"सत्यमेव जयते" भाग ३ - (Marriage Or Marketplace?)

Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39

आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्‍या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..

सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या मुलीला त्यातला अर्थ कळला आहे असे तिच्या चेहर्‍यावरून जाणवले नाही.>>> मला तरी तेव्हा तिच्या चेहर्‍यावरून बोलायला तुझ्या बाचं काय जातय रे या टाईप भाव दिसले. Happy

'लग्न'-विवाह संस्थाच हा प्रकारच फार ओव्हरहाइप्ड करून ठेवलाय आपल्या सो कॉल्ड भारतीय कल्चर मधे ><<पूर्ण अनुमोदन.

त्या पहिल्या मुलीचे वडिल बोलताना ऐकलंत का? म्हणे, पहिल्यान्दा मागणी पूर्ण करण्ञासाठी नकार दिला असता तरी मुलगी आमच्याकडे आली असती, आणि आता पण आलीच. आम्ही तेव्हाच नकार द्यायला हवा होता. (म्हण्जे मुलगी सुखी राहूदेत यापेक्षा मुलगी माहेरी परत येऊ नये याचे टेन्शन जास्त)

त्या पंजाबी मुलीसारखीच सेम कहाणी आमच्या ओळखीतल्या एका कुटुंबात झाली होती. ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर. एका मुलाने तिला मागणी वगैरे पण घातली होती पण तिला परदेशातलाच नवरा हवा होता. अक्षरशः पंधरा दिवसात त्यानी एका परदेशात राहणार्‍या मुलाबरोबर लग्न केलं आणि तो तिला कधीच परदेशी घेऊन गेला नाही. जवळ जवळ तीन वर्षानी फोनवरून तलाक. दैवदुर्विलास असा की ज्या मुलाला तिने ऐनवेळी नकार दिला होता तो आता परदेशात स्थायिक झालाय....

>>> 'लग्न'-विवाह संस्थाच हा प्रकारच फार ओव्हरहाइप्ड करून ठेवलाय आपल्या सो कॉल्ड भारतीय कल्चर मधे ><< हे सम्पुर्णतया अमान्य!
हुन्डा वगैरे प्रथा घाणेरड्या घुसवलेल्या आहेत हे मान्य, पण त्याकरता सम्पुर्ण विवाह पक्षी कुटुम्ब संस्थेला टाकाऊ/त्याज्य कसे काय ठरविता येईल? अन त्याकरता भारतीय कल्चरला "सो कॉल्ड" म्हणायची तरी काय गरज आहे?

'लग्न'-विवाह संस्थाच हा प्रकारच फार ओव्हरहाइप्ड करून ठेवलाय आपल्या सो कॉल्ड भारतीय कल्चर मधे !>>>

प्रचंड अनुमोदन!

मला मनापासून वाटतं आपल्या मुलीचा सासरी छळ होतोय माहित आसूनही जे आई बाप तिला सासरीच नांदायला भाग पाडतात, ती परत आली की वाटेल ते मान्य करून तिची पुन्हा सासरी पाठवणी करतात, आणि पुढे तिचं काही बरं वाईट झालं किव्हा तिनेच कंटाळून काही करून घेतलं की सासरच्यांच्या नावाने शंख करतात अश्या आई बापाला पण शिक्षा करायला हवी.

श्री.झंपी यानी 'साखरपुड्यानंतर लग्न रद्द झाले' संदर्भात आपल्या प्रतिसादात जे म्हटले आहे त्याच्या अनुषंगाने मी (अनुभवाने) म्हणू शकतो की मुंबई पुणे वगळता या गोष्टीचा अन्यत्र फार बाऊ केला जातो. अन् करणारे बहुतांशी मुलीकडीलच असतात हेही माझ्या निदर्शनात आले आहे. [ग्रामीण भागातील भटकंतीत हे मला प्रकर्षाने जाणवले आहे]. म्हणजे मुलीची थेट आई वा थोरली विवाहित बहीण वगळता गावातील अन्य साळकाया म्हाळकाया याना चघळायला एक छानपैकी विषय मिळतो. लग्न मोडले म्हणजे ते काही फक्त पैसा वा सोने या दोनच घटकांमुळे; असेच काही नसून त्या मुलीमध्येच काहीतरी खोट आहे, तिचे अमुकतमुकबरोबर प्रकरण होते ते वराकडील मंडळीना समजले.....आदी बाबीही चविष्टपणे चर्चेला घेतल्या जातात.

मध्यस्थाची मात्र अक्षरशः कुतरओढ होते.....माझी झाली होती. तोंडाला फेस आला होता आठवडाभर दोन्ही पक्षांना समजावून समजावून....आणि सारे कष्ट शेवटी गटारातच गेले. पण हरकत नाही, ती मुलगी माझ्यासमोरच लहानाची मोठी झाली असल्याने तिच्याबाबतीत मीच पुढे पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेमधील कृषि विभागात काम करणार्‍या एका होतकरू तरुणाबरोबर जवळपास विनाखर्च लग्न जमविले होते, ते एक समाधान.

