सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

udayone,

<<<<<< cinema hall madhe aapan aapalyach deshala maan det naahi yaachi chid yete...ani tya mulanche deshprem pahun man aanandun yete >>>>

वरील वाक्य तुमचेच का ? नाही म्हणजे तुमची प्रतीक्रीया बघुन खरच वाटल नाही.

जर राष्ट्रगीता ची मानहानी सहन होत नाही तर देशाची कशी काय सहन होते ?

तुम्हाला काय illogical वाटल माझ्या त्या प्रतिक्रियेत. मी काय अस कल्पो कल्पीत लिहीलय ?

मीअण्णाहजारे,

>> एखाद्याच्या प्रगती अधोगतीला, बर्‍या वाइटाला धर्माचे शेपूट 'कारण' म्हणून कशाला डकवायचं?

भारताची फाळणी धर्माच्या आधारावरच झालीये हे आपल्याला माहीत असेलंच! मुस्लिमांसाठी पाकिस्तान वेगळा काढला गेला. याचा अर्थ पाकिस्तानच्या अवनतीला इस्लाम (आणि केवळ इस्लामच) जबाबदार आहे. याउलट भारताने तुलनेने नेत्रदीपक प्रगती केलीये. ती केवळ उर्वरित हिंदूंच्या आंतरिक शक्तीमुळेच. तीही गेली ६४+ वर्षे हिंदुद्वेष्टे राज्यकर्ते असतांना.

देशाच्या प्रगतीला धर्म कसा कारणीभूत होतो याचं चक्ष्वैसत्यम उदाहरण दिसलं का आता?

आ.न.,
-गा.पै.

मीअण्णाहजारे,

>> शेपूट घालायला कुणी सांगितलं? मी? पोलिस, सैन्य आणि न्यायालय बघून घेईल की..

भिक्कारअफझल आणि भेकडकसाबचे सरकारने जे लाड पुरवलेत त्यावरून न्यायप्रणालीवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न पडतो. काहीका असेना, त्यांच्यावरील ताण हलका करायला हरकत नसावी.

सनदशीर मार्गाने देशद्रोही सरकारला जाब विचारणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

याउलट भारताने तुलनेने नेत्रदीपक प्रगती केलीये. ती केवळ उर्वरित हिंदूंच्या आंतरिक शक्तीमुळेच. तीही गेली ६४+ वर्षे हिंदुद्वेष्टे राज्यकर्ते असतांना.

भारताने प्रगती केली ती भारतीय नागरिकांच्या प्रयत्नाने.. त्यात हिंदु मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जैन पारशी आणि इतरही सर्व आहेत.. यात धर्माचा संबंध आलाच कुठे? आणि भारतात तरी सगळी राज्ये कुठे प्रगत आहेत? बिहार, मध्य प्रदेश, राजस्तान आणि यु पी या राज्यंचा उल्लेख मेडिकलच्या पुस्तकात बिमारु BIMARU राज्ये असा आहे.. कारण ते कायम आजारी असतात..

सनदशीर मार्गाने देशद्रोही सरकारला जाब विचारणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

विचारा की.. सरकारने अडवले आहे का?

>>> एखादा कलाकार या कलमाचा फायदा घेऊ शकेल, असे वाटते. कारण त्याची कला स्पेशलच आहे, असे तो म्हणणार...

आणि तो कलाकार मुस्लिम आणि विशेषतः पाकिस्तानी असेल, तर आपले निधर्मी नेते स्वतःहूनच त्याची कला स्पेशल आहे असे म्हणणार!!!

बादवे, अदनान सामीला २००४-०५ मध्ये आयकरखात्याने नोटीस पाठविली होती, पण नंतर त्यावर पुढे काहीच झाले नाही. ते कोणाच्या आशिर्वादाने असेल हे सहज लक्षात येईल.

>>> उठसूठ सैन्यात जा सांगण्यासारखा येडचापपणा करु नका.

