"सत्यमेव जयते" भाग ३ - (Marriage Or Marketplace?)

Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39

आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्‍या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..

सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> लग्नानंतर काही प्रॉब्लेम झाल्यास, त्या मुलीला ती रक्कम मिळत असे. <<<<
या धाग्याचा हा विषय नाहीच्चे असेही नसल्यामुळे केवळ सान्गु पहातो, की या "मेहेर"च्या रक्कमेचा सहसा कधीही योग्य विनियोग होताना दिसत/दिसलेला नाही. माझ्या माहितीतील तलाकच्या केसेसमधे त्या त्या स्त्रीयान्ची वाताहातच झाली आहे, ना त्यान्ना मेहेर मिळाला, वा मेहेरची रक्कम इतकी तुटपुन्जी की त्यात एक महिना निभावणे देखिल कठीण. शिवाय, आजनाउद्या नवरा पुन्हा घरात घेईल्/त्याच्याशी जुळून येईल या आशेने मेहेरला स्विकारण्याला नकार देण्याचे देखिल बघण्यात आहे! काये ना, की , ओमानमधले नियम ओमानमधे, भारतात शहाबानो देखिल हरली हे लक्षात घ्या! शिवाय ओमान/सौदी वगैरे अरेबिक देशातील नियमान्ची भलामण आम्ही करू लागलोत, तर भारतातील मुस्लिमपर्सनल लॉ, हा त्या परक्या मुस्लिम देशान्चे कायद्याप्रमाणे (फक्त त्यातिल हातपायतोडणे/दगडान्नी ठेचणे या शिक्षा तेवढ्या वगळून Proud ) व्हावा ही मागणि पुढे येणे दूर नाही! काय? Wink

हो लिंबू, आपल्याकडच्या लोकांना फक्त फायदे हवेत. तिकडचे कायदे अजूनही कडकच आहेत. सौदीमधे
काही आरोपांसाठी आता आता पर्यंत सार्वजनिक शिरच्छेदाची शिक्षा होती. (अजुनही असेल)

मंदार, तसे हट्ट एकवेळ मजा म्हणून सोडूनही देऊ. पण माझ्या माहितीत, एका मुलीने, नवर्‍याचे हट्ट
अनावर झाल्यावर, लग्नमंडपातच आव्हान करुन, जो तरुण लग्नाला तयार झाला, त्याच्याशी तिथल्या तिथे
विवाह केला. दोघे सुखी आहेत.

मंदार, पुणेरी इतर अनेक बाबतीत फेमस असले तरी याबाबतीत फारसे नाहीत Happy माझ्या माहितीतील बर्‍याचश्या पुण्यातील लग्नांमधे हुंडा घेतला गेला नव्ह्ता. लग्नाचा खर्चही अर्धा वाटून घेतलेला आहे. किमान मुलगा पुण्याचा असलेल्या (हे प्रकरण मुलीच्या बाजूच्या फारसे हातात नसते म्हणून तसा उल्लेख).

लिंबू, बरीचशी पोस्ट विषयाला धरून आहे. अंगप्रदर्शन वगैरे जरा भरकटले असले तरी तुझे मत म्हणून ग्राह्य आहे Happy

>>आम्हा 'कोल्हापुरी मराठा' समाजात 'आमच्या मुलाला हुंडा नको' असे म्हणणे जवळपास मुलाचे असलेले/नसलेले व्यंग लपविण्याचा प्रकार मानतात.

