भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
ऑसीस कडे पण नेहरा आहे.....
ऑसीस कडे पण नेहरा आहे.....
ऑसीस कडे पण नेहरा आहे.....
ऑसीस कडे पण नेहरा आहे..... :हाहा:....
गंभीरने 'मॅन ऑफ द मॅच'
गंभीरने 'मॅन ऑफ द मॅच' झाल्यावर मुलाखतीत ' ही मॅच ४८व्या षटकांच्या आंतच संपायला हवी होती; धोनीने कां लांबवली कळत नाही' असं विधान केलंय ! त्याने म्हटलंय तें खरं असलं तरीही मास्तुरेजीनी तसं इथं म्हणणं व गंभीरने जाहिर मुलाखतीत कॅप्टनविषयीं असं म्हणणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे, असं नाही वाटत? लक्ष्मण, सचिन व द्रविड यांनी कधीतरी असं विधान केल्याचं आठवतं ? ' अर्ध्या हळकुंडानं ........' आणि काय !!
>> धोनीने कां लांबवली कळत
>> धोनीने कां लांबवली कळत नाही
क्रिकेटमधे आउट पण होऊ शकतात हे गंभीर तेव्हढ्यात विसरला?
माझ्या मते धोनी उत्कृष्ट खेळला. शेवट पर्यंत विकेट फेकायची नाही हे त्यानं ठरवलेलं दिसतंच होतं. तो पर्यंत कुठलाही वेडावाकडा फटका मारला नाही त्यानं. अर्थात ऑसीजनी पण खूप मदत केली तो टिकायला यात वादच नाही. बाकीच्यांच विकेट फेकणं बघितलं की धोनीचं जास्तच कौतुक वाटतं.
शेवटच्या १६ षटकांत फक्त ९२
शेवटच्या १६ षटकांत फक्त ९२ धावा हव्या होत्या व ३ च बाद झाले होते. ३५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनी आला आणि एकदम परिस्थिती बदलली. पॉवरप्लेमधल्या खेळलेल्या १५ चेंडूत त्याने फक्त २ धावा करून प्राण कंठाशी आणले.>> मास्तुरे, ३ च बाद झाले होते नाहि मह्त्वाचे तर, त्यातले दोघे जण आधीच्या बारा बॉलमधे बाद झाले होते हे मह्त्वाचे आहे. समजा आल्या आल्या तुमच्या इच्छेनुसार धोनी दांडपट्टा फिरवता नि बाद होता तर तुम्हीत्यालात्याला दोष देणारे पोस्ट तसेच वेगळ्या कारणामूळे त्याला दोष देत लिहिले असते.
jokes apart, धोनी नेहमीच असा खेळतो. सामना drag करून शेवटच्या काहि षटकांमधे संपवणे हि त्याची style झाली आहे. तसे करताना RRR हाताबाहेरही जातो पण त्याला तो managebale वाटतो तोवर सगळे आलबेल आहे. "Highest batting avg in successful chases (Min.25 inns): Dhoni (104.89), M Clarke (89.20),Bevan (86.25) & M Hussey (83.87)."
त्याने म्हटलंय तें खरं असलं
त्याने म्हटलंय तें खरं असलं तरीही मास्तुरेजीनी तसं इथं म्हणणं व गंभीरने जाहिर मुलाखतीत कॅप्टनविषयीं असं म्हणणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे, असं नाही वाटत?>> Its not a big deal असे मला वाटते. ह्या generation मधले खेळाडू आपली मते स्पष्ट व्यक्त करतात. गंभीरने पिचबद्दलही सरळ सरळ त्याला जे वाटतेय ते व्यक्त केले होते. त्यावरुन जोवर संघात मतभेद होत नाहित तोवर काय फरक पडतो ?
