निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आज सुट्टी आहे. घरीच आहे.
मानुषी ती बदके आहेत ह्यात काही वादच नाही.

पनवेलच्या पॅनारॉमिक रेसॉर्ट मध्ये मला खालील बदक सापडले.

हया फोटोचे निरिक्षण करा. सकाळची कवायत करत आहेत का ही? सगळ्यांनी एकच पोझ दिली आहे.

हे पांढरे शुभ्र बदक

हा थोडा वेगळा होता त्यामध्ये.

मी मागच्या पानावर सूर्यपक्षाचा जो फोटो दिला होता त्याबद्दल लिहायचे राहिले.
हि न ऊमलणारी जास्वंद आपण लहानपणापासून बघतोय. इथे तिची फुले किंचीत उमलतात पण तोंड मिटलेलेच राहते. नीट बघितल्यावर हे कळेल कि पुंकेसर बाहेरच आहेत.
पण मग परागीवहनासाठी काय सोय आहे ? जर साखरपाणी फुलाच्या देठाकडच्या भागात उपलब्ध असेल तर तिथपर्यंत पोहोचणारी जीभ फक्त हमिंग बर्ड कडे असणार आणि एका खास प्रकारच्या पतंगाकडे.
शिवाय त्या बाजूला पक्ष्यांसाठी आधाराची / बसायची काही सोय नाही. त्यामुळे हवेत अधांतरी राहु शकणारे हे दोघेच परागीवहन करु शकतील.
त्यावेळी त्यांच्या डोक्यावर परागकणांचा शिडकावा होणार.
सूर्यपक्ष्याकडे लांन चोच असली तरी तेवढी लांब जिभ नाही. शिवाय तो ज्या पोझिशनमधे आहे, ती त्याने शोधलेली आहे. फुलाला त्याने त्या बाजूने मध घ्यावा अशी अपेक्षा नाही. कारण त्या जागी बसल्यावर त्याच्या डोक्यावर परागकण शिंपडणे शक्य नाही.
म्हणजे सध्या या स्पर्धेत सूर्यपक्षाने बाजी मारलीय. साखरपाणी तर मिळतेय पण परागवहन करायची जबाबदारी नाही.
यापुढे फुल काय करेल. कदाचित बाकिच्या जास्वंदींसारखे पूर्ण उमलेल, किंवा कधीकाळी जास्वंद ज्या सुंगधासाठी लोकप्रिय होती (आता तो अजिबात नसतो) तो परत निर्माण करेल. पाकळ्या देठाकडे जास्त मजबूत करेल. अर्थात त्याला काही शतके लागतील !!!

जागू, ती बदके पंखाना तेलपाणी करताहेत. त्यांच्या पायाजवळ खास तेलग्रंथी असतात. तिथले तेल घेऊन ती चोचीने पिसांना चोळतात. म्हणजे ती पिसे वॉटरप्रुफ राहतात.

दिनेशदा, पण अशी कितीशी पिसं ऑइलिंग करणार? चोच सगळ्या पिसांपर्यंत पोहोचत नसेल ना?

जागू, तुम्ही दोघी फक्त या बाफवरच भेटता म्हणून विचारलं गं. अडाणीपणा उघडा पाडण्यापेक्षा मी रोमातच असते इथे पण तुम्ही दोघी दिसलात तर बरं वाटतं Happy

जेवढी पिसे पाण्यात भिजतात, तेवढ्या पिसानांच करतात. पोटकडच्या पिसांची सोय त्या ग्रंथीमार्फतच होते.

अडाणीपणा उघडा पाडण्यापेक्षा मी रोमातच असते

अगं तु तुझा अडाणीपणा उघडा केला की इतरांना कळते की आपणही तुझ्याइतकेच अडाणी आहोत, फक्त आपण अडाणी आहोत हे जाहीर करायची हिंमत आजवर केली नव्हती किंवा अडाणी आहोत हे लक्षातही आले नव्हते. Happy

