सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

जमोप्या

<<<<<त्यान्नी इंग्रजान्ना गोळ्या घातल्या.. तुम्ही कुणाला घालणार? त्यान्नी इंग्रजी सत्तेच्या संसदेत बॉम्ब टाकला.>>>>>>

मग काय शेपुट घालुन बसणार काय ?

आम्ही कोणाला गोळ्या घालणार नाही कोणाला ही वाकड बोलणार नाही कोणीही आमच्या घरात घुसुन

आम्हाला VT Station ला गोळ्या घातल्या, आमच्या देवळावर (अक्षर धाम), पार्लमेंट वर बाँब टाकले, तरी

ही आम्ही गप्पच बसू. आम्हाला काय मेले ते गेले, आम्ही तर वाचलो. आपल काय जातय. मेला तो

आपला शेजारी होता, मारणारा ही शेजारीच ही गोष्ट मात्र आम्ही मानत नाही.

बाँब स्फोटाला मदत करणारा बाँब स्फोट घड वून आणणारा सुत्रधार कर्नाटकातला, तो गुजरात मधल्या

दंगली मुळे पेटून उठु शकतो व ५० हजार महीना पगाराच्या नोकरी वर असताना ही देशद्रोही बनु शकतो.

पण आपल्याला काय त्याच लोकल मध्ये बाँबस्फोटात मेलेला आपला मराठी होता, आपला शेजारी

होता अशा कशाच च दुखः आपल्याला होत नाही. आपल्याला त्याच सोयर सूतकच नसत.

ही जिवंतपणाची निशाणी आहे काय ?

मग काय शेपुट घालुन बसणार काय ?

शेपूट घालायला कुणी सांगितलं? मी? पोलिस, सैन्य आणि न्यायालय बघून घेईल की.. का सावरकरांपासून प्रेरणा घेऊन तुम्ही कसाबला मारणार आहात? तशीच इच्चा असेल तर सैन्य, पोलिस यात भरती व्हा की.. आम्ही कुठे नाही म्हणतोय? उलट< क्रांतीकारकांच्या नावाने सैन्यात बटालियन ठेवा आणि त्यात तुमच्यासार्खे लोक भरती करा असेच मी म्हणतो,... बोला.. कधी जाताय सैन्यात?

पण आपल्याला काय त्याच लोकल मध्ये बाँबस्फोटात मेलेला आपला मराठी होता, आपला शेजारी

होता अशा कशाच च दुखः आपल्याला होत नाही. आपल्याला त्याच सोयर सूतकच नसत.

ही जिवंतपणाची निशाणी आहे काय ?>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मी मदत करतो तुम्हाला व्हा देशद्रोही..... किती हवेत बॉम्ब बनवायला तुम्हाला ???????

आण्णा, अगदी योग्य मत.. Proud

ते मंदार जोशीही असेच बडबडत होते.. त्यानाही सैन्यात कधी जाताय म्हटल्यावर देशसेवा करायला सैन्यातच कशाला जावे लागते वगैरे बडबडून शेपूट घालून पळाले होते.. आता इथे सुद्धा क्रांतीकारकांचं मत प्रत्यक्ष आचरणात आणणार म्हणजे नेमकं काय करणार हे विचारल्यावर, तुम्हाला समजणार नाही, तुमचा मेंदू डुकराचा आहे असे फडतूस बडबडून त्यान्नी पळ काढला. Proud

वा हजारे वा

कांबोडिया दरिद्री कारण त्यात हिंदू लोक आहेत म्हणून ??

कांबोडिया च्या एकूण जन संख्येत ९६.४% लोक बुद्ध आहेत. २.१% मुस्लमान १.३% ख्रीस्ती तर अवघे
०.३% इतर धर्मीय.

तरी ही कांबोडीयाच्या दारीद्र्याला हिंदू कारणी भूत आहेत ?

तरी ही कांबोडीयाच्या दारीद्र्याला हिंदू कारणी भूत आहेत ?

असे कोण म्हटले आहे? तुम्हालाच कुठून कुठून अशी वाक्ये दिसतात?

अरे जरा लॉजिक बोलत जावा............

मनातली वाक्ये आणुन बोलु नये.........

विवेक तुम्हाला मी मदत करायला तयार आहे........ जातात का पाकिस्तान मधे....... फोडतात का बॉम्ब ?

नसेल तर शांत बसा......आपले देशप्रेम स्वतः जवळच ठेवा.....दुसर्‍यांना शिकवु नका

अवघे
०.३% इतर धर्मीय.

किती का टक्के हिंदु लोक असेनात, पण जे आहेत ते नक्कीच फार श्रीमंत नाहीत एवढेच म्हटले आहे.. हिंदु धर्मामुळे कंबोडिया किंवा कुठलाही देश दरिद्री झाला आसे मी कुठेही म्हटलेले नाही..

