२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चमनचे जासूस कधी घरी जातात त्याची वाट बघत >> Lol अहो त्यांना दुकान बंद करायचे आहे, लवकर जावा, ताटकळत बसलेत बिचारे.

ज्या त्या दिवशी ताजा माल आणा. आत्तापासून काय आहे? >> आमच्याईथे फक्त ज्या त्या दिवशीच ताजा माल मिळतो, मग तो माल ऊद्या घ्यायला गेलो तर तो शिळा नाही का मिळणार. म्हणून देसाई आजच जाणार आहेत. Proud

चमन सांगलीचे आहेत का? ते जावा येवा म्हणतात. >>> कुठलाही आसजो, फोक्या झोडायला काय जाते आपले. Proud

चमन नगरकर ना ? >> काय बोलून राहिले?

आताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉस्टनच्या गाडीतून वेबमास्तरही येत आहेत. नाही म्हणता म्हणता बरीच सिटं भरली की बॉस्टनच्या बशीतली.

अरे मनोरंजनाच्या कार्यक्रमाच काय करायच?.
येताना बरोबर एकतरी आयटेम (मनोरंजनाचा) घेवुन या. Happy
काही मदत लागली तर कळवा. माझा आयडि @ गमेल

अजय पण येतायत का? वा वा! चला म्हणजे कल्लोळाला क्वालिफाय होतोय कार्यक्रम. एक विमान तिकीट, वेबमास्तरांची हजेरी. Happy

निघताना बरोबर एकतरी आयटेम (मनोरंजनाचा) घेवुन या>>>>>> Lol

एकतरी आयटेम <<<< मल्लिकाचा (शेरावत अगर अरोरा-खान) फोन नंबर असल्यास सांगा कुणीतरी. आयटेम आणायचा तर खरा आणावा... Happy

प्रज्ञा९ - किती हा आवाज? इथपर्यंत ऐकू येतोय.. Proud

बारा एवेएठि नेहमी प्रमाणे जोरारारारात .. Happy

कुणी आयटेम न आणल्यास 'कुलराज' यांना आमंत्रण देण्यात येईल. समोरच्या बेसुरीची चांगली ओळख आहे... लक्षात ठेवा... Proud

देसाई,
तुम्हाला संपर्क आयडीवर ईमेल केली आहे. पत्ता कळवाल का प्लीज?

मृ निघाली का ? वा वा! सायो Proud

आम्रखंड फ्रिजात तयार आहे. अजून २ सर्प्राईज (खाण्याचे) आयटम्स आणण्यात येतील. Proud

पाव आणि पानं किती किती आणायचे आहेत?
हॉटब्रेड्सचेच पाव ठरलं ना?

देसाई, ते पान खाल्ल्यानंतर पिंका मारण्याबद्दल एक हुकूम सोडून टाका.

Pages