कॉलेजात असताना एकदा मी मॅथ्सच्या तासाला एक प्रश्न विचारलेला. मला विचारताना वाटत होते आता सगळे हसतील कारण माझ्या मते तो प्रश्न अगदी बेसिक होता आणि सगळ्यांना ती माहिती असणार आणि फक्त मीच अडाणी असणार. तरीही सरांनी खुप डिटेलमध्ये समजावले. आश्चर्य म्हणजे तास संपल्यावर कमीतकमी ७-८ जणांनीतरी मला मुद्दाम भेटुन 'बरे झाले तु विचारलेस, आम्हालाही कळले नव्हते' हे सांगितले. Happy तेव्हा मला कळले की माझ्याइतके अडाणी अजुन भरपुर आहेत फक्त ते तोंड उघडत नाहीत. Happy

वाघळ मी खाल्ल आहे. पण सुकवलेलं. माझ्या बाबांचा फेवरेट. मला फारसा नाही आवडला. पण मासा असणं हे पुरेस आहे माझ्यासाठी Happy

आज उलटी गंगा, चक्क जागूला चातकाकडून भेट !!!

हा किस्सा निसर्गासंबंधात नाही, (कि आहे ?) पण साधनाच्या पोस्ट वरुन आठवले. हा किस्सा आमच्या प्राध्यापकांनी सांगितला होता.

आपल्या जून्या कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्ट मधे अनेक कलमे, स्त्री, बालक आणि वेडा (वूमन, मायनॉर आणि ल्यूनॅटिक) यांच्यासाठी सामायिक आहेत. ते वर्गात शिकवल्यावर प्राध्यापक नेहमी सांगत असत कि या तिघांना एकत्र का गणले गेले याची कल्पना नाही.
विद्यार्थ्यांना पण काही सांगता यायचे नाही. पण एका वर्षी एक विद्यार्थिनी उभी राहून म्हणाली, "सर कारण अगदी सोप्पं आहे.
स्त्रीला या दोघांबरोबरच रहावे लागते, कारण एक तिचे बालक असते तर दुसरा नवरा !!"

साधनाला अनुमोदन. अश्विनी अग तु ज्या विचारशील त्या आम्हाला पण माहीत नसतील आणि त्यातुनच सगळ्यांना माहीती मिळेल.

चातक दुसरा शार्क आहे का ? पहिला कोणता आहे. ?

पहिला वाघळाचीच एक जात आहे असे वाटतेय.

मी बेबी शार्क खाल्ल्लाय पण एवढा मोठा नाही खाल्लाय.
चातकमहाराजांची मज्जा आहे. आम्हालाही बोलवा. सोबत जागुलाच घेऊन येऊ, म्हणजे सगळ्या सोयी होतील. (मला जेवण बनवायचा कंटाळा आहे Happy )

स्त्रीला या दोघांबरोबरच रहावे लागते, कारण एक तिचे बालक असते तर दुसरा नवरा !!"

एक स्त्रीच जाणु शकते दुसरीचे त्रास Happy

एक स्त्रीच जाणू शकते दुसरीचे त्रास!
एकंदरीत सर्व मत्स्याहारींची मजा चाललेली दिस्ते. चालू दे!
साधना तुला मोदक!

चातक दुसरा शार्क आहे का ? >> हो...'शार्क' आणि 'हॅमर शार्क' (पसरट तोंड असलेला).

पहिला साधनातै म्हणते त्या प्रकाराचा असावा...

आणि मोठ्या शार्कची चव मोठ्या हॉटेलातच (५/७ Star) चाखायला मिळेल.... (जी मी चाखली नाहीय :फिदी:)
१००किलो पर्यंतची शार्क एक-दोन दा आणली होती....

त्याहुन जास्त वजनाची शार्क रिटेल मध्ये म्हणजे 'वन पिस' मिळत नाही....... त्यांची वजनदार 'शेपुट' मिळते. तिचेच वजन ५ किलो पर्यंत असते.

वरील सर्व मासे (८०-९०शार्क) ५०० ते १ टन वजना पर्यंतचे आहेत ....यांची बोली लावली जाते.
मी जो पर्यंत तिथे होतो तो पर्यंत १.०५ लाख दिर्हाम्स (१२ लाख रुपयांहुन जास्त) ची बोली चालु होती...... (वेळ रात्रीचे११.३०)

महीन्यातुन एकदा तरी हा बाजार भरतोच..... ( एकाच वेळी मोठ्या संख्येत इतक्या वजनाची मासळी मिळवणे....याचा समुद्रावर काहीनाकाही विपरीत परीणाम होतच असेल ना...?)

