भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
Kedar last time I checked
Kedar last time I checked Dhoni was wicket keeper first.
तू त्याच्या जागी पटेल सुचवतोयस, त्याच्या नि धोनीच्या किपींगची तुलना करुन बघतोस आधी ? पाकिस्तानच्या मागच्या दौर्यामधे कम्रान अकमलने ढीगभर कॅचेस सोडले तेंव्हा चॅपेल म्हणाला होता "If his batting was as good as Don Bradman's, he couldn't score enough runs to make up for what he costs them with his keeping "
I think its better to find at least equal replacement for keeper to replace Dhoni before we start looking at his batting.
नाही. धोणी द किपर बद्द्ल वाद
नाही. धोणी द किपर बद्द्ल वाद नाहीयेच मुळी.
धोणी द टेस्ट कॅप्टन आणि धोणी द बॅटसमन. आता आपण केवळ किपर एके किपर नाही रे घेऊ शकत. बॅटसमनची जोड पाहिजे. द्रविडला विसरलास का?
द्रविडला विसरलास का?>>मला
द्रविडला विसरलास का?>>मला द्रविड कीपर म्हणून पटला नव्हता नि त्यालाही ते पटले नव्हते.
मुद्दा हा आहे कि त्याच्या तीन रोलमधे एकामधे तो उजवा आहे,दुसर्यामधे तो ओके आहे, तिसर्यामधे तो अवे टेस्ट्मधे फारसा खेळत नाहि. ह्या तिन्ही रोल्स्मधे पहिले दोन तिसर्यापेक्षा अधिक मह्त्वाचे आहेत तर तिसर्याच्या जोरावर निर्णय घेणे किती सयुक्तिक आहे ? पटेलपासून कार्थिकपर्यंत एकही जण as a batsman किंवा as a keeper म्हणून धोनीच्या आजूबाजूला तरी फिरकतोय का ? कार्थिक सुरूवातीला छान किपीं करत असे मग त्याचा पटेल झाला. पटेल सुरूवातीला काही gusty innings खेळला होता पण तो सदैवच कामरन अक्मल syndrome ने त्रस्त असतो.
परत घसरले का धोनीवर? मुळात
परत घसरले का धोनीवर? मुळात टीम वाजत नाहीये आणि कॅप्टनवर घसरताहेत. बॅट्समनांना ३०० वर धावा करता येत नाहीत आणि बॉलरांच्यात २० विकेटी काढायची कुवत नाही. ही टीम ठेवून धोनी ऐवजी स्टीव वॉ किंवा अजून कितीही गाजलेल्या माणसाला कॅप्टन केला तरी काय फरक पडणार आहे?
परत घसरले का धोनीवर? >> आधी
परत घसरले का धोनीवर? >>
आधी कधी घसरलो कोणावर? काहीही! आणि डेटा दिला आहे. शिवाय वनडे आणि टि २० मध्ये तो अतिशय चांगला कॅप्टन आहे हे मान्य केले आहे की.
ट्समनांना ३०० वर धावा करता येत नाहीत >> तेच तर मी म्हणत आहे. बॅटींग चांगली हवी.
ही टीम ठेवून धोनी ऐवजी स्टीव वॉ किंवा अजून कितीही गाजलेल्या माणसाला कॅप्टन केला तरी काय फरक पडणार आहे? >>> कॅप्टन टीम मध्ये फरक घडवतो हे मान्य नसले तर चर्चा व्यर्थ आहे. पण धोणीने (आणि आधी गांगुलीने) आपल्या टीमला सकारात्मक दॄष्टिकोणातून वर आणले आहे. हे मी आधीही अनेकदा लिहिले आहे. कॅप्टन प्लेज अ रोल. उदा मागच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात कुंबळेची टेस्ट. किंवा धोणीचे अनेक वनडेज.
ह्या अन इंग्लंडच्या अन विंडीजच्या देखील सिरीज मध्ये आपली देहबोली कधीतरी चांगली होती (एखादे सेशन) बाकी खांदे गाळूनच. मोटिव्हेशन देण्याचे काम कॅप्टनला सतत करावे लागते असा माझा समज आहे.