एखाद्याच्या प्रगती अधोगतीला, बर्‍या वाइटाला धर्माचे शेपूट 'कारण' म्हणून कशाला डकवायचं?

ईश्वर अल्ला तेरो नाम
सबको सन्मती दे भगवान

हे मी स्वतः मागच्या पानावर लिहिले आहे. दिसत नाही का? Proud

जातात का पाकिस्तान मधे....... फोडतात का बॉम्ब ?

Proud

ते अभिनव भारत चळवळवाले की कुणीतरी आहेत ना? त्यान्ना पाठवून द्या पाकिस्तानात लढायला.. उगाच भारतात कुठेतरी सुतळी बाँब फोडणार, त्यापेक्षा सीमेवर जा बॉम्ब फोडायला.. Proud

>>> आम्ही कोणाला गोळ्या घालणार नाही कोणाला ही वाकड बोलणार नाही कोणीही आमच्या घरात घुसुन आम्हाला VT Station ला गोळ्या घातल्या, आमच्या देवळावर (अक्षर धाम), पार्लमेंट वर बाँब टाकले, तरी ही आम्ही गप्पच बसू.

काहीतरीच काय! आपण गप्प कुठं बसलोय. पाकड्यांच्या अतिरेकी कारवायांविरूद्ध आपण पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन, त्यांच्याशी शांतता प्रक्रिया चर्चा, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट इ. कठोर कृती सुरू केल्या आहेत ना!!! अतिरेकी कारवाया बंद व्हाव्यात म्हणून आता दोन्ही देशातले क्रिकेट सामने पण सुरू होणार आहेत. अतिरेकी कारवायांविरूद्ध आता अजून किती कठोर कृती करायची?

नाइक राव, तुमचाच टांगा पलटी झालाय.. मी काय लिहिले आहे आणि काय नाही ते सगळे स्पष्ट आहे

पाकड्यांच्या दहशतवादाविरूद्ध आपण अदनान सामीला मुंबईत आश्रय देणे, त्याला आयकर माफी, त्याला १० फ्लॅट घ्यायला मदत, वीणा मलिकला पायघड्या, फते अली खानला बॉलीवूडच्या चित्रपटात गाण्याची संधी, झी सारेगमप मध्ये पाकी गायकांना निमंत्रण, अशा अनेक कठोर कृती केलेल्या आहेत.

त्याचबरोबरीने आपण लता मंगेशकर, आशा भोसले इ. ना अजिबात पाकिस्तानमध्ये न पाठवून देखील पाकड्यांना कडक इशारा दिलेला आहे.

जामोप्या, उठसूठ सैन्यात जा सांगण्यासारखा येडचापपणा करु नका. सैन्य काय करणार? शेवटी या भिक्कारड्या सरकारचेच आदेश मानणार ना?

त्यापेक्षा तुम्हीच जा पाकिस्तानात आणि तिकडे निधर्मीपणाचे धडे जा. मोजता येणार नाहीत इतके तुकडे करतील तुमचे तिथे.

त्यापेक्षा तुम्हीच जा पाकिस्तानात आणि तिकडे निधर्मीपणाचे धडे जा.

त्यान्ना कशाला निधर्माचे धडे शिकवायचे? त्यांचा देश ऑफिशियल मुस्लिम देश आहे..

>>> त्यापेक्षा तुम्हीच जा पाकिस्तानात आणि तिकडे निधर्मीपणाचे धडे जा.

काहीतरीच काय! निधर्मीपणाचे धडे देण्यासाठी आणि ते आत्मसात करण्यासाठी भारतीयांइतके, विशेषतः हिंदूंइतके, हुशार, भोळसट आणि अभ्यासू विद्यार्थी जगात कुठे आढळतील तरी का? नुसत्या मायबोलीवरच निधर्मीपणामध्ये डॉक्टरेट केलेले किती तरी निधर्मांध आढळतील.

विवेक नाईक, मास्तुरे
दुर्दैवाने आपल्यापेक्षा जामोप्यांकडे जास्त वेळ आणि असल्या पोष्टी टाकण्याचा स्टॅमिना जास्त आहे.
कितीही गिरा तो भी यांची टांग उपरच असणार. असले लोक असेपर्यंत आपल्या देशाचं काहीही भलं होऊ शकणार नाही.

जमोप्या,,,,,

<<<त्यान्ना कशाला निधर्माचे धडे शिकवायचे? त्यांचा देश ऑफिशियल मुस्लिम देश आहे.>>>>.