ओमानमधे, ओमानी किंग फिश (आणि अर्थातच ओमानी क्वीन फिश) पण मिळायचा. त्याची एक तुकडी, आपल्या कपबशीमधला बशीच्या आकाराची असायची. तो फार चवदार असे, (असे माझे खाणारे मित्र सांगत असत.)
तसा मासा मला भारतात कधी दिसला नाही.

आता हा विषय बास बरं का, जागूचा श्रावण आहे !!

यू ट्यूबवरचा होम सिनेमा बघितला का ? >> नाही....लिंक द्याला का दिनेशदा प्लिज...!!

रच्याकने... ही मृत 'हॅमरशार्क' माश्याला हाताळताना काढलेली चित्रफित. (वेळ:२मिनिटे)
http://www.youtube.com/watch?v=4LguH9iSErE

चातक,
तिकडे मासे तसे महाग असतील ना ?>> हो...किलोने विकतात.

थोडक्यात सुरमई/हलवा ३०/-किलो (३५०रु), पापलेट३५/-किलो (४२०रु),
सर्वांत स्वस्त मासा शेरी १२/- किलो ( १४० रु किलो. तरी महाग :अरेरे:)

दिनेशदा माझा श्रावण नाही मी मासे खाते फक्त सध्या मटण बंद आहे. दुसर्‍यांचा विचार करुन मी टाकत नाही सध्या रेसिपीज एवढच.

चातक भारी माहीती.

मानुषीने फोटो दिलेली बदके मॅलार्ड ची मादी आहे MALLARD (Female) .
मॅलार्ड मेलची मान अतिशय सुंदर गर्द हिरवी आणि चमकदार असते.

चातक ते फोटोमधे शार्क आहेत ना? शार्क ना इतक्या मोठ्या प्रमाणात पकडुन खातात? काही प्रकारचे शार्क दुर्मिळ प्रजातीं मधे येतात.
कालच oceans ओशन्स नावाची एक मुव्ही पाहिली त्यात शार्क बद्दल एक क्लिप होती. त्यांचे पंख आणि शेपुट कापुन त्यांना पाण्यात टाकुन देतात. कारण फक्त पंख आणि शेपुट खायला वापरतात म्हणे. मग बिचारा पोहोता न येणारा शार्क समुद्र तळाशी आक्रोश करत रहातो Sad त्या ओरडणार्‍या शार्कला बघवत नव्हतं.

मग बिचारा पोहोता न येणारा शार्क समुद्र तळाशी आक्रोश करत रहातो त्या ओरडणार्‍या शार्कला बघवत नव्हतं.

माणसे काय भयाण आहेत....... Angry

थोडक्यात सुरमई/हलवा ३०/-किलो (३५०रु), पापलेट३५/-किलो (४२०रु),
सर्वांत स्वस्त मासा शेरी १२/- किलो ( १४० रु किलो. तरी महाग

म्हणजे अजिबात महाग नाहीत किंवा इथे आहे तेवढेच महाग आहेत. इथे नेरुळ्/दिवाळे गावात मोठी सुरमई/हलवा इ. मंडळी ४०० रु किलो या भावानेच जातात.

दिनेश तुम्ही लिहिलेले वाचुन इतकी उत्सुकता लागलीय.. येत्या भेटीत सिडी इथे आणा. आम्ही सर्क्युलेटींग लायब्ररीसारखी सगळेजण आलटुन पालटुन बघुन घेतो मग त्याच्या पुढच्या भेटीत परत घेऊन जा Happy

कालच oceans ओशन्स नावाची एक मुव्ही पाहिली त्यात शार्क बद्दल एक क्लिप होती. त्यांचे पंख आणि शेपुट कापुन त्यांना पाण्यात टाकुन देतात. कारण फक्त पंख आणि शेपुट खायला वापरतात म्हणे. मग बिचारा पोहोता न येणारा शार्क समुद्र तळाशी आक्रोश करत रहातो >>> Sad शार्क खरंच ओरडतो का? (सिरियसली विचारतेय). असं त्याचे हात पाय तोडून इम्मोबिलाईझ करुन टाकण्यापेक्षा मारुनच टाकायचं ना. टॉर्चर आहे हे Sad

Pages