>> आधी कधी घसरलो
>> आधी कधी घसरलो कोणावर?
वर्ल्ड कपच्या वेळेलाही धोनीवर लोक घसरले होते. त्याने शेवटच्या मॅचमधे चांगली खेळी केल्यावर मग गप्प बसले.
>> कॅप्टन टीम मध्ये फरक घडवतो हे मान्य नसले तर चर्चा व्यर्थ आहे.
हे मला मान्य आहे पण कधी? जर टीम मुळात एका लेव्हलला खेळत असेल तर! फक्त रणजी खेळलेले लोक चांगल्या कॅप्टनला देऊन जिंकतील का? नाही. आत्ता तसं झालं आहे.. लोकं रणजीच्या लेव्हलचं खेळताहेत.
धोनीचं कप्तानपद - मला
धोनीचं कप्तानपद - मला प्रामाणिकपणे वाटतं कीं मैदानावर जरी कांही निर्णय कप्तान घेत असला तरी सर्व साधारण डांवपेंच हे प्रशिक्षक, ज्येष्ठ खेळाडू इ.च्या विचारविनीमयाने आधीच ठरवले जातात. गुणवत्ता व कामगिरी यांच्या जोरावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवलेल्या खेळाडूंच्या कामगिरीत किंवा खेळाच्या डांवपेचांत कप्तानामुळे आमूलाग्र फरक पडणं अगदींच अपवादात्मक असावं. त्यामुळे, मैदानावर कप्तानाकडून मुख्यतः खेळाडूंना प्रेरणा देणं हेंच अपेक्षित असावं; म्हणूनच, मी मागेही म्हटल्याप्रमाणे, धोनी हा कप्तान म्हणून सर्वाना मनापासून स्विकारार्ह आहे [निदान तसं सचिनपासून जवळजवळ सर्वानीच खुलेपणाने म्हटलं आहे ] हेंच त्याला कप्तान म्हणून ठेवण्यास पुरेसं व ठाम समर्थन आहे. यष्टीरक्षक म्हणून जर तो संघात प्रवेश मिळवूं शकत नसेल, तरच दुसरा कुणी त्या जागीं नेमावा का हा प्रश्न उपस्थित होतो. माझ्या व्यक्तीगत मतानुसार, सध्यातरी यष्टीरक्षक व दर्जेदार नसला तरीही उपयुक्त फलंदाज म्हणून त्याचं संघातलं स्थान वादातीत आहे [ कसोटीतही].
मघासचे माझे पोस्ट अर्धवट
मघासचे माझे पोस्ट अर्धवट राहिले, देशातल्या टिमशी conference call होता ते विसरून गेलो
असो, तर
मुद्दा हा आहे कि त्याच्या तीन रोलमधे एकामधे तो उजवा आहे,दुसर्यामधे तो ओके आहे, तिसर्यामधे तो अवे टेस्ट्मधे फारसा खेळत नाहि. ह्या तिन्ही रोल्स्मधे पहिले दोन तिसर्यापेक्षा अधिक मह्त्वाचे आहेत तर तिसर्याच्या जोरावर निर्णय घेणे किती सयुक्तिक आहे ? पटेलपासून कार्थिकपर्यंत एकही जण as a batsman किंवा as a keeper म्हणून धोनीच्या आजूबाजूला तरी फिरकतोय का ? कार्थिक सुरूवातीला छान किपीं करत असे मग त्याचा पटेल झाला. पटेल सुरूवातीला काही gusty innings खेळला होता पण तो सदैवच कामरन अक्मल syndrome ने त्रस्त असतो. आता दुसर्या रोलविषयी, बहुतेक जणांचा आक्षेप त्याच्या away captaincy ला आहे. देशात तो सहजच जिंकत आलाय. देशातील कामगिरीबद्दलश्शंका असणार्यांना मस्तुरे लवकरच stats काढून देतील :). आता away tests चा भाग तर त्यात खर बघता Eng नि Aus चा अर्धा दौरा एव्हढेच आहे. पुढची दोन वर्ष आपण जवळजवळ sub continental condition मधे खेळणार आहोत जिथे धोनीबद्दल प्रश्न नाहि. सध्या फक्त कप्तान बदलून फरक पडेल असे सध्या तरी वाटत नाहि. ह्याउलट जो कोणी येईल तो change of fortune साठी अधिक pressure