सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांपर्यंत (नेहरू काळ) सरकारदरबारी क्रांतिकारकाना कसलीच मान्यता न देणार्‍यांनी बंगालमधील हयात क्रांतिकारकांनी व त्यांच्या वारसदारांनी जेव्हां एकत्रित होऊन मान्यतेसाठी हालचाली सुरु केल्या तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळून काँग्रेसवर दबाव आल्यानंतरच त्यांना ती देणे भाग पडले.

यात दबावाचा प्रश्न येतो कुठे? स्वातंत्रानंतर इंग्रजांची सगळी ऑफिसेस, जेल सरकारला मिळाले... सरकारने त्यांचा वापर स्वतःच्या प्रशासकीय वापरासठी केला.. ( आमचे कुरुंदवाडचे हायस्कूल अशाच इंग्रजकालीन दगडी जेलमध्ये वसवलेले आहे.. Happy ) त्यात गैर काही नाही... अशा सगळ्या इमारती आठवण म्हणून जतन करायच्या ठरवल्या तर ते प्रॅक्टिकल ठरले असते क? पण एखाद्या ठिकाणी फारच ऐतिहासिक महत्व आहे, अशी जनतेने मागणी केली तर सरकार तसा निर्णय लोकाग्रहास्तव घेऊ शकते.. ही लोकशाही प्रोसिजर आहे.. याला दबावाला झुकले असले हीन शब्द वापरुन स्वतःचे कौतुक कशाला करायचे? उलट, यातून लोकांच्या भावनेलाही सरकार महत्व देते हेच दिसून येते.

जमोप्या,

पाया रचला काँग्रेस ने ? ? सेल्युलर जेलची दोन इमारती तोडुन ?? का रा ष्ट्रीय स्मारक ऊभारायला

सेल्युलर जेल तोडायची गरज पडली ? काँग्रेस् खरच ग्रेट !!!!

त्यांनतर सारवा सारव करण्यासाठी त्या जागी हॉस्पिटल बांधल

अन त्याला नाव दिले गोविंद वल्लभ पंत यांचे साल १९६३.

१९६० साली अंदमान जेल तोडून गोविंद पंत हॉस्पिटल बांधल ५०० बेडच .

अंदमान निकोबार ची लोक संख्या १८५८ ला होती अवघी ५००. साल १९०० च्या आसपास लोकसंख्या कमी
कमी होत २००० झाली. १९६० साली अंदमान निकोबारची जनसंख्या अवघी हजारच्या ही खाली गेली.

मला असा प्रश्न पडला आहे की काही शे जनसंख्या असलेल्या प्रदेशाला ५०० खाटांच हॉस्पिटल कशाला ?

ही माहीती सरकारच्याच वेब साईट वर उ पलब्ध आहे. ( http://ignca.nic.in/cd_07016.htm)

तरी ही काँग्रेस ग्रेटच !!!

तुम्ही ह्याला जर १९६० मध्ये काँग्रेस ने दाखवलेली दुरद्रुष्टी म्हणणार असाल तर सावधान !!

कारण १९६२ ला झालेल्या चिन भारत युध्द्दात काँग्रेसची दुरद्रुष्टी सर्वाना दिसलीच.

अंदमानची आजची लोक्संख्या साडेतीन लाख आहे.... अंदमानसारख्या आयलंडवर जर काही कुणाला गंभीर आजार झाले, तर भारताच्या मुख्य भूमीवर विमानाने यावे लागते. तो खर्च आणि वेळेचा अपव्यय परवडणारा नसतो. त्यापेक्षा पाचशे खाटांचे हॉस्पिटल असणे परवडते. हॉस्पिटलच्या खाटांचं गणित हे डिपार्टमेंट वाइज असते.. हॉस्पिटलमध्ये पन्नास लोक अ‍ॅड्मिट होतात, म्हणूण ५० कॉटचाच एक जनरल वॉर्ड करतो असे करुन चालत नाही.. प्रत्येक डिपार्टमेंटला स्त्री पुरुष असे वेगळे बेड्स ठेवावे लागतात.. त्यात ५०० खाटा असणे अशक्य नाही.

तुम्ही १२०० चा आकडा कुठून मिळवलात ते तुम्हालाच माहीत... शिवाय पर्यटनासाठी येणारे पब्लिक वेगळेच.

