सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

Happy

दामोदरसुत,

अजून लेख वाचला नाही पूर्णपणे! पण तरीही आपले अभिनंदन. याला खास कारण म्हणजे मराठीतल्या आघाडीच्या वृत्तपत्रांत (लोकसत्ता, मटा, सकाळ) आजच्या जालावृत्तीत (२६ फेब्रुवारी) स्वातंत्र्यवीरांवर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकही बातमी नाही. लोकमतात खाली त्यांच्या नागपुरातल्या एका भाषणाचा उल्लेख आहे. त्या वृत्तात सावरकरांची पुण्यतिथी २६ फेब्रुवारी असे सूचित केले आहे.

शेवटी आपल्यासारखे सामान्यजनच त्यांना न्याय मिळवून देणार यात शंका नाही. Happy

आ.न.,
-गा.पै.

माहितीबद्दल धन्यवाद! स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन!!!

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादाराची होळी केलेल्या व १४ वर्षे अनन्वित यातना व छळ सोसत तुरूंगवास सोसलेल्या अशा महान स्वातंत्र्ययोद्ध्याची भारताने जितकी उपेक्षा केली आहे तितकी उपेक्षा जगातील इतर कोणत्याही देशाने केली नसती.

अंदमान कारागृहाच्या पाडापाडीला इंदिरा गांधीचा छुपा वरदहस्त लाभला असला पाहिजे. क्रांतीकारकांची सगळी स्मृती नष्ट वा कलुषित करण्याची काँग्रेसवाल्यांची जुनीच खोड आहे. याच हलकटपणाचा चालू अवतार म्हणजे मणिशंकर अय्यर. या हरामखोराने अंदमानातल्या स्वातंत्र्यज्योतीवर कोरलेल्या सावरकरांच्या कवितेतील ओळी पुसल्या.

भारतीयांनी सावध राहणे किती जरूरीचे आहे हे यातून कळते.

-गा.पै.

सरकारचे अभिनंदन.. स्वातंत्रवीरांची आठवण ठेवण्यासाठी आणि या वीराना ताम्रपत्रे वगैरे देण्यासाठी काँग्रेसने चांगले प्रयत्न केले. अभिनंदन. जे पाडले नाही,ते स्मारक झाले योग्यच, पण जे पाडले गेलेले आहे, तिथे हॉस्पिटल करावे किंवा आधीच केले असेल तर त्याला सवरकरांचे नाव द्यावे.

मणिशंकरान्नी ज्या ओळी खोडल्या त्यात नेमके काय लिहिले होते? ओळी पुसल्या म्हणजे नेमके काय केले? त्या ओळी खडूने लिहिल्या होत्या का? स्वातंत्र्यज्योत किती मोठी आहे? त्यावर किती ओळी मावू शकतात?

स्वातंत्र्यविरांना आणि त्यांच्या कार्याला अभिवादन.

त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या.
----- बंगालींचे क्रांतीकारकांचे प्रमाण खुप जास्त होते... या मधे सामान्य गुन्हेगारही होते?

अंदमान त्याकाळातल्या ब्रिटनचे ग्वांटानामो होते कां? कारागृहासाठी अंदमानचीच निवड होण्याचे कारण काय होते?

*संपूर्ण जेल पाडून टाकणार होते. पण जनतेच्या दबावामुळे निदान तीन (अडीच असे कांहींचे म्हणणे आहे.)तरी विंग्ज वाचल्या आहेत. उरलेल्या भागात गोविन्दवल्लभ पंत-हॉस्पिटल बांधले आहे.
*उदय, मी दिलेल्या आकडेवारीत फक्त क्रांतिकारकांचा समावेश आहे. इतर गुन्हेगारांचा नाही.
१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिकांना मुख्य भूमीपासून १००० किमि पेक्षा जास्त अंतरावर नेऊन बंदिस्त केल्यामुळे त्यांची लढण्याची शक्तिच नष्ट केली गेली. त्यांनाच वेठबिगारापेक्षा वाईट वागवून अंदमानातील मजूरांचा प्रश्न सोडवला गेला. त्यांना अंदमानातील व्हायपर आयलंडवरील तुरुंगात ठेवले होते.
नंतर १८९६ मध्ये सेल्युलर जेल बांधायला सुरुवात झाली. 'माझी जन्मठेप' आपण जरूर वाचावे.
'माझी अंदमान यात्रा'लेख वाचण्यासाठी
http://damodarsut.globalmarathi.com/4856415133652724709 ला` भेट द्य.

