भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३५ षटकात ऑसीज १७६-४.
माईक हसी जाईपर्यंत बरं चाललं होतं आपलं; अब डेव्हिड हसी क्यूं हंसी उडा रहा है अपनी ? २५०च्या आंत ऑसीजना रोखणं अत्यावश्यक . कुणास ठाऊक, माबोकरांचा इथला नैतिक पाठींबाही ही जादू घडवूं शकेल !!!!

(आज ईधर) ईतना सन्नाटा क्यू है भाई..? Happy

आजच्या सामन्याचा आपला धावफलक (कोण आधी तंबूकडे परत धावतो अशी रेस लागली होती) बघता रोटेशन पॉलिसी अंतर्गत पुढील सामन्यात अश्विन व पठाण ला सलामीला पाठवावे असे सुचवायचे होते.
अगदीच कंटाळलेले दिसतेय पब्लिक ऑसी मध्ये अधिक खेळायला.. आयपिल चे डोहाळे लागले असतील एव्हाना सर्वांना. (चियर, बियर, करियर सर्व काही तिथेच तर आहे!).

रच्याकने: या आयपिल हंगामात सचिन खेळणार आहे का मुंबई ईंडीयन्स टीम मधून..? टीकाकारांसाठी आगीत तेल Happy

परवा भारताने दुसर्‍या ट-२० सामन्यात आपला जो खेळ उंचावला होता, तो त्याच दिवशी होणार्‍या आयपीएल च्या लिलावावर नजर ठेवूनच उंचावला होता, असे कुशंका घेणार्‍यांचा निषेध! >>>

कोठे आहेत मास्तुरे ? Proud

अजिबात लाज वाटायचं कारण नाही. भारत खराब कामगिरीमुळे हरलेला नसून सर्व सामने फिक्स झाल्यामुळे हरलेला आहे. इथले एक मान्यवर जेम्स बाँड 'हे सर्व सामने फिक्स होते' हे लवकरच सिद्ध करतील.

चला घरी मॅच संपली हारले परत.......आता घरी या परत
अहो असे कसे? अजून मस्तुरे यांनी सांगितलेली 'शक्यता तिसरी' आहे की. श्रीलंकेविरुद्ध बोनस गुण जिंकायचे.

माबोकरांचा इथला नैतिक पाठींबाही ही जादू घडवूं शकेल !!!!
मलाहि तसेच वाटले होते. मी रात्रभर जागून सामना पहाणार होतो, पण ती शिंची नैतिकता कुठून आणायची हो या अमेरिकेत? जाउ द्या झाले. आता 'शक्यता तिसरी!'

आता पराभवाचे खापर फोडायला वरिष्ठ खेळाडूही नाहीयेत संघात Sad
बहुतेक डंकन महाराजांचे स्थान धोक्यात येणार..... बिलकुल प्रभाव दिसला नाही या माणसाचा!

मास्तुरेंना आता सहनशक्तीरत्न द्या ...........
आणि जर खरंच 'शक्यता तिसरी' खरी झाली तर आपण, ' दुर्दम्य आत्मविश्वास, मराठी बाणा' 'विजिगुषी वृत्ती, 'नेव्हर से नेव्हर' ,'डाऊन पण नॉट आउट', सच्चा भारतीय, असे शब्द वापरून त्यांची आरती करू!

भारत खराब कामगिरीमुळे हरलेला नसून सर्व सामने फिक्स झाल्यामुळे हरलेला आहे. इथले एक मान्यवर जेम्स बाँड 'हे सर्व सामने फिक्स होते' हे लवकरच सिद्ध करतील.>>> चला मास्तुरेंना पटले एकदाचे कि सामने फिक्स होतात.

चला मास्तुरेंना पटले एकदाचे कि सामने फिक्स होतात.
माझा अंदाज असा आहे की, त्यांनी तसे एकदाचे लिहून टाकले, म्हणजे 'फिक्सिंग, फिक्सिंग' ओरडणारे लोक गप्प बसतील, नि मग परत खेळाबद्दल लिहीता येईल.
अर्थात असे ओरडणार्‍यांची अक्कल लक्षात घेता, त्याचा कितपत उपयोग होईल याबद्दल शंकाच आहे.

घाबरू नका. अजूनही खूप संधी आहे. मंगळवारची मॅच आपण अशी फिक्स करू या की त्यात भारत बोनस गुणासह श्रीलंकेला हरवेल आणि नंतर शुक्रवारची मॅच आपण ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिक्स करूया म्हणजे भारत अंतिम फेरीत. एकदा भारत अंतिम फेरीत गेला की अंतिम फेरीतल्या मॅचेस फिक्स करणं म्हणजे निव्वळ पोरखेळ!