खाली येईल. Considering how tolerant we are for failures, it may not be right time for flip. मैदानावर motivate करायचा भाग तर मला वाटते crick info commentary मधे मी धोनी उत्साही वाटतोय असे comments वाचलेले. मी बघितले नसल्यामूळे अधिक बोलत नाहि. डावपेच किंवा spin vs fast balling preference हा instincts एव्हढाच शिकण्याचा भाग आहे. Its infair to expect two people to have same instincts. आणी त्या दर वेळी बरोबर ठरतीलच असे नाहि. उलटपक्षी धोनीचा record बघता त्याचा home record जमेस धरता he has not done that bad असे म्हणायला हरकत नाहि. गेल्या दहा वर्षांमधले captain बाजूला ठेवा नि away series defeats हा कधी आपल्या क्रिकेटचा अविभाज्य भाग नव्हता ते सांगा
धोनीचे मुख्य शक्तीस्थान his ability absorb pressure and treat game as game. भारतासारख्या क्रिकेटला अवाजवी महत्व देणार्या देशात ह्याहून अधिक captaincy criteria नसावा.
देशातल्या टिमशी conference
देशातल्या टिमशी conference call होता>>> असाम्या मी "देशाच्या टिमशी..." वाचले
असाम्या मी "देशाच्या
असाम्या मी "देशाच्या टिमशी..." वाचले >>
<< असाम्या मी "देशाच्या
<< असाम्या मी "देशाच्या टिमशी..." वाचले >> देशाच्या टिमशी conference call ? कसं शक्य आहे ? गावस्कर म्हणतो कीं पहिली हरलेली कसोटी व दुसरी कसोटी [ जी नंतर हरलो ] या दरम्यान अजिबात सराव न करता ' देशाची टिम' ख्रिसमस साजरी करत होती !!! 'नेट'वरच येत नाहीत ते conference call वर थोडेच येणार आहेत ?
दरम्यान अजिबात सराव न करता >>
दरम्यान अजिबात सराव न करता >> धोणी म्हणतो की अति क्रिकेट झाले आहे. त्यामुळे सराव नको. पेक्षा गो कार्टिंग करू. काल गो कार्ट डे होता. आज बॉलींग नाईट असेल.
धोणीच्या म्हणन्यात तथ्य आहे. पण त्यामुळेच सर्वांनीच तिन्ही मध्ये (टि २०, वनडे, टेस्ट) खेळणे काही गरजेचे नाही. ऑस्ट्रेलियाच्या टीम सारखे करावे.
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/548594.html
>>> >> आधी कधी घसरलो
>>> >> आधी कधी घसरलो कोणावर?
>> वर्ल्ड कपच्या वेळेलाही धोनीवर लोक घसरले होते. त्याने शेवटच्या मॅचमधे चांगली खेळी केल्यावर मग गप्प बसले.
विश्वचषकाच्या ९ पैकी पहिल्या ८ सामन्यात धोनी पूर्ण अपयशी होता. आपण अंतिम फेरीत पोहोचलो ते मुख्यत्वे गंभीर (पहिल्या ८ सामन्यात ३ अर्धशतके), सचिन (पहिल्या ८ सामन्यात २ शतके व २ अर्धशतके), झहीर (पहिल्या ८ सामन्यात एकूण १९ बळी) आणि युवराज (पहिल्या ८ सामन्यात ४ अर्धशतके आणि १२ हून अधिक बळी). अंतिम फेरीत पोहोचण्यामध्ये धोनीचे वाटा अत्यंत किरकोळ होता किंवा जवळपास काहीच नव्हता. शेवटच्या सामन्यात मात्र तो जबरी खेळला. पण त्यामुळे इतरांचे तोंड गप्प झाले नव्हते, तर, आपण विश्वचषक जिंकल्यामुळे धोनीचे अपयश पूर्णपणे झाकले गेले. अंतिम सामना हरलो असतो तर धोनीचा जाहीर पंचनामा झाला असता.
