी किंवा जास्तीतजास्त आईस्क्रिम असे. इतर समाजातही हॉलवर/ लग्नाच्या ठिकाणीअसंच आईस्क्रीम वैगेरे देऊन गावात घरी सगळ्या ज्ञातिबांधवांच्या मदतीने केलेला गोडाचा साधाच स्वयंपाक असे.
हल्ली इतर महाराष्ट्राच्या कृपेने हे बदल्लय आणि कोंकणातहि बँड-बाजा,डिज्जे,जेवणावळी आणि काही प्रमाणात हुंडाही शिरलाय असे ऐकते.
त्यामुळे मुलींना ओझे समजले जात नाही आणि स्त्रीभ्रूण्हत्याही कमी प्रमाणात होतात.
यात कुणा एका प्रदेशाची, जातीची बाजू घ्यायची नाही पण कुठल्याही समाजात कुठली गोष्ट चागली असेल तर घ्यायला काय हरकत आहे.

एकुणातच व्यथा आणि कथा फक्त मांडली गेली. जितकी यायला हवी होती तितकी अंगावर आली नाही असे वाटले. <<< निंबुडा Uhoh

प्रत्येक गोष्टातल्या मुलांकडच्यांचे चेहरे धूसर दाखवण्यामागचे कारण कळले नाही. उलट त्यांचे नाव चारचौघात बदनाम करायला हवे होते. अनुमोदन

राणी सारखे प्रत्येक मुलीने वागले तर किती छान........... ..धडाकेबाज व्यक्तीमत्व Happy

निंबुडा, ते त्या मूलीने केलेले चित्रण होते.

>>>
मी राणीने शूट केलेल्या व्हीडीओ बद्दल बोलत नाहीये. सर्वच कथा मांडताना त्या-त्या व्यक्तींचे फोटो दाखवले गेले. तेव्हा मुलींकडचे चेहरे स्पष्ट पण मुलांकडच्यांचे धूसर दाखवले होते. त्या नराधमांचे चेहरे समाजासमोर यायला हवे होते.

एकुणातच व्यथा आणि कथा फक्त मांडली गेली. जितकी यायला हवी होती तितकी अंगावर आली नाही असे वाटले. <<< निंबुडा Uhoh >>>>

का? याचे कारणही मी दिले की माझ्या पहिल्याच पोष्टीत. (दाखवलेली सर्वच उदाहरणे एकाच पठडीतली होती. म्हणजे ऐन लग्नाच्या वेळी मुलाकडच्यांकडून सोने, कार, महागड्या गृहोपयोगी वस्तु, मुलाच्या परदेशवारीसाठी पैसे इ. या व तत्सम गोष्टींची डीमांड. )
लग्न होण्याआधी मुलीच्या घरच्यांना मानसिक टॉर्चर, हुंड्यासाठी दबाव व लग्न झाल्यानंतरही सुनेचा छळ चालू राहणे (उदा. पहिल्या मुलीची कथा व एका पंजाबी मुलीला ३ वर्षे भारतात सोडून स्वतः ऑस्ट्रेलियात जाऊन राहिलेला व ३ वर्षांनंतर घटस्फोट मागणारा नवरा) इ. व्यतिरिक्तही किती उदाहरणी अजूबाजुला घडताना ऐकतो, बातम्यांमध्ये पाहतो/ऐकतो. अगदी मूले झाल्यानंतरही स्त्रीचे व कधी कधी लहानग्यांचेही हाल होतात. कधी कधी सुनेला माहेरी हाकलून देणे, तिच्या मुलांना तिला भेटू न देऊन तिचा मानसिक छळ करणे वै. प्रकारही अवलंबले जातात. कित्येक स्त्रिया मग अशा वेळी ना घर का न घाट का अशा परिस्थितीतूनही जातात. कित्येक जणी लहानग्यांसकट सवतःचे आयुष्य संपवतात. पठडीतील उदाहरणांबरोबरच बाकी कथांनाही न्याय दिला जायला हवा होता असे वाटले.

