सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

अंदमानातून थेट काश्मीर! मास्तुरे, तुमचा मेंदू फारच दोलायमान आहे बुवा! Proud

तुम्ही तर अंदमानातल्या हॉस्पिटलातून पार नेपाळला पोचलात! आता काय गुरख्यांकडून औषध घेणार का?:खोखो:

जामोप्या,

तुम्ही सांगितलंत तशी कारावास्तू पडली असती तर पंचतारांकित तुरुंगवास उपभोगणारे (गांधी, नेहरू छाप काँग्रेजी) आणि कोलू फिरवणारे सावरकर यांच्यातला व्यवच्छेदक भेद दाखवणे अवघड झाले असते.

अंगावर बेड्या असतांना खिळा वा घायपाताचा काटा घेऊन भिंतीवर दीर्घकाव्य लिहिणे म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष तिथल्या कोठडीत गेल्यावर सुंदरपणे समजतं.

असो.

>> या देशाची मूलतत्वे समजायला दुसर्‍या पानांची गरजच नाही..

जामोप्या, हे तुम्ही बोलताय! काय सांगताय काय राव. असं असेल तर मग सेक्युलॅरिझम ही ख्रिस्ती संकल्पना कशाला भारतात आणायची? काहीतरी भोंगळ प्रकार उत्पन्न करायचा आणि त्याचा कीस काढत हिंदूंना नावे ठेवायची! दुसरं काय!!

रच्याकने, भारतीय राज्यघटनेत सेक्युलर हा शब्द आढळून येत नाही.

आ.न.,
-गा.पै.

वाजपेयीनी छान दुरदृष्टी दाखवली ना मास्तुरे......पाकिस्तान ची हातमिळवणी करुन त्यांच्या कलाकारांना भारतात बोलावुन...? कारगिल युध्द मुद्दाम बनवले ते ही दुरदृष्टी दाखवुनच ? रथयात्रा करुन बाबरी मशीद पाडण्यात पण भाजपाचा दुरदृष्टी पणा होताना..? देशात बॉम्बस्फोटाचे सत्र चालु करण्यात अडवाणीची कोणती दुरदृष्टी होती ? मोदींनी गोध्राकांड करताना कोणत्या दुरदृष्टीचा वापर केला ?????????

udayone,

राहुल गांधी न्यूयॉर्कला अटकेत असतांना वाजपेयीने सोडवलं. यावरून भाजप हा कमळकाँग्रेस आहे हे दिसतं.

रच्याकने, बाबरी मशीद हे काय आहे? तुम्हाला वादग्रस्त वास्तू म्हणायचं होतं का?

आ.न.,
-गा.पै.

सावरकर, आगरकर, टिळक , गांधी ...यांनी आपापली कामे चोख केली आहेत........त्यांना जे जे बरोबर वाटले त्यावेळेला ते त्यांनी ठाम पणे केले... तुम्ही कोण !@#$ पडलात का त्यांना चुकीचे बोलायला...?
सावरकरांवर टिका करुन गांधींना मोठे करता येत नाही तसेच गांधींवर टिका करुन सावरकरांना मोठे करता येत नाही..
..........................................................................................................................................
देशासाठी तुम्ही लोक काय करतात साधे निवडनुकीला पन तुम्ही लोक मतदान करत नाहीत ........अण्णा च्या मागे आंदोलनाला उभे राहतात पण ते आंदोलन बरोबर आहे की चुक हे ही माहीत नसते.....आंधळ्यापणाने आपण नेत्यांच्या मागे जातो हेच चुक आहे............ मेणबत्ती सांप्रदाय हाच एक मुर्ख पणाचा कळस आहे.......
अण्णांनी भ्रष्टाचार च्या विरोधात इतके आंदोलन उभे केले काय झाले शेवटी ????

मुंबई मधे शिवसेना आली......इतका मोठा भ्रष्टाचार करुन शेवटी जिंकलीच ना ती ...कशी.. फक्त ४७ % मतदान झाले... आंदोलनात सहभागी झालेले मेणबत्तीवाले कुठे गेले ? .......

पुण्यात राष्ट्रवादी आली निवडुन..... अजित पवार सारख्र्या भ्रष्टाचारी ला निवडुन दिलेच ना शेवटी का.......हे का घडते ?

जिल्हा परिषद मधे काँग्रेस निवडुन आली ........कशी आली इतका भ्रष्टाचार करणारी निवडुनच नाही यायला हवी कशी काय आली ? कोणी निवडुन दिले ? आपणच ना......तेव्हा कुठे जाते आपली देशभक्ती...........?

