सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

साबरमती, वर्धा इ. ठिकाणी असलेले आश्रम, फुले वाडा, भिडे वाडा, तीन मूर्ती भवन, मुंबईतलं १९४७ पूर्वी जिन्ना रहात होता ते घर इ. ठिकाणांच्या बाबतीत हा प्रॅक्टिकल विचार कुठे जातो?

हे वर उल्लेख केलेले लोक सावरकरांपेक्षा अधिक महान असावेत असा निष्कर्ष काढायला हरकत नसावी.

दामोदरसुत,

अजून लेख वाचला नाही पूर्णपणे! पण तरीही आपले अभिनंदन.

मूर्तीमंत विनोद!!!! Proud

इतिहासाची कोणतीही क्रमिक सरकारमान्य पुस्तके वाचली की तसे समजतेच

यात एवढे दात फाकण्यासारखे काय आहे? भाजपाच्याही कारकिर्दीत तीच पुस्तके होती ना? Proud

जिकडे तिकडे जाऊन हेच गरळ ओकताय तुम्ही

यात गरळ कुठे काय आहे? इतिहासाची पुस्तके म्हटल्यावर तुम्ही भयाण हडळीगत दात विचकलेत..म्हणून तुन्हाला सांगितलं की भाजपाच्या कारकिर्दीतही तीच पुस्तके होती.. यात गरळ कुठे आहे?

किती का वर्षे असेना.. होती ना? तुम्ही वाढवा कारकीर्द ! तुम्हाला शुभेच्छा !

हे बघा, आता विचारलं तर असली हास्यास्पद विधानं. जाउद्या. तुम्ही गेट वेलणार नाहीच कधी

जामोप्या,

मला एक गोष्ट कळत नाही, भाजपचा धोंडा हिंदूंच्या गळ्यात कशासाठी? त्याचे हिंदुत्व म्हणजे हिंदूव्होटबँकत्व आहे हे दिसतंय ना? भाजप म्हणजे कमळकाँग्रेस आहे.

आ.न.,
-गा.पै.

>>दामोदरसुत,
एक विनंती. या धाग्याचा तातडीने बॅकअप घेऊन ठेवा. आता कोणत्याही क्षणी हा धागा अ‍ॅडमिनना डिलीट करावा लागणार. यापूर्वी सावरकरांवर निघालेल्या सर्व धाग्याचे असेच झाले आहे.<<
मास्तुरे यांच्या या सूचनेबद्दल धन्यवाद!
सावरकरांवर मी जे कांही आतापर्यंत लिहिले आहे त्याचा उद्देश प्रतिसादातून अधिक आणि नेमकी माहिती उपलब्ध व्हावी हा असतो. कांही प्रमाणात तो साध्यही होतो. पण अगदी प्राथमिक बाबी देखील माहीत नसलेले कांही जण टिंगलटवाळीच्या उद्देशाने आवर्जून लिहितात. धागा बंद पाडण्याचे उद्दिष्ट ते साधत असावेत. त्यांचा हा हेतू साध्य होऊ नये म्हणून काय करता येईल ?

भाजपचा धोंडा हिंदूंच्या गळ्यात कशासाठी?

हिंदुत्व हाच एक मोठा धोंडा आहे.

इतिहासाची पुस्तके म्हटल्यावर तुम्ही भयाण हडळीगत दात विचकलेत.>>

जोशी आणि जामोप्या दोघेही आमचे स्नेही असले तरी या वाक्याचे मात्र हसू आलेच

Rofl

हजारे

हिंदुत्व ही गळ्यातील धोंड असेल तर काढून टाका, कोणी अडवलय का ??

दुसरी कुठली ही धोंड आप्ल्या गळ्यात घालून घ्यायला मोकळे मग !

