सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

वर्धा, साबरमती इ. आश्रम, फुले वाडा, भिडे वाडा, प्रयागचे नेहरूंचे वडीलोपार्जित घर, मुंबईतले आंबेडकरांचे घर, मुंबईतले जिन्नाचे घर इ. कशाला स्मारके म्हणून जपून ठेवली आहेत?

या वास्तू त्या व्यक्तींच्या मालकीच्या होत्या ! अंदमान जेल सावरकरांच्या मालकीचे नाही. ती सरकारी मालकीची वास्तू आहे.. या लोकान्नी स्वतःच्या मालकीच्या वास्तू इतिहास संगोपनासाठी सरकारला देऊन टाकल्या... आणि तुम्ही सावरकरवाद्यान्नी सरकारी इमारतीवर सावरकरांच्या नावाचा पत्रा बडवला... फरक कळला का त्यांच्यातला आणि तुमच्यातला? .

In 1969, the Aga Khan Palace at Pune was donated to the Indian people by Aga Khan IV as a mark of respect to Gandhi and his philosophy. http://en.wikipedia.org/wiki/Aga_Khan_Palace केवळ आगाखान पॅलेस नव्हे तर तुम्ही उल्लेखलेल्या सर्व वास्तू संबंधित लोकान्नी सरकारला दान केलेल्या/दिलेल्या आहेत. पण अंदमान जेल हे काही सावरकरवाद्यान्नी किंवा सावरकरानी सरकारला किंवा जनतेला दान केलेले नाही ! मास्तुरे, तुलना करताना जरा तरी तारतम्य ठेवायचे की हो! कुठे हिमालय, कुठे मुतखडा! चाल्ले लगेच तुलना करायला !! सावरकरवाद्यान्नी अशी एखादी वास्तू सरकारला / जनतेला दान म्हणून स्वप्नात तरी दिली आहे का? Proud

तुमच्यासारखा हिंदुत्वी कोडगा मेंदू असण्यापेक्षा रानडुकराचा गुढगा असणे परवडले, हे आता तरी समजले का? Proud

>>> >>> या वाक्यात गांधींच्या जागी "सावरकर" व सावरकरांच्या जागी "गांधी" हे शब्द टाकले तरी ते वाक्य जसेच्या तसे लागू पडेल.
>> नाही. गांधींविषयी लेखांमध्ये गांधी सावरकरांपेक्षा श्रेष्ठ होते असे आडून आडून सुचविण्याचा अजिबात प्रयत्न नसतो. किंबहुना गांधींचा टार्गेट ऑडियन्स इतका मोठा आहे आणी कॅनव्हास इतका मोठा आहे की अशी गरज भासत नाही. गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते. एकच उदाहरण देतो, 'गांधी' चित्रपट आणी 'वीर सावरकर' चित्रपट.

फार लांब कशाला जायचं. इथे तावातावाने सावरकरांविरूद्ध अर्वाच्य लिहिणारे प्रत्यक्षात गांधीभक्त आहेत का? निव्वळ आपला सावरकरद्वेष लपविण्यासाठी गांधींचं कौतुक सुरू आहे. प्रत्यक्षात त्यांना गांधींविषयी काडीमात्रही आस्था नाही किंवा आदर नाही. पण सावरकरांविषयी मात्र अतीव द्वेष आहे. त्यामुळे गांधींच्या खांद्यावर बंदूक ठेवून सावरकरांवर निशाणा साधणे सुरू आहे.

अंदमान येथील स्वातंत्र्यस्तंभावरील सावरकरांची वचने काढून तिथे गांधींची वचने लिहिणारा मणि शंकर अय्यर काय गांधीभक्त होता का? तो गांधीभक्त कधीच नव्हता, पण सावरकरद्वेषी होता. आपली सावरकरद्वेषाची उबळ झाकता न आल्यामुळेच त्याने गांधींचे नाव पुढे करून सावरकरांची वचने काढून टाकली.

भारतात गांधीवादी फारच थोडे असतील. प्रत्यक्ष नेहरू तरी गांधीवादी होते का? पण गांधीवधाच्या खटल्यात सावरकरांना अडकवून आपला सावरकर द्वेष त्यांनी दाखवून दिला होता.

