निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले आहे. माझी लेक मला तर धमकी देत होती आता फेसबुकवर ब्रेकिंग न्युज टाकते माझी आई अमुक अमुक वर्षांची झाली म्हणुन >>>>:हहगलो: Happy

ऑगस्ट मध्ये खुप म्हणजे खुपच वाढदिवस असतात.>>>>अगदी अगदी Happy आमच्या कॉलेजगृपमधील आम्हा चार जिवलग मित्रांचा वाढदिवस २३, २४, २५, २६ ऑगस्टला असतो. Happy

बहुतेक झाडे बीप्रसारासाठी काही ना काही उपाय योजतातच.
कधी मधुर फळे तर कधी वाऱ्यावर उडण्यासाठी पंख. कधी पाण्यात तरंगण्यासाठी होडी.
आणि असे काहीच नसले तर निदान शेंगा तडकून बिया उडवल्या / फेकल्या तरी
जातात

दिनेशदा,
तुम्ही नेहमी सांगत असलेल्या निसर्गातल्या या अशा आणि इतर अनेक गोष्टींबद्दल मला तर काही एक गंधही नव्हता,लहानपणापासुन गावाकडे,रानात,नदीकाठी अनेक निरनिराळ्या वनस्पती, झाडे,फुले माझ्या अगदी जवळुन पाहण्यात आल्या आहेत पण बहुतेकांची साधी नावे देखील माहीत नाहीत,एक कारण घरी बोली भाषा कन्नड आणि शाळा आणि सगळं वाचन मात्र मराठी त्यामुळे सगळा सावळा गोंधळच ! आता मात्र (गावाकडे,शेतात बांधावर) दिसणार्‍या प्रत्येक झाडाची,फुलांची माहिती करुन घ्यावी, ती स्व:ताला असावी, मुलांना, सगळ्यांना सांगावी असं मनापासुन वाटतं.
तुमचे पुन्हा एकवार मनापासुन आभार !
:स्मितः

जिप्सीला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा !
Happy

निकिता,
तुम्हालाही शुभेच्छा !
Happy

ऑगस्ट मध्ये खुप म्हणजे खुपच वाढदिवस असतातत्या माझा एक आहेच !

माझ्याकडुनही सगळ्या ऑगस्ट वाल्यांना वाढदिवसाच्या एकत्रीत हार्दिक शुभेच्छा Happy

जागुकडे आज स्पेशल असणार म्हणजे.......

आणि योग्याकडेही.

योग्याची बहिण माबोवर आली तर जागुला सॉलिड कॉम्पिटीशन निर्माण होईल. योग्या तु जरा काहीतरी कर आणि तिला आण इकडे.

(जागुला कॉ. झाली तर होऊदे, आम्हाला मात्र त्या निमित्ताने मस्त मस्त पाकृ पाहायला मिळतील (नी वशिला वाल्यांना खायलाही Wink )

अनिल, मलापण ही जाण खुपच उशीरा आली. आणि आता मात्र असे जाणवत राहते कि अजून आपल्याला कितीतरी माहित करुन घ्यायचेय. निसर्गात तर पावलोपावली गूढ कोडी आहेत आणि सोपी उत्तरेही !

सगळ्यांचे धन्यवाद.

जिप्सिची बहीण जर माबोवर आली तर कॉम्पिडिशन नाही होणार साधना ती माझी गुरु असेल जसे आपल्या सगळ्यांचे दिनेशदा आहेत तशी.