>>> मणिशंकरान्नी ज्या ओळी खोडल्या त्यात नेमके काय लिहिले होते? ओळी पुसल्या म्हणजे नेमके काय केले? त्या ओळी खडूने लिहिल्या होत्या का? स्वातंत्र्यज्योत किती मोठी आहे? त्यावर किती ओळी मावू शकतात?

अंदमानात स्वातंत्र्यस्तंभ उभारण्याचे काम सुरू होते. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यातील भारतासंबंधी देशभक्तीपर काही ओळी कोरण्याचे ठरले होते व त्यानुसार काम सुरू होते. दरम्यान मे २००४ मध्ये केंद्रात युपीएचे सरकार आले. त्यात मणिशंकर अय्यर हा कट्टर सावरकरद्वेष्टा मंत्रीमंडळात होता. त्याने सत्ता हाती आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यातील ओळी कोरण्याऐवजी गांधीजींच्या पुस्तकातील काही ओळी कोरण्याचे फर्मान सोडले. गांधीजींचे कार्य हे सावरकरांच्या कार्यापेक्षा अनेकपटीने महान असल्यामुळे त्या स्तंभावर सावरकरांच्या ऐवजी गांधीजींचीच वाक्ये असली पाहिजेत असा युक्तीवाद त्याने केला व त्यानुसार सावरकरांच्या ओळी काढून टाकून गांधीजींची वाक्ये टाकून तो स्वातंत्र्यस्तंभ बसविण्यात आला.

गांधीजी व सावरकर या दोघांनीही आपापल्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. अंदमान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतूट नाते आहे. गांधीजी आपल्या उभ्या आयुष्यात कधीही अंदमानला गेले नव्हते. सावरकरांनी देशासाठी अंदमानच्या तुरूंगात अत्यंत भयाण अवस्थेत व अतिशय क्रूर छळ सहन करत १४ वर्षे तुरूंगवास भोगला. त्यामुळे अंदमान येथील स्वातंत्र्यस्तंभावर त्यांचीच आठवण असणे हे यथोचित होते. पण सावरकरद्वेषाने अंध झालेल्या अय्यरने आपल्या अधिकारांचा गैरवापर करून त्या स्तंभावर सावरकरांची आठवण येऊ दिली नाही.

तसे असेल तर, स्वातंत्रवीर सावरकरांच्या ओळी काढून टाकून असे का म्हटले आहे? त्याचा अर्थ पूर्वी तिथे सावरकरांच्या ओळी होत्या, नंतर त्या खोडल्या असा अर्थ होतो ना? वरती पैलवानमामानी +++ ने कोरलेल्या ओळी पुसल्या असा उल्ले ख केला आहे. खरेच नेमके काय घडले आहे का?

गांधीजी आपल्या उभ्या आयुष्यात कधीही अंदमानला गेले नव्हते.

याचा काय संबंध? आमच्या गावात रामचंद्र रोड आहे.. त्यावरुन कुठे प्रभू रामचंद्र चालले होते? Proud

आणि हाच जर नियम आहे तुमचा तर संसदेत सावरकरांचा फोटो/पुतळा लावला नाही हे योग्यच झाले नै का? कारण ते तरी उभ्या आयुष्यात कुठे संसदेत गेले होते? Proud मग संसदेत त्यांचे काही लावले नाही, म्हणून सावरकरप्रेमी गळा काढ्तता ते सगळे महामूर्खच आहेत म्हणायचे नै का? त्यान्ना एवढा नियम समजू नये? Proud

त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या.