शेवटच्या सामन्यात मात्र तो
शेवटच्या सामन्यात मात्र तो जबरी खेळला. पण त्यामुळे इतरांचे तोंड गप्प झाले नव्हते, तर, आपण विश्वचषक जिंकल्यामुळे धोनीचे अपयश पूर्णपणे झाकले गेले. अंतिम सामना हरलो असतो तर धोनीचा जाहीर पंचनामा झाला असता.>> He was waiting for the right moment
२००३ मधे सचिन नि गंग्याने ६ शतके मारली नि अंतिम फेरीमधे लवकर आऊट झाले. ह्याउलट पाँटींग फक्त तेंव्हा खेळला. नाव कोणाचे आठवते तुम्हाला ? 
त्याच लेखावर एक काँमेट
त्याच लेखावर एक काँमेट आहे.
Before you worry about what Aus is doing look at where India is going, right down to the bottom of the test rankings. Imagine what will happen when the grandfathers go, will India be able to make 100 runs in any innings overseas.
सचिन बद्दल मी नेहमी लिहितोच, पण ऑस्ट्रेलियामध्ये (हा टूर) सचिन, द्रविडने इतक्याही धावा नसत्या काढल्या तर खरच १०० च्या आत आपली उर्वरित नवीन रक्ताची टीम गारद. तीच बाब इंग्लंड दौर्यात पूर्ण धावा वजा द्रविडच्या धावा. वेक अप! सिलेक्टर्स वेक अप.
He was waiting for the right moment >> कमॉन असामी. तो बॅडपॅच मध्ये आहे हे का मान्य होत नाही तुला. त्याच्या गोल्डन टच सध्या नाही. इतकं सोपं आहे ते. जसा सचिनचा २००७ मध्ये नव्हता. पण ठरवून ती इनिंग खेळणे असे त्याचा बाबतीत शक्य आहे का? मग टेस्ट मध्ये का खेळत नाही.
त्यामुळे सराव नको.>> अरे सराव
त्यामुळे सराव नको.>> अरे सराव करण्यासाठी १५० च्या वेगाने टाकणारे कोणि नसेल तर उपयोग काय असा विचार केला असेल
सचिन बद्दल मी नेहमी लिहितोच,
सचिन बद्दल मी नेहमी लिहितोच, पण ऑस्ट्रेलियामध्ये (हा टूर) सचिन, द्रविडने इतक्याही धावा नसत्या काढल्या तर खरच १०० च्या आत आपली उर्वरित नवीन रक्ताची टीम गारद. >> मुद्दा मान्य पण हि नवीन रक्ताची टीम कुठे आहे पण ? पहिल्या सात मधे ४ जण दहा वर्षे खेळताहेत, एक जण पाच, एक जण ४ वर्षे
अरे आलेत की आता. यादवराव. अन
अरे आलेत की आता. यादवराव. अन वरूणराव. आपली बॉलिंग लै पथेटिक.
>>> सचिन बद्दल मी नेहमी
>>> सचिन बद्दल मी नेहमी लिहितोच, पण ऑस्ट्रेलियामध्ये (हा टूर) सचिन, द्रविडने इतक्याही धावा नसत्या काढल्या तर खरच १०० च्या आत आपली उर्वरित नवीन रक्ताची टीम गारद. तीच बाब इंग्लंड दौर्यात पूर्ण धावा वजा द्रविडच्या धावा. वेक अप! सिलेक्टर्स वेक अप.
मी आधीच्या एका प्रतिसादात हेच लिहिलं होतं. सचिन आणि द्रविड या वयस्करांशिवाय इतर कोणीही धावा करत नाहीत (यात लक्ष्मणचेही नाव घालायला आवडले असते). पण सारखी ओरड चाललेली असते की या म्हातार्यांना हटवा आणि तरूणांना संधी द्या. युवराज, कोहली, रैना, मुरली विजय, दिनेश कार्तिक, वृद्धिमान साहा इ. तरूणांना पुष्कळ संधी मिळाली. पण ती त्यांना आजतगायत वाया घालविली. अशा वेळी हे दोघे नसतील तर १०० धावा होणे सुद्धा अवघड आहे.
