सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

केवळ काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थाला सोयीस्कर अश्या गोष्टी बरोब्बर उचलल्या!

आणि भाजपाच्या काळात काय युधिष्ठीराची न्यायव्यवस्था कामाला होती का? त्यांच्याही काळात काँग्रेसचीच व्यवस्था, तेच कायदे होते की. Proud

आणि तुम्ही तरी दुसरं काय करताय? आफ्रिकेचा दाखला तुम्हाला नको होता.. आणि स्वतः मात्र इंग्लंड, अमेरिका काय काय उदाहरणं देत बसलय? Proud

या धाग्याचा सारांश -

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना १९१० साली ५० वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊन अंदमानला तुरूंगात ठेवण्यात आले. १४ वर्षे तुरूंगवास भोगल्यावर १९२४ साली तिथून सुटका होऊन रत्नागिरीला १९३७ पर्यंत स्थानबद्ध करण्यात आले. अंदमानला त्यांचा भरपूर छळ होऊन सक्तमजुरी करावी लागली. तो खरा तुरूंगवास होता. ती एखाद्या पॅलेसमधली राजकीय स्थानबद्धता नव्हती.

त्यांचे राजकीय विचार व एकंदरीत सशस्त्र लढा सत्ताधारी काँग्रेसच्या पचनी पडत नसल्याने स्वातंत्र्यानंतर त्यांची बरीचशी उपेक्षा करण्यात आली. गांधीवधाच्या खटल्यात त्यांना अडकविण्यात येऊन १९४८ मध्ये पुन्हा तुरूंगात टाकण्यात आले. ते व इतर अनेक क्रांतिकारक ज्या अंदमानमधल्या तुरूंगात होते, तो तुरूंग पाडून त्यांचे स्मृतीस्थान नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी हॉस्पिटल बांधण्याचे कारण पुढे करण्यात आले. नंतर जनतेच्या दबावामुळे तुरूंगाचा थोडासा भाग वाचला.

वास्तविक पाहता जगभर अशी ऐतिहासिक स्थळे मुद्दामहून जतन केली जातात. शेक्सपिअरचे १६ व्या शतकातील राहते घर अजून जतन केले आहे. ग्रीसमधील २००० वर्षांपूर्वींची काही देवळे अजून जतन करून ठेवली आहेत. दुसर्‍या महायुद्धात जर्मनांनी उभारलेल्या छळछावण्या अजूनही पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जर्मनी इ. देशांनी जशाच्या तशा जतन केल्या आहेत. दुसर्‍या महायुद्धात ज्यूंना किती भयंकर अवस्थेतून जावे लागले याची पुढील पिढ्यांना कल्पना यावी व अशा प्रकारची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी याची स्मृती जपून ठेवली आहे. सिंगापूरमध्ये जपान्यांनी दुसर्‍या महायुद्धात सिंगापुरींना ज्या तुरूंगात ठेवले होते, तो तुरूंग अजून जतन केला आहे. अंदमानचा तुरूंग म्हणजे, ब्रिटिश राजकीय कैद्यांवर किती भयंकर अत्याचार करत होते, याचा पुरावा होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो साक्षीदार होता. तो जतन करून ठेवायला पाहिजे होता.

पण त्या तुरूंगात काँग्रेसशी संबंधित एकही व्यक्ती नव्हती. तुरूंग जतन केला असता तर त्यामुळे सावरकरांची व इतर सशस्त्र क्रांतिकारकांची स्मृती जिवंत राहिली असती व त्यांची तुलनाही झाली असती. त्यामुळे तो तुरूंग नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. चीनने देखील तिआन मान चौकाची रंगरंगोटी करून १९८९ मधले तिथले ३००० विद्यार्थ्यांचे हत्याकांड लपविण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्याची येथे आठवण होते.

सावरकरांच्या स्मृती जिथे शक्य आहे तिथे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.

अंदमान येथील तुरूंग नष्ट करण्याचा प्रयत्न झाला.