पण या दरम्यान फार ठळकपणे जाणविलेली गोष्ट म्हणजे आईवडीलांची होणारी तगमग. अन्न गोड लागत नाही त्याना त्या दरम्यान. शिवाय या संबंधित मुलीला अजून दोन धाकट्या बहिणी आहेत, पुढे त्यांच्या लग्नातही "एका बहिणीचे साखरपुडा झाल्यानंतरही लग्न मोडले होते...' ही पाचर मारणारा कुणीतरी गावातीलच नारदमुनी असतो. तेही टाळायचे असल्याने एक महिन्याच्या आतच ते लग्न जमविले होते.

सुखी आहे ते जोडपे आज.

अशोक पाटील

लिंबूनाना ज्या संस्थेत/संस्कृतीत सधवेला विधवेपेक्षा, अविवाहितेपेक्षा विवाहितेला, घटस्फोटितेपेक्षा संसारी स्त्रीला, अपत्यहीन स्त्रीपेक्षा पुत्रवतीला जास्त मान(तोही सो कॉल्ड) आहे त्या संस्कृतीबद्दलच बोलताय का तुम्ही? या वाक्यातील शब्दांचे लिंग बदलले तर मात्र अचानक आश्चर्यकारकरित्या समता प्रस्थापित होते.

लिंब, "टाकाऊ/त्याज्य " हे तुझे शब्द आहेत. वरती फक्त अवास्तव महत्त्व वाढवून ठेवले आहे एवढेच म्हंटले आहे - ते सुद्धा एकूण व्यवस्थेचे नव्हे तर या काही रीतींचे.

मी काही प्रमाणात दोष हा मुलिंना सुद्धा देईन. खूपश्या मुली या होणारा त्रास आईवडीलांना अगदी गळ्यापर्यंत आल्याशिवाय सांगतच नाहीत. Sad
आणि काहीजणिंना नवर्‍यावरच्या उगिचच्या सो कॉल्ड प्रेमासाठी घटस्फोट नको असतो. काही जणी आडवं लावण्यासाठी त्रास सोसत जगतात. विशेषकरून जेव्हा नवर्‍याचे विबासं असतील तर त्यांना लग्न करता येऊ नये म्हणून. शिवाय मूल हे तर खूप मोठं शस्त्र आहे. खूप आयांना वाटतं पोरांसाठी वेगळं होऊ नये. पण वेगळं राहून जे आई बापाचं एक्स्क्लुझिव्ह प्रेम तुम्ही पोरांना द्याल तेच एकत्र राहून थोडं अवघड आहे. कारण धुसफुस.. वाद्-विवाद.. Sad

लग्न'-विवाह संस्थाच हा प्रकारच फार ओव्हरहाइप्ड करून ठेवलाय आपल्या सो कॉल्ड भारतीय कल्चर मधे >>>> +१०००० संपुर्णपणे मान्य

एवढ्या सार्वजनिक झालेल्या प्रकाराला परत वैयक्तिक , खाजगी सोहोळा म्हणणे म्हणजे दांभिकपणाचा कळस आहे

लग्न'-विवाह संस्थाच हा प्रकारच फार ओव्हरहाइप्ड करून ठेवलाय आपल्या सो कॉल्ड भारतीय कल्चर मधे
+१

तीन बहिणींपैकी मोठ्या मुलीला सासरी भयंकर जाच होत असूनही आपण परत गेलो तर दोन लहान बहिणींचे लग्न कसे जुळणार या भितीने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारी मुलगी पाहिली आहे Sad

"खूपश्या मुली या होणारा त्रास आईवडीलांना अगदी गळ्यापर्यंत आल्याशिवाय सांगतच नाहीत....."

~ दक्षिणा...हीच तर भारतीय स्त्रीची खासियत इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीने पुरेपूर जाणली असल्याने "जातीया कुठं...? कोण घेतंय हिला घरात ?" अशी गुर्मी सासरकडील मंडळी बाळगून असतात. शिवाय माहेरकडून ते परंपरावादी उपदेशामृत "जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा..." अंगात असे भिनलेले असते की, प्रत्यक्ष सासरी नरकसम वागणूक मिळत असली तरी मुलीने त्यातच सुख मानावे, हा वरतून सल्लाही वेळोवेळी मिळत असतो.

दुसरी गोष्ट ~ अशा चक्रात अडकलेल्या मुलीच्या मागे जर एखाददुसरी छोटी बहीण असली तर मग तक्रारीचे दोरच खुंटले. कारण थोरली विवाहित जर सासरच्या छळाला कंटाळून घरी आली असेल तर धाकटीचे लग्न रखडलेच म्हणा. कारण ? परत तेच...धाकटीसाठी सांगून आलेल्या वरपक्षाकडून वधूकडील घराची 'चौकशी' केली जाते (हा प्रकार तर केवळ असह्य होण्यासारखा असतो....विशेषतः छोट्या शहरातून) आणि मग कुणीतरी काड्या घालणारा वा घालणारी असतेच आजूबाजूला. तो/ती त्या मध्यस्थाला ".....धाकटी मुलगी चांगली आहे, पण म्हणजे असं बघा, ती थोरली घरात आहे कायमची....आता ती का आलीया इकडे याविषयी मी काय जास्त बोलणार नाही; म्हणजे आम्ही असं ऐकलं की, जाऊ दे.....पुढचं तुमचं तुम्ही बघून घ्या....". हे नेमक 'पुढचं' पुढे कधी येतच नाही, कारण सांगणार्‍याने त्या धाकटीच्या ताटातील दुधाच्या वाटीत तिला चांगली म्हणत म्हणत मिठाचे खडे टाकलेले असतातच.

