२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदेसाई, तीन पानी अर्जात काय लिहायचं ते लोलादीना आधी विचारावं लागेल. त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागेल. >>> वेगळा अर्ज कसा करावा?? Happy

परदेसाई, तीन अर्ज (गुलाबजामून, केरीच पन्ह, उकडीचे मोदक आणि कानवले, ह्ळ्दीच्या पानातील पातोळ्या (कोकणी पदार्थ) पाठवले. Happy

परीक्षा तोंडावर आल्यावर अभ्यास करायला घेतला की पिट्ट्या पडतो अगदी. किती त्या पोस्टी. दमले. Proud
गटगला शुभेच्छा. खा,प्या,मजा करा Happy

डिज्जे पण आलीये का? वा वा! देसाई, रेड कार्पेटची सोय करा! Proud

लोला, माझा माजी बॉस सकाळी फोन करतो म्हंटलाय. सहसा तो टांगारू नाहीये पण ह्यावेळी त्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. असो. अजून निघायला वेळ आहे त्यामुळे काही सांगता येत नाही. त्याच्या घरी जाऊन पिक अप करायचं ठरलय.

वरच्या लिस्टमधे विकु, एमु, अजय, अभिप्राला अ‍ॅड करा.
बुवा, मैत्रेयीचं ब्याकयार्ड ते देसाई ब्याकयार्ड असं रेड कार्पेट घातलंय. (देसाई- रे का ड्रेसकोड चट्टेरीपट्टेरी लेंगा नाही हे लक्षात ठेवा) Proud

Pages