निव्वळ आपला सावरकरद्वेष प्रकट करण्यासाठी गांधींचे नाव वापरले जात आहे.

मायबोलीवर हा धागा धरून आजपर्यंत सावरकरांवर ९-१० लेख तरी आले असतील. त्यातले बहुसंख्य आज गायब आहेत. सावरकरांवर कोणी काही चांगले लिहिले की लगेच या सावरकरद्वेष्ट्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि मग तिथे जाऊन अर्वाच्य प्रतिसाद खरडणे सुरू होते. कालांतराने अ‍ॅडमिनना तो धागा बंद करावा लागतो.

या धाग्याचे देखील तेच भवितव्य आहे.

इथल्या तथाकथित गांधीभक्तांनी आजवर त्यांच्यावर एकसुद्धा लेख लिहिलेला नाही. पण सावरकरांवर कोणी लिहिले की लगेच तिथे जाऊन अर्वाच्य लिहून आपला द्वेष प्रकट करणे व तो करताना गांधीभक्त असल्याचा आव आणणे हे यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. यांना गांधीजींबद्दल आदर कधीच नव्हता, ना हे कधी गांधी विचारांनी भारलेले होते. पण हे सावरकरद्वेष्टे मात्र नक्कीच आहेत.

>>> मास्तुरे, तुलना करताना जरा तरी तारतम्य ठेवायचे की हो! कुठे हिमालय, कुठे मुतखडा! चाल्ले लगेच तुलना करायला !!

गुडघा पूर्ण जायबंदी झालेला दिसत आहे. धनगराचे औषध लागू पडले नाही. आता अंदमानातल्या आदिवासींकडून औषध आणा.

मास्तुरे..........

आपण अंदमान ला अथवा भगुर ला भेट दिली आहे का?????

पण सावरकरांवर कोणी लिहिले की लगेच तिथे जाऊन अर्वाच्य लिहून

कुणी काय अर्वाच्य लिहिले आहे? तुमच्या विरोधात लिहिले की लगेच ते अर्वाच्य का?

आपण अंदमान ला अथवा भगुर ला भेट दिली आहे का?????

त्याना असले अडचणीत आणणारे प्रश्न कशाला विचारताय? ते अशा प्रश्न्नाना उत्तरे देत नाहीत..

आगाखान पॅलेस, साबरमती, नेहरूंचे आणि आंबेडकरांचे घर याच्यावर हे चिखल उडवत बसले होते, तुम्ही सावरकरवाद्यान्नी अशी एखादी वास्तू सरकारला / जनतेला दान म्हणून स्वप्नात तरी दिली आहे का? हा प्रश्न विचारल्यावर मात्र यांच्याकडे उत्तर नाही! आता लगेच ते सोडून मणिशंकर आणि त्याच्या त्या चार ओळी याच्यावर हे प्रबंध लिहायला लागले! Proud

सावरकरवाद्यान्नी अशी एखादी वास्तू सरकारला / जनतेला दान म्हणून स्वप्नात तरी दिली आहे का?

अगदी सहमत... आगाखान पॅलेस ते आंबेडकरांचे घर... अशा स्मारकांशी तुलना करण्यापूर्वी सावरकरवाद्यानी स्वतःच्या मालकीची वास्तू सरकारला दान करावी, त्यावर त्यांचे स्मारक उभारायला सरकार आणि जनता नक्की मदत करेल.. सरकारी इमारतीत आयत्या बिळात नागोबा व्हायचं आणि वर या अशा इतर महान स्मारकांवर चिखलफेक आणि तुलना करायची हे या लोकानी सोडून द्यावे... असे एखादे स्मारक यानी सरकारला आणि जनतेला दान दिल्याचे एकही उदाहरण कदाचित नसावे..