अशोक जी,
मला वाटते की नुसता मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण समाजातच कमी अधिक प्रमाणात असेच आहे. आणि ते जुन्या काळापासूनच आहे.
आधीच्या दोन एपिसोडप्रमाणेच तिसरा भागही चांगलाच होता पण् विषय महत्वाचा असला तरी जुनाच होता. राणी आणि तिला भेटलेला राजा यांना अभिवादन! पण खानदानी हुंडाबहाद्दर आज ना उद्या यावर मात करतीलच!
बुर्‍हाणपूरवाल्याने त्यांच्या समाजात केलेले काम गौरव करण्यासारखे आणि अनुकरणीयच आहे; पण त्याचे बोलणे प्रचारकी, अतिशयोक्त, नाटकी आणि आमीरची चमचेगिरी करणारे वाटले. संपूर्ण कार्यक्रमात जी नैसर्गिकता दिसली ती तेथे दिसली नाही.
माणसाचे लोभी मन , जेथे शक्य आहे तेथे, दुसर्‍यांना ओरबाडण्याचा प्रयत्न करीत असते. लग्नातील देण्याघेण्यावरून ज्या निलाजर्‍या, मानवतेला काळिमा फासणार्‍या आणि हिंसक घटना घडतात, ते या लोभी मनाचे, पशूंना लाजवेल असे दृश्य स्वरूप [मॅनिफेस्टेशन] आहे. या लोभी मनावर समाजाचा महा जबरदस्त अंकुश असल्याशिवाय याला आळा बसणार नाही. असे असले तरी आमीरच्या प्रयत्नाचे महत्व कमी होत नाही,

>>अमिरने हा "देहप्रदर्शनाचा" विषयही घेतला तर बर>>

लिंबुटिंबुजी
पूर्ण्पणे सहमत.
आपले ११ मुद्दे देखील विचार करायला लावणारेच आहेत.

>> आम्हा 'कोल्हापुरी मराठा' समाजात 'आमच्या मुलाला हुंडा नको' असे म्हणणे जवळपास मुलाचे असलेले/नसलेले व्यंग लपविण्याचा प्रकार मानतात.>>
हे फक्त मराठा समाजातच आहे असे नाही. तशा प्रकारच्या अपेक्षा नसणे = मुलामधे काहीतरी कमी आहे असा अर्थ घेतला जातो, हे मी पाहिलं आहे.

>> पण माझ्या माहितीत, एका मुलीने, नवर्‍याचे हट्ट
अनावर झाल्यावर, लग्नमंडपातच आव्हान करुन, जो तरुण लग्नाला तयार झाला, त्याच्याशी तिथल्या तिथे
विवाह केला. दोघे सुखी आहेत. >>
आमच्च्या एका बिहारी मित्रानेही आज असाच एक प्रकार झल्याचं सांगितलं.

दुसरं एक..

आमच्या ओळखीच्या एकांच्या घरी, त्यांनी एका मित्राच्या मुलाला पेईंग गेस्ट ठेवलं होतं. वर्षभर तिथे होता.
इंजिनीअरींग करत होता. त्याचं त्यांच्या मुलीबरोबर प्रेम जमलं. ते काकाकाकू साधे होते. त्यांनी मुलाच्या आईबापाशी बोलून दोघांचं लग्न जुळवलं, पत्रिका छापल्या. आणि ह्या ह%^खोराचा बाप ऐन वेळी म्हणे काहीतरी पाचदहा लाख पाहिजेत. आणि त्याचा पोरगा लेकाचा मुगाचे लाडू गिळून बसला.

ह्यांनी लग्न मोडलं. दुसरीकडे लग्न करून ती मुलगी आता सुखी आहे...
इतके शिकूनही भिकारीपणा कसा जात नाही हे समजत नाही. आणि साध्या सरळ लोकांच्या मागे असे त्रास लागतात.

आता ३० च्या आत असलेल्या मायबोलीकरांना विचारावेसे वाटते.
समाजभान, किंवा खर्‍या अर्थाने नागरीकशास्त्र आपल्या अभ्यासक्रमात होते का ?

माझ्यावेळी तरी नव्हते.
त्यामूळे शिक्षणाने, असे भान येईल, असे गृहीत नाही धरता येत.

दिनेशदा, तुमचं म्हणणं नक्कीच चूक नाही.

पण तुम्ही 'शिकून' ह्या एका शब्दावर जाऊ नका. मला इतकंच म्हणायचं होतं की शिकताना/ शिकून झाल्यवर पुस्तकामधून किंवा चार ठिकाणी फिरुन वेगवेगळ्या लोकांना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर काय चूक आणि काय बरोबर ह्याची सहसा जाणीव होऊ लागते. कसं वागावं ह्याबरोबर कसं वागू नये हे समजतं. तरीही यांचं वागणं असं त्रासदायक कसं असावं? असा प्रश्न पडतो.