सावरकरांवरील धागे बंद पाडण्यासाठीच प्रतिसाद देणार्‍यांच्या लिखाणात अगदी प्राथमिक माहितीचाही अभाव असल्याप्रमाणे लिहिले जाते. हे गांधीवादी असण्यापेक्षा वेगळ्याच प्रकारच्या काविळीने पछाडलेले लोक असावेत. आपल्या लिखाणाला प्रतिसाद नको असा एक पर्याय स्वीकारता येईल पण मग महितीतील अनवधानाने झालेल्या चुका कशा निदर्शनाला येणार? अपुरी माहिती पूर्ण कशी केली जाणार? माहितीत भर कशी पडणार? यावर उपाय शोधावा लागेल.
सगळेच गांधीवादी कृतघ्न नव्हते हेही आपण ध्यानात ठेवले पाहिजे. त्याचे सध्या एकच उदाहरण येथे नमूद करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावण्यास विरोध करणाऱ्या कृतघ्न राजकीय पक्षाच्या एका नीच वृत्तीच्या केंद्रीय मंत्र्याने अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये लावलेली सावरकरांची वचने काढून तर टाकलीच, पण अतिशय संतापजनक मुक्ताफळे उधळीत त्याचे समर्थनही केले. यामुळे संतापाची लाट उसळली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी रुद्रावतार धारण करून ’जोडे मारा’ कार्यक्रम हाती घेतल्याने मंत्र्याचे थोबाड बंद झाले. त्यावेळी अगदी अनपेक्षित अशी प्रतिक्रीया आली ती प्रसिद्ध गांधीवादी , समाजवादी नेते स्वर्गीय ग.प्र.प्रधान सरांकडून! त्यांना सावरकरांची राजकीय विचारसरणी मान्य नव्हती. त्यांच्यासारख्या १००% गांधीवादी नेत्याला देखील त्या मंत्र्याचा इतका राग आला की त्यांचे ’सकाळ’ दैनिकात एक पत्रच प्रसिद्ध झाले होते. त्यात त्यांनी मंत्र्याला धारेवर धरतांना एक सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकच उदधृत केला होता.
तो होता :
गुणैरुत्तुंगतां याति नोत्तुंगेनासनेन ना।
प्रासादशिखरोस्थोपि काकः किं गरुडायते?
म्हणजे थोरवी प्राप्त होते ती अंगी असलेल्या उच्च कोटीच्या गुणांमुळे. केवळ उच्चासनावर (अधिकारपदावर)
बसल्यामुळे नव्हे. राजप्रासादाच्या उंच शिखरावर बसलेला कावळा काय गरूड समजला जातो?
त्यांनी मंत्र्याला बजावले की अरे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जी थोरवी लाभली आहे ती त्यांच्या अलौकिक
कार्यकर्तृत्वाच्या बळावर! केवळ (अधिकारपदाच्या) उच्च स्थानावर बसल्यामुळे नव्हे!

मीअण्णाहजारे,

>> हिंदुत्व हाच एक मोठा धोंडा आहे.

हे पाक्यांना सांगितले पाहिजे. कुठल्या देशाचे कसकसे तुकडे पडताहेत हे जगाला दिसतंय! गळ्यातली हिंदुत्वाची धोंड दूर सारल्यावर पाकिस्तानची भरपूर प्रगती झाली म्हणायची! Rofl

आ.न.,
-गा.पै.

गळ्यातली हिंदुत्वाची धोंड दूर सारल्यावर पाकिस्तानची भरपूर प्रगती झाली म्हणायची!

देशाच्या प्रगतीचा आणि धर्माचा काय संबंध? हिंदु धर्मिय असुनही कंबोडियासारखे दरिद्री देश आहेत आणि मुसलमान असुनही गल्फ सारखे प्रगत देश आहेत... पाच वर्शे भारतातही भगवी धोंड होती की.. असा काय उजेड पडला?

त्यांनी मंत्र्याला बजावले की अरे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जी थोरवी लाभली आहे ती त्यांच्या अलौकिक
कार्यकर्तृत्वाच्या बळावर! केवळ (अधिकारपदाच्या) उच्च स्थानावर बसल्यामुळे नव्हे!

अगदी अनुमोदन.. आमचेही हेच मत आहे... नुसत्या जन्माने हिंदु धर्म मिळाल्याने हिंदुत्वाच्या स्थानावर बसून इतर धर्मियाना आणि काँग्र्सला नाव ठेवणारे तरी दुसरं काय करत असतात? एखाद्या माणसाचे कर्तृत्व बघावे.. आणि त्याला योग्य तो सन्मान द्यावा.. उगाच एखाद्याच्या प्रगती अधोगतीला, बर्‍या वाइटाला धर्माचे शेपूट 'कारण' म्हणून कशाला डकवायचं?

ईश्वर अल्ला तेरो नाम
सबको सन्मती दे भगवान

>>एखाद्या माणसाचे कर्तृत्व बघावे.. आणि त्याला योग्य तो सन्मान द्यावा
मग तो सावरकर, बोस, भगतसिंग, आझाद यासारख्या क्रांतिकारकांना का नाही ? फक्त अहिंसावाद्यांनाच का ?

मग तो सावरकर, बोस, भगतसिंग, आझाद यासारख्या क्रांतिकारकांना का नाही ?

आहे की त्यान्ना सन्मान. इतिहासाच्या पुस्तकात आहे सगळे

>>आहे की त्यान्ना सन्मान. इतिहासाच्या पुस्तकात आहे सगळे

प्रत्यक्षात का नाही ?