या सर्वांची नावे का नकोत? फक्त सावरकरांचेच का?

पण सावरकरद्वेषाने अंध झालेल्या अय्यरने आपल्या अधिकारांचा गैरवापर करून त्या स्तंभावर सावरकरांची आठवण येऊ दिली नाही.

मग अंदमान विमानत्ळाला सावरकरांचे नाव कसे दिले? सावरकरांबद्दल आदर होता म्हणूनच सरकारने त्यांचे नाव दिले ना?

"त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या."
>>या सर्वांची नावे का नकोत? फक्त सावरकरांचेच का?<<
लेख वाचल्यास बर्‍याच शंका दूर होतील.
या सर्वांची नावे व ज्यांचे उपलब्ध झाले त्या सर्वांचे फोटो तेथे आहेत.
१९६९ नंतर (नेहरूंनंतर, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर २२ वर्षांनी ) या सर्वांची माहिती जमवणे वगैरेसाठी सरकारचे नाइलाजाने का होईना सहकार्य मिळू लागले. तोपर्यंत त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणुनही मान्यता नव्हती. या अनास्थेमुळे माहिती मिळवणेही कठीण होते. "दे दी तुने आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल" हेच अंतीम सत्य असल्याचे सरकारचे सांगणे होते आणि आजही त्यांना तसेच वाटते. म्हणून तर 'जोडे मारा' लायकीचे मंत्री निर्माण होतात.
या क्रांतिकारकांपैकी प्रत्येकाने देशासाठी आपल्या आयुष्याचा होम केला. ब्रिटीश सरकारने तर त्याना व त्यांच्या कुटुंबियांना छळलेच पण सत्तेवर आलेल्यांनी त्यांचा त्यागही नाकारला होता.
त्यांपैकी प्रत्येकाजवळ सावरकरांइतकी प्रतिभा, प्रगल्भता, शिक्षण, वगैरे होतेच असे नाही. किंबहुना 'माझी जन्मठेप' मुळे या सर्वांना काय यातनामय आयुष्य भोगावे लागले ते देशवासियांना कळले. काळ्यापाण्यावर पाठवल्या गेलेल्या समस्त क्रांतिकारकांचे जणु त्यांनी प्रतिनिधित्वच केले.

सत्तेवर आलेल्यांनी त्यांचा त्यागही नाकारला होता.

म्हणजे नेमके काय केले? त्यांचे फोटो तर सरकारनेच लावले.. सावरकरंच्या नावाने विमानतळ आहे. महारष्ट्रात जसे चौक, पुतळे असतात, तसे इतर लोकांचे त्यांच्या त्यांच्या प्रांतात, जिल्ह्यात त्यांचे पुतळे, रस्ते , फोटो वगैरे असनार, ताम्रपत्रेही सरकारनेच दिली, हे तुम्हीच लिहिले आहे.. सरकारने एवढे सगळे करुनही हे सर्व सरकारने नाईलाजने केले, हेच तुमचे म्हणणे असेल तर त्याल कोणी काही करु शकत नाही... काँग्रेसने हे सगळे नाइलाजाने केले तर तुमच्या लाडक्या भाजपाने असा काय उजेड पाडला? दे दी हमे आजादी, हा इतिहास जर खोटा होता तर भाजपाच्या कारकिर्दीत तो बदलला का नाही? आणि बिना खड्ग बिना ढाल, हा मार्ग ज्यांचा होता, त्यान्ना जनतेने साथही दिली.. स्वातंत्र्य मिळाले, आणि आता कुणातरी काँग्रेसच्या नेत्याचे पराक्रम त्याला जोडून त्या मार्गालाच आणि जुन्या काँग्रेसला नावे ठेवायची ही कसली वृत्ती? देशप्रेमी की धर्मप्रेमी की कॉग्रेसद्वेष्टी?