मी आधीच्या एका प्रतिसादात हेच
मी आधीच्या एका प्रतिसादात हेच लिहिलं होतं. सचिन आणि द्रविड या वयस्करांशिवाय इतर कोणीही धावा करत नाहीत (यात लक्ष्मणचेही नाव घालायला आवडले असते). पण सारखी ओरड चाललेली असते की या म्हातार्यांना हटवा आणि तरूणांना संधी द्या. युवराज, कोहली, रैना, मुरली विजय, दिनेश कार्तिक, वृद्धिमान साहा इ. तरूणांना पुष्कळ संधी मिळाली. पण ती त्यांना आजतगायत वाया घालविली. अशा वेळी हे दोघे नसतील तर १०० धावा होणे सुद्धा अवघड आहे.>>बरे मग तुमचे काय म्हणने आहे मग ? हे तिघे retire होइतो हातावर हात ठेवून बसून राहायचे ? लोक बोलतायेत काय नि ह्यांचे काय ! "पण सारखी ओरड चाललेली असते की या म्हातार्यांना हटवा आणि तरूणांना संधी द्या." कुठलाही sensible माणूस असे म्हणत नाहिये. gradual phase out हवे म्हणताहेत.
>>> हे तिघे retire होइतो
>>> हे तिघे retire होइतो हातावर हात ठेवून बसून राहायचे ?
सध्या तरी दुसरा कुठला पर्याय आहे का? असल्यास तो पर्याय लगेच वापरायला सुरूवात करा.
>>अंतिम सामना हरलो असतो तर
>>अंतिम सामना हरलो असतो तर धोनीचा जाहीर पंचनामा झाला असता.
अगदी!
खेरीज धोणी मैदानावर कधी कुणाला प्रेरणा देताना पाहिलेला नाही.. त्याच्या कूल चश्म्यामागून त्याचे डोळे व त्याच्या cool as cuccumber (shastri mode) देहबोली वरून नक्की खेळाडू कशी प्रेरणा घेत असतील हे मला कळत नाही. शिवाय जे लोक त्याच्या बरोबर गेली काही वर्षे खेळत आहेत त्यात जडेजा, कोहली, रैना, यादव, अश्विन ई. सोडले तर ईतर लोक्स धोणी ला प्रेरणा देण्याच्या जास्त लायकीचे आहेत.
जेव्हा तो प्रेरणा द्यायचा तेव्हा ते नविन तरूण t20 संघाचे दिवस होते, धोणीची प्रेरणा त्याच्या हेयर कट बरोबर कायमची उतरली असे वाटते. गांगूली म्हणला, मी नेहेमी मिड ऑफ वा मिड ऑन ला असायचो. त्यामूळे गोलंदाज वा क्षेत्ररक्षक यांना प्रेरणा द्यायला, चार शब्द सांगायला सोपे जात असे. धोणी ला आधी यष्टीरक्षण, मग क्षेत्ररचना या सर्वा नंतर यष्टीमागून कुणालाही प्रेरणा द्यायला विशेष वाव नसतो.
असो. खरे तर ज्या लेव्हल वर हे सर्व लोक आहेत.. प्रेरणेपेक्षा, दुसर्याला चारी मुंड्या चीत करायचे तेही त्यांच्या घरच्या मैदानात अशी ढासू वृत्ती, अंगार, रग आपल्या सद्य संघात दिसत नाही. "ईंटेंसिटी" का काय ते यालाच म्हणतात वाटते. आणि समोर कायम डिवचणारे ऑसीज असल्यावर अशी ढासूगिरी तर तिहल्या मातीवर पाय ठेवल्यावरच अंगात यायला हवी नाही? पण याही दौर्यात हा संघ एक संघ म्हणून खेळताना दिसत नाही. आणि संघ प्रमुख म्हणून याची जबाबदारी कप्तानावरच असते. धोणी महाराज पत्रकार परिषदे मध्ये जितके हूक्स आणि पुल मारतात (ऊडवा ऊडवी) त्याच्या निम्मे मैदानावर मारले तरी बरे होईल.