यांच्या एका नेत्यांनी १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर, "स्वतंत्र भारताला सैन्याची गरज नाही. सैन्य ठेवणे म्हणजे शेजारी देशांवर अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. यास्तव भारताने सैन्य ठेवू नये." अशा अर्थाचे विधान केले होते.

>>> भिक्कारअफझल आणि भेकडकसाबचे सरकारने जे लाड पुरवलेत

तोंड सांभाळून बोला. त्यांचा एकेरी उल्लेख न करता अफझलजी आणि कसाबजी असा आदरपूर्वक उल्लेख करा.

जामोप्या,

>> विचारा की.. सरकारने अडवले आहे का?

हो. सनदशीर मार्गाने निषेध करणार्‍यांवर सरकार कशी कारवाई करते ते आम्ही पहिले आहे.

सरकार भिक्कारअफझल आणि भेकडकसाबचे लाड पुरवण्यात मग्न आहे. त्या सरकारला जागे करायला पाहिजे. त्याकरिता सरकारला आक्रमकपणे पण सनदशीर मार्गाने कसे धारेवर धरायचे ते माहीत आहे आम्हाला. चिंता नसावी.

'आम्ही शेपूट घालून बसणार नाही' याचा अर्थ स्पष्ट केला.

आ.न.,
-गा.पै.

गामा पै , मास्तूरे ,

यांना अहवाल कसा मिळणार त्यांचे डोळे दिपले आहेत.

काँग्रेसचा इतिहास आहे की त्यांनी आता पर्यंत फक्त त्यांनाच उपयोगी असलेला अहवाल मानला व प्रसिद्ध
केलाय.

खरच एवढी भुक्कड मेन्टॅलिटीची लोक आपल्याच देशात आणि आपल्याच धर्मात निपजावीत याहून दुसरे दुर्दैव ते काय ? मंदार, मास्तुरे यांच्यापुढे कितीही डोके फोडले तरी ते आपलेच खरे करणार.
बाकीच्या धोक्यांपेक्षा हा आपल्याच लोकांच्या तथाकथित निधर्मीवादाच्या नावाखाली सडलेल्या विचारप्रवृत्तीचा धोका फार मोठा आहे. काय केले म्हणजे बदलेल हेच कळेनासे झाले आहे. Angry

पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ ( हे तर हिंदुराष्ट्रच) यांच्या तुलनेत भारताने जास्त प्रगती केली याचे श्रेय निधर्मीवादाला आणी नेहरुंच्या दूरदृष्टीला जाते.

विकु अहो निधर्मीवादाचा मतांच्या राजकारणासाठी आंधळा अतिरेक केला जातो त्याचे दु:ख आहे. असो हे न संपणारे गुर्‍हाळ आहे.

>>काय केले म्हणजे बदलेल हेच कळेनासे झाले आहे.
दुर्दैवाने अनेक योग्य आणि न्याय्य उपाय हे बेकायदेशीर आहेत. Light 1
आणि आपण कायदा पाळणारे लोक असल्याने ते शक्य नाही.

भारताची तुलना केली ती सुद्धा पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळशी ??

GDP OF COUNTRIES;
1. INDIA : 1371
2. PAKISTAN: 1030
3. NEPAL : 516
4. BANGLADESH: 638

BUT BHUTAN: 1978
CHINA : 18458

तुलना करायची तर चीनशी करा. चीन हा कम्युनिस्ट देश आहे म्हणजे निर्धमी मग भारतच एव्हडा
मागे का ? भुतान देशा पेक्षा ही मागे ?

>>> बाकीच्या धोक्यांपेक्षा हा आपल्याच लोकांच्या तथाकथित निधर्मीवादाच्या नावाखाली सडलेल्या विचारप्रवृत्तीचा धोका फार मोठा आहे.

सहमत! निधर्मीवाद हे एक प्रभावी वैचारिक संमोहन आहे. हा एक अफूचा मोठ्ठा गोळा आहे असं कोणीतरी म्हटलं आहे.

सच्चर आयोगाचा अहवाल वाचा. मग कळेल.