स्वारगेटच्या चौकाचे पूर्वीचे नाव "सावरकर चौक" असे होते. आताचा एस टी स्टँड आहे त्या कोपर्‍यात त्या नावाचा फलक अनेक वर्षे होता. १९८३ च्या आसपास तो फलक प्रथम नाहीसा झाला व काही दिवसांनी जेधेंचा पुतळा चौकात उभा राहिल्यावर "जेधे चौक" असा फलक उभा राहिला. या नामांतराविरूद्ध सावरकरप्रेमींनी आवाज उठविल्यावर, ज्याप्रमाणे दादोजी कोंडदेवांचा पुतळा बहुमताच्या जोरावर उखडून काढण्यात आला, तसेच बहुमताच्या जोरावर हे नामांतर रेटून नेले.

मुंबईतल्या वांद्रे वरळी सेतूला सावरकरांचे नाव द्यायचे हे सेतूची योजना आखताना १९९७ मध्ये तत्कालीन सरकारने ठरविले होते. सेतू पूर्ण झाल्यावर मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने सावरकरांचे नाव न देता त्याला राजीव गांधींचे नाव दिले.

२००४ मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यावर अंदमान येथे उभारण्यात येणार्‍या स्मृतीस्तंभावरील सावरकरांची वचने काढून टाकण्यात येऊन तिथे गांधींची वचने कोरण्यात आली.

सावरकरांचे भित्तिचित्र संसदेत लावायला देखील काँग्रेसने जोरदार विरोध केला.

जिथे शक्य झालं तिथे सावरकरांविरूद्ध भूमिका घेण्याचा व सावरकरांची स्मृती मिटविण्याचा बराचसा यशस्वी प्रयत्न काँग्रेसने केला. त्यांचा गुन्हा काय होता तर भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी काँग्रेसपेक्षा वेगळ्या मार्गाने प्रयत्न केला.

दामोदरसुत यांनी काढलेला हा धागा खूपच माहितीप्रद होता. पण नेहमीच्याच यशस्वी कलाकारांनी इथे येऊन अर्वाच्य भाषेत लिहून त्याला अवकळा आणली.

केवळ माझाच हत्ती मोठा.... Happy या बालिश मानसिकतेमधुन बाहेर कधी पडणार... ?

प्रतिकुल परिस्थितीत (सरकार तुमच्या बाजूला नाही आहे असे गृहित धरतो) स्वातंत्र्यविर सावरकरांचे कार्य लोकांसमोर आणण्यासाठी आपण काय केले, काय करु शकतो किंवा काय करायला हवे? त्यांच्या काही चुका झाल्या असतील वा मते कालबाह्य असतील तर ते सर्व बाजूला ठेवा. उगाचच त्यांच्या प्रत्येक कृत्याचे समर्थनच करायला हवे असे नाही.

त्यांची मार्सेलिस ची अविस्मरणीय उडी आणि त्यामधुन कोट्यावधींना मिळणारी प्रेरणा अशा घटना फार कमी भाग्यवंतांच्या नावावर आहेत. त्या घटनांच्या वर्णनाने आजही अंगावर काटा येतो.

निव्वळ एक कवी, नाटककार, सुधारक म्हणुनही त्यांचे कार्य मला अचंबीत करते. आज २०१२ मधे त्यांचे सुधारक म्हणुन केलेले कार्यही जनतेसमोर व्यावस्थित आणले जात नाही. समोरच्या व्यक्तींच्या शंका प्रामाणिक असतील तर त्याचे समाधान करणे समजतो... पण स्वातंत्र्यविर सावरकर कसे लहान होते (त्यांच्या चित्रपटाला मिळालेली कमी प्रसिद्धी, किती लोकांना माहिती होती? असेही म्हणुन अप्रत्यक्षरितीने तुलना करायची मग पुढे समविचारी लोकं अ‍ॅपल ऑरेंज अशी तुलना करता येत नाही असे म्हणत समंजसपणाचा आवही आणतात - दोन्ही विधानांवर आपणच टाळ्या वाजवायच्या), किंवा त्यांनी माफीनामा लिहीला असे बाळबोध विधान करणार्‍यांकडे दुर्लक्ष करणे समंजसपणा ठरेल. त्यांचा उद्देश चर्चा, सुसंवाद साधणे हा नसतोच.

1979 ची माहीती आता 2012 मधे देण्याची गरज काय...? स्मारक कधीचेच झाले....

कबर खोदून काढत बसणे.....हे तुमची काम आहे?
.
.
.
.
.
.
आताच्या परिस्थितीवर लिहा त्यावर वाद घालायचे सोडून.....बिनडोक आणि मुर्खांसारखे भुतकाळातल्या विषय संपलेल्या गोष्टी का काढत आहेत......