आयपिल मध्ये "प्रत्त्येक बॉल ला ठोकायला काय घ्याल"? असे विचारायला अंबानी, मल्ल्या, असे अनेक दिग्गज आपली गंगाजळी पसरून यांच्यापूढे ऊभे असतात. कसोटी मध्ये मात्र "ऊभे रहायला काय घ्याल"? असे विचारणारे कुणीही नसल्याने सर्व प्रेरणेचा लोचा झाला आहे. आणि एरवी झोपेतही खेळपट्टीवर ऊभे राहू शकणारा द्रविड बॅट पॅड मध्ये संघाची लाँड्री घालता येईल एव्हडी मोठी गॅप ठेवून खेळायला लागल्यावर अजून वेगळा काय निकाल अपेक्षित आहे?
बाकी ईंग्लंड गेले, ऑसी संपत आले, १०० वे शतक हा क्रीकेटच्या आकडेवारीतील एक आकडाच असेल हे जरा कुणी सचिन साहेबांना समजावून दिले तर आपल्या संघाचे खूप भले होईल! (ईशांत, अश्विन हे ऑसी कडून गोलंदाजी करते असते तर त्रिकूटाने याही दौर्यात अनेक विक्रम केले असते हे निश्चीत!)
>>> ईशांत, अश्विन हे ऑसी कडून
>>> ईशांत, अश्विन हे ऑसी कडून गोलंदाजी करते असते तर त्रिकूटाने याही दौर्यात अनेक विक्रम केले असते हे निश्चीत!
इशांत, अश्विन हे ऑसीजकडून गोलंदाजी करत असते, तर त्यांनी देखील आपला करिअर बेस्ट परफॉर्मन्स भारताविरूद्ध करून दाखविला असता.
<< खेरीज धोणी मैदानावर कधी
<< खेरीज धोणी मैदानावर कधी कुणाला प्रेरणा देताना पाहिलेला नाही.. >> योगजी, मिड-ऑफला स्थितप्रज्ञासारखा शांतपणे उभा राहून पण तीक्ष नजरेने मैदानावरच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असलेला ऑसीजचा महान कप्तान, बॉर्डर, मी पाहिलाय; ओरडून, हातवारे करून प्रेरणा नाही द्यावी लागत. ती कप्तानाची निर्णयक्षमता,नि:स्पृहता, अविचलता इ.विषयीं संघ सहकार्यांच्या मनात असणार्या विश्वासावर आधारलेली असते. आणि तो विश्वास धोनीबद्दल संघाला असावा असं मानण्याला आधार आहे.
<< ...ई. सोडले तर ईतर लोक्स धोणी ला प्रेरणा देण्याच्या जास्त लायकीचे आहेत. >> सचिनने आपण ज्यांच्या कॅप्टन्सीखाली खेळलो त्यात धोनी हा सर्वोत्तम आहे, म्हणायची काय गरज ? धोनीची चमचेगिरी ? नाही, योगजी, ज्येष्ठ, अनुकरणनीय व कसलेला खेळाडू असणं व प्रेरणादायी कप्तान असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत असं मला तरी वाटतं.
<< कुणी सचिन साहेबांना समजावून दिले तर आपल्या संघाचे खूप भले होईल!>> सचिनपेक्षां मुख्यतः माध्यमाना व अतिउत्साही सचिनभक्ताना हें समजावणं अधिक आवश्यक आहे !
सचिनने आपण ज्यांच्या
सचिनने आपण ज्यांच्या कॅप्टन्सीखाली खेळलो त्यात धोनी हा सर्वोत्तम आहे, म्हणायची काय गरज ? >> +१. मला आठवते त्याप्रमाणे धोनी हि सचिन नि कुंबळे ह्यांची शिफारस होती. ह्याच सिरीजच्या सुरूवातीला हसीने पण चेन्नई किंगबद्दल संदर्भ देऊन धोनीची स्तुती केली होती. कुठे तरी काहि तरी असल्याशिवायच असे होइल का ?