कालचा एपिसोड पाहीला, खरंच ! लग्न या एका दिवसाकरीता आपण आई वडिलांची आयुष्याची मिळकत घालवतो.
मुला ईतकेच मुलींसाठी शिक्षण, ईतर बाबींसा्ठीखर्च होत असतो. मग मुलासाठीच हुंडा का ? लग्न जमवताना दोन्ही कडच्यांनी साधेपणाने लग्न करून ती रक्कंम मुलीच्या नावे डिपोझीट केली तर लग्नानंतर येणा-या अडचणींना तो वापरता येईल. माझ्याच लग्नात मुलाकडच्यानी साधेपणाने लग्न करुया म्हणून सांगीतले पण माझ्या घरचे तयार झाले नाहीत. मग लग्नानंतर माझी पहिली मुलगी प्रिम्याच्युअर (सातव्यात जन्मली) झाली तेव्हा ती दोन महीने काचपेटीत होती. दवाखान्याचा व बाळंतपणाचा खर्च १ लाख आला. पैश्याची खुप ओढाताण झाली. माझी सर्व्हीस सुटली. हा अनुभव आल्यावर मी ठरविले की माझ्या दोन्ही मुलींची लग्ने साधेपणाने करायचे व असलेली रक्कम मुलींच्या नावे बॅकेत ठेवायचे. मग नंतर येण्या-या अडचणींना तो त्यांना वापरता येईल.

प्रत्येक गोष्टातल्या मुलांकडच्यांचे चेहरे धूसर दाखवण्यामागचे कारण कळले नाही. उलट त्यांचे नाव चारचौघात बदनाम करायला हवे होते.

लोकहो लक्षात घ्या हा आमिरखानचा रिअ‍ॅलिटी शो आहे, रंग दे बसंति सारखा सिनेमा नाही. आपण भारतीय न्यायप्रक्रियेपेक्षा मोठे नाही हे आमीरने या आधीच्या भागांतच स्पष्ट केलंय.
त्यामुळे ज्या केसेस अजूनही कोर्टात चालू आहेत त्यातल्या आरोपींना केवळ प्रायवेट चित्रिकरणाच्या आधारे आरोपी म्हणू शकत नाही.
पहिल्या भागात स्टिंग ऑपरेशनमध्ये दाखविलेल्या क्लिप्स अगोदरच नॅशनल टिव्हीवर दाखविल्याने आमिरला त्या परत दाखविता आल्या असाव्यात.

मी पण कोकणातली (मालवणी ) . आमच्याकडे लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करतात आणि आपापल्या इच्छे प्रमाणे दागिने आणि मान पान केला जातो. आम्हा बहिणींची लग्ने अशीच झाली infact सगळ्या चुलत मामे भावंडांची पण. माझ्या मित्र मैत्रिणींना याचे खूप आश्चर्य वाटते (non maharashtrian) पण मला अभिमान . माझा एक तमिळ मित्र जास्त हुंडा मिळणार म्हणून स्वताचा रेट वाढण्यासाठी US ला जाऊन आला. US return म्हणजे हुंडा जास्त.

माझ्या सासर्यांनी घरच्यांचे न ऐकता कोर्ट marriage केले होते स्वतः त्या काळात cost accountant असून सुद्धा. माझ्या सासूबाई सांगतात कि तेव्हा त्यांच्या आई वडिलांना प्रश्न पडला होता कि जावई नक्की मोठ्या हुद्द्यावर आहे का? त्यांनी चौकशी केल्यावर कळले कि मुलाचे (सासर्यांचे) विचारच वेगळे आहेत आणि मग ते लग्नाला तयार झाले. तरीही आजोबांना हे पसंत न्हावातेच .कोर्ट marriage करुन मग थोड्क्यात विधि केले. त्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून माझ्या नवर्याच्या चुलत भावंडानी पण कोर्ट marriage केले आणि मग रिसेप्शन ठेवले.

