"सत्यमेव जयते" भाग ३ - (Marriage Or Marketplace?)

Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39

आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्‍या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..

सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएन्ड , धन्यवाद चांगली फोड केली आहे.

<<"तुम्ही आम्हाला इतके इतके पैसे द्या, त्याबदल्यात आम्ही तुमच्या मुलीचा प्रेमाने सांभाळ करू" >>
Biggrin अतिशय हास्यास्पद वाक्य आहे हे.
संभाळ करायला बालविवाह होतायेत का ?
मुलीच्या आईवडीलांना मुलगी संभाळता येत नाहीये म्हणुन पैसे देऊन सासरच्यांना तिला संभाळायला देतायेत की काय ? Biggrin

<<हुंडा देऊन आधीच आपली आत्मप्रतिष्ठा कमी करू नये, नंतरच्या उसन्या अवसानाने त्याची भरपाई होणार नाही.>>

हे उपाय भरपाई करण्याचे किन्वा सासरच्यांना अद्दल वैगेरे घडविण्यासाठी अजीबात नसून केवळ आणि केवळ मुलीच्या सुरक्षिततेसाठी आहेत.
हुन्डा मागून घेतला म्हणाजेच 'ठिणगी' पडलेली आहे. अता त्या ठिणगीने 'वणवा' पेटणार आहे, का नुसतीच धुमसत रहाणार आहे , का ठिणगी विझून जाणार आहे ह्याची कलपना वेळ गेल्याशिवाय येणार नाही.
त्यामुळे उद्या आग लागली आणि भाजल्यावर मग जागे होण्यापेक्षा आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन आधीच सावधपणे योग्य उपाय योजना करणे हाच मार्ग आहे.

<<माझ्या कल्पनेतल्या आदर्श सहजीवनात शोषण, अविश्वास, स्वार्थ आणि संशय याला जागा नाही,>>
कोणाच्याच बसणार नाही. पण हे जग आदर्श लोकांनी ठासून भरलेले नाही. वास्तवात जगा. आणि वास्तवात सुरक्षित जगण्यासाठी सावधानता बाळगणे जरूरी आहे Happy

समाजात लग्नानंतर मुलीने मुलाच्या घरात जाऊन राहणे व मुलाचे आडनाव लावणे याच प्रथा आधी बंद झाल्या पाहिजेत. त्यामुळेच वरपक्ष स्वताला वरचढ समजतो व मुलगी म्हणजे परक्याचे धन असले विचार समाज करतो. त्यापेक्शा मुला-मुली दोघानी लग्नानंतर स्वताच्या नविन घरात रहाणे, व त्या घरास आवश्यक असणारे सामान किंवा पैसे दोन्हीकडच्या नातेवाइक मित्रमंडळी यांनी आहेर समजुन द्यावेत. स्वताच्या आई-वडिलांचा सांभाळ करणे व ते देखिल हक्काने याची संमति मुलीलादेखिल मिळायला हवी. सासु-सासरे यांची सेवा केली तर सुन चांगली, पण त्याच सुनेने स्वताच्या आई-वडिलांच्या प्रक्रुतीची काळजी केली तर मात्र काय सारखी माहेरची आठवण काढते असे बोलु नये. परंतु हाच न्याय मुलाबाबत लावला जात नाही, त्याने त्याच्या सासु-सासर्याची सेवा करने जास्त प्रशस्त समजले जात नाही. मुलिच्या आई-वडिलांनि काय कमी खस्ता काढलेल्या असतात मुलीला वाढवताना.... त्यांना देखिल त्यांच्या म्हातारपणी आधाराची गरज लागतेच किंबहुना जास्तच कारण आधीच मुलाकडच्यांनी त्यांचा पैसा हुंडयाच्या रुपाने लुटलेला असतो.......