भाजपा कर्नाटकात निवडुन आली.....कशी? ज्याचा मुख्यंमंत्रीच भ्रष्टाचारी आहे त्या पक्षाला का नाही सत्ते वरुन बाजुला सारत मतदार........

.इथे येउन तावातावाने बोलनारे प्रत्यक्षात काय करतात? काहीच नाही.........

.........................................................
पगारातुन भुकंप इत्यादी प्रकल्पाना आपण कधी मदत करतो का ? रक्तदान करतात का नियमीत ? नेत्रदान ही आजची गरज बनली आहे कोणी केले ??????? अरे साधा कचरा तुम्ही रस्त्यावर टाकतात......येता जाता रस्त्यावर थुंकतात आणि इथे येउन काय देशभक्ती दाखवतात ?
नाही हे तुम्ही करत नाहीत फक्त सावरकर , गांधी यांच्यानावाने फुशारक्या मारायच्या..... मी यांव मी त्यांव .... लायकी नाही आहे तुमची बोलायची....इतिहास शिकुन कोणी मोठा होत नसतो.......इतिहास बनवनारा मोठा बनतो...........
वरिल सर्व लोकांनी इतिहास बनवला आहे............. तुम्ही काय केलेत........... ते गेले वरती मरण पावले.......झाले त्यांचे कार्य....... तुम्ही काय कार्य केले........? त्यांच्या अवशेशांना सांभाळणे हे कार्य आहे ? त्यांच्या नावाचा उदो उदो करत बोंबा मारत फिरणे हे कार्य आहे.......काय मोठे काम केले का ? हे करुन
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

भाजपाच्या नावाने इतके बोलनारे आहे इथे तरी पण भाजपा का नाही जिंकत ................एकदाच जिंकली मग काय दिवे लावले तिने ? काहीच नाही...........राम मंदिरा सकत रामाला परत वनवासात घातला ......
रामाच्या नावानेच ९६ ची निवडणुक जिंकली ...........तो एक भावनात्मक प्रतिसाद होता.......पण आता २००७ च्या निवडणुकीत मतदारांना त्यांची लायकी समजलीच ना ............. हकलले ना अडवाणींना शेवटी ........

काँग्रेस जिंकत आहे कारण तिला पर्याय नाही आहे जनते कडे.......... उद्या जर कोणता चांगला पक्ष असेल तर लोक त्याला मत देतील....... पण मतदान लोक करतच नाहीत......ज्यांना ज्यांना बदल हवा आहे ते मतदानच करत नाही............

मुंबई च्या ४७ % मधे २४ % लोक झोपडपट्टीचे होते........त्यांना काय कळणार आहे ... जिथे खायला मिळेल त्यांना देतील ते........१० % लोकांनी पैसे देउन मत दिलेत....... जो जस्त पैसे देणार त्याला मत देणार अशी जर ३४ % लोकांनी बुध्दी न वापरता मतदान केले तर नको ते लोकच जिंकुन येणार .......... ४७ % मतां पैकी युतीला २३ % मत मिळालीत याचा अर्थ काय १०० पैकी ७० % लोकांनी नकारले.................

तिच परीस्तिथी पुण्यात नाशीक मधे...........सत्ताधार्यानी कीतीही भ्रष्टाचार केला तरी तेच लोक निवडुन येतात......का असे होते याचा विचार खर तर करायाला हवा..........

आता उत्तर प्रदेशात निवडनुका आहेत मायावती ने केलेला भ्रष्टाचार हा तर सगळ्या जगासमोर आहे....तरी सुध्दा तीच निवडुन येणार बघा..............असे नको घडायला..... लोक आपली संवेदनशिल नाही आहेत.....
एक धर्म आणी दुसरे जात यातच अडकुन पडला आहे......

दुसर्‍या महायुध्दात महत्वाची भुमीका बजावणारा स्टॅलिन ला पुढच्या निवडणुकीत चक्क नकारण्यात आले..... कारण असे सांगतात इंग्लंड ची लोक... " स्टॅलिन हा युध्दाच्या वेळेलाच बरा होता ..... आता आम्हाला शांतता हवी आहे"......याला म्हणतात लोकशाही जिवंत असणारा देश.......