अशा गोष्टी घडत असल्यामुळे छ्ळ सोसणारी विवाहिता आले आहे कपाळी म्हणून सोसत राहते.

अशोक पाटील

>>या वाक्यातील शब्दांचे लिंग बदलले तर मात्र अचानक आश्चर्यकारकरित्या समता प्रस्थापित होते>>
भरत
हा तर्क आवडला.

अशोक
तुमचे विविध अनुभव आणि निरिक्षणे विचार करायला लावणारी आहेत.

धन्यवाद दामोदरसुत....

नोकरीच्या स्वरूपामुळे माझा आठवड्यातील किमान चार दिवस निमशहरी भाग तसेच ग्रामीण भागातच मुक्काम असतो.....गेली कित्येक वर्षे.....संध्याकाळी ऑडिटिंगचे काम संपले की मग मी थेट गेस्ट हाऊसवर न जाता गावात जाऊन तिथे देवळातील वा पारावरील गप्पात सहभागी होतो. रात्रीचे जेवणही हलकेच असल्याने त्याचीही काही अडचण नसते मला. तिथे जमलेल्या बंधूंच्यासमवेत बोलताना भाषाही त्यांच्याच पातळीवरील वापरत असल्याने त्यानाही (माझा नोकरीतील दर्जा माहीत नसल्याने....मीही माझ्या असिस्टंट्सना वा शिपायांना तिथे न येण्याची ताकीद दिलेली असते) मी त्यांच्यातीलच वाटतो. मग एकदा का त्या पातळीवर उतरलो की मग साहजिकच आंतरसालीसारख्या हळव्या जखमा उघड्या होत जातात आणि मग त्यातील दाहकतेने मीही कधीकधी विषण्ण होऊन जातो.

सांगायचे झाल्यास जवळपास ७५% वेदना या "लग्न" या एकाच माळेभोवती गुंफलेल्या असतात.

अशोक पाटील

काहीजणिंना नवर्‍यावरच्या उगिचच्या सो कॉल्ड प्रेमासाठी घटस्फोट नको असतो. काही जणी आडवं लावण्यासाठी त्रास सोसत जगतात. विशेषकरून जेव्हा नवर्‍याचे विबासं असतील तर त्यांना लग्न करता येऊ नये म्हणून. - इति दक्षिणा

सत्यमेव जयतेचा हा एपिसोड लग्न या एका दिवसासाठी केल्या जाणा-या खर्चाबद्दल आणि त्यातून उद्भवणा-या समस्यांबद्दल होता. दक्षिणाचं निरीक्षण महत्वाचं आहेच. पण लग्न हा विषय कांद्यासारखा बहुपदरी आहे. एक एक पदर सोलत गेलं तरी संपायचा नाही.

स्त्री नव-याला घटस्फोट न देता त्रास सहन करत राहते त्या प्रेमापोटी किंवा नव-याचे मनसुबे उधळून लावण्यासाठीच असं म्हणता येत नाही. एकदा लग्न करून देतांना आईबाबांची काय अवस्था झाली, कसे पैसे जमवले, ते कसे कर्जबाजारी झाले याची तिला संपूर्ण कल्पना असते. मनात कुठंतरी बोचही असते. अशातच संसार मोडून अपयशी होऊन आईवडिलांना मानसिक त्रास व्हावा अशी मुलीची इच्छा नसते. लहान बहिणीचं कारण तर आहेच.

शेवटी ब-याच समस्यांचं मूळ लग्न या विधीशी संबंधित आहे. कदाचित तेव्हां माफक खर्च केला असेल तर आहे हा डाव मोडून आईवडिलांकडे जाणे आणि शक्य झाल्यास नव्याने दुस-या डावाचा विचार करता येणे शक्य होईल. शेवटी व्यवहार देखील महत्वाचा.

हल्ली तर लग्नाची इतकी आमंत्रणं असतात कि ती अटेंड करणं हे ही खर्चिक काम झालेलं आहे. एप्रिल आणि मे महिन्यात घरची, दारची आणि गावची मिळून किमान वीसपंचवीस लग्नं अटेंड केली जातातच. काहींना आपण, काहींना बायको शक्य असल्यास दोघेही असं करावं लागतं. हिवाळ्यातली लग्नं वेगळीच. बरं गेल्यासारखं किमान चांगलं प्रेझेंट देणं आलं. पाकिटात ५१ रू घालून देण्याची सर्वांचीच छाती होते असं नाही. अर्थात काहींना याहीपेक्षा जास्त लग्नं अटेंड करावी लागतात त्यांचा नाईलाज असतो. लग्नाला वधू वराला शुभाशिर्वाद द्यायला जाणे हा मूळ हेतू आहे हे आपण विसरत चाललो आहोत. आपल्या लग्नात प्रेझेंट न देणा-यांची पाठीमागे निर्भत्सना करणारे महाभागही कमी नाहीत. आपण खर्चात पडायचं आणि इतरांनाही भुर्दंड द्यायचा याला हल्ली लग्न म्हटलं जात असावं.