आजही त्यांना तसेच वाटते.

त्यान्नाच कशाला? कोट्यावधी देशवासियान्ना तसेच वाटते.. आणि भाजपाच्या कारकिर्दीतही हा इतिहास बदलला गेलेला नाही, याचा अर्थ तो खराच आहे, हे मानायला आता कुणाचीच हरकत नसावी.

त्यांपैकी प्रत्येकाजवळ सावरकरांइतकी प्रतिभा, प्रगल्भता, शिक्षण, वगैरे होतेच असे नाही.

याचा काय संबंध? भगत्सिंग , बाबु गेनू हे पी एच डी थोडेच झालेले होते? अंदमानात सरकार कुणा वाट्टेल त्याला थोडेच ठेवत होते? ज्यांच्यापासून सरकारला अधिक भय वाटत होते, असेच लोक तिथे असायचे.. बाकीच्यंच्याकडे प्रगल्भता होती की नाही हे माहीत नाही..

हे एक मिळाले.. http://en.wikipedia.org/wiki/Barindra_Kumar_Ghosh.. यान्नीही अंदमानातील तुरुंगवासावर पुस्तक लिहिले आहे.

>>> "दे दी तुने आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल" हेच अंतीम सत्य असल्याचे सरकारचे सांगणे होते आणि आजही त्यांना तसेच वाटते.

इथल्याही काही जणांचा हाच गोड गैरसमज आहे.

जामोप्या,

सावरकरांचा त्याग नाकारला म्हणजे त्यांची शिकवण तर दुर्लाक्षिलीच, वर गांधीहत्येचे आरोपीही बनवले. तेही त्यांच्या वयाच्या ६५ व्या वर्षी. पुढे न्यायालयात आरोप सिद्ध होऊ शकला नाही.

गांधींवर पहिला हल्ला झाला तो असफल ठरला. तेव्हा नेहरू काय करीत होते? त्यांनी त्यातून धडा घेऊन गांधींना सुरक्षा का पुरवली नाही? दुसरा हल्ला नथुरामांनी केला, जो अंती सफल झाला. नेहरू आणि पटेलांवर गांधीना सुरक्षा पुरवण्याची काहीच जबाबदारी नव्हती का? की दोघांनाही गांधी म्हणजे कबाबमे हड्डी वाटत होते? की त्यांना सुरक्षा पुरवण्यापेक्षा मरू देऊन कटात सावरकरांना अडकवणे सोयीचे वाटत होते?

आ.न.,
-गा.पै.

स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांपर्यंत (नेहरू काळ) सरकारदरबारी क्रांतिकारकाना कसलीच मान्यता न देणार्‍यांनी बंगालमधील हयात क्रांतिकारकांनी व त्यांच्या वारसदारांनी जेव्हां एकत्रित होऊन मान्यतेसाठी हालचाली सुरु केल्या तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळून काँग्रेसवर दबाव आल्यानंतरच त्यांना ती देणे भाग पडले. चार वर्षात राष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे आश्वासन दिले गेले तरी प्रत्यक्ष ते पूर्ण होण्यास दहा वर्षे लावली. जनता राजवटीतच त्या कामाने प्रगती केली. माझ्या लेखात हे सर्व आलेले आहे.
सावरकरांनीच फक्त पुस्तक लिहिले असे मी म्हटलेले नाही. पण त्यांच्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये लोकांनी अनुवाद केल्याने ते सर्वदूर वाचले गेले.
सावरकरांचे पुतळे , फोटो, चौकांची नावे इ. सरकारने नाही तर त्यांच्या चाहात्यांच्या प्रयत्नांतून साकार झाले आहेत. त्याचे श्रेय काँग्रेसला नाही. त्यांनी तर संसदेत तैलचित्र लावायलाच विरोध केला होता.