भूतकाळातील मढी उकरणे हा त्यांचा छंद आहे.. राम मंदीर, ताजमहाल , अंदमान स्मारक ही त्याची ठळक उदाहरणे.. त्याना जर कुठून शोध लागला की अफगाणिस्तानच्या पंतप्रधानच्या किचनच्या जागी पूर्वी पुराणकाळात गांधारीचे किंवा कैकेयीचे किचन होते, तर हे लोक तेही पाडून गांधारी- कैकेयी रसोई उभारतील ! लई डेंजर लोक हायेत हे! Proud

बहुमताच्या जोरावर हे नामांतर रेटून नेले.

मग कशाला बोंबलताय? लोकशाही मार्गानेच काम झाले की.

पण त्या तुरूंगात काँग्रेसशी संबंधित एकही व्यक्ती नव्हती.

पण देशभरात इतरही ढीगभर तुरुंग होते की.. त्यात काँग्रेसची माणसं पोत्यात चिरमुरे असतात तशी भरलेली होती. ( त्यात तुमच्या भाजपाचे किती लोक होते? ) पण काँग्रेसनी यातली कुठलीच वास्तू आमच्या लोकान्नी केलेल्या त्यागाचा पुरावा म्हणूण कधीही जतन केली नाही. कारण काँग्रेसला त्याची गरज वाटली नाही.. मग अंदमानाच्याच बाबतीत मात्र काँग्रेसने जाणून बुजुन स्मृती नष्ट करायला तुरुंग नष्ट केला असा आरोप का केला जातो? काँग्रेसने फक्त काँग्रेसी लोकांचे तुरुंग ठेवले असते आणि अंदमान नष्ट केले असते तर समजण्यासारखे होते. पण त्यानी कुठल्याच तुरुंगाला कुणाचेही स्मारक म्हणून जतन केलेले नाही. त्यामुळे सावरकरप्रेमींचा ह आरोप निराधार आहे. ती केवळ काँग्रेस विरोधी केलेली रडारड आहे. बाकी काही नाही.


भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो साक्षीदार होता. तो जतन करून ठेवायला पाहिजे होता.

मग अडवले कुणी होते? अंदमान जेलपैकी ७ विंगपैकी २ विंग या जपानच्या कारकिर्दीत १९४२-४५ या काळात पाडल्या गेल्या.. तेंव्हा तुम्ही विरोध का नाही केला? जपान म्हणजे तुमचेच मित्र राष्ट्र ना? म्हणजे तुमचे जहालवाल्यांचेच सरकार की! आणि त्यानंतर काँग्रेसच्या काळात आणखी २ विंग पाडल्या तर त्याल मात्र आठवणी संपवायला केले असे म्हणून विरोध? तुमचे वागणे असे डबल स्टँडर्ड का?

जामोप्या,

१.
>> आणि भाजपाच्या काळात काय युधिष्ठीराची न्यायव्यवस्था कामाला होती का?

म्हणूनच आम्ही भाजपला कमळकाँग्रेस म्हणतो.

२.
>> आफ्रिकेचा दाखला तुम्हाला नको होता.. आणि स्वतः मात्र इंग्लंड, अमेरिका काय काय उदाहरणं देत बसलय?

भारताशी संबंधित उदाहरणे दिली तर त्यात काय बिघडलं? गांधींच्या आफ्रिकेतल्या दाखल्याचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नाही. इंग्लंड आणि अमेरिकेची उदाहरणे भारतीय लोकशाहीशी संबंधित आहेत.

त्यातूनही आपल्याला गांधींच्या आफ्रिकेतल्या कार्याविषयी एव्हढा पुळका आला असेल तर इथे बघा त्यांनी दरबानमध्ये काय दिवे लावलेत ते!

आ.न.,
-गा.पै.

मीअण्णाहजारे,

१.
>> पण देशभरात इतरही ढीगभर तुरुंग होते की.. त्यात काँग्रेसची माणसं पोत्यात चिरमुरे असतात तशी भरलेली
>> होती. ( त्यात तुमच्या भाजपाचे किती लोक होते? )

ज्याअर्थी तुम्ही भाजपचा उल्लेख केलात, त्याअर्थी हे तुरुंग स्वातंत्र्योत्तर काळातले असावेत. बरोबर आहे मग! काँग्रेसचे गुन्हेगार लोक चिरमुर्‍यासारखे भरती असणारंच! Biggrin

यात काय नवीन! Proud

२.
>> काँग्रेसनी यातली कुठलीच वास्तू आमच्या लोकान्नी केलेल्या त्यागाचा पुरावा म्हणूण कधीही जतन केली
>> नाही.