फक्त शिकूनच हे भान येईल असं मला म्हणायचं नाहीये.

bayako.jpg
.
.
.
.
अशी सजवतात दक्षिणेकडचे लोक मुलीला..........आता करा विचार ....

नाही, ऋयाम मी त्या अर्थाने नाही लिहिलेय.
स्त्री पुरुष समानता, स्वाभिमान, व्यसनांचे दुष्परिणाम हे विषय कधी आपल्या अभ्यासक्रमातच नव्हते.
राष्ट्रपतिपदासाठी लागणारी पात्रता, राज्यसभेतील सदस्यसंख्या असेच विषय होते नागरीक शास्त्रात.
जर आपल्या मनावर लहानपणापासुनच हे संस्कार झाले असते, तर आजच्या तरुणांची मानसिकता
बदलली असती ना !
पुर्वी वरदक्षिणा नावाने, हुंडा हा होताच. पण ते चूक आहे असे सांगणारा एकही धडा आम्हाला नव्हता !
सध्या तर जितके जास्त शिक्षण तेवढे त्याचे मोल चढे, असा प्रकार आहे.

अर्थात पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे स्त्रीभृणहत्या हि १९७० नंतर जास्त प्रकर्षाने होऊ लागली. त्यानंतर
अभ्यासक्रमात काही बदल झाले का ? ते विचारायचे होते.

आमच्या वेळी शिक्षणात हे सगळे नक्कीच होते, किंबहुना या घातक रूढींविरुद्ध लढणार्‍या बहुतेक समाजसुधारकांवर धडेही होते.

चांगली चर्च्या चालु आहे.. काही काही पोस्ट खरेच खुप विचार करायला लावणार्‍या आहेत.. लिंबुची पोस्ट अंगप्रदर्शनाचा मुद्दा सोडुन छान..:)
दुर्दैवाने माझ्या लग्नात मी डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट हुंडा घेतला आहे..:(

कालच्या लोकसत्ताच्या, लोकरंग पुरवणीत संजय पवार यांचा, याच विषयावर "सामाजिक प्रश्नांचं बाजारमूल्य वाढतंय?" असा एक समर्पक लेख वाचण्यात आला.

या लेखाशी मी तरी सहमत आहे!

मला लेखाचा मुद्दाच कळला नाही. आपल्याला दृष्टीग्गोचर होणारी (पैशाची रक्कम, कामाचे तास) मदत चालते. आमिर खानने त्याच्या पैशातून देणगी दिली असती तर चाललं असतं, किंवा कुठे जाऊन श्रमदान केलं असतं तर चाललं असतं. इथे तो त्याचं स्वतःचं सेलेब्रिटी स्टॅटस वापरतो आहे तर त्यात काय अडचण आहे? प्रश्न अधिकाधिक जनतेच्या नजरेत, चर्चेत आणला जातो आहे, सरकारी सूत्रं हलत आहेत तर चांगलंच आहे की.

मी तीनही भाग पाहिले. जे प्रश्न सोडवायची सुरुवात सामान्य माणूस आपल्या घरापासून करू शकतो असेच विषय निवडलेले दिसत आहेत. कार्यक्रमाचं सादरीकरण विषयाचा गांभिर्याला न्याय देणारं आहे. मला कार्यक्रम आवडला. आमिर आणि संपूर्ण टीमचं काम अभिनंदनीय आहे.