ज मो प्या,

किती समर्पक प्रश्न पडतात हो तुम्हाला ?

याचा काय संबंध? आमच्या गावात रामचंद्र रोड आहे.. त्यावरुन कुठे प्रभू रामचंद्र चालले होते?

"दे दी तुने आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल" हे गाण जर राष्ट्रपितासाठी
गात होते तर आजच्या राणेगळ सिद्धीच्या संताला
(अण्णा हजारे याना जनता प्रती गांधी समजते)
काँग्रेस अशी वागणुक का देत आहेत ?

काही अनुत्तरीत प्रश्न ....

सरकारला हॉस्पीटलच बांधायच होत तर सेल्यूलर जेल पाडायची काय गरज होती ? अंदमान मध्ये रिकामी
जमिन नव्हती की काय ?

हॉस्पिटल बांधायला तीन मजली जेल पाडणे ते सूद्धा १९६० च्या सुमारास ज्या वेळेला भारताची
आर्थिक स्थीती कशी होती हे वेगळे सांगायची गरजच नाही. १९६२ च्या भारत चीन युद्धात भारतीय सैनीक
गंजलेल्या बंदुकीनी व बूटाशिवायच लढले होते हे सर्वांना माहीत असेलच.

याचा अर्थ असा लावावा का, की सेल्यूलर जेल पाडायला सरकारकडे पैसे होते पण सैन्याला शस्त्र व
बूट घ्यायला पैसे नव्हते.

नेहरू आणि पटेलांवर गांधीना सुरक्षा पुरवण्याची काहीच जबाबदारी नव्हती का? की दोघांनाही गांधी म्हणजे कबाबमे हड्डी वाटत होते? की त्यांना सुरक्षा पुरवण्यापेक्षा मरू देऊन कटात सावरकरांना अडकवणे सोयीचे वाटत होते?
---- (मुंबई प्रांताचे) मुख्यमंत्री खेर आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांना पण या कटाची संपुर्ण माहिती होती असे जैन यांचे म्हणणे आहे. त्यांच्या जिवाला धोका आहे याची माहिती त्याकाळच्या राजकीय नेतृत्वाला होती. आधीचे हल्ले फसल्यावरही सरकार जागे का झाले नाही यामागे कारणे आहेतच.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-05-01/india/28312663_1_...

य कटामधुन सावरकर निर्दोष सुटले होते का त्यांच्या विरुद्ध काहीच पुरावा मिळवता आला नव्हता?

सावरकरांचा त्याग नाकारला म्हणजे त्यांची शिकवण तर दुर्लाक्षिलीच

कसली शिकवण नाकारली? सावरकर म्हणायचे गायी मारुन खा.. खाणार का? सरकारनं त्यांची शिकवण जोपासायची म्हणजे शाळेतून हिंदुत्वाचे लेक्चर्स द्यायचे असे काही अपेक्षित आहे का?

गांधींवर पहिला हल्ला झाला तो असफल ठरला. तेव्हा नेहरू काय करीत होते? त्यांनी त्यातून धडा घेऊन गांधींना सुरक्षा का पुरवली नाही?

हाच युक्तिवाद ग्राह्य मानायचा ठरवला तर सरकारलाच दोषी मानुन कसाबला निर्दोष सोडावे लागेल. पहिल्या हल्ला केल्यावर निर्लज्ज नथुरामाला अक्कल आली नाही का? की माणसे मारु नयेत? हातात शस्त्र नसलेल्या माणसाला मारलं.. नक्कीच महाभारतातलं शिखंडीचं कृत्य वाचून तो प्रभावीत झाला असणार.. अगदी पक्का हिंदुत्ववादी! Proud

