निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या सिटाउटमधे बर्‍याच हँगिंग कुंड्या आहेत. त्यातल्या फर्नच्या लोंबत्या फांद्यांवर मधमाश्यांनी पोळं केलं आहे. त्यांनी इतक्या हक्काने ते केलंय त्यामुळे अजून तरी मी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला नाही.

DSCN0944.JPGDSCN0945.JPGDSCN0946.JPGDSCN0948.JPG

आणि ही ती फर्नची कुंडी..........याच्या उजव्या बाजूच्या लोंबत्या फांदीवर पोळं आहे. आत्ता दिसत नाहीये, कारण छोटं आहे. मॅक्रो वापरलंय.

DSCN0949.JPG

कुणाला ह्या फुलांदिषयी जास्त माहिती आहे का? माझ्या नवरोबांचा ३ सप्टेंबरला वाढदिवस होता. त्यावेळी त्यांना हा बुके प्रेझेंट मिळाला. ही फुले अजूनही छान फ्रेश आहेत.
DSCN3246_0.JPG

हा हेलिकेनियाचाच प्रकार आहे ना ?

मानुषी कमळ छानच. अग तो माश्यांच्या पोळ्याचा फोटो गणेशउत्सवातल्या प्रकाशचित्राच्या १ नंबरच्या खेळावर टाक ना.

सगळ्यांचेच अभिनंदन.

काय मस्त गप्पा रंगल्या आहेत! सर्व निसर्ग प्रेमींना माझ्या तर्फे गणेशोत्सवाच्या (चांगलाच उशीर झालाय खरंतर शुभेच्छा द्यायला, पण अजून एक दिवस आहे!) हार्दिक शुभेच्छा.
उद्या रविवारी निवांत माझ्या मिसलेल्या गप्पा वाचीन.सर्वांना मी खूप मिस केलं.......

शांकली अग कसला उशिल माझा गणेशोत्सवातला साखरचौतीचा गणपती हा लेख वाच. आमच्याकडे अजुन यायचा आहे.

जागू, कुठल्याही नर्सरीमधे ऑर्किड्स मिळतील. ठाणा,(य़ेऊर) पनवेल (कर्नाळा) जवळच्या
जंगलात पण खुप आढळतील. पण नेमक्या वेळी तिथे आपण असायला पाहिजे.
सिंगापूरला मोठे गार्डन आहे, तिथे नवनव्या जाती विकसित करतात.
इंदिरा गांधी, बेनेझीर भुत्तो, मार्गारेट थॅचर, जपानची राजकन्या यांच्या नावे
विकसित केलेल्या जाती मी बघितल्या आहेत.

दिनेशदा पण अजुन मी कुठल्या नर्सरीत नाही पाहिलय इथे ऑर्किड. आता परत नजर ऑर्किडवर ठेउन बघेन. नाहीतर मला सारीका देणारच आहे.

दिनेशदा सारीकाकडे पण वेगवेगळी झाडे आहेत जी मी कधी पाहीली नव्हती ऐकली नव्हती.

धावा हो धावा....

काल दुपारी सहज कढिपत्त्याची विपु करायला गेले तर झाडाच्या वरच्या अर्ध्याभागाची पानं खाल्लेली Sad एका कॉम्प्लेक्स पानावर साधारण ३ इंचाचं काहीतरी चिकटलेलं होतं. मातकट रंग, पुढे पायांच्या दोन जोड्या आणि मागे २ जोड्या. मध्ये ब्रिजसारखं अधांतरी सिलिंड्रीकल. फोटो काढायला विसरले. ते फारशी हालचाल करत नव्हतं पण मधला ब्रिज थोडा कमान व्हायला सुरुवात झाली होती. मी पटकन ते अख्खं पान तोडून फेकून दिलं.

काय होतं ते? परत आलं तर काय करु? माझा कढिलिंबऽऽ Sad

अश्विनी, तो फुलपाखराचा कोष होता. कोष झाल्यावर त्याने झाडाचे काही नुकसान केले नसते, पण आठवडाभराने डोळ्यासमोर त्यातून पाखरु बाहेर येताना दिसले असते.
अळ्यांपैकी बर्‍याचश्या अळ्या पक्षी खातात काही अळ्याच कोषावस्थेपर्यंत तग धरु शकतात.

शांकली, कालच बेस्ट ऑफ नेचर हि सिडी बघत होतो. आठवण आलीच. मग सविस्तर लिहितो.