लक्ष्मण, सचिन व द्रविड यांनी कधीतरी असं विधान केल्याचं आठवतं ? ' अर्ध्या हळकुंडानं ........' आणि काय !!>> हे उगाचच. त्यांनी नाहि केले म्हणून इतरांनी करायला नको असे का ? अशा बर्याच गोष्टीही आहेत जिथे ह्या तिघांनी आवाज उचलले असते तर भारतीय क्रिकेट अजून चांगल्या स्थितीमधे असते
अशा बर्याच गोष्टीही आहेत
अशा बर्याच गोष्टीही आहेत जिथे ह्या तिघांनी आवाज उचलले असते तर भारतीय क्रिकेट अजून चांगल्या स्थितीमधे असते अरेरे
खरे असावे असे वाटते. बिचारे स्वतःचा खेळ सुधारण्याच्या मागे,
लवकरच संघातून हकालपट्टी झाली तर ज्यांना कॉमेंटेटर, पत्रकार, वगैरे वगैरे गोष्टी करायला हवे असते, ते तोंड वाजवायला लागतात. अक्कल नसेल, खेळ चांगला नसेल तर जास्तच मोठ्याने!.
<< त्यावरुन जोवर संघात मतभेद
<< त्यावरुन जोवर संघात मतभेद होत नाहित तोवर काय फरक पडतो ? >> मला खटकलं तें जाहिरपणें आपलं मत व्यक्त करून टाकणं ; ड्रेसींगरूममधे अवश्य करावं आपलं मत व्यक्त व वर उल्लेखिलेले ज्येष्ठ तसं कशावरून करत नव्हते ? अर्थात, << ह्या generation मधले खेळाडू आपली मते स्पष्ट व्यक्त करतात. >> असं असेल तर मी generation gap चा केविलवाणा बळी झालो असेन ! पण खरंच हें 'जनरेशन रिलेटेड' आहे कीं व्यक्तीनिष्ठ, याचाही जरा गंमत म्हणून तरी विचार व्हावा !!
पुढच्या मॅच मधे सक्ती ने
पुढच्या मॅच मधे सक्ती ने सेहवाग ला बसवायला हवे.......झहीर ला सुध्दा...... सचिन शिवाय तिवारी ला घ्यावे आणि झहीर च्या जागी पठाण..........
काल धोनी शिव्या खाता खाता वाचला......
सचिनला बसवायची गरज नव्हती.
सचिनला बसवायची गरज नव्हती. तो टीम मध्ये अजूनही चांगलाच खेळत आहे. सेहवागला मात्र नक्कीच पूर्ण सिरिजभर बसवावे. तो अजिबातच टिकत नाही. आणि सेहवाग ऐवजी अजिंक्य रहानेला आणावे. तो आणि सचिन ओपन आणि गंभिर नं ३ मस्त राहील. किंवा अगदी तिवारीला संधी द्या. तो नक्कीच १०,८,२० पेक्षा जास्त धावा काढेल. सेहवाग सध्या बॅडपॅच मध्ये आला आहे का?
सर्व सिनिअर प्लेअर्स (गावस्कर, शास्त्री, अक्रम, ग्रेग इ इ ) ह्या रोटेशनचा विरोध करत आहेत. मी त्यांच्याशी सह्मत आहे. रोटेशन करायचेच तर अश्विन ऐवजी इरफानचे करावे. असाही त्याच्यामुळे फारसा फरक पडत नाही.
गंभीरची ही वाक्ये
गंभीरची ही वाक्ये पहा.
http://www.espncricinfo.com/commonwealth-bank-series-2012/content/curren...
"Someone like me, if I was there, I wouldn't have taken it to the last over, because I always feel that any runs in the last over is far more pressure than finishing one or two overs before. Even if you need five or six runs in the last over, the pressure is far more on the batting side. We are different human beings, we think differently, we have different gameplans."