हाच युक्तिवाद ग्राह्य मानायचा ठरवला तर सरकारलाच दोषी मानुन कसाबला निर्दोष सोडावे लागेल.
----- जामोजी खुप फरक आहे... एखादी अघटीत घटना घडल्यानंतर त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाय योजना करणे हे तत्कालीन सरकारचे कर्तव्यच आहे. अनैसर्गिक घटना (राजकीय खुनी हल्ले) टाळता येतात, तर नैसर्गिक (पुर, भुकंप) आपत्तीत कमीत कमी जिवीत हानी आणि तत्पर अत्यावश्यक मदत सेवा मला अपेक्षीत आहे.

कसाब "प्रवृत्तीने" २६-११ ला पहिला हल्ला केला, तो आपल्या दुर्दैवाने कमालीचा यशस्वी झाला... सरकार झोपले (निव्वळ झोपलो नव्हतो... तब्बल २४+ तास पुर्ण गोंधळलो होतो) होते हे सर्व जाणतात, असो. पण तशा प्रकारची पुनरावृत्ती पुन्हा झाल्यास संपुर्ण दोष सरकारलाच मिळणार. आता असे हल्ले झाले आणि ते अयसस्वी झाल्याच हल्ले करणारे थांबतील तर तो तुमचा भोळेपणा आहे. आणि यसस्वी झाले तर पुन्हा अजुन जोराने पुढच्या हल्ल्याच्या तयारीला लागतील.

गांधीवर हल्ला करण्याचा पहिला, दुसरा प्रयत्न अयशस्वी झालेत हे सर्वज्ञात आहे, मग तसे प्रकार टाळण्यासाठी तत्कालीन सरकारने काही पावले उचलायला हवी होती असे नाही का वाटत. तुम्ही जैन यांचे मत वाचले आहे का? हेर खात्याने पुर्ण बित्तंबातमी वर पर्यंत पोहोचवली होती... असे म्हणतात.

उदय, हे सुद्धा वाचा मग
http://www.gandhitopia.org/profiles/blogs/could-gandhi-be-saved-rss
गांधींनी आपल्यासाठी सुरक्षाव्यवस्थेला विरोध केला होता. प्रार्थनास्थळी येणार्‍यांच्या तपासणीलाही विरोध केला होता.

इंदिरा गांधींनाही स्वत:च्या संरक्षणासाठी असलेल्या ताफ्यातून शिखांना हटवणे मंजूर नव्हते.

भरतजी - मला दोन्ही घटना मान्य आहे. अशा सुरक्षा यंत्रणेचा त्रास जन सामान्यांना व्हायला नको म्हणुन त्यांनी तसे निर्णय घेतले होते.

बेअंत आणि सतवंत यांना ते शिख आहेत म्हणुन दुर करणे रेसियल प्रोफायलिंग झाले होते म्हणुन श्रीमती गांधी यांनी नकार दिला होता - हा धाडसी आणि स्तुत्य निर्णय होता. दोघांची पुर्व-पार्श्वभुमी चकचकीत होती. दोघांच्या पार्श्वभुमी वर जर काही काळे ढग असते तर वेगळ्या परिस्थितीची मला अपेक्षा होती.

सारांश, कसाब किंवा इंदिरा गांधी यांच्यावरचा पहिलाच हल्ला दौर्दैवाने कमालीचा यशस्वी झाला होता. गाफिल रहाण्याची चुक (मानली तर) सुधारायला वेळही नव्हता.