सच्चर आयोग हा मुस्लिमांची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, आरोग्य, शिक्षण अशा परिस्थितीवर प्रकाश टाकतो... त्यात असे कुठे दिले आहे की भारताची प्रगती फक्त हिंदुनी केली म्हणून? अहवाल खरेच वाचण्यासारखा आहे... त्यात कितीतरी गोष्टी स्पष्टपणे दिलेल्या आहेत..
१. मुसलमानांच्यात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे स्त्री : पुरुष रेशो हा इतर धर्मियांपेक्षा चांगला आहे.. ( स्त्री म्हणजे देवी असे म्हणूण ढोल बडवणारे धर्म यातून बोध घेतील ही अपेक्षा.)
२. मुसलमानांची आजची लोक्संख्या १५ % आहे, ती वाढून १९ पेक्षा थोडी कमी होऊन मग वाढ थांबेल.. लोक मुले होऊ देतात ती आपली स्थिती बघून, सरकारसाठी वोट बँक म्हणुन नव्हे.. ( हे त्या आयोगातील वाक्य आहे.. )

अजुनही बरेच काही आहे.. पण मुसलमान, सच्च्रर आणि काँग्रेस यांचे अभिनंदन करायला हवे.. सुमारे २० टक्के लोक्संख्या असलेल्या लोकांचा अर्थिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण या सर्वांची आकडेवारी आणि प्रगती साठी काय करायला हवे याच्या शिफारशी त्यात आहेत...

आणि ८० टक्के लोकसंख्या असलेले महान धर्मातले लोक कुठे मशीद पाड, मंदिर बांध, त्यासाठी कोर्ट केसेस खेळ, कुठला संगमरवरी महाल म्हणे शंकराचं देऊळ कसं होतं यावर कादंबर्‍या लिहा ( ज्या कुठल्याही कोर्टाने मान्य केल्या नाहीत. हा भाग वेगळा) अफजलखानाचे राक्षशी मोठे पोस्टर लाव,कुठे अकबरावर षिणेमा आला की टॉकीज फोड, रस्त्याला कुठल्या क्रांतीकारकाचे नाव द्यायचे, जेलमध्ये कुणाचे स्मारक करायचे, अभिनव उपक्रम म्हणून कुठे सुतळी बाँब लाव..... Proud असल्या नॉन प्रॉडक्टिव गोष्टींवर आपला वेळ खर्च करत आहेत... हिंदुनीही असा एखादा सच्चर पुढे करुन संपूर्ण लोकसंख्येचा लेखाजोखा मांडूण काही प्रॉडक्टिव गोष्टी केल्या तर हिंदु धर्माचे नक्की भले होईल..

http://minorityaffairs.gov.in/sites/upload_files/moma/files/sachar_comm_...

>>> अजुनही बरेच काही आहे..

हे "बरेच काही" आहे ते जरा सांगा ना.

>>> मुसलमानांच्यात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी आहे.

असणारच. आपली लोकसंख्या भरपूर वाढवायची हा उद्देश असल्याने हे होणारच आणि १ ला ४ हा रेशो असल्याने पण असे होणार.

>>> मुसलमानांची आजची लोक्संख्या १५ % आहे, ती वाढून १९ पेक्षा थोडी कमी होऊन मग वाढ थांबेल..

काय हा मूर्खपणा. याबाबतीत कोणतेही अपर लिमिट नाही. पण हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा फारच उशीर झाला असेल.

>>> लोक मुले होऊ देतात ती आपली स्थिती बघून, सरकारसाठी वोट बँक म्हणुन नव्हे.. ( हे त्या आयोगातील वाक्य आहे.. )

:फिदीफिदी: भरपूर मुलं होऊन देण्याचे कारण डोकी वाढविणे एवढेच आहे. तसे नसते तर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतल्या कुटुंबाला सुद्धा ७-८ मुले कशी असतात?