प्रत्येक गोष्टातल्या मुलांकडच्यांचे चेहरे धूसर दाखवण्यामागचे कारण कळले नाही. उलट त्यांचे नाव चारचौघात बदनाम करायला हवे होते >>> मला पण हाच प्रश्न पड्तो.

शेवट्चे गाणे मस्तच.

राणी चा dialog आवडला " मै वो सब कर सकती हु जो तुम कर सकते हो ..."

हुन्डा बळी होण्यामागे, "हुन्डा मागणारे" अस्तित्वात आहेत, वा सर्वच वरपक्ष हुन्डामागणारेच आहेत येवढेच केवळ कारण नाही. किम्बहुना, हुन्डाप्रथेच्या विरोधी उभे रहाण्यामागिल अडचणीन्चा विचारही याच निमित्ताने व्हायला हवा. जसे की
१) प्रत्येक जाति/समाजाप्रमाणे, मुलगी अमुक इतक्या वयाची (१६ ते २५) झाली की लग्नाचे बघणे अत्यावश्यक ठरते. अन्यथा जखमी जनावरची जखम कावळा/गिधाडे ज्याप्रमाणे टोचुन टोचुन काढतात (अशी दृश्ये मी बघितली आहेत) त्याप्रमाणे, १६ ते २५ मधिल मुलगी घरात असेल, तर अजुन नाही का हो बघ्त तुम्ही इच्या लग्नाचे करत उठबस विचारणा करणारी शेजारिपाजारिनातेवाईक मण्डळी वात आणतात.
२) एखाद्या मुलिने करिअरकडे लक्ष द्यायचे ठरवुन व्यवसाय/नोकरीकडे लक्ष केन्द्रीत केले तरी ती जोवर लग्न करुन गळ्यात "मन्गळसुत्राचे लायसन्स" अडकवत नाही तोवर अशाच कावळ्यागिधाडासारख्या (लव्हजिहादवाल्यान्सहित) पुरुषान्च्या नजरा तिला खात असतात, नि वेळप्रसन्गी पुढील अनेक प्रकार करु धजतात, वर्णने करायचे काम नाही, माबोकर सूज्ञ आहेत.
३) लग्न न करताही सुरक्षेपायी मन्गळसुत्र/कुन्कु लावणार्‍या कुमारिका/विधवान्ची उदाहरणे मला माहित आहेत.
४) उघड्या समाजात "स्त्री" ला स्त्री म्हणुन तिची इज्जत वा अधिक स्पष्टपणे सान्गायचे तर "योनिशुचिता" साम्भाळली जाण्याची कसलिही शाश्वती नाहीच, सुरक्षितपणे एकटेदुकटे फिरण्याची (पुणे मुम्बई सोडाऽऽ हो!) परिस्थिती नाही, अन वर सो कॉल्ड समाजसुधारकान्कडून(?) योनिशुचित्वाचे (मी हे बलात्कारीतान्बद्दलच्या केसेसबद्दल बोलतोय) येवढे कसले स्तोम माजविता म्हणूनची एक बाबारे म्हणत बिब्ब्याचे पट्टे ओढणारी बुद्धिभेदाची सुरी मानेवर फिरवली जाणे हे हा समाज कोणत्या दुर्गतीकडे चालला आहे याचे द्योतक तर आहेच, पण लग्न न करता तसेच राहिले तरची भीषण परिस्थिती असल्यामुळेच कसेही करुन हुन्डाबिन्डा देऊन पण लग्न व्हावेच अशा मनःस्थितीकडे मुलगी व तिच्या आईबापान्ना नेणारी परिस्थिति हाच नालायक समाज सातत्याने रचतो आहे.
५) वरील परिस्थितीमुळेच, आम्ही हुन्डा देणारच नाही भले लग्न झाले नाही तरी चालेल, इतक्या तेखीची चळवळ उभीच राहू शकत नाही. व हुन्डा घेणार्‍या मुलाच्या दलाल (मला इथे "भडवा" हाच शब्द अपेक्षित आहे) आईबापान्चे फावते.
