२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चलचित्र फक्त हजर रहाणार्‍यांना दाखवण्यात येईल. आणि त्यातही काही चेहरे धूसर करून दाखविण्यात येतील.. पदार्थांची प्रकाशचित्रे प्रकाशीत करण्यात येतील. Proud

आमचे येथे पान खाऊन पिंक टाकण्यास सक्त मनाई आहे. पिंक टाकायची असल्यास स्वतःची पिकदाणी आणणे सक्तीचे आहे.. Proud

हुकूमावरून..

भोजपुरी Sad
मराठीचं काय होणार?
फदफदं हा शब्द बनवणारा केवढा मोठा द्रष्टा असावा.

परदेसाई, मी तुमच्या धाग्यावर रोज हजेरी लावत असते.. आणि गटगला मी मनाने ह्जर असेन. तेव्हा चलचित्राचा लाभ द्यावा. सर्वांना त्या निमित्ताने बघता येईल. Happy

एबेडेकरने तो प्रश्न कॉपी पेस्ट करुन ठेवलाय का ? प्रत्येक गटग धाग्यावर एकच प्रश्न.

देसाई, गेल्या वेळी रेकॉर्ड केलेला मनोरंजनाचा कार्यक्रम कॉपी करुन हवाय का ?

खमंग काकडीत खोबरं?
आजच सौदिंडीयन स्टाईल आमरस कढी शिकून आलेय. उद्या पब्लिकवर प्रयोग करायची खुमखुमी आलीये Wink

सर्वांना त्या निमित्ताने बघता येईल <<<< त्यासाठी तुम्हाला तीन पानी अर्ज करून त्याच्या तीन प्रती काढून लोलादीना पाठवाव्या लागतील. निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्यांच्याकडेच असेल, आणि नकार आल्यास तो निर्णय तुम्हाला बंधनकारक राहील.. Proud

>>>त्यासाठी तुम्हाला तीन पानी अर्ज करून त्याच्या तीन प्रती काढून लोलादीना पाठवाव्या लागतील
तीन प्रती का? प्रत्येक आयडी करता का? Proud

तीन पानी अर्ज?? एवढ काय लिहायच त्या मध्ये???
तीन प्रती कोणाला?? लोलादी एकच आहे ना??
आमच्या ईकडे तीन मा.बो. करनी आहेत.

लोलादी किती आहेत ते ए.वे.ए.ठि. ला आलात तर कळेल. Happy
मॅक्स्,
डुआयडीने नको घेवुस विसा. अज्याबात मिळणार नाही. Happy

भाई Happy
बुवा, आतातरी ठीकाण अपडेट करा की 'देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात' Happy

तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा Happy खाप्यामजाकरा Happy

Pages