>>> माझा अंदाज असा आहे की, त्यांनी तसे एकदाचे लिहून टाकले, म्हणजे 'फिक्सिंग, फिक्सिंग' ओरडणारे लोक गप्प बसतील, नि मग परत खेळाबद्दल लिहीता येईल. अर्थात असे ओरडणार्‍यांची अक्कल लक्षात घेता, त्याचा कितपत उपयोग होईल याबद्दल शंकाच आहे.

अहो झक्की, या मॅचेस खरंच फिक्स केलेल्या होत्या. मागच्या वर्षीच्या वर्ल्डकपमधल्या तर जवळपास सर्व मॅचेस फिक्स केलेल्या होत्या. नाहीतर भारत कसा जिंकला असता?

भारतीय क्रिकेटचं ' दोषारोप' पर्व आतां सुरूं झालंय, नेहमीप्रमाणे ! धोनीने फलंदाजांना सर्व 'श्रेय' दिलंय, टिकाकार धोनीला सर्वस्वी दोष देतायत; 'आमूलाग्र बदल', 'ज्येष्ठाना डच्चू', 'संघात धुसपूस' वगैरे, वगैरेची धूळ उडतेच आहे. पण, या सर्वात, याच दौर्‍यावर एका दर्जेदार संघाची खरंच इतकी वाईट कामगिरी इतक्या नियमितपणे व्हावी याचं अचूक विश्लेषण ऐकायला कधीं मिळेल का ? " अति क्रिकेट" - खेळाडूंसाठी, मिडीयासाठी व प्रेक्षकांसाठी - हा आवाज माझ्या कानात सतत कां घुमतोय तें कळत नाही.

उद्या एक मॅच अजून शिल्लक आहे. त्यात काही चमत्कार झाला तर आपण फायनल मधे नाहीतर घरी.

आता आशिया कप चे सिलेक्शन आहे. त्या संघात फारसे बदल करू नयेत असे मला वाटते. ऑस्ट्रेलियात अपयशी ठरलेले बहुतेक खेळाडू आता बांगलादेशात बरोबर खेळतील.

लोकसत्तामधे "सातत्याने अपयशी ठरलेल्या सचिनला वगळतील की काय" असे लिहीलेले आहे. सचिनला वगळून तेथे कोण दुसरा दिव्य खेळाडू खेळणार आहे? सचिनला फक्त एकच सांगायची गरज आहे की तू वन डेत खेळणार की नाही हे मुख्य ठरव.

उलट त्याने आशिया कप खेळावा. एकदा १०० वे शतक झाले की अजून एक दोन वर्षे तो सहज खेळेल असे वाटते. तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या गांगुलीची जागा अजून कोणीही "पाच नं ला फिक्स" म्हणता येइल असा खेळाडू भरून काढू शकलेला नाही, आणि बाकीच्यांना वगळायला निघालेत Happy

" अति क्रिकेट" - खेळाडूंसाठी, मिडीयासाठी व प्रेक्षकांसाठी
अगदी बरोबर! तरी पण लक्ष वळतेच बरेचदा सामन्यांकडे, क्रिकेटबद्दल कुठे काही लिहीले असेल, त्याकडे.
संस्कारच असे, की कितीहि निधर्मीपणाचा आव आणला, दे॑व वगैरे काही नाही, असे म्हंटले तरी, तरी देवाची मूर्ति दिसली की आपोआप हात जुळू पहातात, मनात कुठे तरी चुकचुकते, तसेच क्रिकेटचे.

तरी पण लक्ष वळतेच बरेचदा सामन्यांकडे, क्रिकेटबद्दल कुठे काही लिहीले असेल, त्याकडे.
संस्कारच असे, की कितीहि निधर्मीपणाचा आव आणला, दे॑व वगैरे काही नाही, असे म्हंटले तरी, तरी देवाची मूर्ति दिसली की आपोआप हात जुळू पहातात, मनात कुठे तरी चुकचुकते, तसेच क्रिकेटचे.
>>

वॉव झक्की, थोडक्यात तुम्ही फार काही सांगून गेलात.

धोणीला म्हणे बोनस पाँईट असतो हेच मुळी माहित नव्हते. धन्य तो कॅप्टन अन धन्य तो सपोर्ट स्टाफ.
http://www.espncricinfo.com/commonwealth-bank-series-2012/content/story/...

