२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि महत्वाचे म्हणजे पेयं वगैरे क्रुशियल जबाबदारी घेतल्यास टांग मारू नये. वेळेत येणे
आन्यथा पर्णाम ब्याकार व्हतील
-हुक्मावरुन! Proud

माझ्या घराचा पत्ता वगैरे लागेल नाही का? कुणाला हवा असेल तर मेल टाका.. मला माहित असलेल्यांना मी मेल टाकतो. vinay 1 desai @ gmail . com (गाळलेल्या जागा भरत)

जिलेबी, मलई बर्फी, आम्रखंड हे आहेच गोडात. शिवाय नात्या पण काहीतरी आणणारे. अजून एक डेझर्ट म्हणजे गोड पदार्थ जास्त नाही का होणार? पंचपक्वानांचं गटग होऊन जाऊदेत. Proud

बॉस्टनची गाडी येतेय गटगला आणि चक्क साबुदाणाखिचडी नाही. ये चॉलबे नॉ.
साखि आणाहो त्यावर बॉस्टनवासीयांचा पहिला हक्क आहे.

हे चित्र 3D आहे का? मागे (की पुढे) दोन डोळे दिसत आहेत .. "पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगति" स्टाइल ..

ह्यातली लोला अनरिअलिस्टीकली उंच आहे ..

मी असं करते..
भिजवलेला साबुदाणा, उकड्लेला बटाटा अन् शेंगदाणे कूट आणते..
देसायांच्या अंगणात साखि बनवुया Happy

च्च ! इतक्या दुरुन येणार्‍या गेश्टांना कामाला लावु नका. फ्लोरिडा, कनेटिकट ही सगळी दुरची राज्यं.

बुवा, कोंचा केक आणणार ? चीज केक का ? खूप गोड झालं. मला पावशेर मिर्च्या जास्त घालाव्या लागतील भाजीत.

आणि त्या वरच्या चित्रात भांड्यावरचं झाकण कसं धरलंय .. वाफेचं तेलकट पाणी सगळं मृ च्या डोक्यावर .. काही कंडिशनींग इफेक्ट झाला त्याचा बरा-वाईट तर त्याबद्दल लिहायला विसरू नका .. :p

चीजकेक नाही पण इथल्या बेकरीत खुपच भन्नाट (माझ्यामते अर्थात) डबल चॉकलेट केक मिळतो. पुर्णपणे चॉकलेटचा बनवलेला तो आणणार आहे. गोडायवाला फाईट देणारा हाच एक केक मला सापडलाय.
गोड मात्र असतो.

>>>> त्या मृ आणि मै आहेत
मृण काहीच करताना दिसत नाहीये मग!
>> मै च्या पाककौशल्याने अचंबित झालीये की Proud

अहो कोणाला शिक्षा देताय? वाटीभर मिर्च्या? खिचडीचं नाव बदलून रावण/कर्माची खिचडीची रेसिपी टाका. Proud

Pages