फारेंड,
मलाही अगदी वाटलं त्या मुलीनी ९११ का नाही डायल केला ? कि तिला काही म्हणजे काहीच माहित नव्हतं अमेरिके बद्दल ? आल्या आल्या हाउस अरेस्ट मधेच गेली का ?
पण घरी फोन करत होती म्हणजे तिला फोन ला अ‍ॅक्सेस होता, सोशल ऑर्गनायझेशन्स ना नंबर शोधून कॉन्टॅक्ट केलं म्हणजे कदाचित नेट ला अ‍ॅक्सेस पण असेल, तरी इतक्या उशीरा हालचाल केली ?
जाउ दे, पण अशा अनेक केसेस अमेरिकन पंजाबी लोकां कडे पाहिल्यायेत , अगदी जवळून .. हाउस अरेस्ट, फिजिकल अ‍ॅब्युज, हुंडा वगैरे.. अगदी शिकलेल्या कमावत्या मुलींनीही ९११ डायल नाही केलाय, त्यामुळे सोडून दिलं..
फ्रिमॉन्ट च्या एका सरदारनीने मात्रं लोकल अमेरिकन चॅनल्स , मिडियाला बोलावून नावर्‍याला चांगला धडा शिकवला होता :).
बाकी बा.फ. वर काही यशस्वी लोकांनी हव्या तशा गाड्या वळवल्यायेत, अंग प्रदर्शन , हिंदु मुस्लिम वाद .. काहीही !

कोमलने ९११ डायल करायला हवा होता. या नात्यात राहणे, न राहणे हा विचार इतक्या महिन्यांमध्ये होणे अपेक्षित आहे पण त्या परिस्थितीची कल्पना आत्ता तरी मला करता येत नाही. भारतात दर मिनिटाला १ हुंडाबळी हे प्रमाण भयानक आहे. यापेक्षाही जास्त असेल खरेतर. काही मुलींची गर्भातच हत्या होते तर काहींची अश्याप्रकारे...........भयानक आहे. बोलती बंद!
माझी एक राजस्थानी मैत्रिण तिच्या नवर्‍याकडून मार खाते (अमेरिकेत). हे बोलता बोलता सहज सांगूनही जाते. मला राग तर आलाच पण असे कसे सहन करतेस या प्रश्नावर तिने सहजपणे उत्तर दिले, " त्यात काय मोठे? नवरा मारायला लागला की मुले (जी लहान आहेत) घाबरून जरा कोपर्‍यात बसतात, फारतर घराबाहेर पळून जातात, चार दोन दिवस शांत शांत जातात मग रुटीन सुरु. आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलय ना, आता सहन करायलाच हवं." तिचा नवरा हा आपल्या सगळ्यांनाच माहीत असलेल्या कंपनीच्या मोठ्या पदावर काम करतो.

मैना,
मी पण माझ्या मैत्रीणीला ९११ डायल करायचा सल्ला दिला होता पण तिला काही करून पंजाब मधे परत जायचे नव्हते आणि त्यापुढे तिला मार खाणे, हाउस अरेस्ट, स्वतः कमवत असून पैशा पैशाचा नवर्‍याला हिशोब देणे, फोन करायचे प्रिव्हिलेज नाही, रात्री अपरात्री नवर्‍यानी तिला घरा बाहेर काढणे सगळे मंजुर होते Uhoh

भारतात दर मिनिटाला १ हुंडाबळी
<< दर मिनिटाला ? कि तासाला ? दर मिनिटाला एक लग्न पण होतं कि नाही कनफ्युजन वाटतय मला..
कालच्या प्रोग्रॅम मधे तासाला ऐकल्या सारखं वाटतय !

माझी एक मैत्रिण यातून गेलीये. हुंडा हा मुद्दा नव्हता, नवर्‍याचे दुसरीकडे अफेअर आणि तिला घरातच आणून ठेवलेली होती. दोघे मिळून हिला छळायचे. ही इतकी घाबरलेली होती त्या काळात आणि मानसिक खच्चीकरण असे होते की ९११ ला फोन करायची पण भिती वाटायची तिला. सुचायचंच नाही खरंतर. नंतर तिचं तिलाच नवल वाटलं होतं स्वतःचं.

वर दिनेशदा आणि ऋयाम यानी 'शिक्षणा'चा छान मुद्दा छेडला आहे. आमच्यावेळी 'पदवीधर' वराला बर्‍यापैकी मान होता [म्हणजे वधूकडील मंडळी त्याची ती भव्य डिग्री पत्रिकेत मुद्दामहून छापत असे, हे दाखविण्यासाठी की आपल्या मुलीला इतकी मोठी पदवी घेतलेला नवरा मिळाला. एक वाघ्या तर बी.ए.च्या दुसर्‍या वर्षातच फेल झाल्यामुळे त्याने शिक्षण सोडून कुठलातरी आय.टी.आय. टर्नरचा कोर्स करून उद्यमनगरात नोकरी करीत होता. तरीही त्याच्या लग्नाच्या पत्रिकेत "चि.वसंत, बी.ए.पार्ट-२" असे गौरवाने छापण्यात आले होते.]