काय सांगताय राव! काँग्रेसच्या लोकांनी आणि त्याग केला? Lol भारीच विनोदी बुवा तुम्ही. एव्हढे थोर त्यागी पुरुष काँग्रेसात होते, तर गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस बरखास्त करायचं का सुचवलं? काय अंदाज आहे आपला?

३.
>> काँग्रेसने फक्त काँग्रेसी लोकांचे तुरुंग ठेवले असते आणि अंदमान नष्ट केले असते तर समजण्यासारखे होते.

आजून एक भयाण विनोद! Proud काँग्रेसचे नेते स्थानबद्ध होत असंत. तुरुंगात जात नसंत!! आणि गेले तरी तो पंचतारांकित तुरुंगवास असे. तो काय डोंबलाचा जतन करून ठेवायचाय?

आ.न.,
-गा.पै.

काँग्रेसचे नेते स्थानबद्ध होत असंत. तुरुंगात जात नसंत!!

तुमचा इतिहास लई कच्चा आहे मालक.. स्थानबद्धता ही केवळ काही विशेष लोकाना मिळालेली शिक्षा असायची.. पण देशभर काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली शेकडो लोकान्नी तुरुंगवास भोगलेला आहे. अर्थात या तुरुंगात जहाल क्रांतिकारकही असायचे... त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यान फक्त स्थानबद्धत मिळायची हा खोटा आरोप करु नका.

काँग्रेसने सावरकरांची अठवण संपवायला अंदमान तुरुंग नष्ट केला, हा तर अतिशय बालिश आरोप आहे.. याच काँग्रेसच्या काळात मराठीच्य पुस्तकात माझी जन्म्ठेपमधले उतारे धडे म्हणून असतात.. इतिहासाच्या पुस्तकत सावरकर , त्यांची उडी, मदनलाल धिंग्रा, मॅडम कामा- त्यांचा झेंडा, सावरकरांची शिक्षा हा सगळा उल्लेख काँग्रेस अगदी मनमोकळेपणाने करते.. सावरकरांची जयोस्तुते ही कविताही मराठीच्या पुस्तकात छापते. सावरकरांचा फोटोही इतिहसच्य पुस्तकात छापते. .. आणि जे जेल बघायला भारतातले ५ % लोकही जात नाहीत, ते पाडले तर कारण काय म्हणे तर सरकारला सावरकरांची आठवण ठेवायची नाही, म्हणून सरकार असे करते.. ! किती बालिश आरोप आहे हा!

लोकाना सावरकर आणि इतर क्रांतीकारकांची नावे काँग्रेसने छापलेल्या इतिहासच्या पुस्तकतून समजली अहेत. लोकाना इतिहास शिकवायला बीजेपी किंवा शाखेचे चड्डीवाले जात नाहीत, सरकारचीच पुस्तके जातात आणि त्यात सावरकर आणि इतर क्रांतिकारकांबद्दल आदराने आणि सविस्तरच लिहिलेले असते... त्यामुळ काँग्रेसने त्यांचे नाव मिटवायचा प्रयत्न केला हा आरोप अगदी बालिशच आहे.

आणि हा आरोप १९६० पासून करुनही काँग्रेसविरोधी पक्षाना जनतेने सत्तेपासून लांबच ठेवलेले आहे, म्हणजे त्यांचे म्हणणे जनतेला पटलेले नाही हेच यातून सिद्ध होते.. Proud Proud