( मालदीवचीही कंडिशन अशीच आहे.. तीन लाख नेटिव लोकसंख्या + २ लाख पर्यटक असे तिथले गणित आहे. या सर्वाना तिथेही असेच मोठे हॉस्पिटल आहे. त्याचे नाव आहे.. इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल . गांधी नाव देशातच नाही परदेशातही लोकप्रिय आहे. ! भारतातल्याच मूठभर लोकान्ना ते का आवडत नाही, त्यान्नाच ठाऊक ! Proud हे हॉस्पिटल नसते तर प्रत्येक वेळी विमानाने भारतात यावे लागले असते. त्यापेक्षा हॉस्पिटल ठेवणे परवडते. आणि इतके असुनही अती गंभीर व्याधीसाठी एअर अँब्युलन्स सतत तयार ठेवावे लागते. मी मालदीवला सहा महिने डॉक्टर म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे अंदमानची अवस्था समजू शकतो )

त्यामुळे हॉस्पिटल प्लॅनड आणि गरजेचे आहे म्हणूनच बांधले. एवढ्या चांगल्या कार्याला सारवासारव केली असे म्हणून अकारण चिखलफेक कशाला करायची.. ? केवळ ते काँग्रेसने केले म्हणून ? शिवाय ते हॉस्पिटल नुसते हॉस्पिटल नाही.. पी जी, पी एच डी याचेही केंद्र आहे.

इतक्या वैद्यकीय सुविधा भारतातच उपलब्ध असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी परदेशात उपचारासाठी का जातात? कित्ती कित्ती शहाणं आहे नैका सरकार आणि काँग्रेस पक्ष?!! Wink

http://timesofindia.indiatimes.com/india/Sonia-Gandhi-goes-abroad-for-ch...

The population of the Andamans was 356,000 in 2010,[26] having grown from 50,000 in 1960. Of the people who live in the Andaman Islands, a small minority of about 1,000 are indigenous Adivasis of the Andamans.

http://en.wikipedia.org/wiki/Andaman_Islands

तुम्ही दिलेला हजारचा आकडा आदिवासींचा असणार.

अंदमान विमानतळाला देखील सावरकरांचे नाव रालोआ सरकारच्या कारकीर्दीत मिळाले. तेव्हा काँग्रेसचे सरकार असते त्या विमानतळाला देखील XYZ गांधी विमानतळ असे नाव दिले असते (XYZ च्या जागी इंदिरा, फिरोझ, राजीव, राहुल, प्रियांका, रॉबर्ट, रेहान. . . असे तुमच्या आवडीचे कोणतेही नाव टाका).
>>

आता कदाचित एक नवे नाव त्यात सामील होण्याच्या मार्गावर आहे.. Proud

मागे एकाने एक चांगला ब्लॉग लिहिला होता ह्या विषयावर..

http://www.sandeepweb.com/2012/01/05/nazrul-bhawan-or-the-importance-of-...

>>> अशा सगळ्या इमारती आठवण म्हणून जतन करायच्या ठरवल्या तर ते प्रॅक्टिकल ठरले असते क?

बरोब्बर. पण हा प्रॅक्टिकल विचार फक्त अंदमान जेल बाबतीतच का? साबरमती, वर्धा इ. ठिकाणी असलेले आश्रम, फुले वाडा, भिडे वाडा, तीन मूर्ती भवन, मुंबईतलं १९४७ पूर्वी जिन्ना रहात होता ते घर इ. ठिकाणांच्या बाबतीत हा प्रॅक्टिकल विचार कुठे जातो?