सचिनपेक्षां मुख्यतः माध्यमाना व अतिउत्साही सचिनभक्ताना हें समजावणं अधिक आवश्यक आहे ! >> +१
सध्या तरी दुसरा कुठला पर्याय आहे का? असल्यास तो पर्याय लगेच वापरायला सुरूवात करा.>> तुमच्याच पोस्टच्या आधीची पोस्ट जरा नजरेआड घाला बरे
असल्यास तो पर्याय लगेच
असल्यास तो पर्याय लगेच वापरायला सुरूवात करा.
एक पर्याय आहे - कसोटी सामने खेळणे बंद. परदेश दौरे बंद. देशातल्या देशात खेळायचे, परदेशी लोकांना बोलवायचे नि त्यांना यथेच्छ धुवायचे. म्हणजे मग पैसेच पैसेच. हळू हळू इथले सगळे लोकप्रिय खेळ जसे झाले तसे भारतातहि एरवी अंतर्गत व वर्षातून एकदा बाहेरचे खेळाडू घेऊन आय पी एल करायचे. त्यामुळे अनेक नवीन खेळाडूंना संधि मिळेल, पैसेपण करता येतील!! आणि खेळ सुधारेलच हो. इथे नाही का फुटबॉलच्या नि बेसबॉलच्या तीसेक टीम्स असल्याने खेळाचा दर्जा सुधारला!
मी सचिनभक्त वगैरे आहे पण
मी सचिनभक्त वगैरे आहे पण त्यापेक्षा जास्त क्रिकेटभक्त आहे. सचिनला तो आज चुकला म्हणायला, जीभ कचरत नाही.
)
ते असो. आज टिओआयला परत धोणी वि वीरू टीम मध्ये चालू झाले आहे व वरिष्ठ खेळाडुंचे धोणी काहीच ऐकत नाही असे त्यांचे म्हणने आहे असे लिहून आले,तर संपादकिय पानावर मी इथे लिहिल्यासारखे तो टेस्ट कप्तान म्हणून अयोग्य आहे अश्या आशयाचा एक लेख आहे. ( तो मी लिहिला नाही.
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournaments/ind...
नी हि सचिन नि कुंबळे ह्यांची
नी हि सचिन नि कुंबळे ह्यांची शिफारस होती. ह्याच सिरीजच्या सुरूवातीला हसीने पण चेन्नई किंगबद्दल संदर्भ देऊन धोनीची स्तुती केली होती. कुठे तरी काहि तरी असल्याशिवायच असे होइल का >>> हो सचिनने रेकमंड केले होते त्याला. तो वनडेत अन टि २० मध्ये बेस्ट कॅप्टन आहे. पण जिथे उभे राहून दुसर्यापक्षाच्या २० विकेट काढायच्या तिथे तो कमी पडतो असे वाटते. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण समय!
धोणी संघाला प्रेरणा देत नाही
धोणी संघाला प्रेरणा देत नाही हे विधान थोडे धाड्साचे आहेच. कारण टीव्हीवर मॅच बघताना मधल्या जाहिरातीमुळे असे क्षण दिसत नाहीत. लाईव्ह मॅच बघताना मात्र संघातल्या सर्व खेळाडूचे आपापसातील बोलणे दिसत असते.
धोणीचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे तो अत्यंत शान्त आणि संयम ठेवणारा खेळाडू आहे, अॅज अ कॅप्टन तो स्वत: अग्रेसिव्ह न होता इतराना मोटिव्हेट करू शकतो.
धोणी संघाला प्रेरणा देत नाही
धोणी संघाला प्रेरणा देत नाही हे विधान थोडे धाड्साचे आहेच. >> मी नाही. आपलेच खेळाडु सुद्धा म्हणत आहेत. आजचा पेपरही वाच.
हे सर्व टेस्ट बद्दल चालू आहे.
Pages