यांची मागणी कायम दुसर्‍यांच्या वास्तूत सावरकरांचे स्मारक बांधा अशीच असते.. सरकारी जेलमध्ये स्मारक हवे ही यांची मागणी.. आणि ते कुठं सावरकरानी उडी मारली का ते सापडले तिथल्या देशानेही तिथे सावरकरांचा पुतळा उभारावा म्हणून हेच लोक नाचत होते! तुम्ही स्मारक कुठेही बांधा हो! देशात बांधा, परदेशात बांधा. त्याला विरोध नाही... पण जे बंधायचे आहे ते स्वतःच्या वास्तूत बांधून ते सरकारला/ जनतेला तुम्ही दान करा ना जसे बाकी स्मारकांबाबत केले गेलेले आहे आणि मग खुशाल त्यांच्याबरोबर तुलनाही करा.

या इतर लोकाना इतिहास, संबंधित व्यक्ती आणि त्यांचे कार्य याबाबत आस्था होती.. त्यामुळेच या वास्तूंचे ऐतिहासिक महत्व ओळखून त्यानी किंवा त्यांच्या वारसानी या करोडो किंमतीच्या वास्तू सरकारला दान दिलेल्या आहेत... सावरकरवाद्यानी या स्मारकांशी स्वतःची तुलना करायच्या फंदात पडू नये.. त्यापेक्षा त्यान्नीही सावरकरांशी संबंधीत असणारी किंवा नसनारीदेखील पण खाजगी मालकीची वास्तू स्मारकासठी सरकारला आणि जनतेला दान करावी. असे केलेत तर त्यांची प्रगल्भता नक्कीच दिसून येईल.. अन्यथा दुसर्‍या देशाच्या किंवा सरकारी जागेत स्मारक पुतळे बांधण्यासाठी हुल्लडबाजी करणं हा देशप्रेमापेक्षा राजकीय स्टंटच जास्त ठरेल. त्यात कसलेही लोकोपयोगी पोटेन्शल नाही.

आता इथे ज्या स्मारकाबाबत चच्र्हा सुरु आहे, तेदेखील सावरकरांचे वैयक्तिक स्मारक नाही. त्याचे नाव राष्ट्रीय स्मारक, नॅशनल मेमोरियल असेच आहे. त्यात सावरकरांच्या नावाने एक जेल, त्यांचा फोटो आहे. http://www.youtube.com/watch?v=q3wcljiisVA&feature=related

मायबोलीवरती सावरकरप्रेमी आणि त्यांचे नवनवीन धागे बघता, एखादा सावरकरप्रेमी आपली एखादी वास्तू सरकारला सावरकरांच्या नावाने दान करेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.. Proud आणि आगा खान पॅलेस, जिनाचे घर, नेहरुंचे घर , साबरमती यांच्याप्रमाणे सावरकरांचेही एखादे मोठे वैयक्तिक स्मारक पहाताना आम्हालाही नक्कीच आनंदच वाटेल .

इतर सावरकरी धाग्यांचे मरणभाग्य या धाग्याला येणार नाही, ही अपेक्षा!

पुण्यात फुले स्मारक केलं ते काही सरकारी किंवा कोणी दान केलेल्या जागेवर नाही. उलट तिथे वर्षानुवर्षे राहणार्‍या आजूबाजूच्या ७-८ वाड्यातल्या ८०-९० कुटुंबांना बळजबरीने हटवून ती जागा ताब्यात घेण्यात आली होती. फुल्यांनी जिथे शाळा काढली त्या भिड्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वाड्याचा वापर स्वतःसाठी करायचाय. ते होऊन न देता तिथे स्मारक करायचा घाट घातलाय. मनात असलं तर सरकारी खाक्या दाखवून सर्व काही शक्य आहे. पण सावरकरद्वेष्ट्या काँग्रेसने तसं मुद्दामच होऊन दिलं नाही.

अर्थात इथल्या सावरकरद्वेष्ट्यांना हे कसं कळणार? कळलं तरी ते न कळल्यासारखं दाखवून अर्वाच्य लिहीत बसणार आणि आपला सावरकरद्वेष लपविण्यासाठी आपण गांधीभक्त असल्याचा खोटा आव आणणार.

जामोप्या आणि रानडुक्कर,

सरकारला दान केलेल्या वास्तूचं काय होतं ते सांगायची गरज नाही.