गांधी-नेहरु काँग्रेसच्या लेखी क्रांतिकारकांना देशभक्त मानले जात नव्हते का तर त्यांनी सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग निवडला. त्यामुळे त्यांना सेल्युलर जेलला स्वातंत्र्यलढ्यात कांही महत्वाचे स्थान आहे हेच मान्य नव्हते म्हणून तर अंदमानात वाटेल तेवढी जमिन उपलब्ध असूनहि सेल्युलर जेल उध्वस्त करून हॉस्पिटल बांधण्याचा घाट निर्लज्जपणे घातला गेला. खुद्द सुभाषबाबूंनी जपानने अंदमान ताब्यात घेतल्यावर सेल्युलर जेलला भेट देऊन तेथे यातना भोगलेल्या क्रांतिकारकांना मानवंदना दिली. त्या घटनेचा फोटोही तेथे लावला आहे. इतके महत्व असलेल्या त्या जेलची पाडापाडी थांबवायलाही खूप प्रयास पडले. पण काँग्रेसवाल्यांच्या स्मृति जतन करायला मात्र जागेची आणि पैशाची रेलचेल!
मास्तुरे यांनी या बाबतीत उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांशी सहमत.
तरीही "जे पाडले नाही,ते स्मारक झाले योग्यच, पण जे पाडले गेलेले आहे, तिथे हॉस्पिटल करावे किंवा आधीच केले असेल तर त्याला सवरकरांचे नाव द्यावे" या अभिप्रायाबद्दल समाधान व्यक्त करावेसे वाटते. आता गोविंदवल्लभ पंत हे नाव बदलून सावरकरांचे नाव द्यावे असे कोणीच म्हणणार नाही. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान कोणीच नाकारलेले नाही. पण ते मात्र इतरांनी दिलेले योगदान नाकारतात. महात्माजींचा गौरव करण्याच्या भरात "दे दी तुने आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल" असे म्हणतांना आपण क्रांतिकारकांच्या पराकोटीच्या त्यागाला मातीमोल ठरविण्याचा कृतघ्नपणा करतो आहोत असे काँग्रेसवाल्यांना का वाटत नाही ? (लौकीक दृष्ट्या अपयशी ठरले तरीही ) सुभाषबाबू व आझाद हिंद सेनेने केवढे मोठे योगदान दिले आहे. पण सर्व श्रेय आपणच उपटायची काँग्रेसला नेहरूंनी लावलेली सवय असल्याने सुभाषबाबूनाही उपेक्षेचे धनी व्हावे लागले. हे आमचे दु:ख आहे.

गांधी-नेहरु काँग्रेसच्या लेखी क्रांतिकारकांना देशभक्त मानले जात नव्हते

त्यात चुकीचे काय आहे? आपापला अजेंडा प्रत्येक व्यक्ती, संस्था ठरवू शकते... त्यान्नी अमूक याला देशभक्त म्हणावेच हे तुम्ही कोण सांगणारे? तुमच्यासारखे हिंदुत्ववादी गांधीजीना तरी कुठे देशभक्त मानतात? काँग्रेसवाले थोडेच तुम्हाला अक्कल शिकवायला येतात?

अंदमानात वाटेल तेवढी जमिन उपलब्ध असूनहि

जमीन सरकारच्या मालकीची नको का? आणि समजा जरी हॉस्पिटल बांधले तरी ते मघ्यवर्ती ठिकाणी नको का? का कुठेही जंगलात बांधायचे?

तुम्ही कितीही गळा काढलात तरी अंतिम सत्य एकच आहे...

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल

१९६२ च्या भारत चीन युद्धात भारतीय सैनीक
गंजलेल्या बंदुकीनी व बूटाशिवायच लढले होते हे सर्वांना माहीत असेलच.

हे तुम्हाला कुठून कळले ? की, अंदमानच्या १००० लोकसंख्यसारखी हीही तुमची कवीकल्पना? Proud

>>जमीन सरकारच्या मालकीची नको का?
पोर्ट ब्लेयर मधील सरकारची सगळी जमीन १९४७ नंतर रानडुकरांनी हडप केली की काय? कि त्यामुळे सेल्युलर जेलच पाडावे लागले?
खरे तर नेहरूंना क्रांतिकारकांचे नामोनिषाणच ठेवायचे नव्हते. पण सगळे भारतीय कांही कृतघ्न नाहीत त्यामुळेच थेट १८५७ पासून ते सुभाषबाबूंपर्यंतच्या सशस्त्र लढ्याचा इतिहास (कितिही दुर्लक्षित करायचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केला तरी ) लोकांपर्यंत पोहोचवला गेला.
>>सहावे 'विनायक' म्हणजे काय?
पहा - http://www.bookganga.com/eBooks/Book/4687083064560258553.htm?Book=Ashtvi...

>>> तुम्ही कितीही गळा काढलात तरी अंतिम सत्य एकच आहे...
दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल

:फिदीफिदी:

असली फार्सिकल वाक्ये वाचल्यावर दस्तुरखुद्द गांधीजींचे सुद्धा हसून हसून पोट दुखायला लागले असेल.

मास्तुरे आले.. की लगेच मागं हेल काढायला हेलकरी आलेच..