गंभीर जे काही बोलला त्यात मला तरी काहीही चूक वाटत नाहीय्ये. ६ गडी बाद झालेले असताना शेवटच्या षटकात १३ धावा करून सामना जिंकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे व इतिहासात असे फारच थोड्या वेळा झालेले आहे. याउलट केवळ ३ च गडी बाद झालेले असताना १६ षटकात ९२ धावा होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. भारत अतिशय सुस्थितीत असताना, शेवटी देव पाण्यात ठेवण्यापर्यंत वेळ यावी, याचा दोष १०० टक्के धोनीचाच आहे. रैनाने (३० चेंडूत ३८) व जडेजाने (८ चेंडूत १२) पुरेपूर प्रयत्न केले होते. पण सामना ५० व्या षटकात जाऊन हारण्याची परिस्थिती आली त्याचे कारण धोनीची संथ फलंदाजी हेच होते. (धोनीने खेळलेल्या पहिल्या १६ चेंडूत फक्त २ धावा केल्या होत्या व ४९ वे षटक संपले तेव्हा धोनीची कामगिरी ५५ चेंडूत ३३ धावा अशी होती).
शेवटच्या षटकात आपण आरामात १३ धावा मारू अशी धोनीला खात्री होती किंवा धोनीने ठरवून योजनाबद्ध खेळ करून सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचून जिंकला किंवा धोनी त्याला पाहिजे तसा सामना फिरवितो असे म्हणणे हे पूर्ण बकवास आहे. धोनी असा योजनाबद्ध खेळ करून सामने शेवटच्या षटकापर्यन्त खेचून देऊन जिंकून देऊ शकत होता तर पहिल्या ट्-२० मध्ये त्याला का नाही जिंकून देता आले? त्या सामन्यात सुद्धा तो आला तेव्हा आवश्यक धावगती ९.२० होती. तो सुरवातीला अत्यंत संथ खेळला (पहिल्या २५ चेंडूत फक्त १५ धावा). १५ षटक संपले तेव्हा धोनी होता २५ चेंडूत १५ आणि आवश्यक धावगती १५.४० पर्यंत पोचली होती. नंतर त्याने मारायला सुरूवात केली आणि शेवटी तो ४३ चेंडूत ४८ धावा करून नाबाद राहिला. म्हणजे जेव्हा सामना पूर्ण हाताबाहेर गेला होता तेव्हा त्याने थोडीफार मारामारी केली. त्या सामन्यात का नाही त्याने असा सोकॉल्ड "योजनाबद्ध" खेळ केला? त्या सामन्यात जमले नाही, काल जमले.
सुरवातीला खूप संथ खेळून चेंडू वाया घालवून नंतर सामना हाताबाहेर गेल्यावर अचानक मारामारी करून जिंकण्याची शक्यता खूपच कमी असते. काल शेवटच्या ४ चेंडूत १२ धावा हव्या असताना धोनीने चान्स घेतला व तो यशस्वी ठरला. क्लिंट मॅकायने देखील नोबॉल टाकून हातभार लावला. पण हेच त्याच्या जागी बॉलिंजर, सीडल, मिचेल जॉन्सन, मलिंगा किंवा सीडल सारखे गोलंदाज असते तर सामना जिंकणे अशक्य होते. काल जमले, पण शेवटच्या षटकांत १३ धावा हव्या असतील तर इतर १० पैकी ९ वेळा ते जमणार नाही आणि अशी वाईट परिस्थिती केवळ धोनीमुळेच आलेली होती.
एक शंका. रोटेशन पॉलिसीनुसार धोनीच्या जागी पार्थिव पटेलला खेळवतील का?
रोटेशन करायचेच तर अश्विन ऐवजी
रोटेशन करायचेच तर अश्विन ऐवजी इरफानचे करावे. >>>>>>>>>>>.. किमान अश्विन बॅटिंग तरी करत आहे.....