त्या आयोगात अशी अनेक विनोदी आणि वस्तुस्थितीला धरून नसलेली वाक्ये आहेत. कारण तो आयोग स्थापन करण्याचा मूळ उद्देश वेगळाच होता.

वैचारिक संमोहनाच्या प्रभावाखाली असलेल्यांना हे कधी लक्षात येणारच नाही.

असणारच. आपली लोकसंख्या भरपूर वाढवायची हा उद्देश असल्याने हे होणारच आणि १ ला ४ हा रेशो असल्याने पण असे होणार.

मास्तुरे ! Proud अहो, लोक ४ लग्नं करतात म्हणून मुलींचा रेशो वाढतो हे कुठले तर्काट हो??? मुली जन्माला आधी येतात आणि मग लग्नं होतात का आधी ४ ४ लग्नं जमवली जातात आणि मग कमी पडू नयेत म्हणून मुली जन्माला घातल्या जातात?????????????????????????? Proud हिंदुत्वाचं संमोहन झालं की असले तर्काट सुचतात..

आणि उद्देश समजा जरी तोच असला, तरी स्त्री भ्रुणहत्या होत नाही/ कमी होते हे स्तुत्यच आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतल्या कुटुंबाला सुद्धा ७-८ मुले कशी असतात?

ही काय फक्त मुसलमानांची मक्तेदारी नाही.. हिंदुंच्यातही असे अनेक ठिकाणी आढळते.. आणि हे प्रमाण सगळ्याच धर्मात कमी होत आहे. http://www.maayboli.com/node/29443 यात कुठेतरी आकडेवारी आहे.. वाचा.. तीन पेक्षा जास्त अपत्ये झाली म्हणून राजीनामा द्यायला लागला अशा केसेस्मध्ये हिंदु मुस्लिम सगळेच आहेत... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5135141.cms बायका जरी ४ केल्या तरी नवर्‍याचे मुलांचे लिमिट कायद्यानुसार २ च आहे...

हे "बरेच काही" आहे ते जरा सांगा ना.

वर अहवालाची लिंक दिली आहे, ती वाचा.. Happy

विजय कुलकर्णीजी,
नेपाळ (हिंदुराष्ट्र) असे आपण म्हटले आहे.
सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
त्यांची हिंदुत्वाची व्याख्या मूलत: राजकीय स्वरुपाची आहे त्यात भारतातील वैदिक, शैव, वैश्णव, आस्तिक का नास्तिक, जैन, शीख, नवबौद्ध , शाक्त वगैरे सर्वजण येतात. हिंदुकोड बीलही नेमके याच सार्‍यांना लागू आहे.
त्यांच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्राचे नागरिकत्व मात्र वर उल्लेखिलेल्या नागरिकांच्या बरोबरीने पारशी, मुसलमान, ख्रिश्चन या धर्मियांनाही आहे. त्याअर्थी ते खरे तर सेक्यूलरच आहे. पण याबाबतीत त्यांच्या प्रतिपादनाचा ढोंगी सेक्युलरवाद्यांनी प्रचंड विपर्यास केला आहे. या धाग्यावर लिहिणार्‍या रानडुकर-मित्रमंडळाने प्रा. शेषराव मोरे यांचा 'सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद' हा ग्रंथ वाचण्याचे कष्ट घ्यावेत. निव्वळ 'टेक्स्ट बुकातील' दोन तीन पाने मजकुर वाचून मल्लिनाथी करणे सोडून द्यावे ही विनंति.
तोवर रानडुकर-मित्रमंडळाच्या लिखाणावर प्रतिक्रीया देणे थांबवावे अशी माझी सर्वांनाच विनंति आहे.

काय हा भाबडेपणा उदयवन! आपण म्हणता तसं असेल तर भारतीय राज्यकर्त्यांचा एव्हढा काळा पैसा स्विस बँकेत कसा साठला? कोण ढोंगी आहे?
आ.न.,
-गा.पै.