त्यांच्या पोटदुखीची चिंता तुम्ही करु नका.... तुमची पोटदुखी सर्वाना माहीत आहे. Proud

>>> तुमची पोटदुखी सर्वाना माहीत आहे.

तुमची पोटदुखीसुद्धा सर्वांना माहीत आहे.

>>> जमीन सरकारच्या मालकीची नको का?

पुण्यात फुले वाड्यात स्मारक करायचा निर्णय घेतला तेव्हा आजूबाजूच्या ७०-८० कुटुंबाची जागा ताब्यात घेऊन स्मारकासाठी ती खाजगी जागा वापरण्यात आली. पुणे-मुम्बई द्रुतगती मार्ग करताना असंख्य शेतकर्‍यांची खाजगी जमीन ताब्यात घेण्यात आली. भारतात आजवर जितकी धरणे बांधली आहेत, ती सर्व खाजगी जागा ताब्यात घेऊन बांधलेली आहेत. सरकारने एखादी गोष्ट करायची ठरविली तर कोणत्याही परिस्थितीत सरकार ते करून दाखवतेच. त्यात खाजगी, सरकारी, लोकांचा विरोध इ. गोष्टींचा अडथळा येत नाही. अंदमानात जसं काही सरकारच्या मालकीची फक्त जेलचीच जागा होती व इतर खाजगी जागा घेणे अशक्य होते? पण जेल पाडण्याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेस करत असलेला सावरकरांचा तिरस्कार आणि त्यांच्या दैदीप्यमान स्मृती मिटविल्या की ते व त्यांचे महान कार्य सुद्धा विस्मरणात जाईल असा नेहरूंचा व काँग्रेसचा असलेला गोड गैरसमज. हॉस्पिटल हे केवळ निमित्त, काँग्रेसची खरी पोटदुखी स्वातंत्र्यवीर सावरकर हीच होती.

रान डुक्कर,

कितीही झाले तर टांग उपर !!

१९६२ च्या भारत चीन युद्धात भारतीय सैनीक गंजलेल्या बंदुकीनी व बूटाशिवायच लढले होते हे सत्य जग जाहीर
आहे. तुमच्या कवी कल्पना तुमच्याकडेच ठेवा.

After the humiliating defeat, the Indian Army entrusted Lieutenant-General Henderson Brooks and Brigadier P S Bhagat to inquire into the debacle. Although the terms of reference set for them were very limited, the duo dug deep and discovered a great deal about the initial formulation of the "Forward Policy" and how the Indian Army was forced into the conflict by the political leadership of that time.
The Indian Government published an official history - The History of the Conflict with China, 1962, which was written by the History Division of the Ministry of Defence in 1992. Both the reports point out that an ill-equipped and ill-prepared Indian Army was forced to take on superior Chinese PLA.

जरा डोळे उघडा आणी सत्य स्विकारा !!

पुणे-मुम्बई द्रुतगती मार्ग करताना असंख्य शेतकर्‍यांची खाजगी जमीन ताब्यात घेण्यात आली.

शेतकर्‍यांची जागा मध्ये येत होती म्हणून घेतली ना? पण जेलची एवढी जागा सरकारकडे पडूनच होती, तिचा काडीमात्र वापर नव्हता.. तर सरकार कशाला लोकांची दुसरी जागा संपादन करेल?

जरा डोळे उघडा आणी सत्य स्विकारा !!

कसले सत्य स्वीकारा? तुम्ही लिहिलेले? हे कुणी , कधी लिहिलेले आहे, त्याची तरी आधी लिंक द्या. मग बघू, सत्य काय आणि कल्पना काय ते.

<<<< जेलची एवढी जागा सरकारकडे पडूनच होती, तिचा काडीमात्र वापर नव्हता. >>>>

१९६० ला काडीमात्र वापर नव्हता आणी १९६९ ला डायरेक्ट राष्ट्रीय स्मारक ???

वा रान डुकरा वा भले बहाद्दर !!!

वा रान डुकरा वा भले बहाद्दर !!!

मला कशाला सांगताय?

सरकारने तिथे अद्ययावत हॉस्पिटल बांधले याबाबत सरकार अभिनंदनास पात्र आहे... आमचा विषय संपला..

समय समाप्ती की घोषणा !