प्रत्यक्षात का नाही ? >>>>>>>>>>. त्यांना परत जिवंत करायचे आहे तुम्हाला?

प्रत्यक्षात का नाही ? >>>>>>>>>>. त्यांना परत जिवंत करायचे आहे तुम्हाला?

Proud

आणि प्रत्यक्ष म्हणजे नेमकं काय करणार? त्यान्नी इंग्रजान्ना गोळ्या घातल्या.. तुम्ही कुणाला घालणार? त्यान्नी इंग्रजी सत्तेच्या संसदेत बॉम्ब टाकला.. तुम्ही कुठे टाकणार? त्यान्नी इंग्रजकालीन रेल्वे रुळ मोडले, रेल्वे लुटली.. तुम्ही करणार का? आज त्यांची शिकवण अमलात आणायची म्हणजे नेमकं काय करणार आहात?

मुळात सावरकरप्रेम हेच गांधेद्वेष व्यक्त करण्यासाठीचा बहाणा आहे(काही सन्माननीय अपवाद वगळता). सावरकरांच्या जन्मठेपेतून सुटकेपर्यंतच्या कार्याबद्दल आदर, कृतज्ञता नाही, असे इथे कोणी म्हटल्याचे दिसत नाही.

त्याच त्याच टेपांची दळणे चालू आहेत, त्यामुळे आणखी काही लिहीत नाही.

प्रत्यक्ष म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला रानडुक्कराचा गुडघा बसवलाय त्यामुळे नाही समजणार. सावरकर आणि इतर क्रांतिकारकांविरुद्ध गरळ ओकणे हे दिवसभराचे इतिकर्तव्य मानणार्‍या तुमच्यासारख्या लोकांना ते कधीच समजणार नाही, किंवा तशी इच्छा नसेल.

बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलायचं हेच तुमचं धोरण आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ही म्हण सकाळी शंभर वेळा म्हणा आणि मग घराबाहेर पडा. तुमचं थोडं तरी भलं होईल.

भरत, प्लीजच.
आदर आहे म्हणूनच हा धागा काढलाय ना? वरच्या सगळ्या पोस्टी तेच म्हणताहेत. प्लीजच तुम्ही तरी जामोप्या मोड ऑन करुन बोलू नका. Sad

प्रत्यक्ष म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला रानडुक्कराचा गुडघा बसवलाय त्यामुळे नाही समजणार

तुमचा मेंदू, गुढगा चांगला आहे ना? मग तुम्ही मजसारख्या पामराना समजून सांगा नेमके काय करायचे ते. Proud

मुळात सावरकरप्रेम हेच गांधेद्वेष व्यक्त करण्यासाठीचा बहाणा आहे

गांधीद्वेष, काँग्रएसद्वेष आणि भाजपाची भाटगिरी यासाठीचा बहाणा

कांबोडिया हिंदुराष्ट्र आहे हा जोक केला तुम्ही हजारे !!!!!

कांबोडियाचा राष्ट्रिय धर्म आहे बद्धिझम. बाकी जगावर एक ही हिंदुराष्ट्र नाही.

शेवट्चे राज्य होते नेपाळ ते सुद्धा आता निधर्मी राष्ट्र झालेय.

याचा अर्थ जर हिंदूना भारतातुन पळवून लावले तर जगात पाऊल ठेवायला दुसरा देश मिळणार
नाही. कारण कोणीही / कुठला ही देश त्यांना आश्रय देणार नाही.

बाकी तुम्ही अगदी मुसलमान झाला तरी भारतात जागो जागी होणार्या बाँबस्फोटातुन सुटका मिळणार
नाही, कारण गर्दीतुन फक्त हिंदुना मारणारा बाँब अजून शोधला गेला नाही. तालिबान, लष्करे तोईबा,
तसे ही ट्पून बसलेत कधी भारताची दाणादाण उडवायला मिळेल याची संधी बघत.

हिंदु धर्मिय असुनही कंबोडियासारखे दरिद्री देश आहेत

हिंदु धर्मीय लोक असूनही कंबोडिया दरिद्री आहे, असे मला म्हणायचे आहे.. तिथे बौद्ध किंवा इतर लोक असतीलही, जसे भारतातही आहे.. जगात हिंदु राष्ट्र एकच होते नेपाळ.. तेदेखील दोन चार वर्षापूर्वी सेक्युलर झाले आहे.. त्यामुळे आज जगात एकही हिंदु राष्ट्र आस्तित्वात नाही.. त्यामुळे हिंदु हा शब्द लोकाना उद्देशूनच आहे.. कोणतेच राष्ट्र आज हिंदु नाही. Proud

Pages