एकी कडे निधर्मी चा टेंभा मिरवायचा.....आम्ही जातिवादी नाही असे ओरडायचे ............दुसरी कडे आपल्याच जाती मधे धर्मातला मुलगा / मुलगी बघायची लग्ना साथी, व्यवसायासाठी................ नाही झाले तर आपल्याच मुलीचा/ मुलाचा खुन करायला पण मागेपुढे न पाहणारी ही लोक.........

हा काय प्रकार आहे......... ?

इथल्या किती जणांनी हा विचार केला आहे............?

udayone,

आपली कळकळ पोहोचली. त्याचं काय आहे की सत्तासुंदरी एखाद्या वारांगानेसारखी असते. आज एकाच्या गळ्यात पडेल तर उद्या दुसर्‍याच्या!

म्हणून सत्तेपल्याडचे असे काहीतरी पकडून ठेवावे लागते, ज्याच्या योगे राज्यकर्त्यांवर दबाव टाकता येईल. या गोष्टीला भारतीय जनमानसात धर्म असं म्हणतात.

व्यावहारिक दृष्ट्या धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम असं म्हणता येईल. आज भारतीय नागरिक म्हणून माझी काय कर्तव्ये आहेत? आणि ती पार पडतांना मला कोणत्या मर्यादा सांभाळाव्या लागतील? हे दोन सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत.

तर जी काही चर्चा चालू आहे त्यातून कर्तव्याचा बोध होतो का हे प्रथम बघितलं पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की कर्तव्याबाबत भारतीयांच्या मनात संभ्रम आहे. तो दूर करणंही तितकाच महत्त्वाचं आहे. भले आपण आपली कर्तव्ये पार पाडण्यात असमर्थ (वा आळशी) असू. पण परिस्थिती हळूहळू पालटतेच, नाहीका?

मात्र कर्तव्ये म्हणजे काय हेच मुळी कळले नाही तर ती पार पाडण्यात काय अर्थ? उदा: मतदान हे कर्तव्य आहे. अगदी बरोबर. पण स्वच्छ उमेदवारच नसेल तर जनतेने मतदान करूनही लाभ नाहीच. तर मतदानासोबत उमेदवारांना जाब विचारणे हे परिपूर्ण कर्तव्य झाले. भले जाब विचारणे शक्य होत नसले तरी ते अत्यावश्यक अंग आहे याचा विसर पडू देता कामा नये. जनतेला विसर पडू नयेच आणि उमेदवाराला तर नयेच नये! अन्यथा उमेदवार निवडणूक जिंकताच जनतेच्या डोक्यावर चढून बसतो.

म्हणून आपल्या चर्चेतून कर्तव्यांबाबत बोध होतो आहे तोवर ती प्रत्यक्ष आचरणात आणता न आल्याचा खेद मानू नये.

बघा पटतंय का ते.

आ.न.,
-गा.पै.

या चर्चेतील किंवा वादातील दोन्ही बाजुंची काही मते पटतात.. उदय आणी गामा दोघांच्याही शेवटच्या दोन्ही पोस्टी छान.. Happy
माझ्या मते.. केवळ सावरकर किंवा गांधीजीच नाही तर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेला अगदी लहान किंवा सामान्य स्वातंत्र्यसैनीक किंवा क्रांतीकारक हा पुज्यनीय आणी वंदनीयच आहे... प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतील कदाचीत त्यांच्या मार्गाविषयी मतभेद असतील आज आपल्याला ते मार्ग चुकीचे सुद्द्धा वाटत असतील तरी त्यांची त्या मागची देशाला स्वातंत्र्य मिळावे ही भावना त्यासाठी केलेला त्याग हे सगळेच महान आहे..
आपल्या दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणामुळे गांधीजी फक्त काँग्रेसचे झाले तर सावरकर हिंदुत्ववाद्यांचे... प्रत्यक्षात तसे होते का??? गांधीजीनी किंवा सावरकरानी स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग हा फक्त काँग्रेस किंवा हिंदुंसाठी होता का?? मग त्याना ही लेबल्स कशासाठी.. चुका तर देवादीकांच्या सुद्धा झाल्या या थोर लोकांच्या हातुनही काही चुका झाल्याही असतील पण म्हणुन त्यांचे देशप्रेम त्यानी दिलेले योगदान कमी होते का??
सावरकराना महान म्हंटले की गांधीजीना शिव्या दिल्या सारखे आहे का गांधीजीना महान म्हंटले म्हणजे सावरकर वाईट???
आपल्या आजच्या पिढीत गांधीजी नाहीत आणी सावरकर सुद्धा..आणी असते तरी त्यांचे कार्य आणी मार्ग वेगळेच असते.. मग एकाचाच मार्ग बरोबर आणी दुसरा मुर्ख ही भुमीका कशाला??.. आज प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ अशी असंख्य देवमाणसे आपल्या आजुबाजुला आहेत.. असे वाद घालण्यापेक्षा या लोकाना त्यांच्या कार्याला आपण आपल्या परीने हातभार लावला तर ते ज्यास्त चांगले नाही का??