( कदाचित मायबोलीवरच लग्नातल्या प्रेझेंटवरचा धागा वाचल्यासारखं वाटतंय..)

सर्वांनी मिळून यावर विचार करायलाच हवा. स्त्री भ्रूण हत्येच्या भागानंतर एका समाजाबद्दलची बातमी वाचनात आली. मुलींचं प्रमाण कमी झाल्याने या समाजाने गर्भलिंगचाचणीवर सामाजिक बहिष्कार घातला आहे. असं करणा-यास जातीबाहेर काढण्यात येणार आहे. ही एक चांगली सुरूवात आहे.

लग्नासंबंधी असा विचार होईल का ?
स्त्रीभ्रूण हत्येचं मूळ कारण देखील लग्नच आहे हे लक्षात येतंच..

जोपर्यंत स्त्री आई-वडिल किंवा नवरा यांच्यावर अवलंबून आहे अशी धारणा आहे ( मुख्यतः त्या स्त्रीची ) तोपर्यंत असच चालणार. आई-वडिल / भाउ तरी कुठवर पुरणार?

लग्न करण्यासाठी वयानं फक्त शारिरिक वयानं सक्षम असून चालणार नाही तर मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, भावनिक इ. सर्व बाजूनं सक्षम असेल तरच लग्न करावं. पण अशी परिस्थिती येणं निदान पुढचे २० वर्ष तरी अवघड आहे.

अर्पणा,

>> ...मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, भावनिक इ. सर्व बाजूनं सक्षम असेल तरच लग्न करावं

एका अर्थी हे विधान अगदी योग्य आहे. मात्र प्रत्यक्षात या सक्षमतेच्या कसोट्या कशा ठरवायच्या?

तुम्ही इंग्लंडमध्ये राहायला असता. तुम्हाला आजूबाजूला अनेक स्वावलंबी इंग्लिश बायका दिसत असतील. किंबहुना इंग्लिश स्त्री युरोपातली सर्वात स्वावलंबी (इंडिपेंडंट) आणि बिनधास्त (बोल्ड) समजली जाते. पण तरीही कित्येकजणी लग्न करायला धडपडतात, मात्र योग्य वर काही मिळत नाहीत. पारंपारिक इंग्लिश विवाहयोजन पार नामशेष झालेलं आहे. वर शोधायची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली आहे. बायकांच्या दृष्टीने वरसंशोधन ही किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. या प्रक्रियेत तिचं वय वाढतच राहतं. मधल्या काळात कुणाशीतरी लिव्ह-इन चालू असतंच. दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं त्या नातेसंबंधालाच कवटाळून बसणं नशिबी येतं. त्यातून पोरं असली की परिस्थिती अजूनच बिकट असते. माणूस सोडून गेला की एकाकी पालकत्व निभावायला लागतं. इंग्लिश बाई विवाहास कितीही सक्षम असली तरी वस्तुस्थिती फार फार वेगळी आहे.

तर मग भारतीयांना यातून काय बोध घेता येईल, असा प्रश्न उभा राहतो.

दीपांजली म्हणतात की लग्न'-विवाह संस्थाच हा प्रकारच फार ओव्हरहाइप्ड करून ठेवलाय आपल्या सो कॉल्ड भारतीय कल्चर मधे. त्यात तथ्य जरूर आहे. म्हणजे खर्चिक लग्नसमारंभ आणि देणीघेणी अनावश्यक आहेत. मात्र विवाहसंस्था अतिरंजित (ओव्हरहाईप्ड) निश्चितच नाही. निदान आजच्या इंग्लिश मुलींवरून तरी विवाहसंस्थेची उपयुक्तता प्रकर्षाने दिसून येते.

लग्न हा आज बाजार झालाय. पण म्हणून विवाहसंस्था मोडीत काढली तर बायकांचा बाजार दुसर्‍या प्रकारे भरेल.

म्हणून मला तरी वाटतं की बायकांचा बाजार ही मूळ समस्या आहे. तिचं केवळ बाह्यस्वरूप विवाहसंस्थेचं आहे. अर्थात, हे झालं माझं मत. आपली व/वा इतरांची मते वेगळी असू शकतात.

यावर उपाय म्हणजे समाजाचा स्त्रियांविषयीचा दृष्टीकोन बदलणे. स्त्री ही अनंतकाळची माता आहे हे जनमानसात खोलवर रुजलं पाहिजे. स्त्रियांचं उत्तन अंगप्रदर्शनही थांबवलंच पाहिजे. नेमक्या याच सामाजिक जाणीवेच्या आधारे स्त्रीगर्भपात रोखता येतील.

स्त्रीभ्रूणहत्या आणि विवाहहाट दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आ.न.,
-गा.पै.

>> स्त्री ही अनंतकाळची माता आहे हे जनमानसात खोलवर रुजलं पाहिजे. स्त्रियांचं उत्तन अंगप्रदर्शनही थांबवलंच पाहिजे. नेमक्या याच सामाजिक जाणीवेच्या आधारे स्त्रीगर्भपात रोखता येतील.