म्हणजे निधर्मीच आहे अस म्हणायच काय तुम्हाला. Rofl Biggrin Biggrin Biggrin

त्याला आयकर माफी,

फॉरिनर भारतात १८३ पेक्षा कमी दिवस असेल, तर त्याला टॅक्स लागतच नाही.. त्याने त्याप्रमाणे मॅनेज केले असण्याची शक्यता आहे. फ्लॅट विकत घेणं हा मात्र गुन्हाच आहे.. कारण पाकिस्तानी माणसाला भारतात रिजर्व बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन, घर घेताच येत नाही . ( म्हणजे परमिशन असेल तर घेता येते. ) .... याने घर घेतले तेही चक्क मुंबईत आणि तिथे तर हिंदुत्वाचे तारणहार पक्षच राज्य करत आहेत.. उगाच काँग्रेसला कशाला नावे ठेवायची? पाकिस्तानचा माणूस यांच्या इलाक्यात यांच्या बुडापाशी आठ दहा फ्लॅट नियमबाह्य पद्धतीने घेतो.. यांच्या बुडाला काही जाणवतच नाही.. म्हणजे कसले गेंड्याच्या कातडीचे लोक असतील नै!!!! Proud

सैन्य काय करणार? शेवटी या भिक्कारड्या सरकारचेच आदेश मानणार ना?

हो का? मग भाजपाचे सुंदर सरकार होते की पाच वर्षे तेंव्हा का नाही सैन्यात गेलात? सरकार भिकारडे आहे, म्हणून सैन्यात जायचे नाही... हे म्हणजे लग्न लावणार भटजी भिकारडा आहे, म्हणून लग्न आणि हनीमुन करणार नाही, असे म्हटल्याप्रमाणे नाही का???? Proud

UDAYONE

<<< विवेक तुम्हाला मी मदत करायला तयार आहे........ जातात का पाकिस्तान मधे....... फोडतात का बॉम्ब ?

नसेल तर शांत बसा......आपले देशप्रेम स्वतः जवळच ठेवा.....दुसर्‍यांना शिकवु नका>>>

तुम्ही मदत करणार ? R U SERIOUS ??

जाउ दे तो तुमचा दोष नाही.

बाँब बनवणे, मदत करणे म्हणजे,कोंबडी भाजणे अस वाटल की काय तुम्हाला.

भाजपाने सुध्दा पायघड्या घातलेल्या पाकड्यांना...... त्याचा निषेध करतात का...? मास्तुरे....
की भाजपा थेरडा करतो ते बरोबरच करतो..?

>>> फॉरिनर भारतात १८३ पेक्षा कमी दिवस असेल, तर त्याला टॅक्स लागतच नाही..

चुकीची माहिती. भारतीय भूमीवर काम करून मिळविलेले कोणतेही उत्पन्न (फॉरिनरचे वास्तव्य एक दिवस असले तरी) हे करपात्र आहे. किंबहुना इतर देशात सुद्धा काम करून मिळविलेले उत्पन्न करपात्र आहे. अदनान सामीने गाण्याचे अनेक कार्यक्रम करून, सिनेमात गाणी म्हणून मिळविलेले उत्पन्न करपात्र आहे. विश्वास बसत नसल्यास एखाद्या निधर्मी सीएला विचारून खात्री करून घ्या.

>>> तिथे तर हिंदुत्वाचे तारणहार पक्षच राज्य करत आहेत..

पण त्यांचे निधर्मी एफएसआय किंग सम्राट मुंबई आणि दिल्लीत आहेत ना. मग महापालिकेतल्या चिल्लरांना कोण विचारणार?

माझ्या प्रतीसादा वर तुम्ही जे लॉजिकली लिहीलेत त्यावरून कळलेच की तुम्ही किती लॉ जि कल अ हात

मास्तुरे मंदार

अरे यांच बरोबर आहे. त्यांचे बोलवता धनी तो दिग्विजय सिंग असेल.

ओसामाजी लादेन म्हणणारा !!!

विवेक फुकट ची बडबड करू नका....
मदत करतो मी.....दम असेल तर घ्या....फुशारक्या मारू नका....
करायला नाही काम...नुसता तोंडातच दम तुमच्या....

पैसे मी देतो...काम तुम्ही करा...

A foreigner (including a nonresident Indian) who was not resident in India in any of the four financial years immediately preceding the year of arrival in India is entitled to a special tax concession, if :
The foreigner has specialized knowledge and experience in construction or manufacturing operations, mining, generation of electricity or any other form of power, agriculture, animal husbandry, dairy farming, deep-sea fishing, shipbuilding, grading and evaluation of diamonds for diamond export or import trade, cookery, information technology (including computer architecture systems, platforms and associated technology), a software development process and tools, or such other fields as the central government may specify; and

The individual is employed in any business in India in a capacity in which specialized knowledge and experience are used.
असादेखील नियम आहे... एखादा कलाकार या कलमाचा फायदा घेऊ शकेल, असे वाटते. कारण त्याची कला स्पेशलच आहे, असे तो म्हणणार...

Note: During the first 48 months commencing from the date of arrival in India, the remuneration will not be subject to any further tax in such a foreigner's hands if the employer bears the tax on the remuneration.

दिग्विजय सिंग लाजेने मान खाली घालेल यांच्या पोष्टी बघून. ट्रेनिंगसाठी येईल यांच्याकडे. आहात कुठे!!!!!

Pages