पुनरुक्तीचा धोका पत्करूनही मयेकर यांनी आधीच लिहिलेले उद्धृत करतो.

मुळात सावरकरप्रेम हेच गांधेद्वेष व्यक्त करण्यासाठीचा बहाणा आहे(काही सन्माननीय अपवाद वगळता). सावरकरांच्या जन्मठेपेतून सुटकेपर्यंतच्या कार्याबद्दल आदर, कृतज्ञता नाही, असे इथे कोणी म्हटल्याचे दिसत नाही.

लोकांची सावरकर भक्त आणी उरलेले सारे सावरकर द्वेष्टे अशी विभागणी करू नये.

श्री दामोदरसुत यांनी लिंक केलेल्या लेखामध्ये सावरकरांचा उल्लेखही नाही.

पण याबाबतीत त्यांच्या प्रतिपादनाचा ढोंगी सेक्युलरवाद्यांनी प्रचंड विपर्यास केला आहे. या धाग्यावर लिहिणार्‍या रानडुकर-मित्रमंडळाने प्रा. शेषराव मोरे यांचा 'सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद' हा ग्रंथ वाचण्याचे कष्ट घ्यावेत

सावरकरांचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला म्हणायला बरीच जागा आहे. उगाचच सेक्युलर वाद्यांवर खापर कशाला? शेषराव मोरेंचे बरेच लेखन मी वाचले आहे. त्यांचे "आंबेडकरांचे सामाजिक धोरण" हे तर आत्ता माझ्या समोर आहे. त्या पुस्तकाला दत्ता भगत यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील दोन वाक्ये.

'सुधारक सावरकर' हीच सावरकरांची खरी प्रतिमा आहे अशी मोरेंची भूमिका आहे. पण हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या हिंदुत्वाचा विपर्यस्त अर्थ लावून त्यांची हिंदुत्वाची व्याख्या मलिन करून टाकली असे प्रा मोरे यांना प्रामाणिकपणे वाटते.

vijaykulkarni,

>> मुळात सावरकरप्रेम हेच गांधेद्वेष व्यक्त करण्यासाठीचा बहाणा आहे

हे कोणाला उद्देशून लिहिले आहे ते माहीत नाही. माझ्याबद्दल म्हणालात तर गांधींची बरीचशी आर्थिक मते मला पटतात. त्यांचं पूर्णपणे पटणारं आजून एक मत सांगतो.

त्यांना (नेहरूनी?) विचारलं होतं की स्वतंत्र भारताचा राज्यकारभार करतांना परस्परविरोधी निर्णय घेण्याची परिस्थिती उद्भवली तर काय करायचं. तर गांधी म्हणाले की अश्या वेळी भारतातल्या तळागाळातल्या सामान्य माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणावा. त्याला ज्या निर्णयाने लाभ होईल तो निर्णय घ्यावा. हे माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन आहे.

आ.न.,
-गा.पै.

>>> मुळात सावरकरप्रेम हेच गांधेद्वेष व्यक्त करण्यासाठीचा बहाणा आहे

या वाक्यात गांधींच्या जागी "सावरकर" व सावरकरांच्या जागी "गांधी" हे शब्द टाकले तरी ते वाक्य जसेच्या तसे लागू पडेल.

मास्तुरे......तुम्ही आगच लावतात का....?

कधी पाणी ओतन्या चे पण काम करावीत..... मनाला शांती लाभेल.....

या वाक्यात गांधींच्या जागी "सावरकर" व सावरकरांच्या जागी "गांधी" हे शब्द टाकले तरी ते वाक्य जसेच्या तसे लागू पडेल.

नाही. गांधींविषयी लेखांमध्ये गांधी सावरकरांपेक्षा श्रेष्ठ होते असे आडून आडून सुचविण्याचा अजिबात प्रयत्न नसतो. किंबहुना गांधींचा टार्गेट ऑडियन्स इतका मोठा आहे आणी कॅनव्हास इतका मोठा आहे की अशी गरज भासत नाही. गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते. एकच उदाहरण देतो, 'गांधी' चित्रपट आणी 'वीर सावरकर' चित्रपट.