आजच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा (....मुलींचाही) वारू चारी दिशांनी उधळला गेल्याचे दिसत्ये. ज्या डिग्र्या/डिप्लोमे कधी आम्ही ऐकल्याही नव्हत्या त्या घेऊन वारेमाप मुलेमुली दिसत आहेत. पण इतके भव्यदिव्य 'शिक्षण' घेतले म्हणजे यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ झाल्या असे काही चिन्हे (दुर्दैवाने) दिसून येत नाही. जितकी पदवी बहुरंगी तितका लग्न बाजारातील त्याचा भाव वधारला की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे.

मुलीदेखील उच्च शिक्षण घेऊन या प्रथेला तयार होताना दिसतात त्यावेळी तर कुटुंबाची हतबलता प्रकर्षाने जाणवते. एम.बी.ए. झालेली मुलगी लाखाच्या घरात हुंडा, सोने, लग्न करून देणे अशा बाबी बैठकीच्यावेळी चालू असतात त्यावेळी आतील खोलीत मूग गिळून चूप बसते हे दृश्य किमान त्या पदवीला तरी शोभादायक नाही....पण परत तेच....नाईलाज.

अशोक पाटील

>>बाकी बा.फ. वर काही यशस्वी लोकांनी हव्या तशा गाड्या वळवल्यायेत, अंग प्रदर्शन ...... ,
दिपांजली जी,
अहो त्यांनी आमीरने कोणता विषय घ्यावा ते सुचवलेय. सुचविण्यात गैर काय? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणी आमीर इथल्या पोस्टी वाचून विषय ठरवणार आहे असा कोणाचाच गैरसमज नाही असे वाटते. वाटल्यास आय पी एल मध्ये नाचणार्‍या मुलींची मदत घेऊन हुंड्याचा विषय तेथील प्रेक्षकांपर्यंत आमीरने पोचवावा असे तुम्ही सुचवा. तेथे तर मायबोलीवर येणार्‍यांपेक्षा जास्त लग्नेच्छु हजर असतात.
आणि तुम्ही काय कमी यशस्वी आहात?
आता दर तासाला एक हुंडाबळी असला तर क्षम्य आणि दर मिनिटाला असेल तरच गंभीर असे कांही आहे काय? कसेही असले तरी गंभीरच ना? मग कशाला त्याचा कीस पाडताय असे आम्ही विचारतो का तुम्हाला?तर तो तुमच्या सेंसिटिविटीचा प्रश्न आहे म्हणून सोडून देतोच ना?

अशोक, मग हे शिक्षण कुठेतरी चांगला नागरीक घडवण्यात कमी पडतय, असे नाही वाटत ?
सत्यमेव जयतेचा आठव्ड्यातला एक तास आणि बाकी सर्व वेळ, त्याच त्या मालिका.
त्यात दाखवतात ते, किंवा समाजात होतय ते चूक आहे, हे मनावर बिंबवणे, शैक्षणिक संस्थात सहज
शक्य आहे, कि नाही ?

मोठ्या मोठ्या गप्पा करणारे की आम्ही ह्याच्या विरोधात, त्याच्या विरोधात असे बोलणारे कितीतरी लोकं अजुन तश्याच रोजच्या दिखावा पद्ध्तीने लग्न करतात.. कायच्या काय खर्च, मानपमान, काय ती देवाण घेवाणाची यादी. शिकलेली लोकं सुद्धा. देणारे व करणारे असले तर घेणारे काय कमी असतात?