सर्व निसर्गमित्रांना,
सुप्रभात ! नमस्कार !
मला वाटतं, देशी वृक्षांचा इतका सारा औषधी उपयोग सगळ्यां नक्षत्रांमध्ये केला जातो,आपण करु शकतो हे वाचुन थक्क झालो, आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान वाटला,काळाच्या ओघात माणुस पोटापाण्यासाठी (?) मात्र या अनमोल वृक्षांपासुन लांब जातांना दिसतोय, जे जवळ आहेत त्यातल्या खुप कमी लोकांना या बद्दल माहिती आहे

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=204683&boxid=194912328&pgno=1&...
Happy

अनिल छान आहे तो लेख.पण अशी औषधे देण्यासाठी जाणकार माणूसच पाहिजे.
आपल्याला तर झाडे ओळखतासुद्धा यायची नाहीत.
तसेच तोडली फ़ांदी आणि केले औषध असे होत नाही. झाड नेमक्या वयाचे, निरोगी
असावे लागते. त्याचे योग्य ते अंग सिद्ध करुन घ्यावे लागते.
आपल्या पूर्वजांनी अनेक शतके प्रयोग करुन हे ज्ञान मिळवले होते. आपण मात्र
तो वारसा पुढे नेण्यास समर्थ आहोत का, हाच मुद्दा आहे.

हुय्मन प्लेनेट मीही पाहायला सुरवात केलीय. परवा सुरवात पाहिली थोडिशी ज्यात तो माणुस फक्त डोळ्यावर चशमा लावुन समुद्रतळाशी उतरतो ते.. प्रोफेशनल्स काय प्रचंड काळजी घेतात, फुफ्फुसांवर दाब येईल, हृदयावर दाब येईल.. यँव नी त्यँव... इथे ज्यांना पोटाचा प्रश्न पडलाय ते बिन्दास जीवावर उदार होतात. एनीवेज, मी पाच मिनिटेच पाहिली. माझ्याकडे स्ट्रीमिंगचा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे सलग दिसत नव्हते. डाऊनलोड करुन नीट दिसते का ते पाहायला पाहिजे.

आपण मात्र तो वारसा पुढे नेण्यास समर्थ आहोत का, हाच मुद्दा आहे.

असमर्थच आहोत ना.. कारण हे ज्ञान ज्याच्यात लिहिलेले ते आपले ग्रंथ शेकडो वर्षांच्या आक्रमणात जळुन गेले. जिथे मौखिक माहिती होती तिथे त्यांना 'इतरांना सांगितले तर परिणाम नष्ट होतील' ही भीती घातलेली. त्यामुळे माहिती त्या कुटूंबातच राहिली आणि काही ठिकाणी पुढच्या पिढीला त्यात रस न वाटल्यामुळे ती ज्ञानगंगा खंडित झाली. आता फार तुटपुंजे ज्ञान शिल्लक राहिले असावे. आणि जे काही आहे ते आजच्या दुषित वातावरणात योग्य परिणाम देण्यास पुरेसे पडत नसावे. ज्यांच्याकडे हे तुटपुंजे ज्ञान आज आहे ते लोकांना लुटताहेत. बालाजी तांबेंच्या लोणवळ्याच्या आश्रमातल्या चुर्ण व भस्मांच्या किंमती ऐकल्यावर रोग परवडला असे वाटायला लागते. Happy

यू ट्यूबवरचे भाग पूर्ण नसावेत. अनेक भागात बीबीसी च्या फोटोग्राफर्सनी त्या माणसांसारखे प्रयत्न करुन बघितले आणि आपली असमर्थता अगदी मोकळेपणी कबूल केलीय.
साधना सकाळच्या वेळी, ते भाग आपल्याकडे लवकर डाऊनलोड होतील असे वाटतेय.

आणि झाडे ओळखायच्या बाबतीतच नवे तर निसर्गातले आवाज, चाहुली, संदेश ओळखायची क्षमता पण नाही राहिली आपल्याकडे आता.

दिनेशदा,
खरचं जे जुने जाणते लोक अशा काही औषधांबद्दल सर्व जाणुन आहेत, त्यांच्याकडुन ते सर्व नविन पिढीला मिळणं खुप महत्वाच आहे,त्यासाठी गावपातळीवर विषेश प्रयत्न झाले पाहिजेत

अनुमोदन !
आदरणीय अण्णांना खरंच सलाम करावासा वाटतो ..
त्यांचा दृढनिष्चय, त्याला मिळालेल यश पाहुन खुप अभिमान वाटतो, उर्मी मिळते.
इथ येऊपर्यंत या एकुण व्यवस्थेकडुन त्यांनी किती त्रास सहन केला असेल असा विचार येतो
Happy

ही कसली वेल आहे ? आमच्या कंपाउंडला आहे. फुले साधारण करंजाच्या फुलांसारखी.