सावरकर भिकारी नव्हते. इंग्रज सरकारने त्याचं राहतं घर जप्त केलं. १९४७ नंतर काँग्रेसी सरकारने ते सावरकरांना सन्मानपूर्वक परत करायला हवं होतं. केवळ द्वेषापोटी ते घर नेहरूने स्वत:च्या बुडाखाली दाबून ठेवलं. सावरकर स्वत: इतके निर्मोही आणि स्वाभिमानी की घराच्या स्वामित्वासाठी सरकारकडे भीक मागितली नाही. १९४४ साली मो.क. गांधी कसे भीक मागायला जिनाच्या घरी जात होते आठवत असेलंच! 'भारताबरोबर माझं घरही स्वतंत्र झालं' असं म्हणून सावरकर बाजूला झाले. सरकारकडे भीक मागणे ही काँग्रेजी परंपरा आहे. भिकेत मिळालेल्या वस्तू (वा वास्तू) देणगीत देऊन मोठा दानशूरपणाचा आव आणायचा हीही काँग्रेसचीच चापलुशी आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या लढ्याचा उल्लेख मी जाणूनबुजून टाळला. याची २ कारणे :

१. त्याचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नाही : गांधींना देशबाह्य जोखडे भारतीयांच्या गळ्यात मारायची खोड होती. आपल्याला खिलाफत चळवळ आठवत असेलंच! तुर्की खलीफाची गादी रद्द होऊ नये म्हणून भारतीयांनी का म्हणून रक्त सांडावं? याच न्यायाने दक्षिण आफ्रिकेतल्या गांधींच्या कामगिरीचा भारतीयांनी का म्हणून उदोउदो करावा?

२. हा धागा सावरकरांवर आहे. गांधींवर नाही. पण तरीही आपल्याला पाहिजे असल्यास मी माझी माहिती पुढे ठेवायला तयार आहे. गांधींनी बोअर युद्धात ब्रिटिशांना पाठिंबा दिला होता हे आपल्याला माहीत असेलंच. आजूनही आपली तहान भागली नसल्यास इथे बघा गांधींनी दरबानमध्ये काय दिवे लावलेत ते. आम्हाला गांधींची अंडीपिल्ली ठाऊक आहेत.

असो.

रच्याकने, आपल्याला आसिंधुहिंदुभूमीबद्दल एव्हढा तिरस्कार का? पाकी राज्यकर्त्यांची काय लायकी आहे ते उघडपणे दिसतंय. मग आसिंधुहिंदुभूमी बनवली तर काय बिघडलं?

तुम्ही गांधीप्रेमाच्या बुरख्याखाली लपलेले पाकिस्तानवादी आहात. तुम्हाला भारताचा पाकिस्तान बनवायचाय.

आ.न.,
-गा.पै.

< इथे तावातावाने सावरकरांविरूद्ध अर्वाच्य लिहिणारे प्रत्यक्षात गांधीभक्त आहेत का?
मुळात इथेसुद्धा स्वा.सावरकरांविरुद्ध कोणीही काहीही लिहिलेलेच नाही, अर्वाच्य लिहिणे दूरच. स्वतः हे विधान करणारर्‍याने मात्र सावरकरांच्या स्तुतीपर एकही अक्षर लिहिलेले वाचनात आलेले नाही.

<निव्वळ आपला सावरकरद्वेष लपविण्यासाठी गांधींचं कौतुक सुरू आहे>
विरुद्ध पक्षाचा युक्तिवादच शब्द फिरवून आपला म्हणून वापरायची सवय जुनी दिसते. यातून मूळ विधानातील सत्य झोंबलेले मात्र स्पष्ट दिसते. अन्यथा गांधींच्या कौतुकासाठी(!) कारणे लागत नाहीत हे कळले असते. ज्या लोकांनी सावरकरांचे नावही ऐकलेले नाही , अशांची मान गांधी या नावाशी नतमस्तक होते याची असंख्य उदाहरणे जगभर आहेत.

<इथल्या तथाकथित गांधीभक्तांनी आजवर त्यांच्यावर एकसुद्धा लेख लिहिलेला नाही>
सावरकरवाद्यांना(सावरकरांना नव्हे) जशी प्रचाराची गरज भासते, तशी गांधींच्या चाहत्यांना मुळीच नाही.