सावरकरांच्या जातीभेद निर्मूलन, भाषाशुद्धी , अलौकीक काव्यप्रतिभा या सर्वाबाबत अतीव आदर बाळगूनच हे माझे मत आहे.

नाही. गांधींविषयी लेखांमध्ये गांधी सावरकरांपेक्षा श्रेष्ठ होते असे आडून आडून सुचविण्याचा अजिबात प्रयत्न नसतो. किंबहुना गांधींचा टार्गेट ऑडियन्स इतका मोठा आहे आणी कॅनव्हास इतका मोठा आहे की अशी गरज भासत नाही. गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते. एकच उदाहरण देतो, 'गांधी' चित्रपट आणी 'वीर सावरकर' चित्रपट.

मेरे मुह की बात छीन ली आपने!

आणि हा त्याचा पुरावा : तुम्ही सांगितलंत तशी कारावास्तू पडली असती तर पंचतारांकित तुरुंगवास उपभोगणारे (गांधी, नेहरू छाप काँग्रेजी) आणि कोलू फिरवणारे सावरकर यांच्यातला व्यवच्छेदक भेद दाखवणे अवघड झाले असते. यान्ना कोलु हवा आहे तो केवळ त्यान्नी गांधी नेहरुंपेक्षा किती जास्त यातना सोसल्या हे दाखवण्यासाठी !

गांधीजीनाही आफ्रिकेत परवाने जाळतना लाठीमार झाला होता. पण गांधीभक्ताना ती लाठी, ते जळके परवाने, तो आग पेटवलेला डबा.. हे सगळं प्रत्यक्ष पहायला लागत नाही... श्रीकृष्ण देखील तुरुंगात जन्माला आला. पण त्याच्या भक्तान्ना तो तुरुंग प्रत्यक्ष पहाण्याची गरज वाटत नाही. पण यान्ना मात्र सवरकर समजण्यासठी कोलु आणि तुरुंग आवश्यकच वाटतो.. भारताच्या १०० कोटी लोकांपैकी अंदमानला जाणारे ५ % लोकही नसतील.. म्हणजे उरलेल्या ९५ % लोकान्ना सावरकर कधी समजणारच नाहीत म्हणायचे! मग या सर्व ९५% लोकान्ना सावरकर काय होते हे समजण्यासाठी हे सावरकरभक्त इतकी डोकेफोड का करत आहेत? Proud त्यान्नी कोलु नाही बघितला की त्यान्ना सवरकर समजणारच नाहीत. ज्या दिवशी ते कोलु बघतील त्यावेळी त्याना आपोआप कळेल . Happy

मास्तुरे......तुम्ही आगच लावतात का....?

गांधी, नेहरु, कॉग्रेस, मुघल सत्ता यान्ना भलंबुरं बोलल्याशिवाय मास्तुरेन्ना अन्न गोड लागत नाही! मास्तुरे, चार दिवस अंदमानला जाऊन जरा कोलु फिरवून या.. बघा मग अन्न आपोआप गोड लागेल . Proud

जामोप्या,

जे सत्य आहे ते दाखवून दिलं तर काय बिघडलं? हिंदू महासभेव्यतिरिक्त कोणी देशासाठी फासावर गेलाय किंवा कोलू फिरवलाय का? नाहीये ना, मग त्या आठवणीला उजाळा दिला तर तो गांधीद्वेष कसा? एक गोष्ट सांगतो, की कंसाला ठार मारल्याने श्रीकृष्णाच्या कारावासाची स्मृती जपली नाही तरी चालेल. दक्षिण आफ्रिकेच्या संग्रामाचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नाही.

सावरकरांच्या अंदमानच्या कारापर्वाचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी निकटचा संबंध आहे. आणि तो आम्ही जपणारच. कारण या देशावर राज्य करणारे गोरे इंग्रज जाऊन त्यांच्या जागी काळे इंग्रज आले आहेत.

गांधी जर एव्हढे अहिंसावादी होते, तर जीनाने डायरेक्ट अ‍ॅक्शन घेतलीच कशी? जीनांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यास सावरकरांचा आदर्श ठेवला पाहिजे. गांधींचा नव्हे.

आ.न.,
-गा.पै.

दक्षिण आफ्रिकेच्या संग्रामाचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नाही.