पण खरंच हें 'जनरेशन रिलेटेड'
पण खरंच हें 'जनरेशन रिलेटेड' आहे कीं व्यक्तीनिष्ठ, याचाही जरा गंमत म्हणून तरी विचार व्हावा !!>> गंभीरच कशाला त्याअधी कोहली किंवा रैनानेसुद्धा अशी वक्तव्ये केली आहेत. त्यावरुन काहि वाद झाल्याचे लक्षात येत नाहि. उगाच ते "boys should have batted well, balled well, and fielded well" types विधाने करण्यापेक्षा हा सडेतोडपणा चांगलाय कि. आनि हे फक्त भारतीय क्रिकेटबद्दलच नाहिये तर aus, POMs इथे पण होते कि.
<< गंभीर जे काही बोलला त्यात
<< गंभीर जे काही बोलला त्यात मला तरी काहीही चूक वाटत नाहीय्ये. >> ते जाहिरपणे बोलावं का, एवढाच माझा मुद्दा होता. शिवाय रिडीफ.कॉमवर मीं वाचलं तें असं होतं -
"It's easier said than done. There is far more pressure on the players who are in the middle. It's their turn to take the decision. I don't know why he (Dhoni) delayed it. Perhaps, he wanted somebody else to take the responsibility. Still the most important shot in the match was played by him," Gambhir stated.
जर धोनीने असं कां केलं हें कळलं नसेल, तर जाहिरपणे बोलण्यापूर्वी त्यालाच विचार आणि समजून घे ना ! अर्थात, हा कांही मोठा इश्यू नाही पण मला जरा खटकलं इतकंच.
>>> शिवाय रिडीफ.कॉमवर मीं
>>> शिवाय रिडीफ.कॉमवर मीं वाचलं तें असं होतं -
गंभीरचे संपूर्ण स्टेटमेंट मी वर दिलेल्या क्रिकइन्फोवरील लिंकमध्ये आहे.
श्रीलंकेची पहिली विकेट
श्रीलंकेची पहिली विकेट दुसर्याच चेंडूवर ! सचिन व इर्फान संघात सामील.
[ आज धोनी म्हणाला कीं विकेट शिल्लक असतील तर शेवटच्या दोन-तीन षटकांतही भरपूर धांवा करणं शक्य असतं; विकेट हातात नसतील तर मात्र शेवटी कमी धांवा करणंही जड जातं. हें बरोबर कीं चूक यापेक्षां तो निश्चित भूमिकेतून गेल्या सामन्यात तसा खेळला होता व आपली भूमिका त्याला सिद्धही करतां आली होती, हें महत्वाचं. गंभीरचं " Perhaps, he wanted somebody else to take the responsibility ", अकारण होतं असं नाही वाटत ? ]
अरे, कुठे गेले आज सगळे
अरे, कुठे गेले आज सगळे क्रिकेटप्रेमी?
आजचा सामना मस्त झाला. टाय व्हायला नको होता. भारताला सहज जिंकता आला असता. याही सामन्यात फक्त गंभीर व धोनीच खेळले. हे दोघेही फॉर्मात आले ही आनंदाची गोष्ट आहे. आता सचिन, रैना, रोहीत शर्मा व सेहवागसुद्धा असेच फॉर्मात येऊ देत.
सचिन ज्या तर्हेने बाद झाला, ते पाहून धक्का बसला. अजिबात पाय न हलवता आळशीपणे ऑफच्या बाहेरचा चेंडू त्याने मारायचा प्रयत्न केला. त्याची विकेट पाहून सेहवागची आठवण झाली. सचिनचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला की काय असे वाटायला लागले आहे. त्याच्या महाशतकाबद्दल आता कोणी चकार शब्दही काढत नाही. त्याला सध्या अर्धशतक सुद्धा दुर्मिळ झाले आहे. श्रीलंका तीनही सामन्यात २२६ ते २३६ मध्ये लटकली आहे. भारताने लागोपाठ ४ थ्या सामन्यात पाठलाग केला. असो. एकंदरीत मझा आला.