मास्तुरे, सवरकरांच्या नेमक्या कुठल्या घराबाबत तुम्ही बोलत आहात? त्यांचे मुंबईतील घर सरकारने ऐतिहासिक वास्तु म्हणून जतन करायचे ठरवले आहे. नासिकचेही घर स्मारक आहे.. नेहरुनी नेमके कुठले घर दाबून ठेवले आणि आता ते नेमके कोणाकडे आहे? हे २ सोडून आणखी कुठले घर आहे का?

http://www.hindustantimes.com/India-news/Mumbai/Veer-Savarkar-s-home-to-...

http://www.cafenasik.com/tourism/nasik-sightseeing/savarkar-waada-bhagur...

पाकी राज्यकर्त्यांची काय लायकी आहे ते उघडपणे दिसतंय. मग आसिंधुहिंदुभूमी बनवली तर काय बिघडलं?

बनवा की मग! सैन्यात जा आणि जिंकून आणा.. आम्ही पंचारती घेऊन तुम्हाला ओवाळायला येऊ की सीमेवर.. ! पाकिस्तान कशाला, अफगाणिस्तान, बर्मा, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका बाकीही सगळं घेऊन या !

स्वतःच्या जागेत स्मारक बांधा आणि सरकारला दान करा एवढे बोलल्यावर आम्हाल थेट पाकिस्तानीच ठरवून मोकळे झाले ! काय करावे आता या लोकाना! Proud

सरकारला दान केलेल्या वास्तूचं काय होतं ते सांगायची गरज नाही.

काय होणार दुसरे? छान स्मारक होते.. आता सावरकरांचेही होईल ही अपेक्षा..

१९४४ साली मो.क. गांधी कसे भीक मागायला जिनाच्या घरी जात होते आठवत असेलंच!

मग, त्यात बिघडलं कुठं? सरकारने अन्याय केला आहे असे वाटत असेल तर दाद मागण्यासाठी प्रयत्न करणं यात गैर काय आहे? आता सुद्धा भिड्यांनी कोर्टात दाद मागितली तर त्यात काही गैर नाही.

>>> <इथल्या तथाकथित गांधीभक्तांनी आजवर त्यांच्यावर एकसुद्धा लेख लिहिलेला नाही>
सावरकरवाद्यांना(सावरकरांना नव्हे) जशी प्रचाराची गरज भासते, तशी गांधींच्या चाहत्यांना मुळीच नाही.

गांधींवर कशाला लिहायचं? त्याची गरजच नाही. जे काही लिहायचं असेल ते खरेखुरे गांधीभक्त लिहितील की. पण सावरकरांबद्दल बरं लिहिलेलं कसं टिकून द्यायचं? मग आपला सावरकरद्वेष व्यक्त करण्यासाठी सावरकरांवर लिहिलेल्या लेखात अर्वाच्य प्रतिसाद देऊन धागा बंद पाडलं की झालं. "इथे गांधींचं नाव वापरणारे गांधीभक्त नसून सावरकरद्वेष्टेच आहेत" ही थिअरीच इथं सिद्ध होत आहे.

>>> ज्या लोकांनी सावरकरांचे नावही ऐकलेले नाही , अशांची मान गांधी या नावाशी नतमस्तक होते याची असंख्य उदाहरणे जगभर आहेत.

बाहेरच्या देशांना सावरकरांचं नावही कानावर पडू नये अशी सरकारी पातळीवर व्यवस्था केल्यावर किंवा १८१८ ते १९४७ या काळातल्या फक्त गांधींचच नाव कानावर जावं अशी सरकारी पातळीवर व्यवस्था केल्यावर असं होणारच. दुसरं काय अपेक्षित आहे? रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वातंत्र्य मिळवलं असा प्रचार केल्यावर इतरांचे मार्ग दृष्टीस कसे येतील?

जामोप्या,

>> स्वतःच्या जागेत स्मारक बांधा आणि सरकारला दान करा एवढे बोलल्यावर आम्हाल थेट पाकिस्तानीच ठरवून
>> मोकळे झाले ! काय करावे आता या लोकाना! :फिदीफिदी:

काय म्हणावं तुम्हाला आता! जवाहर नेहरूच्या काँग्रेसने तीन मूर्ती भवन चोरलं ते आम्हाला आठवतंय. ही वास्तू पंतप्रधानांचे निवासस्थान होती. नेहरूंच्या पश्चात ती पाठोपाठ आलेल्या पंतप्रधानांना निवासासाठी मिळायला हवी होती. मात्र ती काँग्रेसने चोरली आणि तिचं (तथाकथित) राष्ट्रीय स्मारक बनवलं.