अर्थात असे ओरडणार्‍यांची अक्कल लक्षात घेता, त्याचा कितपत उपयोग होईल याबद्दल शंकाच आहे.>>>

झक्की, क्रिकेटवर आत्तापर्यत भारताचा किती वेळ आणी पैसा गेला तो एकत्र करा. म्हणजे कोणाला किती अक्कल आहे ते समजेल. भारताचा क्रुषीमंत्री शेतकरी मरत आहेत ते सोडुन आयपील कशी यशस्वी होइल यात डोके घालतो आणी भारतीय त्या क्रिकेटला डोक्यावर घेउन नाचतात.

>>> तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या गांगुलीची जागा अजून कोणीही "पाच नं ला फिक्स" म्हणता येइल असा खेळाडू भरून काढू शकलेला नाही, आणि बाकीच्यांना वगळायला निघालेत

सहमत! सचिन, द्रविड आणि लक्ष्मण या तिघांनाही एकदम वगळणे फारसे योग्य ठरणार नाही.

एक प्रयोग म्हणून आशिया कपसाठी कोहलीला कप्तान करून संपूर्ण नवीन संघ पाठवावा. सचिन, सेहवाग, गंभीर, रैना, धोनी व झहीर यांना अजिबात पाठवू नये. त्याऐवजी कोहली, रहाणे, रोहीत शर्मा, जडेजा, अश्विन, प्रवीणकुमार, विनयकुमार, उमेश यादव, एरॉन वरूण, सौरभ तिवारी, मनोज तिवारी, इरफान पठाण, राहुल शर्मा, पार्थिव पटेल इ. खेळाडूंना संघात घ्यावे. असा संघ जास्तीत जास्त किती वाईट कामगिरी करेल? हा संघ बांगलादेशला नक्की हरवेल. कदाचित तीनही सामने हरतील. त्यापेक्षा जास्त वाईट होणार नाही. पण नवोदितांना संधी तर मिळेल.

त्याऐवजी कोहली, रहाणे, रोहीत शर्मा, जडेजा, अश्विन, प्रवीणकुमार, विनयकुमार, उमेश यादव, एरॉन वरूण, सौरभ तिवारी, मनोज तिवारी, इरफान पठाण, राहुल शर्मा, पार्थिव पटेल इ. खेळाडूंना संघात घ्यावे.>>विनयकुमार, वरूण हे injured आहेत. पठाण त्या रांगेत आहे कि नाहि माहित नाहि.

आपण फायनलला जाऊ नये असे मनापासून वाटते. उगदीच टुकार खेळतोय.

मास्तुरे,
नविन खेळाडूंना संधि देणे, ज्येष्ठ खेळाडू निवृत्त होइस्तवर नविन खेळाडूंना तयार करणे या दृष्टीने तुमची सूचना बरोबर वाटते, म्हणजे जखमी खेळाडू वगळून.
पण जे कुणि हे आशिया कप सामने स्पॉन्सॉर केले आहेत, त्यांना त्यांच्या पैशाची वसुली पाहिजे असेल, नि वर नफा पण, तर असेच खेळाडू असायला पाहिजेत ज्यांना बघायला पैसे देऊन लोक येतील. भारतातले लोक जरा जास्तच व्यक्तिपूजक आहेत, सचिन, धोणी, सेहवाग पाहिजेतच!! मग ते कसेहि खेळोत, कुणिहि जिंको. लोक त्यांना बघायला जाणार.
नेहेरूंचा वंश निर्वंश होइस्तवर त्यांच्याच वंशातले लोक पंतप्रधान होणार!! तसेच सचिन, सेहवाग, धोणी स्वतःहून निवृत्त होइस्तवर त्यांना नेहेमीच संघात घेतील. सामना कुणि का जिंकेना, दिवसाच्या अखेरीस गल्ला किती जमला हे महत्वाचे!

<< जास्तच व्यक्तिपूजक आहेत, सचिन, धोणी, सेहवाग पाहिजेतच!! मग ते कसेहि खेळोत, कुणिहि जिंको. लोक त्यांना बघायला जाणार. >> झक्कीजी, यात बरंचसं तथ्य असलं तरीही एक मूलभूत मुद्दा यातून उपस्थित होतोच- प्रेक्षक सामने बघायला जातात [ किंवा त्यानी जावं ] ते फक्त आपण जिंकणार म्हणूनच का ? मला वाटतं व्यक्तीपूजेपेक्षां सचिन, सेहवाग हे आकर्षक खेळ करतात म्हणून मुख्यतः तो आनंद लुटायला लोक जात असावेत; शेन वॉर्नलाही गोलंदाजी करताना पहायला लोक गर्दी करायचेच ना !