स्त्रीगर्भपाताचा आणि अनंतकाळच्या मातृत्वाचा आणि अंगप्रदर्शनाचा काय संबंध?
मारझोड झाली तरी विवाहबंधनातून बाहेर पडू नये इतकी विवाहसंस्था तुम्हाला महत्त्वाची वाटते का?

स्वाती_आंबोळे,

१.
>> मारझोड झाली तरी विवाहबंधनातून बाहेर पडू नये इतकी विवाहसंस्था तुम्हाला महत्त्वाची वाटते का?

विवाहबंधन (marriage commitment) आणि विवाहसंस्था (marriage institution) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली वैयक्तिक आहे, तर दुसरी सामाजिक आहे.

२.
>> स्त्रीगर्भपाताचा आणि अनंतकाळच्या मातृत्वाचा आणि अंगप्रदर्शनाचा काय संबंध?

बाईचं उघडं अंग फुकटात बघायला मिळालं की स्त्री या गोष्टीसंबंधी आदर उरत नाही. स्त्री ही पैसे फेकून विकत घ्यायची वस्तू बनते. हे पुरुषाच्या मनात उघडपणे होत नाही तर अजाणतेपणी होतं. स्त्री ही बाजारवस्तू बनते.

एकदा का स्त्रीचं बाजारीकरण झालं की मग स्त्रीकडून फुकटात पैसा मिळावावा (विवाहहाट) किंवा स्त्रीमार्गे पैसा जाऊ नये (स्त्रीभ्रूणहत्या) असली थेरं सुचतात.

स्त्रियांचे प्रश्न केवळ स्त्रियांचे नाहीत. ते पुरुषांचेही आहेत. बघा पटतंय का ते.

आ.न.,
-गा.पै.

स्त्री ही अनंतकाळची माता आहे हे जनमानसात खोलवर रुजलं पाहिजे. स्त्रियांचं उत्तन अंगप्रदर्शनही थांबवलंच पाहिजे. नेमक्या याच सामाजिक जाणीवेच्या आधारे स्त्रीगर्भपात रोखता येतील.>>>
गापै , कुठला संबध कुठे जोडताय तुम्ही. अहो, वंशाला दिवा पाहिजे, मुलगीला कमी लेखणे, पाव एकर शेत असल तरी घराण्याच नाव टिकल पाहिजे या फाल्तु विचारांच्या पगड्यातुन मुलींची हत्या होत आहे.
त्याचा अंगप्रदर्शनाशी काय संबध?
आणि परत ते अनंतकाळची माता वगैरे स्टिरिओटाईप्स का बाळगावेत. एखादिने माता व्ह्यायच नाही अस ठरवल कि समाज बुडला का?

पुरुष अनंतकाळचा पिता आहे हे जनमानसात खोलवर रुजलं तरी कितीतरी गर्भपात थांबविता येतील. कारण निदान स्त्रियांचा आदर करायचे तरी पुरुष शिकतील.
फार अस्वस्थ वाटल हा बाफ वाचून. आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचून तर अधिकच. Sad

>>>>कारण थोरली विवाहित जर सासरच्या छळाला कंटाळून घरी आली असेल तर धाकटीचे लग्न रखडलेच म्हणा. कारण ? परत तेच...धाकटीसाठी सांगून आलेल्या वरपक्षाकडून वधूकडील घराची 'चौकशी' केली जाते (हा प्रकार तर केवळ असह्य होण्यासारखा असतो....विशेषतः छोट्या शहरा>>>><<

हा प्रकार न "समजण्यासारखा" आहे. थोरलीचा डिवोर्स झाला तर धाकटीला का प्रॉबलेम येतो हेच समजत नाही. आणि हो, छोट्या शहरात कुठे, पुण्यासारख्या मोठ्या शहरात बघितलेय. निष्कर्श हा आहे की शहर, गाव वगैरे असे काही नसतं. माणसावर अवलबूंन असते हे.
कहर म्हणजे, मोठीचा डिवोर्स झालाय म्हणजे धाकटी सुद्धा तशीच(त्यांच्यामते 'खोट असलेली') असेल अश्या कमेंट्स करणारे लोकं पाहिलीत. Sad

(स्वगतः बरं, आपण एवढी चर्चा इथे करून फायदा काय? ए. भा. प्र.)

स्त्रियांचे प्रश्न केवळ स्त्रियांचे नाहीत. ते पुरुषांचेही आहेत. बघा पटतंय का ते

एवढंच फक्त पटलं. Happy पूर्ण समाजाचेच प्रश्न आहेत हे.

बाईचं उघडं अंग फुकटात बघायला मिळालं की स्त्री या गोष्टीसंबंधी आदर उरत नाही.
अय्यो,मग काय विकतचं अंग बघायला बायकांशी लग्न करतात की काय पुरूष?

पण अनंतकाळची माता असन्याचा याच्याशी काय संबंध?
स्त्री काय फक्त मातेच्या भुमिकेतच आदरणीय असते का?

>> विवाहबंधन (marriage commitment) आणि विवाहसंस्था (marriage institution) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली वैयक्तिक आहे, तर दुसरी सामाजिक आहे.

उपरोक्त कार्यक्रमात आणि वरच्या चर्चेत याबाबत सविस्तर बोललं/लिहिलं गेलेलं आहे. वैयक्तिक बाबींच्याच सामाजिक प्रथा बनत गेल्यामुळे निघालेले धिंडवडे आहेत ते.