तुमच्या याच विचारसरणीमुळे सावरकर हे फक्त मूठभर लोकांचे आदर्श आहेत आणि गांधीजी हे सार्‍या विश्वाचे आदर्श आहेत.

जीनांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यास सावरकरांचा आदर्श ठेवला पाहिजे. गांधींचा नव्हे.

जीना, सावरकर, गांधीजी सगळेच वर गेले.... आता कुणाला कसले उत्तर देणार आहात? Proud

>हिंदू महासभेव्यतिरिक्त कोणी देशासाठी फासावर गेलाय किंवा कोलू फिरवलाय का?

१ सावरकर माफीपत्र देऊन अंदमानमधून निघून गेल्यावरही कोलू फिरवत राहिलेले सारे जण हिंदुमहासभेचे होते ?
२ देशासाठी फासावर गेलेल्या एखाद्या हिंदुमहसाभावाल्याचे नाव सांगू शकाल ?

जे सत्य आहे ते दाखवून दिलं तर काय बिघडलं?

कसलं सत्य? गांधीजी आणि सावरकर यांची तुलना म्हणजे अ‍ॅपल आणि ऑरेंज यांची तुलना केल्यासारखं आहे... मग गांधीजींपेक्षा त्यान्नी जास्त श्रम सोसले हे दाखवायचा एवढा अट्टहास कशासठी? उद्या एखादा दगडफोड्या म्हणेल मी हिर्‍याला पैलू पाडणार्‍या माणसापेक्षा २३० मिली घाम रोज जास्त गाळतो.. तर त्या तुलनेला काही अर्थ आहे का? मॅथॅमेटिकली त्याची तुलना योग्य असेलही , पण तरीही ती अर्थहीनच आहे.

हिंदू महासभेव्यतिरिक्त कोणी देशासाठी फासावर गेलाय किंवा कोलू फिरवलाय का?

फाशी आणि कोलु यातले काहीच नसेल तर तो माणूस देशभक्त नसतो , असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

vijaykulkarni जी
>>श्री दामोदरसुत यांनी लिंक केलेल्या लेखामध्ये सावरकरांचा उल्लेखही नाही.<<
सावरकरांनी १९६६ मध्ये आत्मार्पण केले. त्यानंतर कलकत्त्यात १९६७ मध्ये स्थापन झालेल्या अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटनेने १९६७ मध्ये जेलची पाडापाडी सुरू झाल्याच्या बातम्या येताच ती पाडापाडी थांबवावी म्हणून केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देणारी ती लिन्क आहे. ज्यांनी ते प्रयत्न केले त्यांचीच नावे त्यात असणार.त्यात सावरकरांचा उल्लेख तुम्हाला कशासाठी अपेक्षित होता ते समजले नाही.
>>'सुधारक सावरकर' हीच सावरकरांची खरी प्रतिमा आहे अशी मोरेंची भूमिका आहे. पण हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या हिंदुत्वाचा विपर्यस्त अर्थ लावून त्यांची हिंदुत्वाची व्याख्या मलिन करून टाकली असे प्रा मोरे यांना प्रामाणिकपणे वाटते.<<

पुरोगामी इ. ठरण्याचा राजमार्ग म्हणजे हिंदुत्ववाद्यांवर तुटून पडणे असा झाला आहे. मोरे यांनी तसे केलेले नाही. उलट तथाकथित पुरोगामी, सेक्युलरवादी वगैरे मंडळीनी सावरकरांच्या विचारांची जी मोड्तोड केली आहे आणि विपर्यास केला आहे त्यावरच खरंतर मोऱ्यांच्या ग्रंथांमध्ये फार फार विस्तृत लिहिलेले आहे तेही मांडा की. तो भाग का दिला नाही? तो तर खूप जहाल आहे. तुम्ही हा विषय आता काढलाच आहे तर तोही तुम्हीच मांडा. "सावरकरांच्या समाजकारणाचे अंतरंग" हेही पुस्तक वाचा. ते तर या तथाकथित पुरोगामी, सेक्युलरवादी वगैरे मंडळीनी सावरकरांना बदनाम करण्यासाठी काय काय कारनामे केले आहेत त्याने भरलेले आहे.

>>गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते.<<
हे योग्य कि अयोग्य? [रानडुक्कर-मित्रमंडळाचे मत मला माहीत आहे. शालेय सरकारी क्रमिक पुस्तके वाचून पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षा देता येते असे त्यांचे मत आहे.] पण मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे कारण माझ्या आठवणीप्रमाणे तुम्ही सावरकरांवर मागे एक लेख लिहिला होता.