आपल्या समाजात एखाद्याला नुसत्या मुलिच असतील तर अरेरे किती बिचारे आहेत हे लोक, तेच जर फक्त मुलगेच असतील तर वा वा काय भाग्य आहे यांचे......आमच्या शेजारी राहत असलेली वरमाय नुसत्या मुली असणारी स्थळे नको सांगते कारण काय तर म्हणे यांच्या आई-वडिलांना सांभाळायची जबाबदारी आमच्यावर येइल म्हणजे हिच्या मुलावर, पण हिला स्वताला सांभाळायला, व हिच्या घरकामाची जबाबदारी कमी करायला मुलीचे पालक स्वताचे लेकरु हिच्याकडे राहायला पाठवणार ते देखिल भला मोठा हुंडा देउन ते या वरमाया सोईस्कररित्या विसरतात याला काय म्हणावे......

<< तो अन्याय्य असल्याचे वाटल्यास, करार नाकारण्याचे स्वातंत्र्य दोन्ही बाजूस असते. त्यावेळी ते स्वातंत्र्य न वापरता, नंतर आगपाखड करणे, हे न्यायाला धरून आहे काय? >>

हुन्डा घेणे कायदेशीर गुन्हा असून तो घ्यायचा आणि वर न्यायाची अपेक्षा ठेवायची ?? हे म्हण्जे 'बेईमानीका धंदा भी ईमानदारीसे होना चाहीये अ से झाले.

तुम्ही आम्हाला इतके इतके पैसे द्या, त्याबदल्यात आम्ही तुमच्या मुलीचा प्रेमाने सांभाळ करू" >>
अतिशय हास्यास्पद वाक्य आहे हे.
संभाळ करायला बालविवाह होतायेत का ?
मुलीच्या आईवडीलांना मुलगी संभाळता येत नाहीये म्हणुन पैसे देऊन सासरच्यांना तिला संभाळायला देतायेत की काय ? >> डेलिया १००१ मोदक!!!

"तुम्ही आम्हाला इतके इतके पैसे द्या, त्याबदल्यात आम्ही तुमच्या मुलीचा प्रेमाने सांभाळ करू" अशा स्वरूपाचे कलम या करारात अनुस्यूत असते.>>> हे वाक्य, 'मुलीचा' या ऐवजी; गाईचा, बैलाचा, कुत्र्याचा, मांजराचा असे वाचले तरी फरक पडणार नाही.

aagau+1 kamit kami paise gheun sambhal karaychya kutrya manjarala nantar jalat./marat tari nahit. It shows how much devalued girls' lives are:(

डेलिया , सगळ्या पोस्ट्स्ना +१

'कन्यादान' हा विधी लग्न समारंभातून वगळता येइल का सध्याच्या काळात या विधीचं नक्की प्रयोजन काय ? लिंबूटिंबू सारख्या जाणकारांनी प्रकाश टाका प्लीज

किंवा पुत्रदान असा विधी अ‍ॅड करता येइल काय.

अर्पणा,

>> 'कन्यादान' हा विधी लग्न समारंभातून वगळता येइल का सध्याच्या काळात या विधीचं नक्की
>> प्रयोजन काय ? लिंबूटिंबू सारख्या जाणकारांनी प्रकाश टाका प्लीज

>> किंवा पुत्रदान असा विधी अ‍ॅड करता येइल काय.

मी लिंबूटिंबूंसारखा जाणकार नाहीये. पण ऐकलेलं सांगतो. पुरूष मेला की त्याचा लिंगदेह त्याच्या बापासोबत आणि आज्यासोबत (बापाच्या बापासोबत) जोडला जातो. अंत्यसंस्काराच्या व/वा पहिल्या श्राद्धाच्या वेळी भाताचे तीन पिंड एकत्र करतात, त्यामागे हे (धार्मिक) शास्त्र आहे. तशीच बाई मेल्यावर तिचा संयोग तिच्या सासूसोबत आणि सासूच्या सासूसोबत होतो.

या दृष्टीकोनातून बघायला गेलं तर कन्यादान विधी अध्यात्मिकरीत्या योग्य आहे. पुत्रदान विधीने साध्य काहीच होणार नाही.

मात्र मातृसत्ताक समाजांत काय रीत होती ते माहीत नाही.

आ.न.,
-गा.पै.

Pages