http://www.espncricinfo.com/c
http://www.espncricinfo.com/commonwealth-bank-series-2012/content/curren... ... मास्तुरे हा लेख खास तुमच्यासाठी लिहिला असावा
गंभीरचं " Perhaps, he wanted somebody else to take the responsibility ", अकारण होतं असं नाही वाटत ?>> नाहि वाटले, एका बाजूला धोनी चिकटलेला नि दुसर्या बाजूने युवराज किंवा रैना सुटलेत हा देशातला pattern त्याला उद्देशून केले असावे. धोनी शेवटच्या काहि षटकांमधे open होतो, त्याधी बरेचदा इतर जण होणे expected असावे अशा अर्थाने आहे. It does not seem like dig to me.
गंभीरच्या गेल्या मॅचनंतरच्या
गंभीरच्या गेल्या मॅचनंतरच्या विधानाचा आज धोनीने चांगलाच सूड उगवला ! गंभीर सेंच्यूरीच्या उंबरठ्यावर असताना क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल आहे हें पाहून गंभीरला बोलावून , आपण परत फिरून त्याचा पूरा 'बकरा' केला ! वर, आपण 'मॅन ऑफ द मॅच'ही बळकावून बसला !!!
<< असो. एकंदरीत मझा आला. >> खरंय. रिडीफ.कॉमवरची आणखी मजेशीर माहिती -
Interestingly, as Mohandas Menon pointed out on Twitter: 'First time both teams have scored same number of runs, lost same no of wkts, faced same no of overs, same no of extras, same no of 4s & 6s!'
The two teams even had the same number of maiden overs: 2.
मलिंगाने कुठल्यातरी
मलिंगाने कुठल्यातरी ओव्हरमध्ये एक बॉल कमी (५ बॉल्स)टाकला म्हणे... त्यामुळे म्याच पूर्ण ५० ओव्हरची झालेली नाही. २९९ बॉलचीच झाली आहे...
<< कुठल्यातरी ओव्हरमध्ये एक
<< कुठल्यातरी ओव्हरमध्ये एक बॉल कमी (५ बॉल्स)टाकला म्हणे... >> ३०वं षटक. पण धोनीने तो मोठा 'इश्यू' न करायचं ठरवलंय. चांगला निर्णय !
लंकेनेही आज विजयाच्या
लंकेनेही आज विजयाच्या उंबरठ्यावरून 'टाय' ला परत बोलाविले (कोणाला यात संझगिरी/कणेकर दिसले तर क्षमस्व
). शेवटच्या ओव्हर्समधे संगाकाराने सोडलेला कॅच, मलिंगाने सोडलेला रन आउट चा चान्स हे जर घेतले गेले असते तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते.
धोनीची चिकाटी जबरी आहे पण. शेवटचा शॉट, ती एक मधली सिक्स आणि एक चौकार खतरनाक होते. गंभीरही मस्त खेळला.
सचिन आज नक्की काय करत होता त्यालाच माहीत असेल. अमिताभने 'विजय' चेच काम करावे. चोप्रा-जोहर मधला आजोबा हे त्याचे काम नव्हे
>>> वर, आपण 'मॅन ऑफ द मॅच'ही
>>> वर, आपण 'मॅन ऑफ द मॅच'ही बळकावून बसला !!!
धोनीने गंभीरचा पुरस्कार बळकावयाची ही दुसरी वेळ. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला विजयापर्यंत नेणारा गंभीर (९७ धावा) हाच खरा योग्य सामनावीर होता. पण तो धोनीने (नाबाद ९१) पटकावला. कालच्या सामन्यात सुद्धा गंभीरची कामगिरी (९२ धावा) ही धोनीपेक्षा (नाबाद ५८) जास्त सरस होती. खरं तर विजयासाठी ६० चेंडूत ५९ धावा इतकी सोपी स्थिती पुढच्या ५ षटकांनंतर विजयासाठी ३० चेंडूत ४६ धावा अशी अवघड झाली त्याला अप्रत्यक्षरित्या धोनीच कारणीभूत होता (गंभीरला त्यानेच धावबाद केले). सहज जिंकता येणारा सामना भारत जवळपास हरला होता. पण शेवटच्या २ षटकामध्ये धोनीने जबरदस्त फलंदाजी करून सामना टाय केला. पण तरीसुद्धा गंभीरचीच कामगिरी जास्त सरस वाटते. असो. धोनी आणि गंभीर पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आले ही आनंदाची गोष्ट आहे.