आधी या लोकानी हे जेल- हॉस्पिटल प्रकरण पेटवलं. मग काही वर्षानी राम मंदीर प्रकरण उकरुन गोंधळ घातला. ते मिटते न मिटते तोच ताजमहाल हे हिंदु देऊळ होतं म्हणून याच पक्षानी गोंधळ घातला. त्यानंतर समुद्रातल्या काही किलोमीटर असलेल्या सेतू मधला केवळ काही मीटरचा हिस्सा तोडून जहाज वाहतुकीमध्ये लाखो गॅलन इंधन वाचवायच्या प्लॅनला अडथळा आणला.. ( आणि हेच लोक आमचे सावरकर किती विज्ञानवादी आहेत, हे सांगायला कचरत नाहीत ! ) आणि साठ वर्षे असले उद्योग करुनही हे सत्तेच्या जवळपासही पोहोचलेले नाहीत. आता जोपर्यंत याना नवीन एखादी बिल्डिंग, वास्तू पेटवापेटवी करायला मिळत नाही, तोपर्यंत जुन्या प्रकरणांवर हे लोक असले धागे काढत रहाणार. देवा, या लोकाना आता नवीन काहीतरी प्रकरण दे! Proud

सावरकरांची दोन घरे- एक नासिकला आणि एक मुंबईला- म्हणजे दोन्ही घरे, विशेषतः मुंबईचे घर, हिंदुत्वाचे तारणहार पक्षाच्याच इलाक्यात आहेत. पण साठ वर्षात तिथे कुठेही प्रेरणादायी भव्य स्मारक बांधणे यान्ना जमले नाही.. मुंबई बद्दल तर काय बोलावे? यांच्या इलाक्यात यांच्या बुडाजवळ पाकिस्तानचा गायक डझनभर फ्लॅट घेतो आणि सावरकरांच्या मालकीच्या वास्तूत मात्र ६० वर्षे झाली तरी एखादे प्रेरणादायी स्मारक मात्र उभे राहू शकत नाही.. आणि उलट, हेच पक्ष आणि यांचे इंटरनेटवरचे ई-भाट काँग्रेस सरकार सावरकरांची आठवण मिटवत आहे, असा आक्रोश करायला पुढे असतात ! किती गंमत आहे नै? Proud

पण देशभरात इतरही ढीगभर तुरुंग होते की.. त्यात काँग्रेसची माणसं पोत्यात चिरमुरे असतात तशी भरलेली होती. ( त्यात तुमच्या भाजपाचे किती लोक होते?

अगदी अनुमोदन..

जमोप्या,

<<<<<
मास्तुरे, तुलना करताना जरा तरी तारतम्य ठेवायचे की हो! कुठे हिमालय, कुठे मुतखडा! चाल्ले लगेच तुलना करायला !! >>>>

किती ही झाले तरी तुम्ही सावरकरांना मूतखड्याची उपमा दिलीत. !!!!

आणी कोणालाही त्याचे काहीच वाटले नाही ??

जामोप्या,

युक्तिवाद करता येत नाही म्हणून विषय भरकटवू नका. ज्या लोकांनी काँग्रेसच्या आवाहनावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगला ते सारे कुठे गेले? सत्तेवर आले म्हणता तर परदेशात गेल्या ६४ वर्षात २५ लाख कोटी रुपये काळा पैसा कसा गेला? सत्तेवर आले नाही म्हणता तर त्यांना सत्तेतून कोणी वगळले?

गांधींना काँग्रेस बरखास्त करावीशी वाटली यातच सारं आलं.

आ.न.,
-गा.पै.

मुतखडा लिहीणार्‍यांना अर्वाच्य दिसले नाही त्यात? काय हो जाम्प्या?

>>कर्नाटकातील एका मंदिरात ब्राम्हण लोकांची पंगत उठली की त्या उष्ट्या पत्रावळीवरून दलितांनी लोळण घ्यायची अशी प्रथा आजही सुरू आहे.
कृपया हा शब्द ब्राह्मण असा लिहावा. नम्र विनंती.

ब्राह्मणांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले. विज्ञानवाद, समता, बंधुत्व दिले .त्यांच्यावर टिका करताना विचार करावा.

नथिंगनेस... हे नाव कुठेतरी ऐकले आहे... हां हां.. स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ असा काहीतरी धागा काढला होता, बायकानी त्याचे बारा वाजवले, तेच का???? Proud

अशी काही घृणास्पद प्रथा आजही आहे कां? असेल तर Sad त्याला कायद्याने मज्जाव नाही करता येत?

