सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

हायला, गामा पैलवान,

>>हा पूर्णपणे ऐच्छिक विधी आहे.
हे सांगून बरे केलेत.

>>मात्र इथे ब्राह्मण लोक ब्राह्मणांनी भोजन केलेल्या उष्ट्या पत्रावळींवरुन लोळण घेतात. त्यामुळे दलितांना अपमानित करण्यासाठी मडे स्नान सुरू करण्यात आले या आरोपात तथ्य नाही.

आणि या वाक्याने तर थोबाडच फुटलं की वो असे आरोप करणार्‍यांचं Happy

<<
चुकीच्या सामाजिक
प्रथा दूर
करायला तात्विकदृष्ट्या
खरेतर सत्तेवर
यायची गरज पडू नये.
सत्तेवर
नसतांनाही सावरकरांनी
रत्नागिरीत
यासाठी खूप
कांही प्रयत्न केले.
महात्माजींनीही समक्ष
भेटीदरम्यान
या प्रयत्नांचे कौतूक केले
होते. तो एक
लेखाचा स्वतंत्र विषय
होऊ शकतो.>>कसले प्रयत्न? पुरावे द्या आणि बोला .

<<भूतकाळातील मढी उकरणे
हा त्यांचा छंद आहे.. राम
मंदीर, ताजमहाल ,
अंदमान स्मारक
ही त्याची ठळक
उदाहरणे.. त्याना जर
कुठून शोध
लागला की अफगाणिस्तानच्या पंतप्रधानच्या किचनच्या जागी पूर्वी पुराणकाळात
गांधारीचे किंवा कैकेयीचे
किचन होते, तर हे लोक
तेही पाडून गांधारी-
कैकेयी रसोई उभारतील !
लई डेंजर लोक हायेत हे!>>
''
जागतिक ईतिहासातील खिंडारे"हे पुस्तक पु ना ओकांचे विनोदी पुस्तक वाचा अशी बरीच मढी उकरली आहेत त्यात:-)

अब समय आ गया है, लवकरच एखादा नविन अवतार येणार आणि ही सगळी सुंदोपसुंदी बंद करणार असे वाटत आहे. पण तो अवतार कदाचित तुमच्या आमच्या या जन्मात येईल की नाही माहित नाही. कदाचित नाही.

<<दलितांच्या मंदिर
प्रवेशाच्या प्रयत्नांबद्दल
तुम्हाला काहीच माहीत
नाही जेम्स?>>

तेच विचारतोय, कुठले मंदिर? कधी प्रवेश दिला? साल कोणते?. साने गुरुजींचे कार्य माहीत आहे, तात्यारावांचे असे कार्य ऐकिवात नाही.

>>> कर्नाटकातील एका मंदिरात ब्राम्हण लोकांची पंगत उठली की त्या उष्ट्या पत्रावळीवरून दलितांनी लोळण घ्यायची अशी प्रथा आजही सुरू आहे. सावरकर असते त्यांनी असल्या फालतू प्रथेला अजिबात समर्थन दिले नसते.

सहमत! सावरकरांनी अशा प्रथेला कडाडून विरोध केला असता. २-३ महिन्यांपूर्वी इंडिया टुडेमध्ये वाचलं की, ही घाणेरडी प्रथा बंद करायचा कर्नाटकातल्या एका मंत्र्यांने प्रयत्न केला होता. पण त्याला तिथल्या पुजार्‍यांनी आणि प्रत्यक्ष लोळण घेणार्‍या दलितांनीच विरोध केला. अशी लोळण घेतल्याने त्वचेचे विकार बरे होतात असा त्यांचा अंधविश्वास आहे.

पूर्वी १९८७ मध्ये कर्नाटकातील चंद्रेगुत्ती येथील नग्नपूजा पोलिसांची मदत घेऊनच कायमची बंद करण्यात आली. त्यापूर्वी लोकांना आवाहन करून व लोकशिक्षण करून फायदा झाला नव्हता. इथे देखील नुसती आवाहने करून किंवा लोकशिक्षण करून लोक ऐकणार नाहीत. ही लोळण घ्यायची घाणेरडी प्रथा पोलिसांच्या मदत घेऊनच कायमची बंद करायला हवी.