अंदमानात जसं काही सरकारच्या मालकीची फक्त जेलचीच जागा होती व इतर खाजगी जागा घेणे अशक्य होते? पण जेल पाडण्याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेस करत असलेला सावरकरांचा तिरस्कार

मग दुसरी जागा घेऊन तिथे स्मारक बांधायचं काम तुमच्या भाजपा सरकारनं का नाही केलं? त्यांचं सावरकर प्रेम उतु जात होते तर दुसरी जागा घेऊन त्यान्नी मोठं स्मारक बांधायचं होतं... काँग्रेस सरकारनं अर्ध्या जागेत स्मारक, आणि अर्ध्या जागेत हॉस्पिटल असंतरी करुन दाखवलं... तुमच्या भाजपानं काय उजेड पाडला?

पोटात फार दुखत असेल तर अंदमानातल्या हॉस्पिटलमध्ये चेक अप का करुन घे नाही? Proud

कैच्या काही.....................

जेवढे दिवे काँग्रेस ने लावले आहेत तेवढेच भाजपाने सुध्दा लावले आहेत....... या व्यक्तिरिक्त काही बोला...नेहमी तेच तेच.......... मतदारांनी त्यांची लायकी निवडणुकीत दाखवुन दिलेली आहे......

>>> पोटात फार दुखत असेल तर अंदमानातल्या हॉस्पिटलमध्ये चेक अप का करुन घे नाही?

जामोप्या,

तुमचे या धाग्यावरील प्रतिसाद लक्षात घेता तुमचा गुडघा अजिबात बरा झालेला नसून आता तो बरा होण्याच्या पलिकडे गेलेला आहे हे सहज लक्षात येत आहे. गुडघ्याच्या दुखण्यावर तुम्ही घेत असलेले धनगराचे औषध अजिबात लागू पडलेले दिसत नाही इतके ते दुखणे गंभीर आहे.

दामोदरसुत,

एक विनंती. या धाग्याचा तातडीने बॅकअप घेऊन ठेवा. आता कोणत्याही क्षणी हा धागा अ‍ॅडमिनना डिलीट करावा लागणार. यापूर्वी सावरकरांवर निघालेल्या सर्व धाग्याचे असेच झाले आहे.

इथे कोणीही सावरकरांबद्दल एखादा धागा काढला व त्यांच्याबद्दल चांगले लिहिले की ताबडतोब सावरकरद्वेष्टे तिथे जाऊन अर्वाच्य लिहायला सुरूवात करतात व शेवटी नाईलाजाने तो धागा बंद करण्यास अ‍ॅडमिनना भाग पडते. ह्याही धाग्याचे तसेच होणार आहे. यापूर्वी सावरकरांवरील ५-६ धागे असेच बंद पाडले गेले आहेत.

सावरकरद्वेष्ट्यांनी गांधीजींवर किंवा त्यांच्या विचारांवर किंवा त्यांच्या सामाजिक/राजकीय कार्यावर किंवा "रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी भारताला स्वातंत्र्य कसे मिळवून दिले" यावर आजतगायत एकही धागा काढून माहिती दिलेली नाही. पण सावरकरांच्या कार्यावर धागा निघाला रे निघाला की तातडीने तिथे जाऊन वाटेल ते लिहून तो धागा बंद पाडणे हे एकच कृत्य सुरू असते. त्यामुळे लवकरात लवकर बॅकअप घेऊन ठेवा.

सावरकरद्वेष्ट्यांनी गांधीजींवर किंवा त्यांच्या विचारांवर किंवा त्यांच्या सामाजिक/राजकीय कार्यावर किंवा "रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी भारताला स्वातंत्र्य कसे मिळवून दिले" यावर आजतगायत एकही धागा काढून माहिती दिलेली नाही.

त्याची गरज नाही.. इतिहासाची कोणतीही क्रमिक सरकारमान्य पुस्तके वाचली की तसे समजतेच.. हे असले धागे आणि लेख यांची गरज गांधी भक्तान्ना पडत नाही.. हे तुमचे मार्ग.. तुम्हालाच लखलाभ.

>>तुमचे या धाग्यावरील प्रतिसाद लक्षात घेता तुमचा गुडघा अजिबात बरा झालेला नसून आता तो बरा होण्याच्या पलिकडे गेलेला आहे हे सहज लक्षात येत आहे.

त्यांचं Knee Replacement operation ऑपरेशन झालं असून त्यांना रानडुकराच्या हाडांनी बनवलेला कृत्रिम गुढगा बसवलाय. Light 1 Wink

Pages