सावरकर प्रेमींनी (भक्तांनी !) स्वातंत्र्यविरांचा मोठे पणा सिद्ध करण्यासाठी बाकीच्यांच्या चुका दाखवणे गरजेचे नाही किंवा तशी अवशक्ता देखील नाही आहे. ते त्यांच्या कर्तुत्वाने मोठे आहेतच... इतरांचा छोटेपणा दाखवण्याच्या नादांत आपण स्वत:चेच नकळत नुकसान करवुन घेतो.

नथिंगनेस साहेब - तुमच्या मताशी संपुर्ण असहमत Angry ... कृपया असे काही भडक लिहू नका किंवा क्रुर थट्टा करु नका.

सर्व जाती, धर्म आणि थरातील लोकांनी आणि त्यांच्या योगदाना मुळे भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे.

Proud

वेळ जात नसला की हा धागा वाचण्यासारखा वाटतो

अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगीर आहे

सत्य कटु असले तरी सत्यच असते.

असं काही नाही. सत्य गोडसुद्धा असते.. गांधीजीनी तर सत्य हे ईश्वर असते असे म्हटले आहे.. मग ते कडू कसे असेल?

vijaykulkarni जी
>>गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते.<<

हे योग्य की अयोग्य? असे मी विचारले होते. आपल्या यावरील उत्तराने माझे समाधान झालेले आहे.

>>प्रा मोरे यांनी काही हिंदुत्ववादी लेखक/ विचारवंतांवर अगदी नावानिशी टीका केला आहे.<<

खरे आहे. पण सावरकरांवरील त्यांच्या दोन पुस्तकांमध्ये (मूळ आवृत्यांमध्ये तर फारच विस्ताराने) सावरकरांच्या हिंदुत्ववाद आणि सामाजिक सुधारणांच्यावर टिका करणाऱया सर्व स्वयंघोषित प्रसिद्ध पुरोगामी मंडळींवर अगदी नावानिशी टिका करणारीच बहुतेक सर्व पाने आहेत ही बाबही तुम्ही निदर्शनाला आणायला हवी होती. असे माझे म्हणणे आहे. असो. सध्या तरी त्यात तुमचा कांही हेतू दडलेला असावा असे मला वाटत नाही.

>>तो मी नव्हेच. दुसर्‍या एका कुलकर्णी ने लिहिला होता तो. लिंक शोधून टाकेन.<<
ते कुलकर्णी तुम्हीच असा माझा नामसादृश्यामुळे गैरसमज झाला. तो लेख मी वाचला होता. माझ्या गैरसमजामुळे त्या कुलकर्णींचे विचार तुमच्यावर नकळत का होईना लादलॆ गेल्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व!

>>कर्नाटकातील एका मंदिरात ब्राम्हण लोकांची पंगत उठली की त्या उष्ट्या पत्रावळीवरून दलितांनी लोळण घ्यायची अशी प्रथा आजही सुरू आहे. सावरकर असते त्यांनी असल्या फालतू प्रथेला अजिबात समर्थन दिले नसते. <<
१००% सहमत. पण कर्नाटकात डॉ. आंबेडकरांची नवी घटना अंमलात आल्यावर निदान ५०-५५ वर्षे तरी कॉंग्रेस/तत्सम स्वयंघोषित पुरोगामी पक्षच राज्य करीत होते ना? मग ती प्रथा त्यांनी बंद का केली नाही? ही प्रथा बंद करण्याची उबळ एकदम हिंदुत्ववादी सत्तेवर आल्यावरच का आली? हिंदुत्ववादी सत्तेपासून कोसो दूर होते तेव्हाच ती प्रथा बंद करायला यांना काय अडचण होती. पुरोगाम्यांनाच ती हवी होती म्हणून हिंदुत्ववाद्यांकडे सोईस्करपणे बोट दाखवले जाते आहे असे तर नाही?.
आणखी एक गोष्ट. आता दलितांच्या बाजूने मजबूत कायदे असतांना या असल्या संतापजनक फालतू प्रथेत दलित लोकही सहभागी होत असतील तर हा डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनीच त्यांचा पराभव केलेला नाही का? शिवाय फुले-आंबेडकरांच्या अनुयायांनीही शाहू-फुले-आंबेडकरांचा हा पराभव केलेला नाही का? थोर पुरुषांचे अनुयाय़ी असे वागण्याची खूप उदाहरणे आहेत. तुम्ही फक्त एकाकडेच अंगुली निर्देश करणे बरोबर नाही.
मूळ विषयापासून हा धागा सामाजिक प्रश्नांकडे जाणार असे दिसते आहे. त्यासाठी खरे तर स्वयंघोषित पुरोगामी रानडुक्कर- मित्रमंडळापकी कोणीतरी एक स्वतंत्र धागा सुरु करण्यात पुढाकार घ्यायला हवा. फक्त प्रतिसाद देण्याचीच सवय राहणे हे प्रगतीला मारक असते असे म्हणतात.
त्यांनी नाही घेतला पुढाकार तर आम्ही तो विषय घेऊन पुढेमागे कधितरी मायबोलीवर येऊच.