त्यांच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्राचे नागरिकत्व मात्र वर उल्लेखिलेल्या नागरिकांच्या बरोबरीने पारशी, मुसलमान, ख्रिश्चन या धर्मियांनाही आहे. त्याअर्थी ते खरे तर सेक्यूलरच आहे.

आनंदाची गोष्ट आहे. मग तसे असेल तर सेक्युलर भारत देश हाच शब्द वापरावा ही विनंती.. जर तुम्ही सेक्युलरच आहात तर हिंदु राष्ट्र हा शब्द तरी कशाला वापरता? हा देश सेक्युलर आहे हे घटनेने सांगितले आहेच की. त्यामुळे इतर कुणी काय व्याख्या केलेल्या आहेत, त्यांची देशाला गरजच नाही. Proud एक घटना पुरेशी आहे.

क्रांतीकारकान्नी देशासाठी केलेला त्याग आणि देशप्रेम वादातीत आहे. पण त्याचा अर्थ त्यन्नी केलेल्या धर्म, राष्ट्र, देशाची विचारसरणी या सगळ्या व्याख्याही जनतेने आपल्या गळ्यात बांधून घ्याव्यात असा होत नाही..

शेषरावांचे पुस्तक :

हे राष्ट्र काय आहे हे समजायला घटना नावाचे एकच पुस्तक पुरेसे आहे.. इतिहासाच्या नावानं सोनेरी आणि चंदेरी वर्ख लावलेली पानं तुम्हाला लखलाभ असोत... या देशाची मूलतत्वे समजायला दुसर्‍या पानांची गरजच नाही.. विषय समजायला टेक्स्ट बुकच वापरावे लागते. .. 'गाइड' च्या नावानं मिळणारी पुस्तकं नाही.

रानडुक्कर मित्रमंडळः

हिंदु असून रानडुक्कराला वाइट साइट बोलताय? एका रानडुक्करानेच हिंदु धर्म तारला आहे, हे विसरु नका.. रानडुक्कर म्हणजे साक्षात भगवान विष्णू ! Proud त्यामुळेच कुणी मला रानडुक्कर म्हटले तरी मला राग आलेला नाही.. उलट, आनंदच झालेला आहे ! Proud

एकंदरच, हे सगळे जेल-हॉस्पिटल प्रकरण म्हणजे सावरकरवाद्यांच्या वेडेपणाचे उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हरतात अशी एक म्हण आहे. ती या लोकान्नी अक्षरशः खरी करुन दाखवली आहे.. या लोकान्नी जेल जिंकले पण हॉस्पिटल मात्र घालवले.. निम्मेच कशाला सगळे जेल पाडले तरी चालेल, ५००च कशाला १००० कॉटचे हॉस्पिटल बांधा, पण जे हॉस्पिटल उभे राहील, त्याला केवळ आणि केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच नाव द्यावे लागेल, ही भूमिका या लोकान्नी घ्यायला हवी होती.. सावरकर हॉस्पिटल असा कोरलेला मोठा दगड रोवून मगच जेल पाडु द्यायला हवे होते ( कारण वास्तू बांधल्यावर सरकार पुन्हा पलटी मारु शकते ! म्हणून ही खबरदारी. ) हॉस्पिटलच्या सगळ्या ओपीडी, आय्पीडी, रक्त लघवी, एक्स रे रिपोर्ट, पेशंटला दिले जाणारे नंबरचे चिटोरे या सगळ्यांवर सावरकरांचे नाव राहिले असते आणि यावच्चंद्र दिवाकरौ सरकार झक मारत सावरकर-सावरकर-सावरकर छापत बसले असते ! Proud हा प्रॅक्टकल सेन्स असल्याने काँग्रेजी नेत्याचे नाव हॉस्पिटलला लागले आणि सावरकरांच्या नशिबी मात्र मेल्यावरही पुन्हा जेलच आले... Sad

असो, आणखी एक गोष्ट सहज करणे शक्य आहे.. ती म्हणजे शाळेला, हायस्कूलला छोटीशी २०००-५००० ची देणगी देणे आणि त्याच्या व्याजातून सातवी किंवा दहावीला इतिहासात प्रथम येणार्‍या मुलाला स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहास पुरस्कार या नावाने ५०-१०० रु चे बक्षीस मिळेल अशी व्यवस्था करणे. वर्षातून एक दिवस तरी शे पाचशे पोरांच्या कानावर ते नाव सन्मानाने पडेल. घरातल्या लोकांच्या स्मरणार्थ संस्था अशा देणग्या स्वीकारतात, सावरकरांच्या नावाने घेतील का हे माहीत नाही.