१९४८ च्या आधी महात्मा गांधी यांच्या वर प्राणघातक हल्ले करण्याचा प्रयत्न झाला होता. भेटण्यासाठी येणार्‍या प्रत्येकाचीच कसुन तपासाणी करणे गांधींना अमान्य होते.... पण जर तिव्र इच्छाशक्ती असेल तर हल्ला करणार्‍या प्रवृत्तीं पर्यंत सुरक्षा यंत्रणा पोहचू शकते... तुम्ही प्रत्येकाची तपासणी करु नका (गांधी खुष, जनता खुष) पण जर तुमच्या कडे शॉर्ट लिस्ट आहे, हल्ला कुठुन होणार आहे याचा अदमास आहे तर अशांवर तर कडक नजर ठेवा, त्यांची नावे, रहाण्याची ठिकाणे, चेहेरे सुरक्षा, गुप्तचर यंत्रणेला आणि म्हणुन राजकीय नेतृत्वाला माहिती असेल तर त्यावर उपाय योजायला महात्मा गांधींची अडकाढी तर नव्हती ?

जामोप्या किती द्वेष कराल सावरकर, हिंदूत्व, इ. गोष्टींचा !!! करा !
कारण कोणाला काय वाटते त्यावर कोणीच नियंत्रण ठेवू शकत नाही दुर्दैवाने लोकशाहीत.

>>> सावरकरांचे पुतळे , फोटो, चौकांची नावे इ. सरकारने नाही तर त्यांच्या चाहात्यांच्या प्रयत्नांतून साकार झाले आहेत. त्याचे श्रेय काँग्रेसला नाही. त्यांनी तर संसदेत तैलचित्र लावायलाच विरोध केला होता.

सहमत! अंदमान विमानतळाला देखील सावरकरांचे नाव रालोआ सरकारच्या कारकीर्दीत मिळाले. तेव्हा काँग्रेसचे सरकार असते त्या विमानतळाला देखील XYZ गांधी विमानतळ असे नाव दिले असते (XYZ च्या जागी इंदिरा, फिरोझ, राजीव, राहुल, प्रियांका, रॉबर्ट, रेहान. . . असे तुमच्या आवडीचे कोणतेही नाव टाका). काँग्रेसने सावरकरांचा इतका पराकोटीचा तिरस्कार केला की रालोआ सरकारच्या कारकीर्दीत संसदेत तैलचित्र लावण्याच्या समारंभावर सुद्धा काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. काँग्रेसला पहिली संधी मिळाल्यावर (२००४ मध्ये सत्तेवर आल्यावर) त्यांनी पहिले काम कोणते केले तर अंदमानमध्ये उभारण्यात येणार्‍या स्वातंत्रस्तंभावरील सावरकरांच्या साहित्यातील ओळी काढून टाकल्या.

माहितीबद्दल धन्यवाद! स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन!!!

त्यांनी त्यातून धडा घेऊन गांधींना सुरक्षा का पुरवली नाही? दुसरा हल्ला नथुरामांनी केला, जो अंती सफल झाला.

गांधीजीनी सुरक्षा नाकारलेली होती.

नथुरामाचा हा दुसरा की तिसरा प्रयत्न? बहुदा तिसरा असावा! आणि एकूण प्रयत्नांपैकी कदाचित चौथा असावा ! वा रे पराक्रम ! Proud

चार वर्षात राष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे आश्वासन दिले गेले तरी प्रत्यक्ष ते पूर्ण होण्यास दहा वर्षे लावली. जनता राजवटीतच त्या कामाने प्रगती केली. माझ्या लेखात हे सर्व आलेले आहे.

कुठल्याही गोष्टीचा पाया उभा करायला जास्त वेळ लागतो.. नंतर कळस कुणी सोम्यागोम्याही उभारु शकतो.. जनता दलाने जर सुरुवातीपासून काम केले असते तर त्यानाही दहा वर्षेच लागली असती.

अर्थात ही जाण तुमच्यासारख्याना असणे शक्य नाही... स्वातंत्रानंतर कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवून मग सत्तेचा आयता कळस उभारुन आम्ही श्रेष्ठ , काँग्रेस कुचकामी अशी मुक्ताफळे उधळणार्‍याना हे सामान्य ज्ञान नसणे अगदी स्वाभाविक आहे. Proud आणि अशा लोकाना जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे.

Pages