२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो,
२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)
साठी शुभेच्छा.
तयारी भलतीच जोरात दिसते आहे.
माझा सप्रेम व सादर नमस्कार वेबमास्तर नि इतर सन्माननीय (म्हणजे सगळेच हं) लोकांना कळवा.
खा, प्या नि चैन करा (जरा मर्यादेतच).

'त्या वासंतिक वासाची वर्दळ अजून आहे, असे पुढच्या ए. वे. ए. ठि. पर्यंत वाटले पाहिजे. वृत्तांत लिहा, फोटो पण टाका, बरेच लोक मला नवीन, तेंव्हा नावे पण लिहा!!
परंतु कृपया
'भरली वांगी, मलई बर्फी, मिसळ, मासे, फदफदे'
' स्वाद घेता सांग्रियाचा पाय पडती वाकडे '
असल्या 'तरहि' गझला मात्र लिहू नका.

Happy

ओ बुवा,
कल्लोळ नका म्हणू. आम्ही नसल्यावर कसला कल्लोळ?

जोरदार गटग होऊन जाउ देत. भरपूर खा, प्या, मज्जा करा, फोटू काढा, वृत्तांत टाका Happy

मग या की तुम्ही पण. Happy

आम्ही नसताना तुम्ही करता तो कल्लोळ आणि तुम्ही नसताना आम्ही करतो ते गटग का? का? Proud

>>कल्लोळ नका म्हणू. आम्ही नसल्यावर कसला कल्लोळ?>> हेच ते. अनुपस्थितांच गार्‍हाणं (की गैरसमज म्हणू?) Wink

अजून आम्ही कुठे बसलोय बशीत? आताशी गाडी ष्ट्यॅन्डला आलीये. आता डेपोत जाऊन यील तेलपाणी करायला. मग फलाटाला लागल्यावर आम्ही चढू फणस, केरसुण्या, ट्रंका घेऊन :p

तू येणार असशील तेव्हा पुन्हा ऑर्डर करेन>> सिंडे, सप्रि येतेय बरका. गाडगिळांकडुन पुपो आणायला विसरु नका. एक मोगर्‍याचं रोप पण. वचन पाळा. Happy

जोरदार होउन जावुद्या गटग / एवेएठि.. खुप शुभेच्छा !!
भरपुर खा, प्या, धमाल करा, फोटू काढा, वृत्तांत टाका Happy

वरच्या मेन्यूत पुरणपोळी बसत नाही. पुरणपोळीबरोबर कटाची आमटी भाताशिवाय इतर काही मेन्यू असणे हा गुन्हा आहे. पुरणपोळीसाठी पुन्यांदा शिट्टीची वारी करणार.

Pages