( देणगी आणि बक्षिसाचे आकडे गावपातळीवरील शाळेसाठी आहेत. डॉन बॉस्को, ट्री हाऊस असल्या चर्चा करणार्‍या लोकान्नी आकडे आपल्या हैसियतनुसार बदलावेत. Proud )

जागोडुक्करप्यारे ! ( मोहन = विष्णू = रानडुक्कर ! Proud )

>>> हे सगळे जेल-हॉस्पिटल प्रकरण म्हणजे सावरकरवाद्यांच्या वेडेपणाचे उत्तम उदाहरण आहे

तुमच्या वेडेपणावर एखाद्या सेक्युलर डॉक्टरकडून गुडघ्यावर औषध घ्या. धनगराचे झाडपाल्याचे औषध उलटल्याचे दिसत आहे. किंवा मग अंदमानातल्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्यावर ट्रीटमेंट घ्या. म्हणजे मग जरा सुसंगत लिहायला लागाल. Biggrin

>>> पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ ( हे तर हिंदुराष्ट्रच) यांच्या तुलनेत भारताने जास्त प्रगती केली याचे श्रेय निधर्मीवादाला आणी नेहरुंच्या दूरदृष्टीला जाते.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या भूतकाळातल्या व वर्तमानातल्या बर्‍याचश्या समस्यांचे मूळ नेहरूंच्या तथाकथित "निधर्मीवादात" व त्यांच्या "(अ)दूरदृष्टीत" आहे.

नेहरू हे निधर्मी कधीच नव्हते. ते मुस्लिमधार्जिणे व हिंदूविरोधी होते. "मी केवळ अपघाताने हिंदू आहे" हे त्यांचेच वाक्य. धर्माधिष्ठित राज्यघटना व कायदे अंमलात आणून आपली निधर्मांधता त्यांनी सिद्ध केली होती.

तसेच ते दूरदर्शी अजिबात नव्हते. चीनवर आंधळा विश्वास, तिबेट बळकावयाला चीनला पाठिंबा, यूनोच्या सुरक्षा समितीचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळत असताना ते नाकारून आपल्याऐवजी चीनला तिथे बसविणे, काश्मिर प्रश्नी युद्ध जिंकण्याच्या परिस्थितीत असताना ते थांबवून तो प्रश्न यूनोत नेणे आणि या प्रश्नात कायमस्वरूपी पाचर मारून घेणे, काश्मिरमध्ये सार्वमताला मान्यता देऊन फुटीरतेची भावना जागृत ठेवणे, काश्मिरला इतर राज्यांपेक्षा खास दर्जा देऊन ते भारतात कधीच पूर्णतः विलीन होऊन न देता त्याचे वेगळेपण कायम ठेवणे, चीनचे धूर्त डावपेच लक्षात न घेता युद्धात दारूण पराभव पत्करणे, भारतीय सैन्यदलाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोनवेळा युद्धात पराभव पत्करून मोठा भूभाग गमाविणे, चीन भारतीय प्रदेशात वारंवार अतिक्रमण करत आहे हे लक्षात आणून देऊन सुद्धा,"त्या प्रदेशात गवताचे एक पातेही उगवत नाही. अशा प्रदेशाचा भारताला काय उपयोग आहे?" अशा तर्‍हेची अत्यंत अदूरदर्शी भूमिका घेणे . . . त्यांच्या र्‍हस्व दृष्टीची ही व अशी अनेक उदाहरणे आहेत.

Pages