मी अशी एक पाहिलीय मुलगी, समाज सेवा हा विषय घेतलेली मुलगी जी हुंडा वगैरे विरोधात भाषणं ठोकायची, तिने तीन दिवस हॉटेल बूक केलेले... काय तो खर्च नवर्‍याकडच्या लोकांचा.. विचारले तर क्या करुं मां बाबा नही मानते. मै एकलोती हूं और वोह(मा-बाबा) कहते शादी तो एक ही बार होती है.. मै भला ही इस मे काम करु लेकीन हम लोगों को पता है ना कैसे हॅंडल करना.. Sad

मग सहा महिन्याने हिलाच केस करून डिवोर्स घेवून बाहेर पडायला लागले होते लग्नातून. का तर ... रोजचे सासूचे नखरे सम्पलेच नाही लग्नानंतर...
त्यामुळे असे बोलणारे एक व करणारे वेगळे लोक पाहिले की आश्चर्य वाटतं.
हे लोकं क नाही स्वतःपासून सुरुवात करत व अश्या खर्चाला विरोध करून रजिस्टर्ड लग्न करत? का असल्या खर्चिक व दिखावू वृतींना लगाम देत? हाच प्रश्ण पडतो. त्यामुळे अश्या लोकांच्या बाबतीत असे काही झाले की दया एवजी किव वाटते. स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक नसले तर दुसरे काय होणार? तुम्ही आधी लालूच निर्माण करणार. मग भोगावे लागणारच ना?
मला खर्च झेपणार नाही/झेपत असेल तरी करणार नाही, लग्न करायचे अस्ले तर कर नाहीतर जा उडत असे सांगितले तर बंद होतील गोष्टी; कमीत कमी शिकलेल्या, स्वतःच्या पायवर उभ्या असलेल्या मुलींनी तरी ताठपणा दाखवला तर कमी होतील ह्या गोष्टी.

हि गोष्ट २ वर्षापुर्वीची आहे.

>>समाजात होतय ते चूक आहे, हे मनावर बिंबवणे, शैक्षणिक संस्थात सहज
शक्य आहे, कि नाही?>><
सहज शक्य मुळीच नाही.

संस्कार फक्त शैक्षणिक संस्थांमधूनच करायचे? तेथे तर मुख्यतः पुस्तकी शिक्षणच दिले जाणार. सभोवालताली घडणार्‍या घटनांमध्ये जर 'असत्यमेव जयते' असे दिसून येत असेल तर शैक्षणिक संस्थांमधून 'सत्यमेव जयते' शिकवण्याचा प्रभाव पडू शकत नाही हेच सध्या सिद्ध होते आहे.
शेजारच्या बाकावरचा कॉपी करत असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असेल आणि तो उत्तम रितीने पास होतांना दिसत असेल तर 'कॉपि करू नये' ही शिकवण यशस्वी होईल का?
सध्या शाळांम्धून संस्कारांचा विषय असतो असे म्हणतात. असे संस्कार शाळांमधून करायचे प्रयत्न करू नयेत असे माझे म्हणणे नाही. त्या सम्स्काराना सुसंगत कृति जर समाजात दिसत नसेल तर त्याम्चे तीन तेरा वाजले नाहीत तरच नवल!

माझ थोडस वेगळ मत मांड्तो. आणि मला पुर्ण कल्पना आहे कि हे मत मांडल्याबद्द्ल सर्व खुप लोकांच्या टिकेचा बळी व्हावे लागेल. पण मला त्याची पर्वा नाही. मी लग्न केलेच तर दाबून हुंडा घेऊन करणार आहे.

माझ्या आई बाबांचे लग्न हुंडा न देता घेता झाले. दोघांनीही खूप खस्ता खाऊन मला आणि माझ्या मोठ्या भावाला उच्च शिक्षण दिले.