आता तोंड वर करून उपदेशाचे डोस पाजताहेत की म्हणे सावरकरभक्तांनी वास्तू दान द्यायला पाहिजेत. नेहरू पाकिस्तानप्रेमी होते ते काश्मीरच्या चिघळलेल्या प्रश्नावरून दिसतं. नेहरूंच्या अवलादीची पापं झाकणारे तुम्हीही पाकिस्तानवादीच आहात.

रच्याकने : नेहरूंनी सत्तेवर येताच अलाहाबादेतलं ७७ मीरगंज इथलं घर ताबडतोब पाडलं. कारण ते लालबत्तीविभागात होतं. तिथे त्यांचा जन्म झाला हे सगळ्यांना माहिती आहे. हा लज्जास्पद संबंध कायमचा नाहीसा करण्यासाठी ते पाडण्यात आलं. जन्म का कुणाच्या हातात असतो? का बरं तिथे स्मारक उभारलं नाही? वास्तूंच्या बाबत काँग्रेसी धोरण काय आहे हे आम्हाला छानपैकी माहितीये. पेडगावास जाणार्‍यांचं सोंग शेवटी उघडकीस येतंच. Biggrin

आ.न.,
-गा.पै.

>> रानडुक्कर मित्रमंडळः हिंदु असून रानडुक्कराला वाइट साइट बोलताय? एका रानडुक्करानेच हिंदु धर्म तारला आहे, हे विसरु नका.. रानडुक्कर म्हणजे साक्षात भगवान विष्णू ! त्यामुळेच कुणी मला रानडुक्कर म्हटले तरी मला राग आलेला नाही.. उलट, आनंदच झालेला आहे ! <<
(१)रानडुक्कर मित्रमंडळः हा या धाग्यावर दृष्टोत्पत्तीस आलेला एक सन्माननीय संप्रदाय आहे.
रानडुक्कराशिवाय त्या मित्रमंडळातील कोणाबद्दलही मी लिहिलेले नाही. तुम्हाला मी रानडुक्कर म्हटलेले नाही त्यामुळे राग येण्याचा प्रश्नच नाही. पण भगवान विष्णू ठरावे यासाठी तुम्ही स्वतःला रानडुक्कर म्हणवून घ्यावे याचे आश्चर्य वाटले.
(२) हिंदूच काय पण मुसलमान असतो तरीही मी रानडुक्कराचा तिरस्कार केला नसता. सृष्टीने निर्माण केलेला तो एक जीव. रानडुक्कराबद्दल मी एकही वावगा शब्द लिहिलेला नाही. त्याचे कारण पौराणिक नाही. रानडुक्कर काय व तुम्ही काय दोघांकडेही मी समत्व भावनेने बघतो. रानडुक्कर जोवर माझ्या जिवावर उठत नाही तोवर त्यालाही जगायचा हक्क आहेच. पण ते माझा जीव घ्यायला आले तर मी त्याला ठार मारायचा प्रयत्न करीनच कारण मलाही जगायचा हक्क आहे. त्यावेळी मात्र अहिंसावादी तत्वज्ञानाप्रमाणे मी त्याला आनंद मिळावा म्हणून प्रतिकाराशिवाय मरणार नाही. रानडुक्कराबद्दल एवढे लिहायला भाग पडण्याचे कारण 'रानडुक्कर्'च आहे. रानडुक्कराला कांही या धाग्यावर येऊन चर्चा कर असे निमंत्रण आम्ही दिले नव्हते. पण एखादे शिक्षित रानडुक्कर येथे लिहू लागले तर आनंदच आहे. अपेक्षा इतकीच की निव्वळ क्रमिक पुस्तकातील दोन पाने वाचून स्वर्ग गाठू नये. कोणत्याही देशाच्या घटनेत सर्व विषय सामावलेले आहेत आणि त्यापलिकडे वाचण्याची आवश्यकता नाही असे मानू नये.