बाकी तुम्ही काय बोलत आहात ते अचाट आहे.

आपण एवढी चर्चा इथे करून फायदा काय? ए. भा. प्र

झंपी इथे ज्यांचं लग्न व्हायचे आहे ते तरी डोळे उघडे ठेऊन लग्नखर्चाचा, हुंड्याचा विचार करतील. आपल्या पेक्षा लहान मंडळींची लग्न करताना/ठरवताना हुंड्याचा विचार करणार नाहीत.

>>>यावर उपाय म्हणजे समाजाचा स्त्रियांविषयीचा दृष्टीकोन बदलणे. स्त्री ही अनंतकाळची माता आहे हे जनमानसात खोलवर रुजलं पाहिजे. स्त्रियांचं उत्तन अंगप्रदर्शनही थांबवलंच पाहिजे. नेमक्या याच सामाजिक जाणीवेच्या आधारे स्त्रीगर्भपात रोखता येतील>>><<

नाही पटलं. सगळी जबाबदारी पुन्हा स्त्रीवरच का? ड्रामाटीक टर्न आहे हा. सतत स्त्रीला विशेषणं देवून अडकवायचं.
स्त्री माता आहे हे कशाला भिनवायचे? त्याने नक्की भ्रुणहत्या थांबवणे कशी साध्य होणार?

आधी प्रथा व चाली-रीती बंद करा.
पुर्ण दोन वेगळे विषय इथे भेसळ झालेत. धन्यवाद!

-----------------------------------------------------

लग्नातील अवाजवी खर्च करणारी लोकांकडून आमंत्रणं आली की नकोसे वाटते लग्नाला जायला... आपल्या पाकिटाला मोठं भोक पडते. भेटी नको असे पण लिहित नाहीत लोकं. सगळा दिखावा. Proud

सासरी कितीही छळ झाला तरीही लग्न निभव,
दिलं तिथं मेली
कसंही झालं तरी यावर्षी लग्न व्हायलाच हवं
हिचं झालं नाही / मोडलं तर लहान बहिणींची लग्न कशी होणार
इ. इ. प्रकारचं कितीतरी सोशल कंडिशनिंग सिनेमा, गाणी रितीरिवाज यांतून चालू असतं. शिक्षण, क्लास याचा फारसा संबंध नसतो या विचारसरणीला. या दृष्टीनं भारतात सद्यस्थितीत असणारी विवाहसंस्था हाइप्ड आहे असं माझंही मत आहे. ज्या व्यक्तीला लग्न करायचय किंवा करयच नाहीये ती सोडून बरेच इतर लोक ( समाज ) यांत इंव्हॉल्व्ड असतात या अर्थी ते मत आहे. कोणीही लग्न करूच नये अशा अर्थान नाहीये ते म्हटलेलं.

लग्न नाही केलं तरी पंचाइत आणि केलं तरी ते 'टिकवायची' पूर्ण जबाबदारी अगदी जीवाच्या करारावर बाईचीच असणं हा प्रॉब्लेम आहे.

शेवटी लग्न का करावं / करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण बायकांसाठी वरसंशोधन किचकट म्हणता पण विवाह हा जर 'सहजीवन' या अर्थानं बघायचा असेल तर बाई आणि पुरूष दोघांनीही योग्य जीवन्साथी शोधण्यासाठी वेळ द्यावाच आणि जर दुर्दैवानं निवड चुकली आणि नंतर इच्छा असेल तर ही निवड करण्याची मुभा दोघांनाही असावी ( आजही आहे पण यांत अजिबातच समानता नाही ).
लग्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे, जीवन एंरिच करणारी प्रोसेस आहे पण (बाईसाठी )लग्न म्हण्जेच जीवन असं हॅमरिंग करणं अत्यंत चुकीचं आहे.

इंग्लंडमधे माझ्या आजूबाजूला बहुतांश लोक लग्न / रिलेशनशिप मधे सुखी आहेत, काही सिंगलसुद्धा आहेत पण त्या सिंगलपणाची अतिचर्चा, सोशल बॉयकॉट वगैरे अजिबातच पाहिलेलं नाही. एकटी बाई जीवन कोणत्याही भीती / दडपणाशिवाय व्यतीत करू शकते. भारतात अगदी शहरांतसुद्धा घटस्फोटित स्रीला असं राहणं शक्य नाही, लोकं अक्षरशः टोचून मारतात.

इंग्लीश मुलींच्या सिंगल पेरेटींग ( तेही टिनएज पेरेंटिंग ) संदर्भात मुख्य मुद्दा मोडकळीत आलेली विवाहसंस्था नसून बेनिफिट्स क्ल्चर आहे, कारण युरोपात इतरत्र विवाहाचं प्रमाण कमी असलं तरी सिंगल पेरेटिंग कमी आहे, अर्थात हा अगदीच वेगळा विषय आहे.