६) हुण्डा देण्याची ऐपत नसणे वा बापाला हुण्ड्यापाई खड्यात घालण्यापेक्षा स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करुन घेणे चान्गले असेही मुली मानु लागुन त्याप्रमाणे वागतात.
७) याच सहा नम्बरचे कारणामुळे, तसेच, योग्य वर योग्य वेळी न मिळाल्यामुळे, वयपरत्वे बाह्य भुलथापान्ना वा जबरदस्तीला बळि पडणार्‍या मुलिन्ची सन्ख्या काही थोडी थोडकी नाही. या देशातल्या यच्चयावत शहरातील वेश्यावस्त्या अशाच मुलिन्नी भरलेल्या आहेत. मूळात, कायद्यातील "स्वखुषीने" वेश्याव्यवसाय करणारी वा स्वखुषीने ना करणारी हा फरक मान्डणारे गृहितकच मूळात चूकीचे असल्याने, कारण कोणतीच नुकतीच वयात आलेली स्त्री "स्वखुषीने(?)" वेश्याव्यवसायात पडणे शक्य नाही. शक्य आहे / झालय असे म्हणणारे कुणी माईचे लाल असतील तर त्यानी नावानिशी पुढे यावे, त्यान्चा सत्कारच करुयात!
९) एकदा का वेश्या म्हणून शिक्का बसला, की आयुष्यभरात त्यातुन सुटका होणे नाही हे निश्चित असल्याने, फसवुन आणलेल्या/जबरदस्ती केलेल्या मुली एकदा का दोनचारजणान्नि उपभोगिल्या की तिला वेश्याव्यवसायात "स्वखुषीने" ढकलण्याचा मार्ग मोकळा होतो. या ठिकाणि (माझेसहित) अखिल हिन्दू समाज षंढासारखाच वागतो. नाही या रॅकेट्स तोडायचे काम करीत, नाही लव्हजिहादला कृतीशीर विरोध करीत वा नाही बर्‍याच अंशी मूळ कारण बनत असलेली हुण्डा पद्धत बन्द करत.
१०) मिडीया/चित्रपट वगैरे बाबी देखिल स्त्री स्वातन्त्र्यवाद्यान्च्या अर्धवट मूर्ख युक्तिवादान्चे पदरा आड दडून स्त्रीदेहाचे सर्रास लैन्गिक उत्तेजनात्मक प्रगटन ते देखिल कलात्मकतेच्या नावाखाली चौविस तास अहमहमिकेने करीत असतात, निवडक विकले गेलेले बुद्धिवादी जीव त्याची जीव तोडून भलामण करीत असतात, व अन्गावर जितके वस्त्र कमी तितके ते सुधारितपणाचे लक्षण मानुन कायद्यानुसार(?) केवळ लिन्ग व वक्ष दाखविण्याचे टाळून बाकी सर्व मादक/उत्तेजित करणार्‍या बाबी /हालचाली/दृष्ये मूर्ख कायद्यातील पळवाटा शोधुन दाखवुन अशी दृष्य पाहुन सूप्तपणे तप्त झालेल्या तमाम अर्धवट बेअक्कलेच्या "नर" पुरुषवर्गास स्लो पॉयझनिन्गप्रमाणे येच देशिच्या नारीन्वर केवळ अन केवळ वासनायुक्त नजर/भावनेनेच बघण्याची दृष्टी देतात. कोण आपली पोरगी लग्नाविना एकटी ठेवेल? कितीका हुन्डा द्यावा लागेना?
११) लग्न न झाले तर देशकालवर्तमान परिस्थितीप्रमाणे, वर सान्गितल्याप्रमाणे तर्‍हतर्‍हेचे अब्रुचे धिन्दवडे जर निघणार अशीच परिस्थिति बाह्य समाजात असेल, तर हुन्डाच काय, वाट्टेल ते मागितले तरी देऊन कुठुन का होईना, पोरीला "सुरक्षित" करण्याकडे लोकान्चा कल असतोय.

अमिरने हा "देहप्रदर्शनाचा" विषयही घेतला तर बरे!