या दरम्यान माझे वडील वारले. आईला ब्लड प्रेशर, डायबेटीस ई ई दुखण्यांनी हैराण केलेले आहे.
माझ्या मोठ्या भावानी कर्ज काढून चांगला मोठा फ्लॅट बूक केला (कर्जाचे हफ्ते २० एक वर्ष आरामात चालतील). त्याच्या लग्नाच्या बोलाचाली वेळी हुंडा ई ई विषय आमच्या पैकी कुणाच्या ही डोक्यात नव्हते. लग्न तस सधन घरातील पण दुसर्या शहरातील मुली बरोबर ठरले. मुली च्या घरच्यांनी हुंडा ई ई बद्द्ल बोलणी चालू केल्यावर आम्ही स्पष्ट पणे सांगितले की आमच्या काहीही अपेक्षा नाहीत. कोर्ट मॅरेज पण चालेल. पण मुली च्या घरच्यांना भारी हौस म्हणून त्यांनी थाटानी लग्न लावून दिले. बरेचसे दागिने मुलीला आम्हीच केले. मोठा भाऊ आणि ती वेगळ्या शहरात छान घरात राहू लागले. भाऊ दिवस भर नोकरी निमित्त बाहेर. मुलगी उच्च शिक्षित असून आणि आम्ही नोकरी करयला उत्तेजन देत असून ही घरीच राहीली. लग्नानंतर पाच महिन्यांनी मुलगी परत माहेरी गेली. काही महीन्यांनी तिने घट्स्फोटा साठी अर्ज केला. कारणे अशी दिली कि मानसिक छळ, ऊपाशी ठेवणे ई ई(आता माझा भाऊ दिवस भर नोकरी करून आल्यावर रात्रीच्या जेवणा साठी रोज हॉटेलात घेऊन जायचे ही अपेक्षा असल्यावर रात्रीचा स्वैपाक करणे हा छळ्च नाही का?)

आता गेले दोन वर्ष तारखांवर तारखा पडतायत. वकिलाचा खर्च, दर महिन्याला रजा टाकून दुसर्या शहरात आजारी आईला घेऊन जायचा त्रास. वर परत सगळे कायदे असे आहेत की मुली च्या घरचे पैसेवाले असूनही, माझ्या भावालाच त्यांना २०-२५ लाख आणि घरातील अर्धा हिस्स (कर्जाचे हफ्ते तोच फेडणार) द्यावा लागेल अशी पाळी आली आहे.

दर वेळी त्यांच्याशी बोलल्यावर आणि ते जात असलेल्या नरक यातना ऐकल्यावर रक्त अगदी खवळून उठत. तेव्हा पासून ठरवल .. एक तर लग्न करायचच नाही, किंवा केल तरी हुंडा घेऊन करायच. म्हणजे उद्या लग्न मोडल तरी आपल्या कडे काहीतरी देखील पैसे उरतील.

दुष्यंता , आता इथल्या शकुंतला तुला टोचून खातील बघ... हे असेच काहीसे अनुभव मीही इथे मांडले होते, तेंव्हा मलाही इथे हैराण करून सोडले होते.

असो.. तुझा निर्णय तूच घेणार आहेस. त्यामुळे कुणाची काळजी करु नकोस. पुलं नी लिहून ठेवलं आहे , 'बेंबट्या, जगात कुंभार कमी आणि गाढवंच फार.' तुला काय व्हायचे ते तूच ठरवणार .. Proud

Happy तुझे वैवाहिक जीवन तुझ्या मर्जीप्रमाणे आणि सुखाचे जावो, या तुला शुभेच्छा...

बाकी, ५० व्या मिनिटाला एवढी जिगरबाज पोस्ट लिवलीस.. काय म्हणावे तुझ्या धाडसाला? Biggrin

( ता क - हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे त्याचे समर्थन करु नये.. पण सा सू सासर्‍यानी प्रेमाने काही भेट म्हणुन दिले तर ते आन्ण्दाने घ्यावे.. Proud )

--- जागो गाढव प्यारे !

दुष्यंत, माझी एक मैत्रीण आहे जी हुंडा द्यायला तयार आहे, मागाल तितका. कारण तिनेही ठरवले आहे, की लग्नानंतर सासू-सासरे व इतर सासरच्या मंडळींना जमेल तितका त्रास द्यायचा. जमल्यास पोलिसात गुन्हा बिन्हा ही दाखल करायचा. कारण तिच्या मोठ्या बहिणीला सासरच्यांनी फार त्रास दिला म्हणे. तर ही मुलगी तुमच्यासाठी परफेक्ट वाटतेय. अगदी मेड फॉर इच अदर च म्हणा ना.. आहात का तयार?

Pages