>>गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते.<<
स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने महात्माजींचे नाव एनक्याश करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. त्यामुळे जिकडे तिकडे त्यांचेच नाव दिसत असेल तर इतर देशभक्तांची नावे लोकांना कांही अधिक वाचन केल्याशिवाय कशी माहीत होणार? तेव्हां एखादा माणूस तेव्हड्यावरून कमी प्रतीचा ठरतो असे आहे काय? महात्माजींच्या अनुयायांपैकी नेहरूच लोकांना माहीत असतात. म्हणून त्यांचे इतर अनुयायी दुर्लक्ष करण्याच्या लायकीचे समजायचे काय?

गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते

यात गांधीवाद्यांच्या काय दोष? वर सावरकरभक्तानीच म्हटले की आफ्रिकेच्या संग्रामाच्या आणि भारताचा संबंध नाही म्हणून... त्यातून त्यांची कोती मनोवृत्ते दिसून येते. आसिंधुसिंधुच्या पलीकडे सावरकरवाद्यांच्या मेंदुचा सरडा सरकतच नाही, हादेखील गांधीवाद्यांचा दोष झाला काय? . गांधीजींची विचारसरणी कित्येक देशानी आत्मसात केली. तिकडेदेखील काँग्रेस गांधीजींची पुस्तके आणि फोटो किंवा गांधीछाप नोटा वाटायला गेले होते की काय! Proud

शालेय सरकारी क्रमिक पुस्तके वाचून पदवी किंवा त्यापलिकडचा अभ्यास करता येतो असे त्यांचे मत आहे.

होयच. काय चुकीचे आहे त्यात? मग इतिहास समजायला सोनेरी पाने, गोळवलकरांची भाषाणे आणि नमस्ते सदा असली कवनं वाचावीत असे तुमचे मत आहे का? लोकशाही मार्गाने आधी निवडून या आणि वाट्टेल ती क्रमिक पुस्तके ठेवा, लोक वाचतील.

जिकडे तिकडे त्यांचेच नाव दिसत असेल तर

त्यात गैर काय आहे? काँग्रेसने हॉस्पिटल, रस्ते, बाजार, पूल, विमानतळे अशा लोकोपयोगी वस्तू बांधण्याकडे लक्ष पुरवले आणि अंदमानातही आपल्या नेत्याचे नाव पोहोचवून दाखवले... तुम्हाला असल्या प्रॉडक्टिव गोष्टी बांधण्यापेक्षा मंदिर, मठ, जेल, अंधारकोठडी,तेजोमहालय ( ! Proud Rofl ) असल्या बिनकामाच्या वास्तुंमध्ये जास्त इंटरेस्ट ! काँग्र्सच्या काळात जनतेसाठी १०० रु मंजूर झाले तर त्यातले फक्त १२ रु पोचतात म्हणे! असू दे. बारा तर बारा.. पण तुमच्या हातात सत्ता आली तर ते बारा रुपयेही मंदिर, मठ, जेल, अंधारकोठडी , तेजोमहालय असल्या गोष्टींवर खर्च होत रहाणार.. म्हणून जनतेनं तुमचं नामोनिषाणही ठेवलं नाही.. तुम्ही लोक राज्य करायच्या लायकीचे तर नाहीच आहात, मुख्य विरोधक म्हणूनदेखील तुमची लायकी नाही, हेदेखील जनताच दाखवून देईल. पण असूदे.. तुम्ही असल्या लोकोपयोगी वास्तू नाही बांधल्या तर चालेल! तुम्ही भज सावरकरं मूढ्मते! असे म्हणत बसा!

आम्ही डुक्कर मंडळी तुम्हाला संकटात वाचवायला येणार नाही.. संप्रप्ते सन्निहिते काले नही नही साक्षति डुक्करकारणे ! Proud

>>> दक्षिण आफ्रिकेच्या संग्रामाचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नाही.

सहमत!

>>> तुमच्या याच विचारसरणीमुळे सावरकर हे फक्त मूठभर लोकांचे आदर्श आहेत आणि गांधीजी हे सार्‍या विश्वाचे आदर्श आहेत.

:फिदीफिदी:
Rofl Biggrin Lol

>>> गांधी, नेहरु, कॉग्रेस, मुघल सत्ता यान्ना भलंबुरं बोलल्याशिवाय मास्तुरेन्ना अन्न गोड लागत नाही!