बादवे, मुंबईतल्या सरकारच्या मालकीच्या असलेल्या इंदू मिलच्या १४ एकर जागेवर आंबेडकरांचे स्मारक करण्यात येणार आहे. (ही अतिरिक्त माहिती सरकारची जागा, सरकारची जागा असे तावातावाने लिहिणार्‍यांसाठी)

<<<बाहेरच्या देशांना सावरकरांचं नावही कानावर पडू नये अशी सरकारी पातळीवर व्यवस्था केल्यावर किंवा १८१८ ते १९४७ या काळातल्या फक्त गांधींचच नाव कानावर जावं अशी सरकारी पातळीवर व्यवस्था केल्यावर असं होणारच>>>
किती विनोदी लिहिता. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारणखात्यालाही स्वतःच्या कार्यक्षमतेबद्दल इतका विश्वास वाटणार नाही. गांधींचं नाव भारताबाहेर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच पोचलेलं होतं. भारत सरकारच्या प्रचारयंत्रणेचा प्रभाव पूर्वलक्षी असतो का?
तसंच अख्ख्या जगभरातली जनता, विचारवंत,राजकारणी, प्रसारमाध्यमे, अ‍ॅटनबरोसारखे चित्रपटनिर्माते हे मूर्ख , दुधखुळे इ.इ. आहेत. पटलं.

गांधींचं नाव भारताबाहेर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच पोचलेलं होतं.

कुणाला सांगताय हे? सावरकरवाद्यांना? यांचा आसिंधुसिंधु पलीकडे कशाशी संबंधच नाही, त्याना हे कसे माहीत असणार की नाव कुठल्या देशात कधी गेले ते.. Proud

>>> अपेक्षा इतकीच की निव्वळ क्रमिक पुस्तकातील दोन पाने वाचून स्वर्ग गाठू नये.

कोणाला सांगताय हे? सावरकरद्वेष्ट्यांना? ज्यांना सरकारी पाठ्यपुस्तकाशिवाय दुसरी पुस्तके माहीत नाहीत आणि ज्यांचा सरकारी पाठ्यपुस्तकांशिवाय दुसर्‍या पुस्तकांवर विश्वास नाही त्यांना? Uhoh

प्रचारयंत्रणेचा प्रभाव पूर्वलक्षी असतो का?

कुणाला सांगताय हे? हिंदुत्ववाद्याना? मुसलमान लोकांच्यात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी आहे म्हटल्यावर हे बोलतात की भविष्यात पुरुषाना चार बायका करता याव्यात म्हणून जास्त मुली जन्माला येतात.. तिथे १८१८ पासूनचा इतिहास १९४७ नंतर काँग्रेसने वाइप आउट केला, हे यान्ना म्हणणे अवघड का आहे? मुसलमान लोक भविष्य मॅनेज करतात.. काँग्रेसवाले भूत मॅनेज करतात.. आणि यांचा वर्तमान कायम रडत बसलेला असतो. Proud

मात्र ती काँग्रेसने चोरली आणि तिचं (तथाकथित) राष्ट्रीय स्मारक बनवलं.

ते नुस्ते नेहरुंचं स्मारक नाही.. तिथे लायब्ररी, डिजिटल लायब्ररी, चिल्ड्रेन रिसोर्सेस, फेलोशिप इन हिस्टरी, पब्लिकेशन्स, प्लॅनिटोरियम अशा ढीगभर इतर गोष्टी आहेत.. देशांचं आणि लोकांचं भलं होईल असं काही झालं तर तुम्हाला ते सहन होत नाही का? कसले देशप्रेमी हो तुम्ही? कुठं हॉस्पिटल झालं तर तुमचं तोंड वाकडं.... कुठे आणखी काही झाले तरी तुमचं तोंड वाकडं.. हे काही बरे नै बुवा!

आवरा आता लोकहो.. तिकडे वरती गांधी नेहेरु आंबेडकर सावरकर सगळे कपाळाला हात लावुन बसले असतील हे वाचुन.

दामोदरसुतजी,

>>पुरोगामी इ. ठरण्याचा राजमार्ग म्हणजे हिंदुत्ववाद्यांवर तुटून पडणे असा झाला आहे. मोरे यांनी तसे केलेले नाही.