एखाद्या व्यक्तीवर टीका करायची असेल तर किमान माहिती असावी लागते (ज्ञान सोडा हो, ती यांच्याकडून अपेक्षाही नाही), पण सावरकरांच्या सामाजिक कार्याबद्दल काडीचीही माहिती नाही आणि आलेत टीका करायला.

बरं "हरिजन" या शब्दावरचे सावरकरांचे विचार तरी ठावूक आहेत का?
(आणखी एक हिंट).

काये विशाल, फुलटॉसवर बोल्ड होणारे लोक्स हे Wink

१००% सहमत. पण कर्नाटकात डॉ. आंबेडकरांची नवी घटना अंमलात आल्यावर निदान ५०-५५ वर्षे तरी कॉंग्रेस/तत्सम स्वयंघोषित पुरोगामी पक्षच राज्य करीत होते ना? मग ती प्रथा त्यांनी बंद का केली नाही? ही प्रथा बंद करण्याची उबळ एकदम हिंदुत्ववादी सत्तेवर आल्यावरच का आली? हिंदुत्ववादी सत्तेपासून कोसो दूर होते तेव्हाच ती प्रथा बंद करायला यांना काय अडचण होती. पुरोगाम्यांनाच ती हवी होती म्हणून हिंदुत्ववाद्यांकडे सोईस्करपणे बोट दाखवले जाते आहे असे तर नाही?.

चंद्रेगुत्ती इथली प्रथा बंद करण्यासाठी 'पुरोगामी' लोकांनीच पुढाकार घेतला होता.

शिवाय फुले-आंबेडकरांच्या अनुयायांनीही शाहू-फुले-आंबेडकरांचा हा पराभव केलेला नाही का?

छान ! म्हणजे फुले-आंबेडकरांच्या अनुयायांनी त्यांचा पराभव केला म्हणून आम्हीही सावरकरांचा पराभव करणार असा हट्ट असेल तर प्रश्नच संपला.

तरी नशीब ! ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळीतून तेजस्वी किरण बाहेर पडतात असले सनातनी संशोधन आले नाही.

>>छान ! म्हणजे फुले-आंबेडकरांच्या अनुयायांनी त्यांचा पराभव केला म्हणून आम्हीही सावरकरांचा पराभव करणार असा हट्ट असेल तर प्रश्नच संपला.
इथे सावरकरांचा पराभव करायला कुणिच बसलेलं नाही. फक्त सावरकर समर्थकांकडे एक बोट दाखवताना तीन बोटे स्वतःकडे आहेत एवढंच दाखवून द्यायचं होतं. Happy

झकासराव | 5 March, 2012 - 14:28
कैच्या कै सुरु आहे. >>>>>>

Rofl

Rofl

जागतिक ईतिहासातील खिंडारे"हे पुस्तक पु ना ओकांचे विनोदी पुस्तक वाचा

भारतीय इतिहासातील घोडचुका असे एक त्यांचे विनोदी आणि प्रचारकी पुस्तक आहे... पण जागतिक इतिहासातही ते खिंडारे पाडत होते हे माहीत नव्हते ! Proud

शाब्दिक फोडाफोडी अगदी मजेदार आहे.. अमेरिका - अमरिश, ऑस्ट्रिया - अस्त्रीय, इजिप्त - अजपती, केनडा - कणाद, उरूग्वे - उरूगावः, ग्वाटेमाला - गौतमालय Proud

http://khattamitha.blogspot.in/2008/03/blog-post_11.html

जागतिक इतिहासातले घोटाळे दाखवणारी अनेक पुस्तके आहेत. आणि ती पाश्च्यात्यांनीच काढलेली आहेत. पण तुमचा धड भारतीय पुस्तकांचा अभ्यास नाही. त्यामुळे गिरा तो भी टांग उपर छाप उत्तरे चालुद्या.

कुणाला ब्रा-म्हण शब्द लिहायला शिकव. कुणाचा इतिहासाचा किती अभ्यास आहे याचे सर्टिफिकेट दे... तुम्हाला मायबोलीने पंतोजी म्हणून नियुक्त केलय का? Proud

जामोप्या,

>> जीना, सावरकर, गांधीजी सगळेच वर गेले.... आता कुणाला कसले उत्तर देणार आहात?

जिना वर गेला असेल, पण त्याची अवलाद आजूनही जिवंत आहे. बलुचिस्तानातल्या हिंदूंना हुसकावून लावण्याचे कटकारस्थान गेले चारपाच वर्षे सुखेनैव चालू आहे.