एक छोटसं उदाहरण - हॉकीमधे नवीन नियम आले व त्या खेळातली नजाकतच निघून जाऊ लागली होती. त्यावेळीही हॉकीत वलय असणारे खेळाडू असूनही प्रेक्षकानी त्या खेळाकडे पाठ फिरवली. अन, अचानक "लखनौ हॉस्टेल्स"या संघाबद्द्ल चर्चा व्हायला लागली. शर्मा या जुन्या ऑलिम्पियनने लखनौमधील शाळा-कॉलेजातील मुलं निवडून त्याना आपल्या जुन्या, शैलीदार खेळाचे धडे, डांवपेच शिकवले व त्यांच्याकडून ते घोटून घेतले. जेंव्हा त्याने हा संघ खुल्या सामन्यांत उतरवला तेंव्हा जादू घडावी तसे प्रेक्षक मैदानांवर गर्दी करूं लागले. कारण लाँग पासिंगच्या रटाळ खेळापेक्षां त्याना खेळाची ही जुनी जादुई शैली मोहित करत होती. तात्पर्य - लोक केवळ जिंकणं बघायलाच [ किंवा केवळ तंत्रशुद्ध, चिवट खेळ पहायला ] नाही तर आकर्षक व आनंददायक खेळही पहायला गर्दी करतात. << सचिन, सेहवाग... कसेही खेळोत, कुणीही जिंको, लोक त्याना पहायला जाणार >> याच्यामागे व्यक्तीपूजेपेक्षां आकर्षक खेळ करण्याची कुवत त्यांच्यात आहे ही जाणीव अधिक असावी.

असो, माझाही इथला खेळ रटाळ व्हायला लागलाय ! Wink

भाऊ, अजिबात रटाळ नाही, उलट चांगली माहिती मिळाली. अजून तुम्हाला त्या लखनौ हॉस्टेल्स बद्दल माहीत असेल तर जरूर लिहा.

तरी पण लक्ष वळतेच बरेचदा सामन्यांकडे, क्रिकेटबद्दल कुठे काही लिहीले असेल, त्याकडे.>>> हे सही आहे Happy

<< अजून तुम्हाला त्या लखनौ हॉस्टेल्स बद्दल माहीत असेल तर जरूर लिहा. >> आपण आपल्या मूळ शैलीशी प्रामाणिक राहूनच त्यात योग्य ते बदल केले तर आपण तो खेळ अधिक उत्तमरित्या खेळूं शकतो, हा मुद्दा सिद्ध करण्याकरताच शर्मा यानी हा संघ उभा केला होता. And he proved his point !
"लखनौ हॉस्टेल्स"ने तीन-चार खेळाडू राष्ट्रीय संघाला दिले; त्याच संघातला शैलीदार खेळाडू शहीद हा
राष्ट्रीय संघाचा कप्तान पण झाला.

असो. भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पठाण ऐवजी झहीर हा एकच बदल आहे दोन्ही संघांत.
आज चमत्कार घडावा म्हणून देवाला नमस्कार ! Wink

कसले बकवास खेळत आहेत. आपण जिंकू नये!

हे अश्विन, जडेजा आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाहीत. त्यांना काढून योग्य त्या लोकांना संधी द्यायला पाहिजे. अश्विन चेन्नई मध्येच बॉल फिरवू शकतो. अन्यथा कुठेही त्याची गोलंदाजी भेदक वगैरे वाटली नाही. जडेजाला तर काहीच येत नाही. देशातच तो बरा. आयपिल स्पेशालिस्ट म्हणून जडेजा, अश्विन ह्यांनी करियर करावे, भरपूर पैसे आहेत.

Just in case India's batsmen had hopes of winning with a bonus point, the bowlers are ensuring such dreams will die a quick death. - Espncricinfo.
अरेरे! Sad

आता तेंडुलकरचे शतक होईल, बीसीसीआय ४ बाद २९५, ४५ ओव्हर्स, मग धोणी ४९ ओव्हर्स होईस्तवर धीमेपणे खेळून ३०४ पर्यंत नेईल. त्याचे म्हणणे, बाद न होणे हे महत्वाचे, धावा निघतात. मग शेवटच्या ओव्हरमधे १७ ऐवजी १५ होतील नि बिसीसिआय हरेल. पण तेंडूलकरच्या शंभराव्या शतकापुढे इतर काहीच महत्वाचे नाही!

नि आता आय पी एल!!!

Pages