गांधीद्वेषाचे इंधन आणि नथुरामप्रेमाचे इंजिन ऑईल टाकल्याशिवाय हिंदुत्ववादाची फटफटी 'स्टार्ट' होत नाही.

<<शिवाय फुले-आंबेडकरांच्या अनुयायांनीही शाहू-फुले-आंबेडकरांचा हा पराभव केलेला नाही का? थोर पुरुषांचे अनुयाय़ी असे वागण्याची खूप उदाहरणे आहेत. तुम्ही फक्त एकाकडेच अंगुली निर्देश करणे बरोबर नाही>>

मुळात थोर पुरुष त्यांच्या अनुयायांनी आपापसात वाटून घेणे हेच चूक आहे.

चुकीच्या सामाजिक प्रथा दूर करायला सत्तेवर यायची काय गरज आहे?

Wink

मयेकर जी,
>>मुळात थोर पुरुष त्यांच्या अनुयायांनी आपापसात वाटून घेणे हेच चूक आहे.<<

१००% सहमत.

>>चुकीच्या सामाजिक प्रथा दूर करायला सत्तेवर यायची काय गरज आहे?<<

चुकीच्या सामाजिक प्रथा दूर करायला तात्विकदृष्ट्या खरेतर सत्तेवर यायची गरज पडू नये.
सत्तेवर नसतांनाही सावरकरांनी रत्नागिरीत यासाठी खूप कांही प्रयत्न केले. महात्माजींनीही समक्ष भेटीदरम्यान या प्रयत्नांचे कौतूक केले होते. तो एक लेखाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.
प्रत्यक्षात मात्र थोर पुरुषांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे प्रबोधन पुढे सरकते पण त्याला सत्तेचे असे कांही बळ असल्याशिवाय निव्वळ समाजप्रबोधनाने चुकीच्या प्रथा दूर होतातच असे दिसत नाही. अगदी टागोरांसारख्यांनीही धिक्कारलेली सती जाण्याची क्रूर प्रथा कायद्याचे( म्हणजेच सत्तेचे ) बळ उभे राहिल्यावरच थांबली. समाजातील मोठ्या संख्येने मान्यता दिल्याशिवाय कायदाही निष्प्रभ होतो. तेव्हा प्रबोधन व कायदा दोन्ही आवश्यक आहेत.

उदय,

>> अशी काही घृणास्पद प्रथा आजही आहे कां?

याला मडे मडे स्नान असं म्हणतात. कुक्के सुब्राह्मण्यम मंदिर (सुळया) येथे ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवरून इतर जातीतील लोक लोळण घेतात. हा पूर्णपणे ऐच्छिक विधी आहे. ही प्रथा नाही. कुणावरही कसलीही जबरदस्ती नाही. घटनेने दिलेल्या कुठच्याही मानवी अधिकाराची पायमल्ली होत नाही. यात नवस फेडण्याचाही भाग आहे. यामुळे त्वचाविकार बरे होतात असा भक्तांचा विश्वास आहे.

नागमल्लादिके (तालुका पावागड, तुमकूर) आणि रामनाथपूर (तालुका अरकलुगुड) या ठिकाणीही असे स्नान चालते. मात्र इथे ब्राह्मण लोक ब्राह्मणांनी भोजन केलेल्या उष्ट्या पत्रावळींवरुन लोळण घेतात. त्यामुळे दलितांना अपमानित करण्यासाठी मडे स्नान सुरू करण्यात आले या आरोपात तथ्य नाही.

रच्याकने : इतर धर्मियांच्या चालरीती बंद करण्याची हिंमत कधी प्रशासनाने दाखवली नाहीये हे नमूद करावेसे वाटते.

आ.न.,
-गा.पै.

Pages