कोणतीही गोष्ट एक वस्तू म्हणून पाहिली की तिला मार्केट्चे नियम लागणारच. तेजी-मंदी, काळाबाजार सगळं होणार. लग्न हा बाजार आहे असं आपण म्हटलात, मला मान्य आहे ते. पण मुळ कारण म्हणजे पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीच असणार स्थान : ऑबजेक्ट, एक वस्तू . आज बायका हुंडा देतात तिथं उद्या घेतील, पण मुळ मुद्दा - स्त्रीला एक व्यक्ती / माणूस म्हणून वागवणं हा आहे, त्यासाठीच बायकांना मानसिकरित्या सक्षम होण्याची / स्वतःचं स्थान निर्माण करायची गरज आहे. आणि सध्यातरी भारतात परिस्थिती इतकी वाईट आहे की शॉक ट्रिट्मेंटचीच गरज आहे.

अपर्णा, आवडले मुद्दे.
>>इ. इ. प्रकारचं कितीतरी सोशल कंडिशनिंग सिनेमा, गाणी रितीरिवाज यांतून चालू असतं. शिक्षण, क्लास याचा फारसा संबंध नसतो या विचारसरणील>><<

+१०००

हे कोणा एकाला उद्देशून नाहीये पण,
इथेच आधी एका च्रर्चेवर कुठल्यातरी बाफवर असेच अचाट विचार बोलणारे(मोठीचा डिवोर्स झालाय तर धाकटीचा प्रोबलेम होणं सहाजिकच आहे वगैरे) लोकं पाहिलीत(सो कॉल्ड सुशिक्षित). तेव्हा शहर, गाव काय सबंध नसतोच.

Kiran.. | 23 May, 2012 - 14:१०
~एकदा लग्न करून देतांना आईबाबांची काय अवस्था झाली, कसे पैसे जमवले, ते कसे कर्जबाजारी झाले याची तिला संपूर्ण कल्पना असते. मनात कुठंतरी बोचही असते. अशातच संसार मोडून अपयशी होऊन आईवडिलांना मानसिक त्रास व्हावा अशी मुलीची इच्छा नसते. लहान बहिणीचं कारण तर आहेच. ~

किरणदा माझे पुढील विचार हे सुरवातीला ज्या तीन मुलींच्या मुलाखती दाखवल्या त्या तीन मुलींच्या उदाहरणावर आधारीत आहेत (अशाच अजून कितीतरी मुली असतील)

(१) नवर्याबरोबर अमेरिकेला जाऊन आलेली कोमल
(२) मदुराईची Lecturer निशाना
(३) ऑस्ट्रेलिया ला नवर्याबरोबर जाऊ पाहणारी परमजीत.

एक लक्षात घ्या ह्या मुली Educated आहेत........

हुंड्याचा पैसा हा मुलीचे आई वडील किवा भाऊ ह्यांनाच द्यावा लागतो. मग जर हुंडा देऊन लग्न मुलीला करायचे आहे तर मग हा सगळा आर्थिक भार आई आणि वडिलांवर का? आई वडीलांची कष्टाची कमाई, त्यांनी घाम गाळून जमवलेला कष्टाचा पैसा असे इतक्या सहज कसे काय कुणाला फुकट घेऊ द्यायचा? ह्याचा विचार ह्या मुलीनी नको करायला? आई वडीलाना कर्जबाजारी करून ह्या मुली कस काय सुखी जीवन जगू शकणार? मग ह्या मुलीना स्वार्थी का म्हणू नये?

मी आज पर्यंत असं कधीच ऐकल नाही की ह्या Category मधील एकातरी मुलीने नोकरी करून फक्त स्वतः हुंडा देण्यासाठी पैसे जमा केले आहेत. ज्या Educated मुलीना आणि मुलांना हुंडा देवून घेवून लग्न करायचे आहे त्यानी त्यांच्या हुंड्याची आणि लग्नाच्या रकमेची जबाबदारी जर स्वतः उचलली तर खुपसे प्रश्न सोप्पे होतील. जसे की मुलीना सुधा समज येईल स्वतः कष्ट करून जमवलेला पैसा आपण असा सहजा सहजी दुसर्यांना नाही देवू शकत.

मी स्वतः जेव्हा पैसे कमवायला लागले तेव्हा मला समजले की खूप कष्ट आणि मेहनत लागते एक एक पैसा जोडायला. म्हणूनच एक $ खर्च करताना सुधा मी विचार करते. माझ्या सारख्या अजून खूप जणी असतील ह्या मायबोलीवर सुधा त्या ही हेच म्हणतील....."आम्ही नाही देणार आमचा कष्टाचा पैसा असं इतक्या सहज दुसर्या कुणाला".

समाजाच्या मानसिकतेत बदल तेव्हाच होईल जेव्हा मुली स्वतःची आर्थिक जबाबदारी स्वतः उचलतील आणि स्वतःच्या कौटुंबिक जबाबदारी बरोबरच आपल्या आई वडिलांची जबाबदारी उचलण्या साठी पुढे येतील. (हल्ली मुली नक्कीच उचलतात आई वडिलांची जबाबदारी पण त्यांची संख्या अजून म्हणावी तेवढी समाधानकारक नाही आहे)
म्हणूनच सगळा दोष मुलांना आणि त्यांच्या पालकांना देऊन आम्ही सहानुभूती नाही मिळवू शकत. कुठेतरी वाटत चूक आमची सुधा आहे.....आम्ही मुली सुधा कुठेतरी कमी पडतो आहोत.