या हिंदूंच्या रक्षणाकरिता भारत सरकारने सावरकरांची शिकवण आचरणात आणायला पाहिजे.

कळलं आता काय ते?

आ.न.,
-गा.पै.

टीप : हिंदूंच्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल महाराष्ट्र टाईम्सचं अभिनंदन!

मुद्दे समजून उमजून घ्यायलाच हे तयार नाहीत. यांचे म्हणणे सपशेल खोटे पडले तरीही. आणि वर मला काय नियुक्त केले आहे त्यावर भाष्य करताहेत Biggrin

या हिंदूंच्या रक्षणाकरिता भारत सरकारने सावरकरांची शिकवण आचरणात आणायला पाहिजे.

म्हणजे नेमकं काय करणार? पॅरीसमध्नं पिस्तुल आणून ठ्ठो ! करणार काय? नेमकं काय करायचं? आणि ते बलुचिस्तानातले ( पाक) हिंदु आहेत... त्यान्ना मदत तुम्ही नेमकी कशी करणार आहात? उगाच्ग एक दोन ओळींची उत्तरं देण्यापेक्षा एक सेपरेट बीबी काढा.. तिथं सविस्तरच लिहा..

दुसर्‍या देशाच्य स्वातंत्र्याचा आणि आपला संबंध नाही, हे तुमचे संघीय विचार होते... पण आता दुसर्‍या देशातल्या अन्यायाविरुद्धही तुमचा आत्मा चळवळ करु लागला आहे.. ! तुमच्या मधला मोहनदास जागा होत आहे, याचेच हे लक्षण नै का? ( आठवा : खिलाफत) ... तुमचेही अभिनंदन !!! Proud

जागोमोहनदासप्यारे!

>>दुसर्‍या देशाच्य स्वातंत्र्याचा आणि आपला संबंध नाही, हे तुमचे संघीय विचार होते.
दुसर्‍या देशातल्या तिथल्या लोकांचा आणि आपला संबंध नाहि असा अर्थ आहे त्याचा,
हिंदू असतील तर ते आपलेच.

मी पण कोणाशी वाद घालतोय Sad

<<जागतिक इतिहासातले
घोटाळे दाखवणारी अनेक
पुस्तके आहेत.
आणि ती पाश्च्यात्यांनीच
काढलेली आहेत. पण
तुमचा धड भारतीय
पुस्तकांचा अभ्यास नाही.
त्यामुळे
गिरा तो भी टांग उपर
छाप उत्तरे चालुद्या.>>

पाश्चिमात्य लेखकांनी खिंडारे पाडणारी कोणती पुस्तके काढलीत? नावे द्या.
आणि जरी काढली असतील तरी त्यात मेंदुला झिंणझिण्या आणणारे प्रचारकी दावे नक्कीच असणार नाहीत.

>>>> जागतिक इतिहासातले घोटाळे दाखवणारी अनेक पुस्तके आहेत. आणि ती पाश्च्यात्यांनीच काढलेली आहेत.
>> पाश्चिमात्य लेखकांनी खिंडारे पाडणारी कोणती पुस्तके काढलीत? नावे द्या. आणि जरी काढली असतील तरी त्यात मेंदुला झिंणझिण्या आणणारे प्रचारकी दावे नक्कीच असणार नाहीत.

भारतावरील आर्यांचे तथाकथित आक्रमण (ही थिअरी भारतीयांमध्ये फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी जन्माला घातली होती) व जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरील पुस्तक ही पाश्चात्य इतिहासकारांची २ प्रमुख घोटाळेबाज पुस्तके आहेत.

<<एखाद्या व्यक्तीवर
टीका करायची असेल तर
किमान
माहिती असावी लागते
(ज्ञान सोडा हो,
ती यांच्याकडून
अपेक्षाही नाही), पण
सावरकरांच्या सामाजिक
कार्याबद्दल
काडीचीही माहिती नाही आणि आलेत
टीका करायला.
बरं "हरिजन"
या शब्दावरचे
सावरकरांचे विचार
तरी ठावूक आहेत का?
(आणखी एक हिंट).>>

हींट देताय कि गोबेल्सनीतीने प्रचार करताय?

Pages