अन्यथा आहेच एकीकडे पराकोटीच्या क्रुरपणे "बुरख्याचा आड" कोन्डलेली स्त्री, तर दुसरीकडे आधुनिक व्यक्तिस्वातन्त्र्याच्या/स्त्रीस्वातन्त्र्याच्या नावाखाली खरोखरच्या वेश्यान्ना देखिल लाज वाटेल इतपत स्त्रीदेहाच्या राजीखुषीच्या(?) प्रदर्शनाचे मधमाशान्च्या मोहोळाप्रमाणे येथिल समाजावर हल्ला करणारे पॉयझनिन्ग! दरम्यानच्या भागात समाजाचा कणा तो मध्यमवर्ग, त्यातिल लहानथोर स्त्रीया व त्यान्ची कुटुम्बव्यवस्था या वैचारिक दृष्य स्वरुपातील, व प्रत्यक्ष हल्लाबोल घटनान्मुळे उध्वस्त होत चालली आहे.
स्त्रीभ्रूणहत्या हा याच परिस्थितीचा "साईडप्रॉडक्ट" आहे हे विसरुन चालणार नाही.
अमिरने स्त्रीभ्रूणहत्या हा विषयची घ्यावा.

स्त्रि भ्रूण हत्येचा एपिसोड पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, त्यात फक्त अशा हत्यांचे परिणाम दाखवले गेले. कारणांचा शोध घेतला गेला नाही.

स्त्री भ्रूण हत्येचे सर्वात महत्वाचे कारण हुंडा हे आहे. माझ्या ओळखीतल्या एका उच्चशिक्शित मुलाच्या बहिणीने ती टेस्ट करून स्त्री गर्भ नष्ट केला. मी कारण विचारले असता त्याने सांगितले की, तिला अगोदर एक मुलगी होती. आणखी एक मुलगी झाल्यावर तिच्या हुंड्याचा प्रश्न उभा राहिला असता. त्याने सांगितले की त्यांच्या भागात हुंड्याचे खुप प्रमाण आहे.

हो निंबुडा, त्यांचे चेहरे दाखवले असते तर त्यांनी बदनामीचा दावा दाखल केला असता. कोर्टात आरोप सिद्ध होईपर्यंत ते दोषी मानले जात नाहीत.

मुसलमान म्हणजे चार लग्नाची मान्यता, असा सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे. पण ओमानमधे प्रत्येक लग्नाच्यावेळी, काही ठराविक रक्कम (काहि वर्षांपुर्वी ती १०,००० ओमानी रियाल, म्हणजेच साधारण दहा लाख रुपये होती.) लग्नानंतर काही प्रॉब्लेम झाल्यास, त्या मुलीला ती रक्कम मिळत असे. अजूनही तो नियम असावा.

केनयातील मसाई समाजात, मुलीच्या वडीलांना, मूलाने काही गायी द्यायच्या असतात. त्याशिवाय ते लग्नाला मान्यता देत नाहीत.

मग अशा भागात लग्न करुन द्या जिथे हुंडा नाही. लग्नाला मुलीच मिळत नाहित म्हटल्यावर हावरट साले आपोआप ताळ्यावर येतील > माफ करा हा संतापून दिलेला प्रतिसाद आहे.

माझी वरील पोस्ट एकान्गी वाटत असली तरि मलाही, लग्न/वा तत्सम्बन्धी विषयात, लग्नानन्तरही सासरच्यान्च्या सम्मतीने वा त्यान्चे कारण करुन, आयशीबापसाला आर्थिकदृष्ट्या शब्दशः लुबाडून झोपविणार्‍या स्त्री व्यक्तिरेखाही माहित आहेत, अशाही घटना घडतात/घडू शकतात हे मान्य आहे, मात्र हे प्रमाण अत्यल्पात अत्यल्प, अगदी अपवादात्मक असल्याने वरील चर्चेमधे त्याचा विचार करणेची गरज नाही असे माझे मत आहे.
हां, ज्यान्ना विषय भरकवटायचा असेल, ते जरुर हा विषयही "चघळू" शकतात.

Pages