फक्त बुरंच! त्यांच्याविषयी भलं बोलायला त्यांनी आधी काहीतरी भलं केलं असलं तरच भलं बोलता येईल ना!!

>>>> >>गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते.<<
स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने महात्माजींचे नाव एनक्याश करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. त्यामुळे जिकडे तिकडे त्यांचेच नाव दिसत असेल तर इतर देशभक्तांची नावे लोकांना कांही अधिक वाचन केल्याशिवाय कशी माहीत होणार?

सहमत!

>>> मग गांधीजींपेक्षा त्यान्नी जास्त श्रम सोसले हे दाखवायचा एवढा अट्टहास कशासठी? उद्या एखादा दगडफोड्या म्हणेल मी हिर्‍याला पैलू पाडणार्‍या माणसापेक्षा २३० मिली घाम रोज जास्त गाळतो.. तर त्या तुलनेला काही अर्थ आहे का?

तसं नसेल तर आणिबाणीत येरवड्यात एका छोट्या कोठडीत तुरूंगात असलेले आणिबाणी विरोधक आणि १९९७ मध्ये आलिशान सरकारी विश्रामगृहात स्थानबद्ध असलेला लालू यादव (ज्यामध्ये एअर कंडिशन, टीव्ही, फोन, स्विमिंग पूल इ. सुखसोयींची रेलचेल होती) यांच्या तुरूंगवासात काहीच फरक नाही.

तुरूंगात छळ होत असलेल्या अवस्थेत, दंडाबेडी ठोकलेल्या अवस्थेत कोलू फिरविणे आणि एखाद्या शाही प्रासादात बाथटब, पंखे इ. सर्व सोयी असलेल्या ठिकाणी स्थानबद्ध होणे, या दोन प्रकारच्या तुरूंगवासात जमीनअस्मानाचा फरक आहे.

>>> श्रीकृष्ण देखील तुरुंगात जन्माला आला. पण त्याच्या भक्तान्ना तो तुरुंग प्रत्यक्ष पहाण्याची गरज वाटत नाही.

हो क्का! मग आगाखान पॅलेस, वर्धा, साबरमती इ. आश्रम, फुले वाडा, भिडे वाडा, प्रयागचे नेहरूंचे वडीलोपार्जित घर, मुंबईतले आंबेडकरांचे घर, मुंबईतले जिन्नाचे घर इ. कशाला स्मारके म्हणून जपून ठेवली आहेत? तिथे सुद्धा शाळा, हॉस्पिटल, वृद्धाश्रम इ. करता येईल की. ती ठिकाणे मात्र राष्ट्रीय स्मारक म्हणून जपून ठेवायची आणि सावरकरांच्या स्मृती तोडून तिथे मात्र रूग्णालय हवे!!

>>> मास्तुरे, चार दिवस अंदमानला जाऊन जरा कोलु फिरवून या.. बघा मग अन्न आपोआप गोड लागेल .

तुम्हीच तिथल्या सेक्युलर रूग्णालयात जाऊन गुडघ्यावर उपचार करून घ्या. एकदा गुडघा बरा झाला की मग बघा कसे आपोआप सेन्सिबल लिहायला लागाल.

जामोप्या - तुमची काही मते फार भन्नाट आहे. पण
गांधीजी आणि सावरकर यांची तुलना म्हणजे अ‍ॅपल आणि ऑरेंज यांची तुलना केल्यासारखं आहे... मग गांधीजींपेक्षा त्यान्नी जास्त श्रम सोसले हे दाखवायचा एवढा अट्टहास कशासठी? उद्या एखादा दगडफोड्या म्हणेल मी हिर्‍याला पैलू पाडणार्‍या माणसापेक्षा २३० मिली घाम रोज जास्त गाळतो.. तर त्या तुलनेला काही अर्थ आहे का? मॅथॅमेटिकली त्याची तुलना योग्य असेलही , पण तरीही ती अर्थहीनच आहे.

या पोस्टसाठी तुम्हाला जोरदार अनुमोदन...

एकदा गुडघा बरा झाला की मग बघा कसे आपोआप सेन्सिबल लिहायला लागाल.

माझा गुढगा बरा व्हायची गरज नाही.. माझा गुढगा रानडुक्कराचा म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा आहे असे सर्टिफिकेट तुमच्याच कंपूतल्या जोशी बुवान्नी दिले आहे.. आता त्याला कुठे दाखवायची गरज नाही. Proud

Pages