जडेजाला कशासाठी घ्यायचे? तो
जडेजाला कशासाठी घ्यायचे? तो नक्की काय करतो. (चांगल्या फिल्डींग शिवाय) १० ओव्हर्स मध्ये ४५-४८ धावा कधी कधी जास्तच अन बॅटींग शून्यच. इरफानला त्याच्या आधी पाठवायला हवे होते. इरफानलाही धोणीनेच रनआउट केले. आता जडेजाला बास, इरफानला ठेऊन वर परत सचिन, सेह्वाग अन गंभीर हवेत. कारण जो नं ६ किंवा ७ वर खेळतो तो फिनिशर असायला हवा. जडेजा ७ वर खेळतो. त्याने एक दोन मॅच जिंकविल्या ते ठिक पण त्याच्यामुळे अनेक मॅचेस हरलो पण. उदा सचिनची १७५ ची खेळी वाली मॅच. अशा एक ना अनेक. तो डेथ बॉलींगही करत नाही. त्यामुळे माझ्यामते तो सध्याच्या बेस्ट ११ मधून आउट असावा. सेहवागही. तिवारीला एक दोन मॅच मध्ये संधी द्यावी. तो खेळलाच नाही तर मग सेहवाग आहेच.
धोणी मस्त खेळला हे ठिक, पण तो गंभीर आउट झाल्यावर कित्येक ओव्हर्स (४-५) शेल मध्ये गेल्यासारखे खेळला. आपन हारलो असतो. जिंकत असताना.
सहज जिंकता येणारा
सहज जिंकता येणारा सामना?
मास्तर, टिव्ही समोर तंगड्या वर करून एकीकडे चहा ढोसत ढोसत मॅच बघताना सगळं सहज वाटतं, बरं का!
गंभीर धोनीमुळे आउट झाला हे बरोबर आहे. क्रिकेटमधे असे गोंधळ होतच असतात. पण गंभीर असताना फार काही वेगाने धावा होत नव्हत्या. ३१ व्या षटकाच्या सुरुवातीला स्कोअर १३५ होता, ४० व्या षटकाच्या शेवटी तो १७८ होता. म्हणजे १० षटकात दोघांनी फक्त ४३ धावा काढल्या. तेव्हा खरं तर गंभीर चांगला सेट होता आणि त्याला जास्त लवकर धावा काढणं जमलं असतं. गंभीर त्या १० ओव्हरीत, २९ बॉल खेळून ६८ वरून ९१ वर गेला - एकूण २३ रन्स. धोनी ३१ बॉल खेळून १० वरून २९ वर - एकूण १९ रन्स. त्यात ३१ व्या ओव्हरीत धोनीचा (अवघड) कॅच सुटला होता.
असो. शेवटच्या १० ओव्हरीत ५९ धावा करणं गंभीर असला असता तरी अवघडच होतं. कारण त्या १० तल्या ४ ओव्हरी मलिंगानं टाकल्या (त्यातली ४१ वी ओव्हर मेडन होती, त्यातच गंभीर गेला) त्यात १७ धावा निघाल्या. कुलसेखराच्या २ ओव्हरीत ७ धावा निघाल्या म्हणजे ६ ओव्हरीत फक्त २४. हा रनरेट अलिकडच्या १० ओव्हरींच्या (१० ओव्हर्स ४३ रन्स) रनरेट इतकाच साधारणपणे होता.