प्रा मोरे यांनी काही हिंदुत्ववादी लेखक/ विचारवंतांवर अगदी नावानिशी टीका केला आहे. ते इथे अप्रस्तुत आहे म्हणून अधिक लिहित नाही.

>>गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते.<<
हे योग्य कि अयोग्य? पण मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे कारण माझ्या आठवणीप्रमाणे तुम्ही सावरकरांवर मागे एक लेख लि
हिला होता.

तो मी नव्हेच Happy दुसर्‍या एका कुलकर्णी ने लिहिला होता तो. लिंक शोधून टाकेन.

>>गांधींच्या पुस्तकांच्या बहुसंख्य वाचकांना सावरकर हे नाव माहित नसते.

असे लिहिण्यात सावरकरांचा अपमान करायचा माझा अजिबात हेतू नव्हता. तसा सूर उमटला असेल तर क्षमस्व.

गांधीजींविषयी एका पुस्तकाचा परिचय करून देणारा http://www.maayboli.com/node/15554 हा लेख आणी प्रतिक्रिया कृपया वाचा.

सावरकरांनी आपल्या लेखनातून जातीप्रथेवर अगदी कठोर टीका केली आहे. कर्नाटकातील एका मंदिरात ब्राम्हण लोकांची पंगत उठली की त्या उष्ट्या पत्रावळीवरून दलितांनी लोळण घ्यायची अशी प्रथा आजही सुरू आहे. सावरकर असते त्यांनी असल्या फालतू प्रथेला अजिबात समर्थन दिले नसते. पण हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरु होताच 'हिंदुधर्म खतरेमें' अशा आरोळ्या ठोकायला सुरु केली. सावरकरांचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला असे म्हणतो ते याचसाठी.

जामोप्या,

>> तिथे लायब्ररी, डिजिटल लायब्ररी, चिल्ड्रेन रिसोर्सेस, फेलोशिप इन हिस्टरी, पब्लिकेशन्स, प्लॅनिटोरियम अशा
>> ढीगभर इतर गोष्टी आहेत.

आख्खी नवी दिल्ली जिथे नव्याने उभी केली तिथे या गोष्टी वेगळ्या ठिकाणी बांधता आल्या नसत्या का? पंतप्रधानांचा निवास हडपण्याची काय गरज होती? इंग्लंडमध्ये पंतप्रधानांचं निवासस्थान १० डाउनिंग स्ट्रीट कधी बदलतं का? अमेरिकेत व्हाईट हाऊस कधी कोण्या व्यक्तीच्या नावाने बाजूला केलं गेलंय? भारतातच असले लाड चालतात. कारण काँग्रेस उन्मत्त झालेली आहे.

आ.न.,
-गा.पै.

जामोप्या,

>> मास्तुरे, सवरकरांच्या नेमक्या कुठल्या घराबाबत तुम्ही बोलत आहात?

मास्तुरे नाही. अहो, मी गामा पैलवान बोलतोय. ते सावरकरांच्या भगूरच्या घराबद्दल (ancestral वर सर्च मारणे) बोलतोय.

१९५० साली लियाकत आली खान भारताच्या दौर्‍यावर आलेला असतांना त्याची दाढी कुरवाळण्यासाठी नेहरूने सावरकरांना (वय वर्षे ६६+) मुद्दामहून अटक केली. हेही वरील दुव्यात वाचायला मिळेल.

आ.न.,
-गा.पै.

पंतप्रधानांचा निवास हडपण्याची काय गरज होती?

हडपले काय? शब्द जरा चांगले वापरा बुवा! आणि ते इंग्लंडवले गेले की आपला देश सोडून ! ते त्यांच्या देशात काय करतात नी काय नाही कशाला चिंता करत बसलाय?

जामोप्या,

ते इंग्लंडवाले जाऊद्यात हो. पण त्यांची लोकशाही आणि प्रशासनव्यवस्था अजून इकडेच आहे म्हंटलं! केवळ काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थाला सोयीस्कर अश्या गोष्टी बरोब्बर उचलल्या!

आ.न.,
-गा.पै.

Pages