आणि म्हणूनच मला अर्पणादिच म्हणन एकदम पटते.....
~ आई-वडिल / भाउ तरी कुठवर पुरणार? लग्न करण्यासाठी वयानं फक्त शारिरिक वयानं सक्षम असून चालणार नाही तर मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, भावनिक इ. सर्व बाजूनं सक्षम असेल तरच लग्न करावं. ~

(किरणदा माझा हेतू तुमच्या किवा कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात नाही आहे. हे सगळे माझे प्रामाणिक विचार आहेत. मी चुकत असेन तर मला नक्की सांगा.....मला आवडेल)

अनन्या

आमीरच्या शो मधे एका मुलीने माझ्या लग्नाचा खर्च मीच करीन असं शेवटी बोलून दाखवलं होतं. तिचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. पण किती पालकांना आपल्या मुलीने स्वतःच्या लग्नाचा खर्च उचललेला आवडेल ?

मुलगी शिकून स्वतःच्या पायावर उभी रहायला किमान २० - २२ वर्षे जातातच. जास्तीत जास्त २५ - २६ पर्यंत लग्न उरकून घेण्याकडे सर्वांचाच कल असतो. अशा परिस्थितीत आहे हीच परिस्थिती राहिली तर लग्नाचा खर्च झेपणं तिला कितीही इच्छा असली तरी शक्य होईल का ? पूर्वी मुली शिकलेल्या नसायच्या. म्हणून चांगलं स्थळ पटकावण्यासाठी पैसे देऊ करणं यात कुठेतरी हुंडा या प्रथेचं मूळ असावं. आज शिकलेल्या मुलींनाही हुंडा द्यायला लागावं यात त्यांचा अवमानच आहे. म्हणूनच काही कारणाने या मुलींना प्रथा मोडणं शक्य झालं नाही तर किमान आपल्या मुलांना त्या दॄष्टीने तयार करणं हे पहिलं पाऊल असेल. कित्येक मुलांचेही विचार या दॄष्टीने समारात्मक असल्याचं दिसून येतं. मात्र ऐन लग्नाच्या वेळी आज्जी आजोबा / आई वडील यांचा विचार करणं, जाऊ दे, पिकलं पान आहे.. थोडेच दिवस राहीलेत.. होऊ द्या थोडं त्यांच्याही मनासारखं म्हणून प्रथा न मोडणं याला फाटा द्यायला हवं.

---------------------------------------------------------------------------

परवडते म्हणून लग्नावर खर्च करणे हा परंपरा जोपासण्याचा गुन्हा आहे. खोट्या सामाजिक प्रतिष्ठांना खतपाणी घातलं जातं. दुर्दैवाने भारतासारख्या प्रदेशात आजही शिक्षणाचं, सामाजिक जाणिवांचं प्रमाण सर्वदूर नाही. अनुकरणप्रियता आहे. अशा वेळी आमच्या आनंदाला आम्ही का आवर घालावा असे प्रश्न विचारणारे मेणबत्ती स्पेशालिस्ट घटक समाजात आहेत याचं वाईट वाटतं.

सकाळमधे तीन चार वर्षांपूर्वी एक बातमी आली होती. सकारात्मक बातमी देणारे एक सदर त्यावेळी सकाळमधे होते. एका तरूणाने सत्यशोधक पद्धतीने आपला विवाह केला. हुंडा लांबची गोष्ट झाली. लग्नामधे कुठलाही डामडौल नव्हता. मोजके लोक आशिर्वाद देण्यासाठी आले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे लग्नामधे वाचलेला खर्च त्याने सामाजिक संस्थेला दिला.

इथल्या पोष्टी वाचून कुणाला वाईट वाटलं असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. कारण माझाही त्यात सहभाग आहेच. पण इथं कुणी कथा लिहीत नाहीयेत हे लक्षात घ्यायला हवं होतं असं मनापासून वाटलं. समाजात सध्या जी परिस्थिती आहे त्याबद्दलची निरीक्षणं मांडताहेत सगळे असं मला वाटतं.

-----------------------------------------------------------------------------
@ अनन्या

अशोक पाटील आणि माझी पोस्ट तसंच दक्षिणाची पोस्ट संपूर्ण वाचली असशीलच. माझं म्हणणं असं आहे कि समाजाने आता लग्न या विधीसंबंधी विचार करायलाच हवा. एका समाजाने ज्याप्रमाणे ठराव करून गर्भलिंगपरीक्षेवर बंदी घातली तसंच कुठल्यातरी एका समाजाने लग्नातल्या अनिष्ट प्रथांवर ठराव करून बंदी घालायला हवी. लोकशिक्षण वगैरे मार्ग आहेतच पण सामाजिक बंदीइतकं कुठलंही हत्यार प्रभावी नाही. याशिवाय आणखी कुठला प्रभावी मार्ग असेल तर त्याची चर्चा आपण करूयात ...

एक विनंती

एकापेक्षा जास्त आयडीने उलटसुलट पोष्टी टाकण्याचे किमान अशा गंभीर आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या विषयांवरच्या चर्चेत टाळावे. ही एक नम्र विनंती आहे. सहकार्याची अपेक्षा आहे.. धन्यवाद.

Pages