दिनेशदा या बदकांना मॅंडरिन डक्स म्हणतात असं लेक म्हणत होता.
लोकहो , एक महिन्यांनी आमच्या नगरात परत आल्यावर भरपूर पाऊस झालेला दिसतोय. हवा थंड झालीये. तिथे डीसीत तर काय उकाडा होता.
घरात बरेच नारळ (५३) निघालेत. काम करणाऱ्या मुलाने बरेचसे सोलून ठेवलेत. गणरायांच्या आगमनासाठी मोदकांचं सारण करून ठेवणार आहे.
उरलेल्या नारळांच्या वाटपाचं पहावं लागेल.
वरच्या सिटाउटमधले अमांडाचे झाड (मी मध्यंतरी पिवळ्या फ़ुलांचे फ़ोटो टाकले होते) चहूबाजूंनी फ़ांद्या फ़ुटून बहरलंय. भरपूर कळ्या फ़ुलंही आहेत. एक बुटक्या चाफ़्याचं कुंडीतलं झाडही लाल फ़ुलांनी भरलंय. याचं बोटॅनिकल नाव वेगळं आहे. सदाफ़ुली, फ़र्नही एक महिन्यात खूपच मस्त झालंय.
खालच्या बागेतल्या पेरूलाही पानोपानी पेरू आलेत आणि गेटपाशी छोट्या छोट्या लाल फ़ुलांनी एक मोठा गुच्छ बनतो ते झाड तर या गुच्छांच्या भाराने वाकलंय. याचंही नाव माहिती नाही. पण बागेत पावसाने तण आणि इतर झुडुपेही खूपच माजलीत. ती काढायला हवीत. पावसाने एक सापही निघाला. त्याला धरून पिशवीत घालून एकाकडे लांब सोडण्यास दिला. काही काही लागवडही(उदा. दुधी, कारलं वगैरे) करायचं डोक्यात आहे.

मानुषी.. लकी आहेस.. मजा करुन घे मिळतंय तोवर.. Happy

काल वाचनायलात माहेरचा अन्नपुर्णा विषेशांक दिसला. म्हटले आमच्या अन्नपुर्णाबाई नी बाबा नक्कीच या विशेषांकात असणार.. उघडुन पाहिल्यावर प्राजक्ता म्हात्रे, दिनेश शिंदे इ. नावे दिसल्यावर इतके बरे वाटले. आपल्या मित्रमैत्रिणींची नावे अशी छापुन आलेली पाहताना काहीतरी वेगळेच फिलिंग येते. Happy

सोबत मिनोती, श्रद्धा, चिन्मय, अल्पना, वर्षू यांचेही मस्त लेख आहेत. Happy

दिनेशदा,
तुम्ही सांगितल्या प्रमाणे लिंबावर बहुतेक वेगळ्या प्रकारची फुल्पाखरे येत आहे. बहुतेक ह्या करिता की सगळ्या अळ्या आहेत. खुप आहेत आणि वेगळ्या आहेत. काल काढुन टाकणार होते सगळ्या आणि फवारणार होते, पण म्हटलं तुम्हाला विचारु.
झाडाची पानं खात आहेत पण फारसा त्रास देत नाहीत झाडाला.

काय करु?

निकिता, ती झाडाची जूनच पाने असतात. कोष झाल्यानंतर साधारण आठवडाभरात कोषाचा रंग बदलतो, अगदी सकाळी आपल्या डोळ्यादेखत पाखरु बाहेर येते. आधी पंख मिटलेले व ओले असतात पण ते उन्हात वाळ्वले जातात. या सगळ्या प्रक्रियेचे फोटो पण काढता येतील.

मानुषी, बागेने पण, आपल्या माणसाला मिस केले असणार.

साधना, आता मी भारतात येईन, तेव्हाच बघायला मिळाणार तो अंक मला.

Pages