>>> गंभीर त्या १० ओव्हरीत, २९
>>> गंभीर त्या १० ओव्हरीत, २९ बॉल खेळून ६८ वरून ९१ वर गेला - एकूण २३ रन्स. धोनी ३१ बॉल खेळून १० वरून २९ वर - एकूण १९ रन्स. त्यात ३१ व्या ओव्हरीत धोनीचा (अवघड) कॅच सुटला होता.
अरे चिमण, हे आकडे बघ.
४० वे षटक संपले तेव्हा भारत ४ बाद १७८ आणि ४५ वे षटक संपले तेव्हा भारत ६ बाद १९१. त्या ५ षटकातल्या ३० चेंडूतले धोनीने १५ चेंडू खेळून ५ धावा केल्या, जडेजाने १० चेंडूत ३ धावा व अश्विनने ५ चेंडूत ४ धावा केल्या. आवश्यक धावगती ६ पेक्षा कमी असताना शेवटच्या २ षटकांसाठी आवश्यक धावगती १२ झाली होती. सोपी मॅच उगाचच अवघड करून टाकली. २ षटकात २४ धावा करणे अवघड आहेच. धोनीने जबरदस्त प्रयत्न केला पन मागच्या सामन्यात क्लिंट मॅकायने आणि या सामन्यात मॅथ्यूजने देखील विजयाला हातभार लावला.
शेवटच्या १० ओव्हरीत ५९ धावा
शेवटच्या १० ओव्हरीत ५९ धावा करणं गंभीर असला असता तरी अवघडच होतं >>
चिमण अरे ६ चा रनरेट शेवटच्या दहा ओव्हरीत सामन्य म्हणून गणला जातो. ८ च्या रनरेटने देखील धावा काढून अनेकांनी सामने जिंकले आहेत. अगदी भारताने देखील. ६ चा रनरेटही अवघड झाला तर मग आपन (जगज्जेते) अन झिम्बाँब्वे वा नेदरलँडस मध्ये काय फरक?
जडेजाला कशासाठी घ्यायचे? तो
जडेजाला कशासाठी घ्यायचे? तो नक्की काय करतो. (चांगल्या फिल्डींग शिवाय) १० ओव्हर्स मध्ये ४५-४८ धावा कधी कधी जास्तच अन बॅटींग शून्यच. इरफानला त्याच्या आधी पाठवायला हवे होते. >>इरफानला एव्हढे खाली का ठेवला ते कळली नाहि खरे. जडेजा देशात जेव्हढा सरस ठरला होता तेव्हढा प्रभावी वाटत नाहि हे खरे पण त्याच्या fielding ला पर्याय नाहि.
ण त्याच्या fielding ला पर्याय
ण त्याच्या fielding ला पर्याय नाहि. >>
त्याला अष्टपैलू म्हणून घेतले पण त्याच्यात पाटा पिच सोडल्यातर अष्टपैलूत्व नाही. 
अरे नवीन खेळाडू सर्वच चांगले फिल्डर्स आहेत. रैना, विराट अगदी रोहित शर्मा पण. आता असे आहे की फिल्डींग चांगली असणे जरूरी झाले आहे. त्यामुळे त्याला पर्याय असणारे चांगले फिल्डर्स उपलब्ध आहे. केवळ फिल्डीग ह पर्याय ठेवला तर कैफुला पण घ्या की राव.
>> ८ च्या रनरेटने देखील धावा
>> ८ च्या रनरेटने देखील धावा काढून अनेकांनी सामने जिंकले आहेत
बरोबर आहे, पण पीच आणि बॉलिंगची क्वालिटी पण असते ना? आपल्या इथल्या खेळपट्ट्यांवर शेवटच्या १० ओव्हरीत १०० पण निघतात. पीच जर फलंदाजीला योग्य असतं तर आपल्या फारशा विकेटी पडलेल्या नसताना (३१ ते ४० ओव्हर्स मधे) जास्त धावा झाल्या नसत्या का?
Pages