एवढा लांबलचक आणि लोळीसारखा पायवाला कोष असतो? हम्म्म. मी कधीच पाहिला नव्हता म्हणून समजले की काहीतरी भयानक कीड आली आहे. अरेरे, उगाच काढून टाकलं. फुलपाखरु बाहेर याचची वेळ साधता आली पाहिजे ना?

अश्विनी माझ्या माहेरी कृष्णकमळाची वेल होती. त्यावर प्रत्येक पानावर हे कोष असायचे. त्याच्या मांडवाखालून सावधतेने जायला लागायचे. मग काही दिवसांनी फुलपाखरे बागडताना दिसायची.

अरे, हे आमच्या कडेही होते.... खुप होते. गणेशवेल लावली होती त्यावर होते. आम्ही ते सगळे काढून टाकले होते.

जागू, अगं ते ऑर्कीड जंगली आहे, मागच्यावर्षी पुरंदर किल्ल्यावर गेले होते तेव्हा माकडांच्या उड्यांमुळे ही ऑर्कीड असलेली आंब्याची फांदी तुटली होती, तीच आणून लावली.. यावर्षी मस्त फुलली होती..

दिनेशदा, ती कसली सी डी आहे? अटेंबरो साहेबांची आहे का? जरा डीटेल्स द्याल का?
माझ्याकडे १/२ वाईट बातम्या आहेत.
पहिली म्हणजे माझं कलिंगड..... ती वेल वाळून गेलीये....अन्न-पाणी वर्ज्य केलंय त्यामुळे पूर्ण सुकून गेलीये........पण कलिंगड मात्र अजून हिरवं आहे,वाढ झाली नाहीये.
साधना,तुझ्याकडची काय खबरबात आहे गं?
दुसरी म्हणजे, सारंग सोसायटीपासच्या मुक्तांगण-बाल-रंजन केंद्राच्या आवारातील पिवळ्या तबेबुयाचे झाड तोडलंय.
बर्‍याच दिवसांनी मी तिथे गेले आणि ती जागा सुनी-सुनी......एकदम लक्षात आलं की आपला तबेबुया नाही तिथे.........
का तोडला तो? कुणाच्याही मधे येत नव्हता तो, का असं वागतात लोकं?
मला माहितीये की हे निरर्थक आणि अनुत्तरित प्रश्न आहेत.पण तरी मनाला आणि बुद्धीला ते पटत नाही.

जागू,
माझ्याकडे कृष्ण्कमळाच्या वेलीवर पैसा ह्या अळीसारख्या खूप अळ्या आणि मुंगळे असायचे.
सारिका,
ऑर्किड मस्त वाढलंय हं! पुरंदर गडावर दुर्मिळ अशी फ्रेरिया ही वनस्पती सापडते. वज्रगडाकडे जातानाच्या वाटेवर दिसते ती. आणि साधारणतः याच म्हणजे सप्टेंबर मधे (कधी कधी हवामान आणि पावसाच्या मानावर आगे-मागे पण होऊ शकेल) फुलते.

दिनेशदा,
ऑर्किड्स बद्दल मला माहित नव्हतं,छान माहिती मिळाली.
(फोटोत ऑर्किड्स झाड मात्र नीट दिसलं नाही, का लपवल माहीत नाही.)

गणपतीला गावाकडे दुर्वाबरोबर रोज आगाड्याचीही २-४ लहान काड्या/देठ वाहत होतो, ते का अजुनही माहीत नाही,(तुम्ही नक्की सांगाल) या काळात हा आगाडा सर्वत्र खुप उगवलेला,बहरलेला दिसतो
जागु,
तुमचा हाही लेख अजुन वाचायचा राहिला आहेच ...
शांकली,
तुम्हाला खुप दिवसांनी या पानांवर पाहिलं, काही लोकांना झाडे,फुले याबद्दल काहीही ज्ञान नसतं, काहीच वाटत नाही म्हणुन तर अनेक दुर्मिळ अशी झाडे तोडली जातात
हे एक काम इथे राहुन गेलं होतं....आठवण म्हणुन
गणपती गेले गावाला,चैन पडेना आम्हाला !

मानुषी, त्या निळ्या कमळाला मराठीत/कोंकणीत साळकं म्हणतात का? पण मला वाटतं साळकांना इतक्या पाकळ्या नसतात....

सारीका हो ग तु म्हणाली होतीस.

शांकली अग हल्ली तर आमच्याकडे आख्खे डोंगरच पोखरताहेत दगड मातीसाठी. त्याच्या विरोधात फार कमी लोक उभी राहतात त्यामुळे काहीच होउ शकत नाही.

अनिल नक्की वाचा.

Pages